कोविड 19 माहिती Covid 19 Information in Marathi

Covid 19 Information in Marathi – Corona Symptoms in Marathi कोविड 19 माहिती नमस्कार मित्रानो, जगावर आलेल्या महाभयंकर कोरोंना सारख्या संकटाची झळ ही सर्वांनाच पोहचली असेल. आपण आज ही जर अशा परिस्थितीत निरोगी असू तर आपले नशिबच म्हणावे लागेल. आजच्या या सदरात आपण कोरोंना म्हणजेच Covid १९ या बद्दल माहिती पाहणार आहोत. कोरोंनाची निर्मिती सर्व प्रथम कुठे व कशी झाली ? कोरोंनाची लक्षणे कोणती ? इत्यादि सर्व प्रश्नांची उत्तरे या सदरात थोडक्यात पाहणार आहोत. सदरच्या लेखात आपण कोविड १९ या रोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार  आहोत.

covid 19 information in marathi
covid 19 information in marathi

कोविड 19 माहिती – Covid 19 Information in Marathi

सर्वात सामान्य लक्षणे:कमी सामान्य लक्षणे:
तापठणका व वेदना
कोरडा खोकलाघसा खवखवणे
थकवाअतिसार
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह
डोकेदुखी
चव किंवा गंध कमी होणे
त्वचेवर पुरळ, किंवा बोटांनी किंवा बोटांनी मलिन होणे

काय आहे हा कोरोंना ? – Coronavirus in Marathi

कोरोंना हा असा रोग आहे ज्यामध्ये मानवी शरीरातील पेशीमद्धे कोरोंनाचा विषाणू शिरकाव करतो आणि त्या पेशीचे संपूर्ण आवरण नष्ट करून निरोगी पेशी संपवून टाकतो. ज्यामुळे रोगप्रतिकरक शक्ति कमी होऊन श्वसनाचा त्रास होतो, आणि योग्य वेळी उपचार न केल्यास श्वास अडकून मनुष्य मृत्यू पावतो .

कोरोंनाची निर्मिती कुठे व कशी झाली ?

तर कोरोंना या रोगाची सर्व सर्व प्रथम प्रचिती ही चीन मध्ये आली. ३१ डिसेंबर २०१९ मध्ये याचा पहिला रुग्ण हा चीनमधील उहान या शहरा मध्ये आढळला. चीन मध्ये पहिल्यांदा एक नुमोनिया लक्षणे असलेला रुग्ण आढळला. तिथून रांगत रांगत हा विषाणू हळू हळू सर्व जगभर पसरला. हा रोग संसर्ग जन्य असल्याने त्याचा प्रसार होण्यास फार वेळ नाही लागला.

Covid १९ याचा अर्थ असा आहे क , co म्हणजे कोरोंना, vi म्हणजे वायरस आणि d म्हणजे डिसीझ मराठीत याला रोग असे म्हणतात. आणि हा रोग २०१९ या साली आढळल्यामुळे १९ असे लिहिले जाते . ज्या विषाणू मुळे हा कोरोंना पसरला त्या विषाणूचे नाव आहे corornaviridae.

कोरोना व्हायरस लक्षणे ? – Corona Symptoms in Marathi Latest

Covid 19 Symptoms in Marathi

कोरोंनाची सर्वसाधारण, कमी सर्वसाधारण, व गंभीर अशी लक्षणे आहेत.

सर्वसाधारण लक्षणे – Corona Lakshan in Marathi

यामध्ये ताप, सुखा खोकला, आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो.

कमी सर्व साधारण लक्षणे – Corona Chi Lakshane in Marathi

यामध्ये अंग दुखी, डोके दुखी, कोरडा घसा , तोंडाची चव जाणे, वास येणे बंद होणे, शुष्क त्वचा तसेच बोटांवरील आणि टाचेचा रंग बदलणे.

गंभीर लक्षणे – Coronavirus Symptoms in Marathi

यामध्ये श्वास घेण्यास अडचण येणे, छातीवर दाब अथवा वेदना होणे, बोलता न येणे किंवा वाचा जाणे तसेच शरीराची हालचाल मंदावणे किंवा पूर्णपणे थांबणे.

कोरोना व्हायरस लक्षणे व उपाय  – Corona Upay in Marathi

यामध्ये आपण कोरोंना लक्षणे दिसून आल्यास सर्व प्रथम जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात दाखल होऊन चाचणी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. ही चाचणी पॉजिटिव आल्यास खालील प्रमाणे खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 • स्वताला एकटे एका खोलीत ठेवा, कुटुंबातल्या अथवा कोणत्याही इतर व्यक्तीशी संपर्क टाळा.
 • तीन पदरी मास्क वापरा. इतर कोणत्याही व्यक्तीशी बोलायाचे असल्यास दोघाणीही N-95 मास्क वापरा .
 • मास्क जर वापरुन खराब झालेला आढळल्यास तो तत्काळ बदलावा. किंवा १% सोडियम क्लोराइड असलेल्या द्रवणणे स्वछ धुवून वापरला तरी चालेल.
 • पुरेशी विश्रांती घेणे आणि भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे.
 • श्वसणा संबंधी सर्व काळजी घेणे.
 • सतत सॅनिटईझेरने हाथ धुणे गरजेचे आहे.
 • स्वतच्या खाजगी गोष्टी कुटुंबातल्या इतर व्यक्तींशी शेअर करू नये.
 • ज्या ज्या वस्तु आपण वापरत असतो त्या वस्तु देखील सॅनिटईझेरने पुसून घेतल्या जात आहेत याची काळजी घ्यावी.
 • दररोज शरीराचे तापमान तपासावे.
 • त्याबरोबरच शरीरातील ऑक्सिजन ची पातळी ही नियमित पणे पल्स ऑक्सीमिटरने तपासावे.
 • आणि डॉक्टरांशी नियमित सल्ला घेणे.

