बांधकामाची माहिती टप्पे व प्रकार Construction Information in Marathi

construction information in marathi बांधकामाची माहिती टप्पे व प्रकार, भारतामध्ये तसेच जगामध्ये सध्या अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि मोठ मोठ्या उंचीच्या इमारती बांधल्या जातात परंतु या बांधकाम प्रकल्पामध्ये काम करत असताना त्या संबधित व्यक्तीला प्रकल्पाची माहिती हि कारसाठी डीझेलसारखी असते आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये बांधकाम आणि त्याविषयाचे प्रकल्प (construction) विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. कणस्ट्रक्शन म्हणजे मराठीमध्ये बांधकाम म्हणतात.

आणि सध्या बांधकामाचे महत्व हे मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे पाहतो ती बांधकाम क्षेत्राची देणगी आहे आणि या क्षेत्रामार्फत अनेक प्रकारचे बांधकाम केले जाते जसे कि मोठ मोठ्या इमारती, धरणे, पूल, रस्ते, रुग्णालये, मंदिरे आणि मोठ मोठी कार्यालये आणि इतर बांधकाम हे बांधकाम क्षेत्रामार्फत केले जाते.

जर एखाद्या व्यक्तीला बांधकाम क्षेत्रामध्ये पडायचे असल्यास त्या व्यक्तीला विशेष असे शिक्षण घ्यावे लागते त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील संपूर्ण माहिती मिळते आणि त्यामुळे व्यवसाय चांगल्या पध्दतीने आणि सुरळीत चालण्यासाठी मदत होते आणि या उलट तुम्हाला बांधकाम क्षेत्राविषयी काहीच माहिती नसेल आणि जर तुम्ही या व्यवसायामध्ये पडला तर तुमचा तोटा होऊ शकतो.

construction information in marathi
construction information in marathi

बांधकामाची माहिती टप्पे व प्रकार – Construction Information in Marathi

बांधकाम क्षेत्र म्हणजे काय – construction meaning in marathi

बांधकामध्ये मोठ मोठ्या इमारती, धरणे, पूल, रस्ते, रुग्णालये, मंदिरे आणि मोठ मोठी कार्यालये आणि इतर बांधकाम यांची डिझाईन करणे किंवा उभारणी करणे.

सिव्हील इंजिनीअरचे बांधकाम क्षेत्रातील महत्व – importance

सिव्हील अभियांत्रिकी हि खूप जुनी आणि खूप मोठी शाखा आहे आणि या शाखेमार्फत वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम केली जातात जसे कि रुग्णालये, रस्ते, पूल, कळावे, शाळा, महाविद्यालये, मोठी मोठी मंदिरे, धरणे आणि इतर अनेक बांधकामे. खाली आपण सिव्हील इंजिनीअरचे बांधकाम क्षेत्रातील महत्व काय आहे म्हणजेच त्याची या क्षेत्रातील कामे काय आहेत ते पाहणार आहोत.

  • कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची योजना तयार करण्यासाठी तसेच त्या प्रकल्पाची रचना करण्यासाठी लांब पल्ल्याची योजना तयार करणे त्याचबरोबर नकाशे, सर्वेक्षण अहवाल आणि इतर माहितीचे विश्लेषण करणे.
  • रुग्णालये, रस्ते, पूल, शाळा, महाविद्यालये, मोठी मोठी मंदिरे, धरणे आणि इतर अनेक बांधकामे यांची रचना करणे तसेच बांधकाम कामगारांच्या कडून त्या संबधित रचनेचे बांधकाम पूर्ण करणे तसेच त्याची देखरेख आणि दुरुस्ती करणे हे सिव्हील इंजिनीअरचे मुख्य कार्य आहे.
  • विशिष्ट प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी डांबर, क्रोंक्रीट, लाकूड किंवा स्टील या सारख्या बांधकाम साहित्यावरील चाचण्यांच्या परिणामांचे विश्लेषण करणे.
  • सिव्हील अभियांत्रिकीचे काम हे वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रामध्ये करणे आणि त्या बांधकामाची देखभाल करणे.
  • प्रकल्पाच्या नियोजन आणि जोखीम विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये बांधकाम खर्च संभाव्य पर्यावरणीय धोके, बांधकाम खर्च आणि इतर घटकांचा विचार करणे.

