dairy diploma information in marathi डेअरी डिप्लोमा माहिती, सध्या भारतामध्ये डेअरी उत्पादनांना खूप महत्व आहे आणि सध्या भारतामध्ये डेअरी प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालत आहे. त्यामुळे डेअरी कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आपले करिअर चांगले घडवण्याची चांगलीच संधी आहे. दुधापासून अनेक पदार्थ (तूप, लोणी, बटर, दही, पनीर, चीज) बनतात आणि त्या पदार्थाना बाजारामध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे डेअरी प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत आणि तरुणांची आणि लोकांची ओढ देखील या प्रकल्पाकडे वाढत चाललेली आहे.
डेअरी टेक्नोलॉजी हि एक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखा आहे जी दुध प्रक्रिया आणि मानवावर होणारा परिणाम याची पडताळणी करते. तसेच या प्रकल्पामध्ये दुध, आईसस्क्रीम, तूप, लोणी, बटर, दही, पनीर, चीज या सारख्या पदार्थांचे पॅकेज, वितरण आणि वाहतूक करण्यासाठी बॅक्टेरियोलॉजी आणि पोषण या विज्ञानाचा वापर केला जातो.
डेअरी डिप्लोमा हा कोणताही विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट स्टारवर करू शकतात आणि या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत आणि बीटेक (BTech), एमटेक (MTech), बीएससी (BSc) आणि एमएससी (MSc) या सारखे लोकप्रिय कोर्स हे डेअरी प्रकल्पासाठी लोकप्रिय आहेत. डेअरी डिप्लोमा मध्ये दुध खरेदी, दुध गुणवत्ता नियंत्रण यावर लक्ष ठेवणे, दुधापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, दुधावर प्रक्रिया करणे या सारखा अनेक गोष्टींचा अभ्यासक्रम हा या मध्ये समाविष्ट असतो. डेअरी डिप्लोमा हा एक आपला स्वताचा व्यवसाय चालू करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
डेअरी डिप्लोमा माहिती – Dairy Diploma Information in Marathi
डेअरी डिप्लोमा म्हणजे काय – dairy diploma meaning in Marathi
डेअरी डिप्लोमा हा अएक कोर्स आहे जो दुध खरेदी, दुध गुणवत्ता नियंत्रण यावर लक्ष ठेवणे, दुधापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, दुधावर प्रक्रिया करणे या सारख्या गोष्टींच्याविषयी माहिती देतो आणि यामध्ये बीटेक ( BTech ), एमटेक ( MTech ), बीएससी ( BSc ) आणि एमएससी ( MSc ) हे लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.
डेअरी डिप्लोमासाठी अभ्यासक्रम – syllabus
डेअरी डिप्लोमा या पदवी कार्यक्रमामध्ये बीटेक ( BTech ), एमटेक ( MTech ), बीएससी ( BSc ) आणि एमएससी ( MSc ) हे लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत आणि हे स्पेशलायझेशन वर अवलंबून आहे. डेअरी तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम हा वेगळा असू शकतो जसे कि डेअरी तंत्रज्ञानामध्ये डेअरी इंजिनीअरिंग, डेअरी केमिस्ट्री, डेअरी कॅटल न्युट्रिशन, डेअरी इकॉनॉमिक्स आणि डेअरी कॅटल फ़िजिओलॉजी या सारखा अभ्यासक्रम आहे. बीटेक ( BTech ) चा कोर्स हा चार वर्षाचा आहे आणि यामध्ये आठ सेमिस्टर असतात.
अ. क्र | विषय |
१. | डेअरी इंजिनीअरिंग |
२. | डेअरी केमिस्ट्री |
३. | डेअरी कॅटल न्युट्रिशन |
४. | डेअरी इकॉनॉमिक्स |
५. | डेअरी कॅटल फ़िजिओलॉजी |
डेअरी डिप्लोमा पात्रता निकष – eligibility
कोणताही कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला सरकारने किंवा त्या संबधित संस्थेने ठरवलेले पात्रता निकष पार पडावे लागतात तसेच डेअरी डिप्लोमा देखील करण्यासाठी काही पात्रता निकष पार पडावे लागतात. डेअरी डिप्लोमा हा कोर्स भारतामध्ये अनेक विद्यापीठामध्ये राबवला जातो आणि काही विद्यापीठामध्ये हा व्यावसायिक म्हणून शिकवला जातो. चला तर खाली आपण डेअरी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहूया.
- उमेदवारांनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये आवश्यक असलेल्या किमान टक्केवारीसह विज्ञान प्रवाहात १२ मध्ये ५० टक्केहून अधिक गुण मिळवून उतीर्ण होणे गरजेचे आहे.
- डेअरी तंत्रज्ञानातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या कडून त्यांच्या संबधित विद्यापीठे किंवा महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली किमान टक्केवारी असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या विद्यार्थ्याला डेअरी डिप्लोमा करायचा असेल तर त्या संबधित विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतून १२ वी पूर्ण केलेली असावी.
डेअरी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया – process
ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर डेअरी डिप्लोमा करायचा आहे अश्या विद्यार्थ्यांनी यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती प्रक्रिया काय आहे ते खाली आपण पाहूया.
- सर्वप्रथम तुम्ही महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. मग तुमच्या समोर एक विद्यापीठाचे पेज ओपन होईल.
- आता नोंदणी या बटनावर क्लिक करा तुमच्या समोर नोंदणी अर्ज ओपन होईल.
- त्यानंतर नोंदणी फॉर्मवर दिलेले सर्व तपशील भरा आणि परीक्षा शुल्क भरा आणि पुन्हा एकदा भरलेला तपशील तपासा आणि मग सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
- प्रवेशपत्रासह प्रवेश परीक्षेला उपस्थित रहा.
- प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात किंवा सादर करावी लागतात.
- त्या नंतर कागदपत्रे दिल्यानंतर महाविद्यालय किंवा विद्यापीठ कागदपत्रांची पडताळणी करते आणि मग त्या संबधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करते.
डेअरी डिप्लोमा विषयी महत्वाची माहिती – information about dairy diploma in Marathi
- या प्रकल्पामध्ये दुध, आईसस्क्रीम, तूप, लोणी, बटर, दही, पनीर, चीज या सारख्या पदार्थांचे पॅकेज, वितरण आणि वाहतूक करण्यासाठी बॅक्टेरियोलॉजी आणि पोषण या विज्ञानाचा वापर केला जातो.
- डेअरी डिप्लोमा करण्यासाठी कमीत कमी १५००० ते २०००० हजार इतकी फी असते.
- या प्रकारचा प्रकल्प करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कार्यक्षमता, टीमवर्क, वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये, जिज्ञासू वृत्ती या प्रकारचे गुणधर्म असणे खूप आवश्यक असते.
- डेअरी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या म्हणजे मदर डेअरी, अमूल, मेट्रो डेअरी लिमिटेड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेसले इत्यादी.
- हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून १२ वी पूर्ण केलेली असावी आणि त्याला १२ वी कक्षेमध्ये ५० ते ६० टक्के गुण मिळालेले असावे तरच तो डेअरी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी पात्र ठरू शकतो.
- बीटेक ( BTech ), एमटेक ( MTech ), बीएससी ( BSc ) आणि एमएससी ( MSc ) हे लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत आणि हे स्पेशलायझेशन वर अवलंबून आहे.
- डेअरी डिप्लोमा मध्ये दुध खरेदी, दुध गुणवत्ता नियंत्रण यावर लक्ष ठेवणे, दुधापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, दुधावर प्रक्रिया करणे या सारखा अनेक गोष्टींचा अभ्यासक्रम हा या मध्ये समाविष्ट असतो.
- डेअरी डिप्लोमा हा कोर्स २ किवा ४ वर्षाचा असू शकतो आणि हे स्पेशलायझेशनवर अवलंबून असू शकते.
आम्ही दिलेल्या dairy diploma information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डेअरी डिप्लोमा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dairy diploma meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dairy diploma in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट