झटपट नाश्ता रेसिपी मराठी Breakfast Recipes in Marathi

Breakfast Recipes in Marathi – Maharashtrian Recipes for Breakfast in Marathi ब्रेकफास्ट रेसिपीज मराठी सकाळचा नाश्ता रेसिपी आपल्याला रोज प्रश्न पडतो कि घरातील सर्व लोकांच्यासाठी काय नाश्ता बनवायचा आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात जसे कि एकाला महाराष्ट्रीय नाश्ता आवडतो जसे कि पोहे, उपमा तर एकाला दक्षिण भारतीय नाश्ता आवडतो जसे कि डोसा, इडली, आप्पे इत्यादी. पोहे, शिरा, उपमा हे झटपट zatpat breakfast recipes in marathi आणि गडबडीच्या वेळी बनवले जाणारे नाश्त्याचे प्रकार आहेत. तुम्ही जर सकाळी जॉबसाठी घरातून लवकर बाहेर पडत असाल तर गडबडीचे वेळी आपण घरातल्या इतर लोकांच्यासाठी पोहे, उपमा यासारखे पदार्थ बनवू शकतो.

कारण हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि हे खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनणारे पदार्थ आहेत तसेच आपल्याकडे पुरेसा वेळ असेल तर आपण आप्पे, डोसा किंवा इडली यासारखे पदार्थ बनवू शकतो. चला तर मग आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या नाश्त्याच्या काही रेसिपी पाहूयात.

breakfast recipes in marathi
breakfast recipes in marathi
अनुक्रमणिका hide
1 झटपट नाश्ता रेसिपी मराठी – Breakfast Recipes in Marathi

झटपट नाश्ता रेसिपी मराठी – Breakfast Recipes in Marathi

सकाळचा नाश्ता रेसिपी – Morning Nasta Recipe in Marathi

आपल्याला रोज रोज एक प्रकारचा पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊन कंटाळा येतो म्हणून आज या लेखामध्ये आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी पाहणार आहोत.

कांदे पोहे रेसिपी – kande pohe in Marathi

पोहे हि रेसिपी भारतामध्ये प्रसिध्द असलेला एक पदार्थ आहे जो लोक नाश्ता म्हणून खातात. पोहे हा सर्वात सोपा आणि कमी वेळेत तयार होणारा सकाळच्या नाश्त्याचा प्रकार आहे. चला तर मग आपण कांदे पोहे हि नाश्त्यासाठी बनवली जाणारी दिश कशी बनवायची ते पाहूयात.

कांदेपोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kandepohe 

 • २ वाटी पोहे.
 • १ मोठा कांदा ( चौकोनी आणि उभा चिरलेला ).
 • २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
 • ७ ते ८ कडीपत्याची पाने.
 • १/२ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे.
 • १ चमचा मोहरी.
 • १/२ चमचा जिरे.
 • हळद ( आवश्यकतेनुसार ).
 • मीठ ( चवीनुसार ).
 • साखर ( चवीनुसार ).
 • १ मोठा चमचा खवलेले ओले खोबरे.
 • चिरलेली कोथींबीर.
 • १ मोठा चमचा.

पोहे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make pohe recipe 

 • पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम २ वाटी पोहे घ्या आणि ते चांगले निवडून घ्या.
 • मग एक कांदा घ्या आणि तो चौकोनी चिरून घ्या त्याचबरोबर हिरव्या मिरच्या चिरून घ्या, कडीपत्त्याची पाने काढून घ्या.
 • आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला.
 • तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
 • मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि हे मिश्रण २ ते ३ सेकंद हलवा आणि मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो चांगला ३ ते ४ मिनिटे भाजा.
 • कांदा टाकल्यानंतर थोड्याच वेळाने भाजलेले शेंगदाणे टाका आणि ते देखील कांद्यासोबत आणि थोडे चांगले भाजून घ्या.
 • कांदा भाजण्याच्या ३ ते ४ मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये आपण निवडून ठेवलेले पोहे एक भांड्यामध्ये घ्या आणि ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यामधील पूर्ण पाणी काढून टाका.
 • मग त्यामध्ये हळद आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये भिजवलेले पोहे आणि त्यावर थोडी साखर घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि कढईवर झाकण घालून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्यावे आणि ते डायरेक्ट सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून त्यावर लिंबूची फोड ठेवून सर्व्ह करा.