बांधकामाचे टप्पे कोणकोणते आहेत – process

कोणत्याही प्रकारची इमारत किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना आपल्याला एक विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते किंवा विशिष्ट टप्प्यांचा वापर करावा लागतो आणि आज आपण या लेखामध्ये ते टप्पे कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.

  • प्रथम कोणत्याही प्रकारची इमारत बांधताना किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम ( रस्ता, मंदिर, विमानतळ आणि इतर ) करताना ते असे बांधायचे या विषयी रचणा तयार करून घेतली जाते.
  • आता कोणत्याही बांधकामाचा महत्वाचा टप्पा म्हणजे मजबूत आणि कणखर असा पाया घालणे आणि हा पाया मजबूत असणे गरजेचे आहे तरच ती संबधित इमारत मजबूत बनते.
  • पाया घातल्यानंतर भिंत, कॉलम, छताचे रचना बांधून घेतली जातात तसेच खिडक्या आणि दारे बसवण्यासाठी भिंतीमध्ये साचे सोडलेले असतात.
  • आता डिझाईनप्रमाणे त्या इमारतीचा साचा तयार झाल्यानंतर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम इन्स्टॉल करून घेणे तसेच प्लंबिंग करून घेणे.
  • आता इमारतीला दारे आणि खिडक्या बसवून घेणे आणि शेवटी इमारती मधील छोटी मोठी कामे करून घेणे जसे कि फर्निचर आणि इतर काम करून घेणे.

बांधकामाचे प्रकार – types

बांधकाम हे वेगवेगळ्या हहेतूसाठी केले जाते जसे कि आपल्याला राहण्यासाठी इमारती बांधल्या जातात तसेच काही रस्ता हे बांधकाम विभागातील एक उदाहरण आहे आणि हे वाहतूक विभागामध्ये येते आणि तसेच अनेक इमारती बांधल्या जातात ज्या व्यवसायासाठी बांधल्या जातात. खाली आपण बांधकामाचे प्रकार पाहणार आहोत. बांधकामाचे एकूण दोन प्रकार आहेत ते म्हणजे निवासी बांधकाम आणि अनिवासी बांधकाम.

  • निवासी बांधकाम : निवासी बांधकाम हा बांधकामाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये अश्या इमारतींचे बांधकाम केले जाते जे राहण्यासाठी वापरल्या जातात जसे कि घर, बंगला, फ्लॅट आणि मोठ मोठे अपार्टमेंट्स इत्यादी निवासी बांधकामामध्ये समाविष्ट आहे.
  • अनिवासी बांधकाम : अनिवासी बांधकाम हा देखील बांधकामाचा प्रकार आहे आणि हे बांधकाम व्यवसाय करण्याच्या दृष्टीने बांधलेले असते जसे कि रुग्णालये, कार्यालये, हॉटेल्स इत्यादी हे अनिवासी बांधकामामध्ये समाविष्ट आहे.

बांधकामामधील वेगवेगळी क्षेत्रे – sectors

बांधकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्रे आहेत, ती कोणकोणती आहेत ती आपण खाली पाहणार आहोत.

अ.क्रबांधकाम क्षेत्र
 1बांधकाम (मुख्य)
 2वाहतूक बांधकाम क्षेत्र (रस्ता बांधकाम, रेल्वे स्थानक बांधकाम, विमानतळ बांधकाम आणि इतर वाहतूक बांधकाम)
 3धरण आणि पूल बांधकाम क्षेत्र, जल सिंचन बांधकाम क्षेत्र
 4शहरी बांधकाम क्षेत्र
 5तटीय आणि महासागर बांधकाम क्षेत्र

आम्ही दिलेल्या construction information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बांधकामाची माहिती टप्पे व प्रकार बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या construction meaning in marathi या civil contractor meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about construction in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये construction supervisor course information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!