आईस्क्रीम रेसिपी Ice Cream Recipe in Marathi

Ice Cream Recipe in Marathi आईस्क्रीम रेसिपी मराठी आज या लेखामध्ये सर्वांना आवडणाऱ्या आईस्क्रीम या रेसिपी बद्दल माहिती घेणार आहोत. आईस्क्रीम हा पदार्थ कोणाला आवडता नाही हा पदार्थ सर्वांना आवडतो आणि हा एक डेझर्ट प्रकार असून हि डिश लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात खातात आणि हि डिश खाण्यासाठी लहान मुलांच्यापासून ते मोठ्यांच्यापर्यंत सराव लोक खूप वेडे असतात. आईस्क्रीम हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि दुध हे आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे त्यामध्ये साखर, कस्टर्ड पावडर आणि वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स घालून आपण वेगेवगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आपण घराच्या घरी उत्तम प्रकारे बनवू शकतो.

आणि आईस्क्रीम आपण दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर त्याचा आनंद घेवू शकतो. आईस्क्रीम हे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये उपलब्ध असते जसे कि साधे आईस्क्रीम, व्हॅनीला आईस्क्रीम, बटर स्कॉच, मॅगो आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, ड्राय फ्रुट आईस्क्रीम, फ्रुट फ्लेवर्ड आईस्क्रीम याप्रकारची अनेक आईस्क्रीम आपल्याला बाजारामध्ये मिळतात आणि त्यामाधिली काही कप मधील असतात, काही कोण मधील असतात तर काही फॅमिली पॅक असतात.

काही लोकांना आईस्क्रीम इतके आवडते कि आईस्क्रीम हे नाव जरी ऐकले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि ते खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. हा पदार्थ एक गोठवलेला पदार्थ आहे जो आपण रात्रीच्या जेवणानंतर डेझर्ट म्हणून खावू शकतो.

आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण दुध किंवा मलई सुध्दा वापरून आपण आईस्क्रीम बनवू शकतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. आईस्क्रीम हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आणि हा पदार्थ खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो.

ice cream recipe in marathi
ice cream recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 आईस्क्रीम रेसिपी – Ice Cream Recipe in Marathi

आईस्क्रीम रेसिपी – Ice Cream Recipe in Marathi

आईस्क्रीम महणजे काय ?

आईस्क्रीम हा एक दुधापासून बनवला जाणारा थंडगार पदार्थ आहे. दुध हे आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे त्यामध्ये साखर, कस्टर्ड पावडर आणि वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स घालून आपण वेगेवगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आपण घराच्या घरी उत्तम प्रकारे बनवू शकतो.

घरच्या घरी आईस्क्रीम बनवताना सर्वप्रथम १ चमचा कस्टर्ड पावडर २ ते ३ चमचे दुधामध्ये घालून ती चांगली मिक्स करा आणि मग ती चांगली मिक्स झाली कि ते मिश्रण दुधामध्ये ओता आणि ते दुध गॅसवर शिजवून घ्या आणि मग ते थंड झाले कि घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते.

आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

 • दुध : आईस्क्रीम बनवताना लागणारा दुध हा पदार्थ एक मुख्य घटक आहे. आईस्क्रीम बनवतेवेळी दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून शिजवली जाते आणि मग त्यामध्ये थोड्या वेळाने इसेन्स आणि साखर टाकली जाते.
 • कस्टर्ड पावडर : कस्टर्ड पावडर देखील आईस्क्रीम बनवताना वापरणे गरजेचे असते कारण कस्टर्ड पावडर मुळे आईस्क्रीमला घट्टपणा येतो.
 • इसेन्स : आईस्क्रीम मध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स वापरले तर आईस्क्रीला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर येतात्त.

आईस्क्रीम रेसिपीज – how to make ice cream at home recipe in marathi

आईस्क्रीम हे कोणाला आवडत नाही, हे सर्वांना आवडते आणि काही लोक तर या डिशचे वेढे असतात. आपण आपल्याला आईस्क्रीम खावू वाटले कि वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बाजारातून विकत आणतोच परंतु आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीम सारखे आईस्क्रीम घरी देखील बनवू शकतो आणि ते देखील वेगवेगळ्या फ्लेवरचे जसे कि साधे आईस्क्रीम, व्हॅनीला आईस्क्रीम, बटर स्कॉच, मॅगो आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, ड्राय फ्रुट आईस्क्रीम, फ्रुट फ्लेवर्ड आईस्क्रीम.