उपमा रेसिपी – upma recipe in marathi 

उपमा हा पदार्थ रव्यापासून बनवला जाणारा एक पदार्थ आहे जो सहसा लोक सकाळच्या नाश्त्यासाठी बनवतात. आपली जर सकाळी कामावर जायची गडबड असेल तर आपण आपल्या इतर घरातील लोकांच्यासाठी हा झटपट बनणारा उपमा बनवू शकतो. आता आपण पाहूयात उपमा कसा बनवायचा.

उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rawa upma 

 • १ वाटी रवा.
 • २ वाटी पाणी.
 • २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
 • १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
 • १ छोटा टोमॅटो ( चिरलेला ).
 • १ चमचा उडदाची डाळ.
 • १/२ मोठा चमचा तेल किंवा तूप.
 • १/२ चमचा मोहरी.
 • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • कोथिंबीर.

उपमा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make rava upma 

 • सर्वप्रथम रेसिपीसाठी वापरला जाणारा रवा ताटामध्ये घेवून चांगला निवडून घ्या.
 • आता गॅसवर कढई ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि त्यामध्ये रवा घालून ४ ते ५ मिनिटे चांगला भाजून घ्या ( टीप : रवा चांगला भाजला नाही तर आपला मऊ आणि सुट्टा होणार नाही ).
 • कढईतील रवा भाजताना रव्याला चमच्याने सारखे वरती खाली करा.
 • आणि हे करत असताना दुसरीकडे एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घाला आणि ते उकळून घ्या.
 • आता भाजलेला रवा एका ताटामध्ये काढून त्या कढईमध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि आणि कडीपत्ता घाला आणि ते २ सेकंद हलवा मग त्यामध्ये कांदा घाला आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा.
 • एकदा कांद्याला लालसर रंग आला कि त्यामध्ये डाळ टाका आणि ती मिक्स करून थोडा वेळ भाजा.
 • त्यानंतर आता यामध्ये उकळलेले पाणी घाला आणि ते सर्व मिश्रण एकत्र करा आणि त्याला एक उकळी आणा. पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये भाजलेला रवा, मीठ ( चवीनुसार ) आणि टोमॅटो घाला आणि कढईवर झाकण घालून त्याला २ ते ३ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या त्यामुळे त्यामधील रवा फुलेल.
 • शेवटी गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालून ती मिक्स करा आणि उपमा एका प्लेटमध्ये घालून त्यावर बारीक शेव घालून त्यावर एक लिंबूची फोड ठेवून सर्व्ह करा.

आप्पे रेसिपी – appe recipe in marathi

आप्पे हा पदार्थ दक्षिण भारतातील खासियत असून या पदार्थाचा शोध देखील बहुतेक त्या भागातच लागला आणि त्या ठिकाणी हा पदार्थ वारंवार बनवला जाणारा पदार्थ आहे. आपण रोज रोज नाश्त्यासाठी  पोहे आणि उपमा बनवतो आणि हे रोज खाण्यासाठी कंटाळवाणे वाटते त्यावेळी तुम्ही आप्पे हि रेसिपी नाश्त्यासाठी  बनवू शकता ज्यामुळे काही वेगळे खाल्ल्याचा आनंद मिळतो.

आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make appe recipe 

 • १ वाटी तांदूळ.
 • १/२ वाटी उडदाची डाळ.
 • पाव वाटी चना डाळ.
 • २ चमचे पोहे.
 • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
 • २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
 • १ मध्यम आकाराचा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
 • २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

