कप केक रेसिपी मराठी Cup Cake Recipe in Marathi

Cup Cake Recipe in Marathi कप केक रेसिपी मराठी केक म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येतेच आणि केक हा असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खूप म्हणजे खूप प्रिय असतो आणि काही लोकांना त्याचे जरी नाव ऐकले तरी तो खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अश्याच केक प्रेमींच्यासाठी आज या लेखामध्ये कप केकच्या काही रेसिपी पाहणार आहोत. कप केक रेसिपी जर आपल्या घरी ओव्हन असेल तर बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे कप केक कसे बनवायचे.

cup cake recipe in marathi
cup cake recipe in marathi

कप केक रेसिपी मराठी – Cup Cake Recipe in Marathi

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० ते ४५  मिनिटे

कप केक रेसिपीज – cup cake recipes 

कप केक हा लहान मुलांना खूप आवडतो आणि म्हणूनच आता आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे कप केक कसे बनवायचे ते पाहूयात. चला तर मग कप केक कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

साधा कप केक रेसिपी – simple cup cake recipe in marathi 

आता आपण साधा कप केक कसा बनवायचा आणि हा केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया.

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० ते ४५  मिनिटे

साधा कप केक रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make simple cup cake recipe 

 • २ वाटी मैदा.
 • १ वाटी बटर .
 • १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
 • २ अंडी.
 • १ मोठा कप दुध.
 • १/२ चमचा खायचा सोडा.
 • १/२ चमचा बेकिंग सोडा.
 • १ चमचा वेलची पावडर ( फ्लेवरसाठी ).
 • १ छोटी वाटी बदाम आणि काजू तुकडे.
 • नक्की वाचा: केक रेसिपी मराठी 

साधा कप केक रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make simple cup cake 

 • जर तुम्ही कप केक ओव्हन मध्ये भाजणार असाल तर ओव्हन १८० डिग्री सेल्सियस वर २५ ते ३० मिनिटे प्री हिट करा.
 • आता अंडी घ्या आणि ती मिक्सिंग बाऊल मध्ये फोडून घ्या आणि बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या. मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता बटर घाला आणि चांगले बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
 • बॅटर थोडे पातळ होण्यासाठी त्यामध्ये लागेल तेवढे दुध घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
 • आता यामध्ये आता केकच्या बॅटरमध्ये वेलची पूड आणि साधा सोडा आणि बेकिंग सोडा खाला ते चांगले एकत्र करा आणि लगेचच कप केकच्या मोल्ड मध्ये घाला.
 • आणि ते कप केकचे मोल्ड बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि ते ओव्हनमध्ये भाजण्यासाठी ठेवा.
 • आता कप केक १० ते १५ मिनिटे भाजला कि ते बाहेर काढा आणि त्यावर काजू आणि आणि बदाम तुकडे टाका आणि परत तो कप केकचा ट्रे परत ओव्हनमध्ये ठेवा आणि केक १५ ते २० मिनिटे भाजा.
 • मग ते २५ ते ३० मिनिटे भाजल्यानंतर ओव्हन मधून बाहेर काढा आणि गार झाल्यानंतर ते मोल्ड मधून काढा.
 • तुमचे साधे कप केक तयार झाले.

चॉकलेट कप केक रेसिपी – chocolate cup cake recipe

आता आपण सर्वांनाच आवडणारा कप केक कसा बनवायचा ते पाहूयात.

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
केक भाजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० ते ४५ मिनिटे

चॉकलेट कप केक रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chocolate cake recipe 

 • २ वाटी मैदा.
 • १ वाटी बटर .
 • १ वाटी साखर ( बारीक केलेली / पिठी साखर ).
 • २ अंडी.
 • १ मोठा कप दुध.
 • १/२ चमचा खायचा सोडा.
 • १/२ चमचा बेकिंग सोडा.
 • ३ ते ४ चमचे कोको पावडर.
 • २ चमचे चॉकलेट सिरप.

चॉकलेट कप केक रेसिपी बनवण्यासाठी केली कृती – process to make chocolate recipe 

 • ओव्हन १८० डिग्री सेल्सियस वर २५ ते ३० मिनिटे प्री हिट करा.
 • आता अंडी घ्या आणि ती मिक्सिंग बाऊल मध्ये फोडून घ्या आणि बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या. मग त्यामध्ये साखर आणि मैदा घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या आणि आता बटर घाला आणि चांगले बिटरच्या सहाय्याने एकजीव करून घ्या किंवा फेटून घ्या.
 • मग त्यामध्ये बेकिंग सोडा, खायचा सोडा, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप घाला आणि ते एकजीव करा किंवा बिटरच्या सहाय्याने केकचे बॅटर चांगले फेटून घ्या.
 • बॅटर थोडे पातळ करण्यासाठी दुध घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
 • आता हे मिश्रण लगेचच कप केकच्या मोल्ड मध्ये घाला आणि ते कप केकचे मोल्ड बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि ते ओव्हनमध्ये भाजण्यासाठी ठेवा.
 • कप केक २५ ते ३० मिनिटे १८० डिग्री सेल्सियस वर भाजून घ्या.
 • कप केक २५ ते ३० मिनिटे ओव्हनमध्ये भाजल्यानंतर ते बाहेर काढा आणि गार झाल्यानंतर मोल्ड मधून काढा.
 • चॉकलेट कप केक तयार झाले.
 • तुम्ही त्याला क्रिमने सजावट करून खावू शकता.

टिप्स (Tips) 

 • कप केक आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरचे बनवायचे असल्यास आपण साध्या केक मध्ये वेगवेगळे फ्लेवर घालून वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवू शकतो.
 • कप केक आपण मोठ्या कुकरमध्ये देखील भाजू शकतो. पण कुकर मध्ये भाजताना कुकरची शिट्टी आणि रिंग काढली जाते आणि कुकरमध्ये खाली वाटी ठेवली जाते आणि त्यावर एका प्लेटमध्ये कप केकचे मोल्ड ठेवावे आणि कुकरला झाकण लावून १० मिनिटे मंद आचेवर आणि २० मिनिटे मोठ्या आचेवर कप केक बेक करावे.

आम्ही दिलेल्या cup cake recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कप केक रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cup cake recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of cup cake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cup cake recipe in marathi without oven Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!