क जीवनसत्व माहिती Vitamin C Information in Marathi

Vitamin C Information in Marathi – Vitamin C in Marathi व्हिटॅमिन सी माहिती कोरोनाला हरवायचे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये  जीवनसत्व क युक्त असलेला आहार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कारण जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर आज आपण जाणून घेणार आहोत जीवनसत्व क बद्दल. त्याचे स्त्रोत कुठले आहेत, त्याचे फायदे, तोटे तसेच त्याच्या अभावामुळे होणारे रोग  हे सर्व आपण या लेखात पाहणार आहोत.

तर आधी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जीवनसत्व क म्हणजे काय आहे – हे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. जे नैसर्गिक रित्या संत्रा, लिंबू, आवळा सारख्या  उत्पादनांमध्ये नैसर्गिक रित्या असते. आणि आहाराचे  पूरक  तत्व  म्हणूनही उपलब्ध आहे. जीवनसत्व म्हणजेच अस्कॉर्बीक ऍसिड. हे आंबट फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. जीवनसत्व  क मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात. प्रदूषण तसेच प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेची हानी भरून काढण्याचे काम जीवनसत्त्व करते.

Vitamin C Information in Marathi
Vitamin C Information in Marathi

क जीवनसत्व माहिती मराठी – Vitamin C Information in Marathi

अन्न मिलिग्राम (मिग्रॅ)प्रति सेवाटक्केवारी (%) DV*
लाल मिरची, गोड, कच्ची, ½ कप95106
संत्राचा रस, ¾ कप93103
संत्रा, 1 मध्यम7078
द्राक्षाचा रस, ¾ कप7078
किवीफ्रूट, 1 मध्यम6471
हिरवी मिरपूड, गोड, कच्चा, कप6067
ब्रोकोली, शिजवलेले, ½ कप5157

जीवनसत्व क चे स्त्रोत – Vitamin C Foods in Marathi

आवळा

आवळा हा जीवनसत्व क उच्च स्रोत आहे. 100 ग्रॅम आवळ्यामध्ये 700 ग्रॅम क जीवनसत्व मिळते.   आवळा जरी उपलब्ध नसेल तरी  त्याच्या पासून बनवलेली उत्पादने जसे की गुळाच्या पाकात बनवलेली आवळा कॅण्डी,आवळा जाम हे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपण त्याचाही वापर जीवनसत्व   मिळवण्यासाठी करू शकतो.

लिंबू

लिंबू हे सहज उपलब्ध असणारे फळ आहे. सध्या कोरुना च्या काळामध्ये जीवनसत्व क मिळवण्यासाठी  लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत पिण्यास प्राधान्य होते .

टोमॅटो

टोमॅटो ही सुद्धा सहज आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे फळ आहे.याचा वापर आपण जेवणात सर्रास करतो.

संत्री

संत्री सर्वांच्या आवडीचे फळ याच्या मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व मिळते.

किवी 

जोपर्यंत डेंगू झाल्यावर डॉक्टर पेशंटला  कीवी खाण्याचा सल्ला देत नाहीत तोपर्यंत कीवी हे  फळ बहुतेक जणांना माहीत नसते. कीवि मध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व आढळते.

पेरू

सर्वांच्या परिचयाचे फळ.  मात्र 100 ग्रॅम मात्रेतून आपल्याला 300 ग्रॅम क जीवनसत्व मिळते.
तसेच नारळाचे फळ, द्राक्षे, अननस, आंबा, पपई, मनुके, स्ट्राबेरी, खरबूज, टरबूज, मोसंबी या फळामधून आपल्याला क जीवनसत्त्व मिळते. तसेच पालक, कोबी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बटाटा, वाटाणा, हरभरा, घेवडा, मेथी, मुळ्याची पाने, कोथिंबीर, करडई इत्यादी फळभाज्या व पालेभाज्या मधून आपल्याला क जीवनसत्त्व मिळते. डाळीमध्ये ही जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते पण डाळी भिजवून खाल्ल्यामुळे   जीवनसत्व मिळते.

तसेच जीवनसत्व क च्या कॅप्सूल, टॅबलेट सुद्धा कृत्रिम पूरक रुपात उपलब्ध आहेत.

जीवनसत्त्व क चे फायदे – vitamin c benefits in marathi

त्वचेसाठी जीवनसत्व क चे फायदे –

जीवनसत्व क मुळे व त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य खुलते. त्वचा नितळ आणि सुंदर दिसण्यासाठी शरीराला जीवनसत्व कच्चा पुरवठा होणे आवश्यक आहे. जीवनसत्व क मुळे चेहऱ्यावरील डाग, मुरूम, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स यांसारख्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.रोज जीवनसत्व क शरीरात गेल्यामुळे चेहर्‍यावरील तेज वाढते. जीवनसत्व क खाद्यपदार्थांत सोबतच  जीवनसत्व क युक्त क्रीम, लोशन, ब्लीच हे सुद्धा चेहर्यासाठी उपलब्ध आहेत.