या नंतर जर कोणत्या व्यक्तीची लक्षणे छातीवरील असह्य दाब , श्वासनास प्रचंड त्रास व ऑक्सिजन ची पातळी ही ९४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला त्वरित इस्पितळात दाखल करणे अनिवार्य आहे.

Covid-19 वरील लस!  

Covid 19 सारख्या महाभयंकर रोगावर लस शोधण्यात जागतिक स्तरावर प्रयत्न झाले. अगदी १ ते दीड वर्ष अथक परिश्रमानंतर अखेर लस शोधण्यास शास्त्रज्ञांना यश मिळाले. सर्वात प्रथम ZyKoV-D ही अगदी प्रभावी आणि गुणकारी लस बनवण्यात आली आणि ती ही स्वदेशी निर्मितीची आहे. त्यानंतर वेगवेगळ्या देशात लस तयार बनवण्यात येऊ लागली. जानेवारी २०२१ पर्यंत नऊ वेगवेगळ्या तांत्रिक स्तरावर लस अजून प्रभावी बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

लस ही निरनिराळ्या पद्धतीच्या येऊ लागल्या आहेत. कारण हा कोरोंना आत जय स्वरूपात आहे त्याच्याही बदलत्या रूपात आणि वेगळ्या प्रकारे मानवी पेशींवर भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

त्यामुळे अशा वेळी भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोकयांचा आधीच आढावा घेऊन आपल्याला त्याच्या दृष्टीने औषध आणि लस यामध्ये गरजेप्रमाणे बदल करत राहणे महत्वाचे आहे.

त्यामध्ये RNA vaccine, Adenovirus vector vaccine, Inactivated vector vaccine, subunit vaccine, इत्यादि प्रकारचे लस तयार झाली आहेत .

वरील पैकी जे RNA vaccine आहे ते शरीरातील पेशीमध्ये सोडले जाते , आणि या लसीमूळे पेशीमद्धे प्रथिने तयार होऊन रोगप्रतिकरक शक्ति वाढते . जे सर्वप्रथम UK मध्ये बनवले गेले होते. त्याचे अलर्जी सारखे साइड इफेक्टस ही दिसून आले. Pfizer–BioNTech COVID-19आणि Moderna COVID-19 हे दोन RNA vaccine आहेत.

यानंतर Adenovirus vector vaccine याचा एकच डोस दिला जातो आणि अगदी सहज रित्या साठवून ठेवू शकतो. या लसीमूळे ही रोगप्रतिकरक शक्ति वाढण्यास मदत होते.  Oxford-AstraZeneca COVID-19, Sputnik V COVID-19, Convidecia , Janssen COVID-19 हे Adenovirus vector vaccine चे प्रकार आहेत.

आपण जे सध्या वापरत आहोत ते म्हणजे Inactivated virus vaccines . यामध्ये कोरोंना या रोगाचे विषाणू आधी पासूनच असतात .उष्णतेचा वापर करून यांची आणखी विषाणू तयार करण्याची क्षमता पूर्णपणे कमकुवत केलेली असते पण शरीरातील रोग प्रतिकरक शकतीला ते प्रतिसाद देऊ शकतात .यामध्ये CoronaVacBBIBP-CorV and WIBP-CorV या चीनी लसी आहेत. Covaxin ही भारतीय लस आहे. आणि  CoviVac ही रशियन लस आहे .

कोरोंनाचे जगावर झालेले परिणाम !

जवळ जवळ दोन वर्षे झाली मानव प्राणी कोरोंनाशी झुंज देत आहे. मानवी जीवनावर या रोगामुळे भयंकर वाईट परिणाम झाले. हा रोग संसर्ग जन्य असल्यामुळे ज्या ठिकाणी माणसांची गर्दी होईल अशा गोष्टीवर बंद आणावा लागला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, कारखाने, कार्यालये, बंद करण्यात आले.

या सर्व गोष्टी मुले लोकांचे रोजगार बंद झाले. वस्तूंचे उत्पादन बंद पडले. वाहतूक व्यवस्था बंद झाल्या. सर्व देशांचा आर्थिक कणा मोडला. सर्वात जास्त हाल हे समाजातील अति खालच्या गरीब स्तरातील लोकांचे झाले. ज्यांना एक दिवस कामाला न गेल्याने घरात अन्न मिळत नसे त्यांना खूप यातना भोगाव्या लागल्या. यावर कोणतेही औषध तूर्तास न आल्यामुळे प्रचंड जीवित हानी झाली .

पण जसे मानवी जीवनावर वाईट परिणाम झाले तसेच निसर्गावर चांगले परिणाम ही झाले. मानवी शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन मानव मृत्युमुखी पडत होता पण वातावरणातील ऑक्सिजन वाढत होता. हवा प्रदूषण अगदी मोठ्या प्रमाणात कमी झाले कारण कार्बन उत्सर्जित करणारी वाहने आणि कारखाने बंद होती. पानी प्रदूषण कमी झाले होते. मानव सोडून इतर कोणत्याही प्राण्यांना इतका कोरोंनाचा फरक पडला न्हवता.

पण अजूनही मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर या संकटाशी दोन हाथ करत आहे. लवकरच पहिल्या लांटेसारखी दुसरी लाट हो ओसरून जाईल.

आम्ही दिलेल्या covid 19 information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “कोविड 19” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या coronavirus symptoms in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि corona lakshan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण corona symptoms in marathi या लेखाचा वापर corona in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!