घरच्या घरी आईस्क्रीम बनवणे खूप सोपे असते आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम प्रकारे आपण आईस्क्रीम बनवू शकतो. चला तर मग पाहूयात आईस्क्रीम कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

व्हॅनीला आईस्क्रीम रेसिपी – vanilla ice cream recipe in marathi language

काही लोकांना फ्लेवरचे आईस्क्रीम आवडते आणि हा एक लोकांच्या आवडत्या यादीतील फ्लेवर आहे. चला तर मग पाहूयात व्हॅनीला आईस्क्रीम कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

व्हॅनीला आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make vanilla ice cream 

व्हॅनीला आईस्क्रीम बनवताना आपल्याला दुध, कस्टर्ड पावडर आणि व्हॅनीला इसेन्स हे मुख्य साहित्य आहे आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग पाहूयात व्हॅनीला आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

 • दीड वाटी ताजे दुध ( मलई युक्त ).
 • १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर.
 • १/४ वाटी साखर किंवा पिठी साखर ( आवडीनुसार ).
 • १ वाटी मलई ( मऊ टेक्चर येण्यासाठी ).
 • १ वाटी ड्रायफ्रुट्स ( काजू, बदाम, पिस्ता तुकडे ).
 • १ मोठा चमचा व्हॅनीला इसेन्स.

व्हॅनीला आईस्क्रीम बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make vanilla ice cream recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून व्हॅनीला आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूयात.

 • सर्वप्रथम एक वाटी घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर घाला आणि त्यामध्ये दीड ते २ ( आवश्यकतेनुसार ) मोठे चमचे दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यामधील सर्व गाठी फोडून घ्या आणि त्याची पातळ स्लरी बनवून घ्या.
 • आता एक भांड्यामध्ये दीड वाटी दुध घ्या आणि त्यामध्ये आपण बनवून ठेवालेली कस्टर्ड पावडरची पातळ स्लरी मिक्स करा आणि ते भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा आणि ते पावडर मिक्स केलेले दुध गरम करा आणि ते मंद आचेवर गरम करत असताना ते सतत चमच्याने हलवत रहा.
 • तुम्ही दुध हलवत राहिल्यामुळे दुध खाली लागणार नाही.
 • दुध चांगले गरम झाले कि त्यामध्ये १/४ वाटी साखर घाला आणि ती चमच्या ढवळून विरघळून घ्या. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त साखर घालू शकता.
 • आता हे दुध थोडे मंद आचेवर आटवत असताना. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये १ वाटी मलई घ्या आणि त्यामध्ये व्हॅनीला इसेन्स घाला आणि ते मिक्सरवर थोडे फिरवून घ्या,
 • आणि आता ती मलई थंड झालेल्या दुधामध्ये आपण मिक्सरमध्ये व्हीप केलेली क्रीम घाला आणि ती दुधामध्ये चागली एकजीव करा ( टीप : हे मिश्रण तुम्ही मिक्सरवर मंद वेगावर मिक्स करून घेतले तरी चालते ).
 • आता हे मिश्रण एक हवा बंद डब्यामध्ये ओता आणि त्याला गच्च झाकण लावून ते फ्रीजमध्ये highest cold mode वर फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा आणि ते आईस्क्रीम ६ ते ७ तास सेट करा.
 • ते आईस्क्रीम चांगले सेट झाले कि म्हणजेच ते घट्ट झाले कि ते एका सर्व्हिंग बाऊमध्ये काढून त्यावर काजू, बदाम आणि पिस्ता काप टाकून सर्व्ह करा.

चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी – chocolate ice cream recipe in marathi language

चॉकलेट म्हटलं कि लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत अनेक लोकांच्या तोडला पाणी सुटते आणि चॉकलेट फ्लेवरचे आईस्क्रीम म्हंटले तर काय विषयच नाही. चॉकलेट आईस्क्रीम हे खूप लोकांना आवडते आणि हे खूप जन आवडीने खातात. म्हणूनच आपण चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chocolate ice cream recipe 

चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला भरपूर साहित्य बाजारातून आणावे लागते जसे कि चॉकलेट पावडर, कोको पावडर, कस्टर्ड पावडर, चॉको चिप्स, कॉर्नफ्लोवर कारण हे साहित्य आपल्याला घरामध्ये उपलब्ध नसते त्यामुळे ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आता आपण पाहूयात.

