Dal Tadka Recipe in Marathi – Recipe of Dal Tadka in Marathi दाल तडका रेसिपी मराठी डाळ तडका हा भारतीय रेस्टॉरंटमध्ये दिला जाणारा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये डाळ तडका कसा बनवला जातो याबद्दल माहिती घेणार आहोत. डाळ तडका हि रेसिपी खूप सोपी आहे आणि या तडक्याचा स्वाद देखील खूप छान लागतो. डाळ तडका हा एक भारतीय प्रकार असून यामध्ये तूर डाळ, मुग डाळ किंवा मसुर डाळ या प्रकारच्या डाळी वापरल्या जातात आणि या डाळी शिजवून त्याला लसून आणि सुक्या मिरच्या यांचा तडका दिला जातो.
दाल तडका रेसिपी मराठी – Dal Tadka Recipe in Marathi
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
शिजवण्यासाठी लागणार वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
वाढणी | ५ ते ६ व्यक्ती |
पाककला | भारतीय |
- डाळ : डाळ ही डाळ तडका बनवण्यासाठी लागणारी महत्वाची सामग्री आहे कारण डाळीशिवाय डाळ तडका बनू शकत नाही.
- लसून व लाल सुक्या मिरच्या : डाळ तडक्यासाठी लसून व लाल सुक्या मिरच्या वापरल्या जातात कारण लसून व लाल सुक्या मिरच्यांशिवाय डाळ तडक्याला स्वाद येवू शकत नाही.
- डाळ तडकासाठी ताजे साहित्य वापरा- डाळ बनवताना चांगले आणि ताजे साहित्य वापरा म्हणजेच डाळ तडका मध्ये वापरली जाणारी डाळ चांगल्या प्रतीची असावी तसेच त्यामध्ये तडक्यासाठी वापरला जाणारा लसून ताजा असावा त्याचबरोबर टोमॅटो, आलं आणि कोथबिर देखील ताजी असावी.
- तडक्यासाठी तूप वापरावे : काही लोक तडक्यासाठी तेल वापरतात आणि हे त्यांच्या आवडीनुसार वापरले जाते परंतु जर तडक्यासाठी तूप वापरले तर डाळ तडक्याला एक वेगळाच स्वाद येतो.
- डाळीला धुंगर पद्धतीने स्मोकी फ्लेवर घालणे – डाळीला धुंगर पद्धतीने स्मोकी फ्लेवर दिला डाळ तडक्याला एक वेगळीच चव येते.
डाळ तडका मध्ये वापरल्या जाणाऱ्या डाळी
- तूर डाळ : डाळ तड्क्यामध्ये शक्यतो तूर डाळ वापरून केली जाते आणि या डाळीपासून केलेला डाळ तडका खूप छान होतो आणि आज या लेखामध्ये देखील आपण जी रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये तुरडाळ वापरणार आहोत.
- मूग डाळ : अगदी मूग डाळ देखील रेसिपी बनवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
- मसूर डाळ : डाळ तडका बनवण्यासाठी मसूर डाळ देखील वापरली जाते.
डाळ तडका हि रेसिपी अशी रेसिपी आहे जी बहुतेक लोक रोजच्या जेवणामध्ये खातात कारण हि रेसिपी साध्या भाताबरोर चांगली लागते आणि हि करण्यासाठी सोपी आहे आणि कमी वेळेत होते. आपण खाली डाळ तडका कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणारा आहोत.
- १ वाटी तुरडाळ.
- २ वाटी पाणी.
- २ ते ३ चमचे तेल किंवा तूप.
- ७ ते ८ पाकळ्या लसून.
- २ मोठ्या लाल सुक्या मिरच्या.
- १/२ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा गरम मसाला.
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
कृती क्रमांक १ : डाळ शिजवण्यासाठी केली जाणारी कृती
- सर्वप्रथम डाळ एका बाऊल मध्ये काढून घेवून त्यामध्ये पाणी घालून ते एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर कुकर मध्ये १ वाटी तुरडाळ घाला आणि त्यामध्ये २ वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून मध्यम आचेवर ४ शिठ्या येई पर्यंत ठेवा आणि मग ते शिजल्यानंतर कुकर बंद करा.
- मंद आचेवर गॅस लावून त्यावर कढई ठेवा त्यात २ ते ३ चमचे तेल किवा तूप घालून त्यामध्ये १/२ चमचा मोहरी घाला.मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला.जिरे छान फुलले कि त्यामध्ये १ मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घाला.कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये आलं व लसून पेस्ट घालून ते चांगले २ सेंकदासाठी भाजून घ्या मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर चांगले भाजून घ्या.
- मग यावर झाकण घालून ते १ ते २ मिनिटासाठी चांगली वाफ काढून घ्या त्यामुळे टोमॅटो चांगला शिजला जाईल नंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि २ लाल मिरची पावडर घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि त्यामध्ये मीठ आणि साखर चवीनुसार टाकून घ्या.
- मग थोडे पाणी शिंपडा आणि मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घालून सर्व मिश्रण एकत्र करा आणि एक डाळीला एक चांगली उकळी आणा.
- नंतर मग वरून कोथिंबीर टाका.
- आता एक छोटी तडका कढई घ्या आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तूप घाला आणि तूप चांगले गरम होऊ पर्यंत वाट पहा. एकदा तूप गरम झाले कि त्यामध्ये ठेचलेल्या ७ ते ८ लसून पाकळ्या, २ ते ३ लाल सुक्या मिरच्या, थोडीशी हळद घाला आणि तो तडका आपण बनवलेल्या डाळीमध्ये घाला (टीप :तडका देताना गॅसची आच मध्यम असावी नाहीतर आपला तडका करपण्याची शक्यता असू शकते).
- आपला रेस्टॅरंटसारखा डाळ तडका तयार झाला.
डाळ तडका आपण कश्या सोबत खाऊ शकतो – serving ideas
डाळ तडका हा पदार्थ तिखट असल्यामुळे आपण हा पदार्थ पांढरा भात, जीरा राईस, चपाती, रोटी किंवा नान सोबत खावू शकतो.
खाली आपण घरगुती गरम मसाला कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणारा आहोत. त्यासाठी खाली साहित्य आणि कृती दिलेली आहे.
साहित्य
- २ ते ३ कांड्या दालचिन.
- ३ ते ४ वेलदोडे.
- १ मसाला वेलदोडा.
- २ बदाम फुल.
- १ तमाल पत्रीचे पान.
- ६ ते ७ चमचा काळी मिरी.
- सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मधयम आचेवर गॅसवर ठेवा मग त्यामध्ये दालचिन, वेलदोडे, बदाम फुल, मसाला वेलदोडे, तमाल पत्रीचे पान, काळी मिरी घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
- भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये गार करा आणि मग ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या सर्व खड्या मसाल्याची बारीक पूड करून घ्या.
- बारीक पूड केल्यानंतर तो मसाला चाळून घ्या. तुमचा घरगुती गरम मसाला तयार झाला.
आम्ही दिलेल्या dal tadka recipe in marathi video माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दाल तडका रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal tadka recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dal recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dal recipe marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट