माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध Cricket Essay in Marathi

Cricket Essay in Marathi – Cricket Nibandh in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध मराठी खरंतर, क्रिकेट या खेळाची सुरुवात इसवी सन १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट पुरावे आहेत. तरीदेखील मित्रांनो, क्रिकेट संदर्भातील  साधारणतः सोळाव्या शतकातील इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे आपल्याला मिळतात. परंतू, असे असले तरी पूर्वीच्या काळी क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे विश्वासू संदर्भ आपल्याला इसवी सन १५९८ मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये सापडतात. या संदर्भामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर इसवी सन १५५० च्या सुमारास क्रिकेट हा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे.

याशिवाय, पूर्वीच्या काळी क्रिकेट खेळ हा मूलतः केवळ लहान मुलांनी खेळायचा खेळ आहे असा एक समज होता. परंतू, इसवी सन १६११ मधील काही संदर्भ आपल्याला असे दर्शवतात की काळाच्या परिवर्तनासोबत प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे, सगळ्यात जुना ज्ञात इंटर-पॅरिश अथवा व्हिलेज क्रिकेट सामना हा त्याकाळी पहिल्यांदा खेळवला गेला होता.

cricket essay in marathi
cricket essay in marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध मराठी – Cricket Essay in Marathi

माझा आवडता खेळ निबंध – My Favourite Game Cricket Essay in Marathi

essay on my favourite game cricket in marathi या सामन्यानंतर इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेमध्ये खऱ्या अर्थाने  क्रिकेटची ओळख झाली आणि अठराव्या शतकात क्रिकेटची ओळख हळूहळू जगातील इतर प्रदेशांमध्ये देखील होत गेली. मित्रांनो, पहिले जागतिक महायुद्ध होण्याआधीची दोन दशके ही “गोल्डन एज ऑफ क्रिकेट” म्हणून ओळखली जातात.

यानंतर, पहिल्या महायुद्धामुळे उद्भवलेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी क्रिकेट हे फक्त नावापुरते शिल्लक राहिले होते. असे असले तरी, या काळात अनेक महान व उत्कृष्ठ खेळाडू होऊन गेले. शिवाय, याच काळात अनेक अविस्मरणीय सामने देखील झाले. मुख्यतः या कालखंडामध्ये काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले होते.

अशा युद्धांतर्गत वर्षांवर खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवले ते फक्त ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन या खेळाडूने. तसं पाहिलं तर, ‘डॉन ब्रॅडमन’ हा खेळाडू आकडेवारीनुसार आजवरचा सर्वांत महान फलंदाज होता.

पहिल्या महायुध्दानंतर उद्भवलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाआधीच्या काळात वेस्ट इंडिज, भारत आणि न्यूझीलंड तर, दुसऱ्या जागतिक  महायुद्धानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन  देशांच्या संघासोबत विसाव्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटचा विस्तार चालूच राहिला होता. परंतू, मधल्या काही कालावधीत सरकारने सुरू केलेल्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर इसवी सन १९७० ते इसवी सन १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.

त्यामुळे, इसवी सन १९६३ मध्ये क्रिकेटने जणू एखाद्या  नव्या युगात पदार्पण केले होते. याखेरीज, याच काळात इंग्लंड काऊंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा नवीन प्रकार सगळ्यांसमोर आणला. या नवीन प्रकारातील क्रिकेटचा निकाल लवकर लागण्याच्या खात्रीमुळे मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर बनले. शिवाय मित्रांनो, अशा क्रिकेट सामन्यांमध्ये वाढ देखील झाली.

अशा प्रकारे, पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना इसवी सन १९७१ साली खेळवला गेला. या क्रिकेट सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन इसवी सन  १९७५ या साली केले.

इसवी सनाच्या एकविसाव्या  शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी-ट्वेंटी या क्रिकेट प्रकारची सुरुवात करण्यात आली आणि हा प्रकार त्याकाळी अल्पावधीतच लोकप्रिय सुद्धा झाला.

मैदानी खेळ क्रिकेट

आपणा सर्वांना माहीत आहे की क्रिकेट हा खेळ मैदानावर खेळला जातो. क्रिकेट हा जागतिक खेळ असून, हा खेळ मैदानावर प्रत्येकी अकरा  खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू (बाॅल) आणि फळी (बॅट) यांच्या साहाय्याने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. त्याचबरोबर, क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी आखलेली असते आणि तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी तीन अशा पद्धतीने लाकडी यष्टी उभी केलेली असते.

