डाळींचे प्रकार व माहिती Dal Information in Marathi

Tur Dal Information in Marathi – Types of Dal With Name in Marathi वेगवेगळ्या डाळींच्या विषयी माहिती भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये रोजच्या जेवणामध्ये डाळीचा एक तर पदार्थ असतोच जसे कि डाळीचे वरण, डाळीची आमटी, डाळ फ्राय आणि डाळ भात यासारखे अनेक पदार्थ डाळीपासून बनवलेले असतात. भारतीय पाककृतीतील सर्वात मौल्यवान घटकांपैकी एक म्हणजे डाळ, डाळीला सर्वात मौल्यवान घटक म्हणण्याचे कारण भारतीय स्वयंपाकघरात डाळीला एक विशेष स्थान आहे. डाळीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे तूर डाळ, मुग डाळ, हरभरा डाळ, मसुरा डाळ आणि उडद डाळ या प्रकारच्या अनेक डाळी स्वयंपाक मध्ये वापरल्या जातात.

आणि डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक सुध्दा मिळतात. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त डाळीचा (तूर डाळ, मूग डाळ) वापर हा सांबर आणि आमटी करण्यासाठी केला जातो.

Dal Information in Marathi
Dal Information in Marathi

डाळींचे प्रकार व माहिती – Dal Information in Marathi

तूर डाळ माहिती मराठी – Tur Dal Information in Marathi

Arhar Dal in Marathi भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये आणि भारताच्या अनेक भागामध्ये तूर डाळीला आनण्य साधारण महत्व आहे कारण तूर डाळ हि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. या प्रकारच्या डाळीचा उपयोग सांबर बनवण्यासाठी, आमटी बनवण्यासाठी जात प्रमाणात केला जातो. तूर डाळीला अरहर डाळ किंवा कबूतर डाळ म्हणूनही ओळखली जाते.

कोणत्याही दक्षिण भारतामध्ये लोकांच्या जेवणामध्ये तूर डाळ असते. हि डाळ प्रथिने, पोटॅशियम, लोह, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे यासारख्या पोषक घटकांनी पूरक आहे.

फायदे

 • तूर डाळ हि एक फायबरच मोठा स्त्रोत आहे आणि जर आपण रोजच्या आहारामध्ये या डाळीचा वापर केला तर हे निरोगी आहार योजनेचा एक भाग असू शकतो ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

मसूर डाळ माहिती मराठी – Masoor Dal in Marathi

मसूर डाळ किंवा लाल मसूर डाळ ही भारतीय स्वयंपाकात सामान्यतः वापरली जाणारी डाळ आहे. कोणत्याही डाळी पौष्टिक असल्यामुळे त्या आपल्या आरोग्यास देखील चांगल्या असतात तसेच मसूर डाळीमध्ये देखील काही पौष्टिक आणि औषधी गुण असतात, ते म्हणजे प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बी जीवनसत्त्वे आणि फोलेटने या सारखे पौष्टिक घटक असतात त्यामुळे आपले चांगले आरोग्य वाढवण्यास मदत होते. मसूर डाळ हि शक्यतो भारतीय संस्कृतीमध्ये डाळीच उसळं करण्यासाठी वापरली जाते.

मसूर डाळीचे फायदे व तोटे

 • या डाळीमध्ये आहारातील फायबरचा चांगला स्त्रोत असल्यामुळे क्तातील साखरेच्या स्पाइकचे नियमन होण्यास मदत होते.
 • आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध मसूर डाळ त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि मुरुमांना प्रतिबंध देखील करते.
 • मसूर डाळीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हि डाळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

उडीद डाळ माहिती – Urad Dal in Marathi

उडद डाळ हा मुख्य घटक आहे जो खूप प्रसिद्ध डाळ प्रकार आहे आणि या डाळीची स्वादिष्ट चव देखील आहे. उडद डाळ हि एक लोकप्रिय डाळ आहे जी इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पा आणि मेंदुवडा यासारख्या अनेक पदार्थामध्ये वापरली जाते त्याचबरोर उडदाच्या डाळीचे पापड देखील बनवले जातात. या डाळीमध्ये देखील पौष्टिक घटक असतात जसे कि प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी इत्यादी.