आप्पे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make appe recipe 

 • तुम्हाला माहित असेलच कि जर आपल्याला आप्पे करायचे असतील तर त्याचे पीठ आदल्या दिवशी रात्री करून ठेवावे.
 • सर्वप्रथम जे आपण साहित्यामध्ये तांदूळ, उडीदडाळ आणि चणाडाळ सांगितली आहे ती चांगली स्वच्छ निवडून घ्या.
 • मग हे सर्व एका स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग त्यामध्ये थोडे म्हणजे सगळ्या डाळी भिजतील असे पाणी घाला आणि त्यामध्ये २ चमचे पोहे घालून ते चांगले एकत्र करून ते २ ते ३ तासांच्यासाठी भिजवून ठेवा.
 • २ ते ३ तासांनी ते चांगले भिजल्यानातर ते थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर बारीक करून घ्या जर ते बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घालू ते पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.
 • ही प्रक्रिया सर्व तांदूळ, उडीदडाळ, चनाडाळ आणि पोहे या मिश्रणासाठी करा आणि हे बारीक झालेले पीठ एका मोठ्या आणि खोल डब्यात ठेवा जेणेकरून पीठ फसफसल्यानंतर ते बाहेर पडणार नाही किंवा येणार नाही.
 • मिक्सरवर बारीक केलेले पीठ हे ८ ते ९ तास भिजत ठेवावे लागते आणि ८ ते ९ तासाने हे पीठ फुगून वरती आलेले दिसेल.
 • सकाळी आप्पे करताना हे पीठ चांगले हलवून घ्या आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला त्याचबरोबर चवीसाठी मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
 • आता स्वच्छ धुतलेले आप्पेपात्र घ्या आणि ते मोठ्या आचेवर गरम करण्यासाठी ठेवा एकदा आप्पे पात्र गरम झाले कि त्या तव्याच्या आप्पेच्या साच्यामध्ये तेल सोडा किंवा ब्रशने लावून घ्या आणि मग त्यामध्ये आप्पे पीठ घाला आणि त्या अप्प्यांच्या बाजूने थोडे तेल घालून ते झाकण घालून, गॅसची आच मंद करून ते चांगले खरपूस भाजा म्हणजे त्याला चांगला तपकिरी रंग येईपर्यंत भाजा. ( टीप : ते जास्त करपू देवू नका ते चांगले लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि ते दोन्ही बाजूने भाजा ).
 • ते चांगले लालसर आणि कुरकुरीत झाले कि ते चमच्याने काढा.
 • तुमचे आप्पे तयार झाले, हे तयार झालेले आप्पे आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा तसे देखील खाऊ शकतो.

इडली रेसिपी – Idli recipe recipe in marathi 

इडली हा एक भारतातील लोकप्रिय पदार्थ असून हा पदार्थ भारतीय कुटुंबामध्ये नाश्त्यासाठी हा बनवला जातो आणि अगदी आवडीने खाल्ला जातो. आता आपण इडल्या बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि त्या कश्या बनवल्या जातात ते पाहूयात.

इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make idli 

 • ३ वाटी तांदूळ.
 • १ वाटी उडदाची डाळ.
 • १/४ खायचा सोडा.
 • दीड चमचा मीठ.
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).

इडली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – instructions to make idli recipe 

 • आत्ता आपण इडली बनवण्यासाठी काय करावे लागते. तांदूळ आणि डाळीचे मिश्रण किती वेळ भिजवावे ते वाटल्यानंतर किती वेळ भिजवावे आणि त्याला कसे वाफवावे या सर्व प्रक्रीयेबद्दल माहिती घेणार आहोत.
 • सर्वप्रथम ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी डाळ चांगली निवडून घ्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
 • मग एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घाला आणि त्यामध्ये ६ वाटी पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून ते ६ ते ७ तास भिजवा.
 • सहा ते सात तासानंतर भिजवलेल्या मिश्रनामधील जास्त झालेले पाणी काढून घ्या आणि ते मिक्सर वर फिरवून त्याचे बारीक पीठ/ बॅटर करून घ्या ( सर्व तांदळाच्या आणि डाळीच्या मिश्रणाचे बॅटर करा .
 • मग हे तांदळाचे आणि डाळीचे बॅटर ४ ते ५ भिजवून ठेवा त्यामुळे पीठ चांगले फसफसून येईल आणी आपल्या इडल्या हलक्या आणि मऊ बनतील.
 • ४ ते ५ तासांनी पिठामध्ये खायचा सोडा आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
 • त्यानंतर इडली पात्र घेवून त्यामध्ये पाणी घाला आणि इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये पीठ घाला आणि त्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर पत्राचे झाकण घाला.
 • आणि ते मोठ्या आचेवर उकडण्यासाठी ठेवा आणि ते ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. ६ ते ७ मिनिटांनी इडली पात्र उघडून इडलीमध्ये सुरी किंवा चमच्या घालून पहा जर सुरीला किंवा चमच्याला पीठ लागले तर ते आणि थोडा वेळ उकडा आणि जर पीठ लागले नसेल तर त्या चांगल्या उकडल्या असतील.
 • इडल्या उकडल्या असतील तर गॅस बंद करा आणि त्यामधील इडलीच्या प्लेट्स काढून घ्या आणि त्यामधील इडल्या चमच्याने काढून घ्या.
 • राहिलेल्या बॅटरच्या इडल्या वाफवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरा.
 • तुमच्या मऊ, लुसलुशीत आणि हलक्या इडल्या तयार झाल्या.
 • ह्या तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत खाऊ शकता.