 • अर्धा लिटर दुध.
 • दीड चमचा कस्टर्ड पावडर.
 • ८ ते ९ मोठे चमचे साखर ( पिठी साखर ).
 • १ मोठा चमचा चॉकलेट पावडर.
 • १ मोठा चमचा कोको पावडर.
 • अर्धा मोठा चमचा कॉर्नफ्लोवर.
 • दीड चमचा चॉको चिप्स.

चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make chocolate ice cream recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूयात.

 • सर्वप्रथम एक वाटी घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर घाला आणि त्यामध्ये दीड ते २ ( आवश्यकतेनुसार ) मोठे चमचे दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यामधील सर्व गाठी फोडून घ्या आणि त्याची पातळ स्लरी बनवून घ्या.
 • आता एक भांड्यामध्ये दीड वाटी दुध घ्या आणि त्यामध्ये आपण बनवून ठेवालेली कस्टर्ड पावडरची पातळ स्लरी मिक्स करा.
 • आता या मिश्रणामध्ये साखर, १ मोठा चमचा चॉकलेट पावडर, १ मोठा चमचा कोको पावडर आणि अर्धा मोठा चमचा कॉर्नफ्लोवर घाला आणि मिश्रण मिक्सरमध्ये कमी वेगावर किंवा बिटरच्या कमी वेगावर चांगले मिक्स करून एक जीव करून घ्या.
 • मग गॅसवर मद आचेवर कढई ठेवा आणि ते मिक्स केलेले मिश्रण घाला आणि मिक्स केलेले दुध गरम करा आणि ते मंद आचेवर गरम करत असताना ते सतत चमच्याने हलवत रहा. तुम्ही दुध हलवत राहिल्यामुळे दुध खाली लागणार नाही.
 • दुध थोडे घट्ट झाले कि गॅस बंद करा आणि ते मिश्रण चांगले थंड होएऊ द्या.
 • हे मिश्रण थंड झाले कि त्यामध्ये चॉको चिप्स घाला आणि ते चांगले मिक्स करा.
 • आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एक गच्च झाकण असलेल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओता आणि ते फ्रीजरला highest cold mode वर ५ ते ६ तास सेट करण्यासाठी ठेवा.
 • ५ ते ६ तासांनी ते तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून सर्व्ह करू शकता.

मॅगो आईस्क्रीम रेसिपी – mango ice cream recipe in marathi

जर तुम्हाला ताजे आंबे वापरून मॅगो आईस्क्रीम बनवायचे असल्यास तुम्ही हे मॅगो आईस्क्रीम उन्हाळ्याच्या सीजन मध्ये म्हणजे आंब्याच्या सीजन मधेच बनवू शकता. चला तर मग पाहूयात मॅगो आईस्क्रीम कसे बनवायचे आणि हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

मॅगो आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mango ice cream 

मॅगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला आंबा, दुध आणि कस्टर्ड पावडर, फ्रेश क्रीम हे साहित्य लागते आणि ते आपण बाजारातून सहज उपलब्ध करू शकतो. आता आपण मॅगो आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • २ आंबे.
 • १/२ लिटर दुध.
 • दीड चमचा कस्टर्ड पावडर
 • १ वाटी ताजी क्रीम.
 • १/२ वाटी साखर.
 • १ चमचा वेलची पावडर.

मॅगो आईस्क्रीम बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mango ice cream 