क्रिकेट खेळताना एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. शिवाय, हा संघ जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करत असतो. याउलट, त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करण्याचे काम करतो. मित्रांनो, क्रिकेट या खेळातील प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हटले जाते. फलंदाजी संघाचे एकूण दहा फलंदाज बाद झाल्यानंतर अथवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात.

अशा प्रकारे, एका किंवा दोन डावांमध्ये अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या सर्वांत जास्त असेल तो संघ विजेता संघ म्हणून घोषित केला जातो.

शिवाय, प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक क्रिकेटच्या मैदानात उतरत असतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील  गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, जेंव्हा खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाजवळ उभ्या असलेल्या फलंदाजाकडे चेंडू फेकतो, तेंव्हा क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात होते. मित्रांनो, या फलंदाजाला दुसऱ्या शब्दात स्ट्रायकर असेदेखील म्हटले जाते.

स्ट्रायकर हा मैदानावरील मध्यभागी असलेल्या खेळपट्टीवर, यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. याठिकाणी, बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे किंवा चौकार अथवा छक्का मारणे ही फलंदाजाची मुख्य भूमिका असते.

याउलट, दुसरा फलंदाज ज्याला नॉन-स्ट्रायकर असे म्हटले जाते, तो खेळपट्टीच्या विरुद्ध असलेल्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो.

क्रिकेट खेळत असताना बाद झालेल्या फलंदाजाला आपले मैदान सोडावे लागते. संबंधित फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांच्याच संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो आणि मैदानावर पदार्पण होतो. खरंतर, फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याचबरोबर त्याला बाद करणे ही गोलंदाजाची प्रमुख उद्दिष्ट्ये असतात.

याखेरीज, एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक असे सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर, चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. अशा प्रकारे, संबंधित  गोलंदाजाचे एक षटक पूर्ण झाले की त्याच्याजागी दुसरा गोलंदाज खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने चेंडुफेक करायला सुरुवात करतो.

खेळाचे स्वरूप आणि नियम

मित्रांनो वरील माहितीमध्ये आपण पाहिले की, क्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला डाव किंवा इंग्लिशमध्ये innings असे म्हटले जाते. शिवाय, क्रिकेट सामन्याच्या अगोदरच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत आणि या डावा दरम्यान गोलंदाज करणारा संघ क्षेत्ररक्षण करतो तर, उर्वरीत दुसरा संघ फलंदाजी करतो.

त्याचबरोबर, प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांची अदलाबदली करून खेळतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एकूण अकरा खेळाडू मैदानावर उभे असतात. परंतू, याउलट फलंदाजी करणाऱ्या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर उतरू शकतात.

मित्रांनो, याखेरीज  फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला जाहीर केली जाते, परंतु ही क्रमवारी काहीवेळा बदलली देखील जाऊ शकते.

शिवाय, क्रिकेट सामना सुरू होण्याआधी एका संघाचा कर्णधार जो स्वतःसुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो, तो सर्वांपुढे येतो आणि नाणेफेक  करतो. यांनतर, नाणेफेक जिंकणाऱ्या संबंधित संघाच्या कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

याशिवाय, क्रिकेट खेळाचे मैदान हे बहुधा वर्तुळाकार अथवा अनेकदा लंबवर्तुळाकार आकाराचे असते आणि या मैदानाच्या मधोमध आयताकृती आकाराची खेळपट्टी आखलेली असते. तसेच, क्रिकेट खेळाच्या मैदानाच्या कडा या सीमारेषेने अंकित केलेल्या असतात. मित्रांनो, ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टँडचा भाग, एक दोर अथवा काहीवेळा रंगवलेली रेषा देखील असते.

कोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे किंवा  यष्ट्यांचे पालकत्व करत असतो आणि जेंव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेंव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच एकंदरीत, त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आतील भागात असताना क्रिकेटच्या मैदानाला टेकलेला/टेकलेली असते.

जर संबंधित फलंदाज हा त्याच्या क्रिजच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना फलंदाजाच्या जवळील यष्ट्या पडल्या तर तो फलंदाज बाद केला जातो. परंतु, त्याचवेळी बाद झालेल्या फलंदाजांच्या संघातील दुसरा फलंदाज सुरक्षित असतो. अशा प्रकारे, दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरूध्द असलेल्या बाजूला आपापली जागा घेतात. याचवेळी, मैदानावर उभे असलेले गोलंदाजाच्या संघातील इतर खेळाडू फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतात.

                       तेजल तानाजी पाटील

                          बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या cricket essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite game cricket essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on cricket in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cricket nibandh in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!