शेवया उपीट रेसिपी – shewaya upma recipe in marathi

आपल्याला रोज नाश्त्यासाठी काय बनवायचे असा प्रश्न पडतो आणि त्या वेळी आपण लगेच बनणारे पदार्थ बनवतो जसे कि पोहे, उपमा, शिरा यासारखे पदार्थ बनवतो त्यामधील अजून एक झटपट बनणारा पदार्थ म्हणजे शेवया उपीट.

शेवया उपीट बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shewaya upma 

 • २ वाटी शेवया.
 • १ कांदा ( बारीक चीरलेला )
 • १ मध्यम आकाराचा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
 • १/२ मोठा चमचा शेंगदाणे.
 • दीड चमचा लाल मिरची पावडर.
 • १/४ हळद.
 • मोहरी आणि जिरे ( फोडणीसाठी ).
 • मीठ ( चवीनुसार ).
 • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
 • तेल.

शेवया उपीट बनवण्यासाठी केली कृती – process to make shewaya upma 

 • सर्वप्रथम कढई गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये १ चमचा तेल घाला आणि मग तेल गरम झाले कि त्यामध्ये शेवया घाला आणि त्या चांगल्या लालसर रंगापर्यंत भाजून घ्या. ( टीप : शेवया चांगल्या भाजा म्हणजे उपीट चांगले सुट्टे होईल ).
 • आता त्या शेवया कढईमधून काढा आणि बाजूला ठेवा.
 • आता कढईमध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि शेंगदाणे घाला आणि ते चांगले भाजून घ्या मग त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे फुलले कि त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर रंगापर्यंत भाजा.
 • आता एकी कडे ३ वाटी पाणी एक भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवा.
 • मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर टाका आणि ते चांगले एकत्र करा आणि आता त्यामध्ये शेवया घाला आणि त्या १ मिनिटे त्या मिश्रणामध्ये चांगल्या एकत्र करा. आता त्यामध्ये गरम करायला ठेवलेले पाणी घाला आणि मग मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यावर झाकण लावून ते २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या.
 • आता ते उपीट सर्विंग प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

मेदू वडा रेसिपी – medu wada recipe in marathi

मेदू वडा किंवा उडीद वडा हा एक दक्षिण भारतीय प्रकार असून भारताच्या काही भागांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी प्रसिध्द असणारा एक पदार्थ आहे. चला तर मग पाहूयात मेदू वडा कसा बनवायचा.

बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make medu wada 

 • १ वाटी उडीद डाळ.
 • १/२ चमचा मेथीचे दाने.
 • २ ते ३ हिरव्या मिरच्या.
 • ६ ते ७ कढीपत्ता पाने.
 • १ चमचा छोटे छोटे आल्याचे तुकडे.
 • २ ते ३ चमचे नारळाचा खीस.
 • १/२ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( तळण्यासाठी ).