उडीद डाळ खाण्याचे फायदे

 • उडद डाळ खाल्ल्यामुळे पचन शक्ती वाढते त्यामुळे जर काही लोकांना अपचन या सारख्या समस्या जाणवत असतील तर उडद डाळ खाल्लीतर पचन चांगले होण्यास मदत होते.
 • हि डाळ त्वचा आणि केसांना देखील उपयुक्त ठरते.
 • या डाळीमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील आहारातील फायबर असल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
 • उडद डाळ खाल्ल्यामुळे हाडांची सुधारणा होण्यास मदत होते आणि हाडे मजबूत होण्यास देखील मदत होते.
 • ऊर्जा वाढवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

मुग डाळ माहिती – Moong Dal in Marathi

मुग डाळ हि सामन्यता स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी एक डाळ आहे ज्याच्या वापर आपण जेवणामध्ये डाळीची आमटी किंवा डाळीची खिचडी बनवण्यासाठी करू शकतो. या डाळीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, फोलेट, पोटॅशियम, जस्त, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि आहारातील फायबरचा चांगला स्त्रोत आहे.

फायदे

 • मुग डाळ खाल्ल्यामुळे पचन शक्ती वाढते त्यामुळे जर काही लोकांना अपचन या सारख्या समस्या जाणवत असतील तर मुग डाळ खाल्लीतर पचन चांगले होण्यास मदत होते.
 • मुग डाळीमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
 • हि डाळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.

हरभरा डाळ माहिती – Chana Dal in Marathi

हरभरा डाळ हा भारतातील हा भारतातील प्रमुख पदार्थ आहे आणि या डाळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. बहुतेकदा या डाळीचा उपयोग दळून त्याचे बेसन पीठ करून भजी बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठी तसेच पुरण पोळी बनवण्यासाठी, बेसन लाडू आणि कळीचे लाडू या सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी या प्रकारच्या डाळीचा उपयोग केला जातो. भारतामध्ये हरभरा डाळ हि खूप प्राचीन काळापासून केली जाते आणि त्याची उत्पत्ती पूर्व भूमध्य प्रदेशामध्ये झाली असे म्हणतात.

हरभरा डाळ खाण्याचे फायदे

 • हरभरा डाळ हि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते.
 • हरभरा डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
 • हि डाळ खाल्यामुळे आपल्या हाडांची सुधारणा होते आणि हाडे मजबूत देखील होतात.
 • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हरभरा डाळ हि तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते.

वेगवेगळ्या डाळींच्या बद्दल अनोखी तथ्ये – facts about dal 

 • वेगवेगळ्या डाळी ह्या वेगेवेगळ्या पोषक घटकांनी पूरक असतात आणि त्या पोषक घटक असणाऱ्या डाळी खाल्ल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते.
 • काही डाळींमध्ये असे पोषक घटक असतात ज्यामुळे केसांचे तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते.
 • डाळींच्यामध्ये प्रथिने, खनिज आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
 • डाळ हि एक फायबरच मोठा स्त्रोत आहे त्यामुळे हृदयरोग तसेच मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
 • काही लोकांना अपचन या सारख्या समस्या जाणवत असतील तर मुग डाळ खाल्लीतर पचन चांगले होण्यास मदत होते.
 • डाळ आणि तांदूळ ( जसे कि डाळ मखनी, जीरा राईस किंवा खिचडी ) यांचे क्लासिक संयोजन लोकप्रिय आहे कारण ते पौष्टिक आणि चवदार देखील असते.
 • डाळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे कि आमटी, डाळ फ्राय आणि डाळ खिचडी यासारखे पदार्थ बनवले जातात.
 • भारतीय पाककृतीतील सर्वात मौल्यवान घटकांपैकी एक म्हणजे डाळ, डाळीला सर्वात मौल्यवान घटक म्हणण्याचे कारण भारतीय स्वयंपाकघरात डाळीला एक विशेष स्थान आहे
 • डाळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
 • दक्षिन भारत आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त डाळीचा (तूर डाळ, मूग डाळ) वापर हा सांबर आणि आमटी करण्यासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या dal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डाळींचे प्रकार व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tur dal information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dal mill information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये arhar dal meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!