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी –

जीवनसत्व क मुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होते. जीवनसत्व क हे आपल्या शरीरात विषाणू विरुद्ध लढण्यासाठी  अँटी बॉडीज तयार करते. म्हणूनच  कोरोनाच्या महामारीत जीवनसत्त्व  क भरपूर प्रमाणात सेवन करण्याचे सल्ले दिले जात होते.

हिरड्यांसाठी फायदे- 

दात चांगले ठेवण्यासाठी हिरड्या मजबूत असणे आवश्यक आहे. आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी जीवनसत्व क खूप महत्त्वाचे आहे. रक्तस्त्राव होत असेल तर आहारामध्ये जीवनसत्व क चा वापर आणि अनिवार्य आहे. जीवनतत्व  क हे हिरड्यांच्या संरचनेला आधार देते.

जखम बरी करण्यासाठी – 

जखमेचा उपचार प्रक्रियेत जीवनसत्व क ची  महत्वपूर्ण भूमिका आहे. जीवन सत्व  क मुळे जखम भरून येण्यास मदत होते.

हाडासाठी जीवनसत्व क चे महत्व –

अस्थींचे कार्य सुधारण्यासाठी जीवनसत्व क महत्त्वाचे आहे. हाडांच्या मजबुतीसाठी जीवनसत्व यांच्याबरोबरच जीवनसत्व क सुद्धा महत्वाचे आहे.शरीराचे सांधे जोडण्याचे काम करणाऱ्या कॉलाजेन नामक द्रव्य तयार करण्याचे काम हे जीवनसत्त्व करते.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी- 

जीवनसत्व क हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. मानसिक आरोग्य वरील सकारात्मक प्रभावासाठी जीवनसत्व क हे महत्त्वाचे आहे. उतारवयात वय संबंधित विकारांना रोखण्यासाठी जीवनसत्व क चा वापर आवश्यक आहे. जीवनसत्व क मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात. प्रदूषण, प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेची झालेली हानी भरून काढण्याचे काम जीवनसत्त्व क करते.

  • जीवनसत्व क शरीरातील रक्तवाहिन्यांना मजबूत करण्याचे काम करते.
  • शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलवर  नियंत्रण मिळवण्याचे काम ही जीवनसत्त्व  क करते.
  • चयापचय क्रियेतील काही क्रिया  क जीवनसत्वा शिवाय घडू शकत नाहीत. क जीवनसत्वामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.

जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारे रोग –

  • जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. स्कर्वी या रोगात दाता च्या खालच्या आवरणाला सूज येने, त्यातून रक्त वाहने, दात गळून पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
  • जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे लवकर थकवा येतो.
  • मानसिक दृष्ट्या नैराश्य येणे हेसुद्धा जीवनसत्व क च्या  अभावाचे लक्षण आहे.
  • जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे  रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात.

जीवनसत्व क ची गरज आणि प्रमाण :

सामान्य व्यक्तीची क जीवनसत्वाची आवश्यकता 45-50 मिली ग्रॅम एवढी आहे. प्रसूत स्त्रियांना 80 मिली ग्रॅम  इतक्या क जीवनसत्वाची आवश्यकता आहे. सहा महिने ते 12 वर्षापर्यंत 30 मिली ग्रॅम  तर 13 ते 18  वर्षापर्यंत 30 – 50 मिली ग्रॅम  क जीवनसत्वाची आवश्यकता असते.

जीवनसत्व क च्या अतिसेवनामुळे होणारे सहप्रभाव –

  • जीवनसत्व क च्या अतिसेवनामुळे मळमळ, अतिसार, पोट बिघडणे व त्यामध्ये वेदना होणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
  • जीवनसत्व क च्या अतिसेवनामुळे काही व्यक्तींमध्ये ऍलर्जिक प्रतिक्रियाही घडू शकतात.
  • कोणत्याही जीवनसत्वाचा अतिरेक किंवा अभाव शरीरास अपायकारक ठरतो. त्यामुळे त्याचे सेवन योग्य प्रमाणात आणि शरीराच्या गरजेनुसार करावे.

पदार्थांची वाहतूक त्यावरील प्रक्रिया व त्यांची साठवणूक इत्यादी क्रियांमध्ये क जीवनसत्त्व नष्ट होते. त्याप्रमाणे फळे जास्त वेळ शीतकपाटामध्ये ठेवल्यामुळे त्यातील बरेचसे जीवनसत्त्व नष्ट होते. इतर जीवनसत्त्वांच्या तुलनेत  क जीवनसत्व लवकर नष्ट होत असल्यामुळे कृत्रिम पद्धतीने ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

शीतपेये यांना फळांचे फ्लेवर देताना त्यात कृत्रिम रीत्या बनवलेले अस्कॉर्बिक अॅसिद मिसळले जाते. कित्येक हवाबंद पदार्थांमध्ये क जीवनसत्व मिसळले जाते जेणेकरून त्या पदार्थांचे ऑक्सिडीकरण होणार नाही.

आम्ही दिलेल्या Vitamin C Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “क जीवनसत्व” बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vitamin c benefits in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vitamin c marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!