 • सर्वप्रथम एक वाटी घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर घाला आणि त्यामध्ये दीड ते २ ( आवश्यकतेनुसार ) मोठे चमचे दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यामधील सर्व गाठी फोडून घ्या आणि त्याची पातळ स्लरी बनवून घ्या.
 • आता एक भांड्यामध्ये दीड वाटी दुध घ्या आणि त्यामध्ये आपण बनवून ठेवालेली कस्टर्ड पावडरची पातळ स्लरी मिक्स करा आणि ते भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा आणि ते पावडर मिक्स केलेले दुध गरम करा आणि ते मंद आचेवर गरम करत असताना ते सतत चमच्याने हलवत रहा.
 • तुम्ही दुध हलवत राहिल्यामुळे दुध खाली लागणार नाही. दुध घट्ट झाले कि गॅस बंद करा आणि ते दुध गार हु द्या.
 • आता आंबे घ्या आणि त्या साल काढून त्याचा गाभा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि त्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालून ते मिक्सरला फिरवा आणि त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्या.
 • मग दुध गार झाले कि त्यामध्ये आंब्याची पेस्ट आणि क्रीम घालून ते चांगले फेटा आणि मिश्रण एकजीव करा.
 • आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एक गच्च झाकण असलेल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओता आणि ते फ्रीजरला highest cold mode वर ५ ते ६ तास सेट करण्यासाठी ठेवा.
 • ५ ते ६ तासांनी ते तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून सर्व्ह करू शकता.

साधे आईस्क्रीम रेसिपी – ice cream recipe

काही लोकांना फ्लेवरचे आईस्क्रीम आवडत नाही त्यांच्यासाठी आता आपण साधे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूयात.

आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make ice cream recipe 

 • दीड वाटी ताजे दुध ( मलई युक्त ).
 • १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर.
 • १/४ वाटी साखर किंवा पिठी साखर ( आवडीनुसार ).
 • १ वाटी ड्रायफ्रुट्स ( काजू, बदाम, पिस्ता तुकडे ).

आईस्क्रीम बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make ice cream recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूयात.

 • सर्वप्रथम एक वाटी घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर घाला आणि त्यामध्ये दीड ते २ ( आवश्यकतेनुसार ) मोठे चमचे दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यामधील सर्व गाठी फोडून घ्या आणि त्याची पातळ स्लरी बनवून घ्या.
 • आता एक भांड्यामध्ये दीड वाटी दुध घ्या आणि त्यामध्ये आपण बनवून ठेवालेली कस्टर्ड पावडरची पातळ स्लरी मिक्स करा आणि ते भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा आणि ते पावडर मिक्स केलेले दुध गरम करा आणि ते मंद आचेवर गरम करत असताना ते सतत चमच्याने हलवत रहा.
 • तुम्ही दुध हलवत राहिल्यामुळे दुध खाली लागणार नाही.
 • दुध चांगले गरम झाले कि त्यामध्ये १/४ वाटी साखर घाला आणि ती चमच्या ढवळून विरघळून घ्या. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त साखर घालू शकता.
 • आता ते मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडे थंड होऊ द्या
 • ते मिश्रण थंड झाले कि त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता याचे काप घाला आणि ते मिक्स करा.
 • मग हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एक गच्च झाकण असलेल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओता त्याला झाकण लावून ते फ्रीजरला highest cold mode वर ५ ते ६ तास सेट करण्यासाठी ठेवा.
 • ५ ते ६ तासांनी ते तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून सर्व्ह करू शकता.

टिप्स ( Tips ) 

 • आईस्क्रीम आपण ३ ते ४ दिवस फ्रीजमध्ये ठेवून त्याची मजा घेवू शकतो.
 • जर तुमच्याकडे आईस्क्रीममध्ये वापरण्यासाठी कस्टर्ड पावडर घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लोवर स्लरी देखील वापरली तरी चालते ज्यामुळे आईस्क्रीमला घट्ट पणा येतो.
 • आईस्क्रीममध्ये पिठी साखर देखील वापरली तरी चालेले कारण पिठी साखर लगेच विरघळते.
 • जर तुम्ही आईस्क्रीममध्ये पिठी साखर वापरत असाल तर प्रमाणापेक्षा थोडी जास्ती पिठी साखर वापरा.
 • साखर आवडीनुसार वापरा म्हणजे गोड जास्त आवडत असल्यास जास्त वापरा आणि कमी आवडत असल्यास कमी वापरा.
 • आंब्याचा इसेन्स घालून देखील आपण मॅगो आईस्क्रीम बनवू शकतो.

आम्ही दिलेल्या ice cream recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आईस्क्रीम रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ice cream recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vanilla ice cream recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chocolate ice cream recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “आईस्क्रीम रेसिपी Ice Cream Recipe in Marathi”

 1. आईस्क्िम ला वास येत असल्यास काय करावे. आईस्क्रीम करताना दूध करापल्यास काय करावे

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!