कोथिंबीर वडी रेसिपी मराठी Kothimbir Vadi Recipe in Marathi

Kothimbir Vadi Recipe in Marathi – Kothimbir Chi Vadi Recipe in Marathi कोथिंबीर वडी रेसिपी मराठी कोथिंबीर वडी हा एक महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ आहे. कोथिंबीर वडी हि बेसन पीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर पासून बनवलेली असते आणि त्या दोन्हीचे मिश्रण करून त्याचे रोल बनवून ती वाफवून घेतली जाते आणि मग त्याच्या वड्या पाडून ती तळून घेतली जाते. कोथिंबीर वडी हि खूप खुशखुशीत आणि खमंग बनते आणि हि करण्यासाठी देखील सोपी असते तसेच हि वडी बनण्यासाठी कमीत कमी २० ते २५ मिनिटे लागतात. आपण हि खुशखुशीत आणि खमंग वडी सणामध्ये, पाहुण्याच्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो.

या कोथिंबीर वडीचा एक चांगला फायदा म्हणजे आपण ही वडी वाफवून देखील खाऊ शकतो आणि ज्यांना तेलकट आणि तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हि वडी जरी वाफवून खाल्ली तरी चांगली लागते किंवा त्याला थोडी जिरे, मोहरी, लसून पेस्ट आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन जरी खाल्ली तरी काही हरकत नाही.

kothimbir vadi recipe in marathi
kothimbir vadi recipe in marathi

कोथिंबीर वडी रेसिपी मराठी – Kothimbir Vadi Recipe in Marathi

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
उकडण्यासाठी आणि तळण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकुण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी६ ते ७ व्यक्ती

Recipe of Kothimbir Vadi in Marathi

कोथिंबीर वडी मधील मुख्य साहित्य – key ingredients 

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आपण खाली पाहणार आहोत.

  • कोथिंबीर : कोथिंबीर हा कोथिंबीर वडी या पदार्थातील एक मुख्य घटक आहे कारण यान पदार्थाचे नावच कोथिंबीर वडी असे आहे. आपण जी कोथिंबीर या वडीमध्ये वापरतो ती ताजी असावी त्यामुळे वडिला चांगला स्वाद येतो आणि वडी अगदी खमंग बनते.
  • बेसन : बेसन हे देखील या पदार्थातील एक महत्वाचा घटक आहे कारण बेसन पीठ घातल्या शिवाय पीठ घट्ट होत नाही आणि त्याचे रोल होत नाहीत.
  • लसून, लाल मिरची पावडर आणि मीठ : लसून, लाल मिरची पावडर आणि मीठ या सर्व घटकांच्याशिवाय या पदार्थाला चव आणि स्वाद येऊ शकत नाही. त्यामुळे लसून, लाल मिरची पावडर आणि मीठ हे घटक या पदार्थातील महत्वाचे घटक आहेत.
  • नक्की वाचा: दाल तडका रेसिपी 

कोथिंबीर वडी बनवण्याची पध्दत किंवा कोथिंबीर वडी कशी बनवावी

आता आपण कोथिंबीर वडी कशी बनवावी त्यासाठी काय करावे लागते आणि वडी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे सर्व पाहणार आहोत.

तयारी करण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
उकडण्यासाठी आणि तळण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकुण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
वाढणी६ ते ७ व्यक्ती

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

कोथिंबीर बनवण्यासाठी विशेष असे लोन्तेही साहित्य लागत नाही जे बाजारातून आणावे लागते आणि जे आपल्या घरामध्ये उपलब्द नसते. बहुतेक कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरामध्ये सहजा सहजी उपलाब असते त्यामुळे आपल्याला कोथिंबीर बनवण्याच्या साहित्याबद्दल काळाजी करण्याचे काही कारण नाही.

  • १ मध्यम आकाराची कोथिंबीर पेंडी.
  • १ वाटी बेसन पीठ.
  • ३ ते ४ चमचे तांदळाचे पीठ.
  • २ ते ३ चमचे शेंगदाण्याचा मोठा कुट.
  • २ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • ८ ते ९ पाकळ्या लसून.
  • २ चमचा तीळ ( पर्यायी ).
  • १ चमचा धणे जीरे पावडर.
  • १/४ चमचा हिंग.
  • तेल ( तळण्यासाठी ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया – process to make kothimbir vadi 

  • कोथिंबीर वाडी बनवताना सर्वप्रथम कोथिंबीरची पेंडी स्वच्छपणे निट करून ती चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि त्या कोथिंबीर मधील जास्त झालेले पाणी निघून जाण्यासाठी कोथिंबीर ५ ते ६ मिनिटासाठी मोदक पात्राच्या चाळणीमध्ये ठेवा.
  • मग कोथिंबीर मधील सर्व पाणी निघून गेल्यानंतर ती कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्या.
  • मग एका मोठा बाऊलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, शेंगदाण्याचा मोठा कुट, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, धणे जिरे पावडर, ठेचलेला लसून, २ चमचा तेल, मीठ चवीनुसार आणि साखर चवीनुसार घाला.
  • हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या.
  • मग मळलेले पीठ ५ ते ६ मिनिटासाठी झाकून ठेवा म्हणजे ते चांगले फिजले जाईल.
  • मग ते पीठ एका ताटामध्ये काढून घेवून हाताला तेल लावून चांगले मळून घ्या आणि मग त्याचे रोल करा.
  • जर तुम्ही वडीचे रोल उकडण्यासाठी मोदक पात्राच्या चाळणीचा वापर करत असाल तर चाळण वरती झाकणासारखी बसेल अशे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये २ ते ३ वाटी पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी ठेवा.
  • चाळणीला तेल लावून त्यामध्ये बनवलेले वडीचे रोल घालून ती चाळण त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर गच्च झाकण घाला आणि ते ७ ते ८ मिनिटे उकडून घ्या.
  • ७ ते ८ मिनिटाने त्यावरील झाकण उघडून ते रोल चांगले शिजलेत का ते पहा आणि जर ते चांगले शिजले असतील तर गॅस बंद करून घ्या
  • आणि जर तुम्ही वडीचे रोल उकडण्यासाठी इडली पात्राचा वापर करत असाल तर इडली पात्रामध्ये थोडे पाणी घाला आणि इडलीच्या प्लेटला तेल लावून त्यावर वडीचे रोल ठेवून त्याला झाकण घालून ते उकडण्यासाठी ठेवा.
  • वडीचे रोल चांगले उकडल्यानंतर ते रोल ताटामध्ये काढून घेवून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पडा.
  • आता वाडी तळण्यासाठी कढई मध्ये तेल घाला आणि ते आणि ते मोठ्या आचेवर चांगले तापवा. एकदा कढईमधील तेल तापले कि गॅसची आच मध्यम करून त्या तेलामध्ये एक एक वडी टाकून त्यामध्ये एकावेळी ६ ते ७ वड्या टाकून चांगली सोनेरी किंवा तपकिरी होईपर्यंत तळा.
  • हि प्रक्रिया राहिलेल्या वड्यांच्यासाठी देखील करा आणि सर्व वड्या तळुन घ्या.
  • तुमच्या कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहेत.

कोथिंबीर वडी कश्यासोबत खाल्ली जाते – serving suggestions

कोथिंबीर वडी हा पदार्थ आपण नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सॉस, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, चपाती, रोटी किंवा अगदी तशी देखील खाता येते.

कोथिंबीर वडी करताना लक्षात घेतल्या जाणाऱ्या काही टिप्स 

  • कोथिंबीर वडीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर ही ताजी असावी.
  • जर तुम्हाला जास्त तिखट पदार्थ आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील वापरू शकतात त्यामुळे वडीला चांगला तिखटपणा येईल.
  • वडीमध्ये जर आपण थोड्या प्रमाणात ओवा वापरला तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले कारण ओवा पचायला हलका असतो त्यामुळे आपल्याला वडी खाल्ल्यामुळे कोणताही त्रास होत नाही.
  • ज्यांना तेलकट आणि तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हि वडी जरी वाफवून खाल्ली तरी चांगली लागते किंवा त्याला थोडी जिरे, मोहरी, लसून पेस्ट आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन जरी खाल्ली तरी चालेल.

 आम्ही दिलेल्या kothimbir vadi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोथिंबीर वडी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kothimbir chi vadi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kothimbir vadi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtrian kothimbir vadi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!