मेदू वडा किंवा उडीद वडा बनवण्याची कृती – instructions to make medu wada 

 • सर्वप्रथम एक वाटी उडीद डाळ घेवून ती चांगली निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
 • त्यानंतर डाळीमध्ये ३ ते ४ वाट्या पाणी घालून ते डाळ ४ ते ५ तास चांगली भिजवून घ्या आणि हि डाळ चांगली भिजली कि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मिरची आणि आले घालून ती डाळीची अगदी बारीक करा.
 • मग त्यामध्ये मीठ, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कढीपत्ता आणि नारळाचा खीस घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
 • मग मध्यम आचेवर एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल ठेवा. एकदा तेल गरम झाले कि एका मोठ्या गोल चमच्यावर पाणी लावून हे उडदाचे थोडेसे बॅटर चमच्यावर घालून त्यावर एक होल पाडा आणि तो चमच्या गरम तेलामध्ये तसाच धरा जोपर्यंत तो पर्यंत वडा चमचा पासून वेगळा होत नाही आणि तो वेगळा झाला कि तो दोन्ही बाजूने चांगला टाळून घ्या.
 • तुमचा मेदू वडा सर्विंग करण्यासाठी तयार झाला. हा वडा खोबऱ्याच्या चटणी सोबत चानागाला लागतो.

शिरा रेसिपी – shira recipe in marathi

शिरा हा एक गोड पदार्थ असून हा खूप लोकांना आवडणारा एक सोपा पदार्थ आहे. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत कित्येक लोक आवडीने खातात आणि हा पदार्थ शक्यतो भारतामध्ये लोक नाश्त्यासाठी खातात.

शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shira 

 • १ वाटी रवा.
 • १ वाटी साखर.
 • २ वाटी पाणी किंवा दुध.
 • १/२ वाटी तूप.
 • १ चमचा वेलची पावडर.
 • बेदाणे ( आवश्यकतेनुसार ).
 • काजू ( आवश्यकतेनुसार ).

शिरा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shira 

 • सर्वप्रथम कढईमध्ये तूप घाला आणि ते मध्यम आचेवर गरम करा एकदा तूप गरम झाले कि त्यामध्ये १ वाटी रवा घाला व रवा गुलाबी रंगामध्ये बदलू पर्यंत चांगला भाजा.
 • रवा छान गुलाबीसर भाजला कि त्यामध्ये गरम पाणी किंवा गरम दुध घाला आणि रवा आणि दुध/ पाणी चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्या मिश्रणाला चांगली वाफ आणा.
 • त्याला चांगली वाफ आली कि त्यामध्ये साखर, वेलची पूड, बेदाणे आणि काजू घाला आणि ते चांगले एकजीव करा व गॅस बंद करा.
 • आपला शिरा खाण्यासाठी तयार झाला.

डोसा रेसिपी – dosa recipe in marathi 

आपण रोज काही तरी वेगवेगळ्या डिशेश नाश्त्यामध्ये बनवून खात असतो आणि त्यामधील एक लोकप्रिय नाश्ता म्हणून प्रसिध्द असलेली डिश म्हणजे डोसा रेसिपी. आता आपण डोसा हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूयात.

डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dosa 

 • ३ वाटी तांदूळ.
 • १ वाटी उडीद डाळ.
 • १/२ चमचा मेथी दाने.
 • १ मोठा चमचा पोहे ( मुठभर ).
 • १ मोठा चमचा शाबु.
 • १ मोठा चमचा हरभरा डाळ.
 • १ मोठा चमचा तूर डाळ.
 • १ मोठा चमचा मुग डाळ.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).

