Corn Recipes in Marathi – Corn Recipes Indian in Marathi कॉर्न रेसीपीज आज आपण या लेखामध्ये मक्क्यापासून बनणाऱ्या काही रेसिपीज पाहणारा आहोत. कॉर्न पासून भारतामध्ये अनेक रेसिपी बनवल्या जातात त्यामधील काही रेसिपी नाश्त्यासाठी बनवल्या जातात त काही रेसिपी स्नॅक्स रेसिपी बनवल्या जातात. कॉर्न पासून बनवलेल्या सर्वच रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकतात. कॉर्न रेसिपीज घरी बनवण्यासाठी खूप सोप्या आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर मग कॉर्न पासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी कश्या बनवायच्या ते पाहूयात.
कॉर्न रेसिपीज – Corn Recipes in Marathi
कॉर्न रेसिपीज – corn recipes
कॉर्न पासून खूप पूर्वीपासून रेसिपी बनवल्या जातात म्हणजेच कर्ण पासून काही पारंपारिक रेसिपी बनवल्या जातात तर सध्या कॉर्न पासून अनेक नवीन रेसिपी बनवल्या जातात. रेसिपीज घरी बनवण्यासाठी खूप सोप्या आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्न रेसिपीज कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
कॉर्न उपमा रेसिपी – corn upma recipe in marathi
कॉर्न उपमा हा मक्क्याचे दाने असणारे कणीस खिसून त्याचा गाभा काढून घेतला जातो आणि त्याला आपण उपम्याला जशी फोडणी दिली जाते. चला तर कॉर्न उपमा कसा बनवायचा ते पाहुयात.
- २ ते ३ वाटी मक्क्याचा दाण्यांचा खीस / पेस्ट.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- १/२ चमचा मोहरी.
- १/४ चमचा जिरे.
- ५ ते ६ पाने कडीपत्ता.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/३ चमचा हळद.
- ३ ते ४ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- कॉर्न उपमा बनवताना प्रथम जर तुम्हाला खीस हवा असेल तर मक्क्याची कणसे सोलून ती तशी खिसून घ्या आणि जर पेस्ट हवी असेल तर मक्क्याचे दाने काढून त्याची मिक्सरवर मोठी मोठी पेस्ट करा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्य्मध्ये तेल घाला तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे टाका जिरे चांगले फुलले कि लगेच त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा घाला आणि कांदा तेलामध्ये ५ मिनिटे किंवा त्याला थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- आता यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये मक्क्याचा खीस घाला आणि खीस ३ ते ४ मिनिटे मिक्स करा आणि तेलामध्ये भाजा.
- आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्स करा आणि त्यावर झाकण लावून ५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- शिजवल्यावर ते सुटते बनेल. आता त्यामध्ये कोथिंबीर घाला आणि मिक्स करून गरमागरम सर्व्ह करा.
मसाला कॉर्न रेसिपी – masala corn recipe in marathi
मसाला कॉर्न हि एक भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे जी लोक आवडीने खातात. चला तर मग मसाला कॉर्न रेसिपी कशी बनवायची ते पाहुयात.
- १ वाटी उकडलेले मक्क्याचे दाने.
- १/२ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा बटर.
- १/३ चमचा चाट मसाला.
- १ चमचा लिंबू रस.
- १/२ चमचा साखर.
- मीठ ( चवीनुसार ).
- प्रथम उकडलेले मक्क्याचे दाने एका भांड्यामध्ये घाला.
- मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, बटर, चवीनुसार मीठ आणि साखर, लिंबू रस आणि चत मसल घाला.
- आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा आणि ते सर्व्ह करा.
कॉर्न टिक्की रेसिपी – corn tikki recipe in marathi
कॉर्न टिक्की हि एक सोपी रेसिपी आहे जी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो. चाल तर मग कॉर्न टिक्की कशी बनवायची ते पाहूया.
- १ वाटी कॉर्न पेस्ट.
- २ उकडलेले बटाटे.
- २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- १ चमचा मैदा.
- २ मोठे चमचे ब्रेड क्रम्प्स
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
- कॉर्न टिक्की बनवताना प्रथम उकडलेले बटाटे सोलून ते मॅश करून घ्या.
- आता एका मिक्सिंग बाऊल मध्ये कॉर्न, मॅश केलेला बटाटा, हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या, मीठ, मैदा आणि कोथिंबीर घाला आणि मिक्स करा आणि त्याची कानीन मळल्या सारखे पीठ माळून गोळा बनवून ठेवा.
- आता ब्रेड क्रम्प्स एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- आता आपण बनवून ठेवलेल्या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घ्या आणि त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळून घ्या.
- आता तवा गरम करा आणि त्यावर तेल टाकून मावतील तेवड्या टिक्की घाला आणि त्याला तेल सोडून ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. ह्या सर्व टिक्की दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या.
- अश्या प्रकारे सर्व टिक्क्या भाजून घ्या.
- आणि गरमागरम टिक्की टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या Corn Recipes in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कॉर्न रेसिपीज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या corn soup recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि masala corn recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये corn tikki recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट