दही वडा रेसिपी मराठी Dahi Vada Recipe in Marathi

Dahi Vada Recipe in Marathi दही वडा रेसिपी मराठी दही वडा हा एक उत्तर भारतीय पदार्थ असून ज्याच्या तिखट, गोड आणि आंबट चवीमुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. दही वड्यासाठी जो वडा वापरला जातो तो उडदाच्या डाळीपासून बनवला जातो म्हणजे हा उडीद वडाच असतो आणि तो ताकामध्ये भिजवून, घट्ट दह्यासोबत सर्व्ह केला जातो. दही वडा हा पदार्थ कित्येक लोकांना आवडतो आणि हि रेसीपी कित्येक लोक आपल्या घरामध्ये आवडीने बनवण्याचा प्रयत्न करतात अश्याच लोकांच्यासाठी आज या लेखामध्ये आपण दही वडा रेसिपी पाहणार आहोत.

हा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा हा वडा साखर घातलेले दही आणि काही चटण्यांच्या सोबत सर्व्ह केला जातो. दही वडा सहसा विशेष प्रसंगी आणि सणांच्यामध्ये बनवला जातो परंतु हा पदार्थ काही वेळेला पार्टी स्नॅक म्हणून देखील बनवला जातो. हा पदार्थ हा एक असा स्वादिष्ट स्नॅक आहे ज्याच्या प्रत्येक बाईटमध्ये तिखट, गोड आणि आंबट चव असते.

dahi vada recipe in marathi
dahi vada recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 दही वडा रेसिपी मराठी – Dahi Vada Recipe in Marathi

दही वडा रेसिपी मराठी – Dahi Vada Recipe in Marathi

तळण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
तयारीसाठी लागणारा वेळ१ तास २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास ४५ मिनिटे
पाककलाउत्तर भारतीय

दही वडा म्हणजे काय ?

दही वडा हि एक उत्तर भारतीय डिश आहे आणि त्यामधील वडा हा उडदाच्या डाळीपासून बनवला जातो म्हणजे हा उडीद वडाच असतो आणि तो ताकामध्ये भिजवून, घट्ट दह्यासोबत, तिखट आणि गोड चटण्यांच्या सोबत सर्व्ह केला जातो.

दही वडा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

 • उडदाची डाळ : उडदाची डाळ हि या रेसिपीमध्ये महत्वाची मानली जाते कारण या रेसिपीमध्ये जे वडे वापरलेले असतात ते भिजवलेल्या उडदाच्या डाळीपासून बनवलेले असतात.
 • दही आणि ताक : दही आणि ताक हे देखील या रेसिपी मधील मुख्य घटक आहेत कारण उडीद वडे ताकामध्ये भिजवले जातात आणि दह्यासोबत सर्व्ह केले जातात.

दहीवडे कसे बनवायचे – how to make dahi vada recipe in marathi 

दही वडा हा त्याच्या तिखट, आंबट आणि गोड चवीमुळे खूप जणांचा आवडता पदार्थ आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी जरी वेळ लागत असला तरी आपण वडा बनवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा किती फायदेशीर आहे हे आपल्याला हा पदार्थ खाल्ल्यावर समजते पण हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे. चला तर मग पाहूयात दही वडा कसा बनवायचा आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तळण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
तयारीसाठी लागणारा वेळ१ तास २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास ४५ मिनिटे
पाककलाउत्तर भारतीय

दही वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dahi wada 

वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

 • १ वाटी उडीद डाळ.
 • १/२ चमचा मेथीचे दाने.
 • १/२ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
 • १ ते २ हिरव्या मिरच्या.
 • २ छोटे तुकडे आलं
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( तळण्यासाठी ).

दही वडा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य 

 • २ वाटी पातळ ताक.
 • १ वाटी घट्ट दही.
 • १ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
 • मिरपूड.
 • लाल मिरची पावडर.
 • चाट मसाला.
 • चिंच कोळ.
 • हिरवी चटणी
 • साखर ( चवीनुसार ).
 • मीठ ( चवीनुसार ).

दही वडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dahi vada recipe 

कृती १ : वडे बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

 • सर्वप्रथम एक वाटी उडीद डाळ घेवून ती चांगली निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
 • त्यानंतर डाळीमध्ये ३ ते ४ वाट्या पाणी घालून ते डाळ ४ ते ५ तास चांगली भिजवून घ्या आणि हि डाळ चांगली भिजली कि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मिरची आणि आले घालून ती डाळीची अगदी बारीक करा.
 • मग त्यामध्ये मीठ, चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
 • मग मध्यम आचेवर एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल ठेवा. एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये वडे तळून घ्या ( टीप : वडे मध्यम आकाराचे बनवा ).

कृती २ : वडे ताकामध्ये भिजवण्यासाठी केली जाणारी कृती 

 • वडे ताका मध्ये भिजत घालतेवेळी सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेले वडे घाला आणि त्यावर आपण तयार करून ठेवलेले ताक घाला आणि ते एका तास झाकण घालून भिजत ठेवा.

कृती ३ : वाद्यासाठी लागणारे दही बनवण्याची कृती 

 • सर्वप्रथम एक मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये दही घ्या आणि ते रवीने गुसळून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घालावे लागत असेल तर अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट दही थोडे पातळ करून घ्या.
 • आता त्या दह्यामध्ये साखर ( चवीनुसार ) आणि मीठ ( चवीनुसार )घाला आणि ते चांगले मिक्स करून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.

कृती ३ : वडे सर्व्ह करताना केली जाणारी कृती 

 • आता वाडे सर्व्ह करताना ते ताकातून बाहेर काढा आणि त्यामधील ताक साधारण पिळून घ्या.
 • मग ताक पिळून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये घाला आणि त्या वड्यांच्यावर दही घाला, दही असे घाला कि वडे दिसणार नाहीत.
 • आता त्यावर चिंच कोळ, हिरवी चटणी घाला आणि मग त्यावर थोडा चाट मसाला, मिरपूड आणि लाल मिरची पावडर भुरभुरा.
 • मग त्यावर शेव आणि कोथिंबीर घाला आणि आपले तिखट, आंबट आणि गोड चवीचे दही वडे सर्व्ह करा.

दही वडे चांगले बनवण्यासाठी वापरलेल्या काही टिप्स – tips to make perfect dahi vada 

 • तुम्हाला जर खूप आंबट खायची आवड नसेल तर तुम्ही ताका ऐवजी वडे पाण्यामध्ये भिजवले तर चालतील.
 • वड्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ देखील वापरली तरी चालते.
 • वडे बनवताना ते मध्यम आकाराचे असावेत किंवा लहान असावेत कारण ते पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवले तर ते फुगतात आणि त्याचा आकार डबल होतो.

आम्ही दिलेल्या dahi vada recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दही वडा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bread dahi vada recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dahi vada recipe in marathi by archana माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dahi vada recipe by madhura in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!