डोसा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dosa 

 • सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे तांदूळ आणि सर्व डाळी मापून घ्या आणि त्या चांगल्या निवडा.
 • त्यानंतर ते स्वच्छ निवडल्यानंतर तांदूळ, सर्व डाळी, पोहे, मेथी दाने आणि शाबु एका खोल भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्या.
 • मग त्यामध्ये तांदूळ आणि डाळी पाण्यामध्ये चांगल्या बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि त्यावर झाकण घालून ते मिश्रण ६ ते ७ तास चांगले भिजू द्या.
 • ६ ते ७ तासानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्यातील थोडे थोडे मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते चांगले फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बॅटर बनवून घ्या आणि हे बॅटर एका हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.
 • हे मिक्सरवर वाटलेले बॅटर ५ ते ६ तास भिजवा त्यामुळे ते चांगले फसफसून येईल.
 • ५ ते ६ तासांनी हे पीठ चांगले हलवून मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घालून ते बॅटर चांगले एकत्र करून घ्या.
 • मग आता गॅसवर मोठ्या आचेवर डोसा तवा गरम करण्यासाठी ठेवा एकदा तवा तापला की गॅसची आच मध्यम करा आणि मग डोसा बॅटर चमच्याने तव्याच्या मध्यभागी घाला आणि ते चमच्याच्या सहाय्याने गोल फिरवून त्याची जाडी कमी करून गोल मोठा डोसा करा आणि त्याच्या भोवतीने चमच्याने तेल सोडा आणि ते कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत भाजा.
 • तुमचा डोसा खाण्यासाठी तयार झाला.
 • डोसा आपण बटाट्याच्या भाजी सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकतो.

आलू पराठा रेसिपी – aloo paratha recipe in marathi

आलू पराठा हि एक भारतीय पदार्थ असून हा पदार्थ लोक सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा काही ठिकाणी संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवला जातो. पंजाबमध्ये आलू पराठा खूप आवडीने खाल्ला जातो आणि त्याठिकाणी हा पदार्थ तूप, लोणी किंवा बटर सोबत सर्व्ह केला जातो.

आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make aloo paratha 

 • ५ ते ६ उकडलेले बटाटे.
 • २ वाटी गव्हाचे पीठ.
 • ३ ते ४ चमचे आले लसून पेस्ट.
 • ८ ते ९ हिरव्या मिरच्या.
 • १ चमचा लिंबू रस.
 • १ चमचा हळद.
 • १/४ चमचा हिंग.
 • २ मोठे चमचे खोबरे कोथिंबीर पेस्ट.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • साखर ( चवीनुसार ).
 • तेल किंवा तूप ( आवश्यकतेनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

आलू पराठे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make aloo paratha 

 • सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घाला आणि कुकरचे झाकण लावून कुकरला ४ ते ५ शिट्ट्या द्या.
 • मग कुकर थंड होईपर्यंत वाट पहा.
 • या वेळेमध्ये एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तेल आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले मळून घ्या.
 • आणि ते १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा त्यामुळे कणिक चांगली भिजेल.
 • आता कुकर गार झाला असेल तर त्याचे झाकण उघडून त्यामधील बटाटे काढून घ्या आणि त्याच्या साली काढा.
 • मग ते बटाटे खिसून घ्या किंवा कूसकरून घ्या.
 • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये थोडे तेल घाला ते गरम झाले कि त्यामध्ये लसून, हिरवी मिरची, हळद, हिंग आणि खोबरे कोथिंबीर पेस्ट घालून ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये खिसलेला बटाटा, साखर, मीठ आणि लिंबू रस टाकून ते चांगले एकत्र करू घ्या आणि गॅस बंद करून घ्या.
 • तुमचे सारण तयार झाले.
 • आता मळून ठेवलेली कणिक घ्या आपल्या हाताला थोडे तेल लावा आणि कणकीचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या आणि सारणाचे देखील गोळे करून घ्या.
 • मग कणकीच्या गोळ्यामध्ये बटाट्याचे गोळा भरून त्याला कोरडे गव्हाचे पीठ लावून तो गोळा गोल लाटून घ्या.
 • आणि मग तवा मध्यम आचेवर गरम करून त्याला थोडे तूप किंवा तेल लाऊन आपण लाटलेला पराठा तव्यावर टाका आणि त्याला दोन्ही बाजूने तेल लावून त्याच्या दोन्हीही बाजू भाजा.
 • अश्या प्रकारे सर्व गोळे भरून लाटून घ्या आणि ते तव्यावर भाजून घ्या.
 • तुमचा आलू पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला, तुम्ही हा पराठा लोण्यासोबत सर्व्ह करू शकता.

आम्ही दिलेल्या breakfast recipes in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झटपट नाश्ता रेसिपी मराठी माहिती breakfast recipes indian veg in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharashtrian recipes for breakfast in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि madhura breakfast recipes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये zatpat breakfast recipes in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!