दलिया रेसिपी मराठी Daliya Recipe in Marathi

Daliya Recipe in Marathi – Daliya in Marathi दलिया रेसिपी मराठी दलिया म्हटलं कि अनेक लोकांना समजत नाही कि दलिया म्हणजे काय आणि या पासून कोणकोणत्या रेसिपी बनवल्या जातात परंतु दलिया म्हणजे मोठा मोठा पडलेला गव्हाचा रवा ज्याला सुजी देखील म्हणतात आणि या पासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात आणि आज आपण या लेखामध्ये दलिया पासून बनणाऱ्या काही लोकप्रिय रेसिपीज पाहणार आहोत. दलिया हे एक पौष्टिक अन्न म्हणून खाल्ले जाते. दलिया हा एक पौष्टिक अन्न आहे आणि आपण दलिया पासून गोड लपसी / गोड सुजी, दलिया उपमा हे प्रसिध्द बनवले जातात.

भारतामध्ये बहुतेक ठिकाणी दालीयापासून उपमा किंवा लपसी आवडीने बनवले जातात आणि खाल्ले जातात. चला तर मग आता आपण दलिया पासून रेसिपी कश्या बनवायच्या त्या पाहूयात.

daliya recipe in marathi
daliya recipe in marathi

दलिया रेसिपी मराठी – Daliya Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे

दलिया रेसिपीज – daliya recipes 

दलिया पासून अगदी सोप्या आणि कमी वेळेमध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनणाऱ्या रेसिपीज बनवू शकतो आणि ह्या रेसिपी बनवण्यासाठी साहित्य देखील खूप कमी लागते. चला तर मग आता आपण दलिया पासून वेगवेगळ्या रेसिपी कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

दलिया उपमा किंवा सुजी उपमा रेसिपी कशी बनवतात – how to make daliya upma recipe 

आता आपण गव्हापासून बनवलेली सुजीचा उपमा कसा बनवायचा याबद्दल आता आपण पाहूयात. चला तर मग पाहूयात सुजीचा उपमा कसा बनवायचा आणि त्याला काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे

सुजी उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make daliya 

सुजी उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आपल्याला बाजारातून काही गडबडीने विकत आणावे लागत नाही.

  • १ वाटी सुजी.
  • २ वाटी पाणी.
  • २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या.
  • १ कांदा ( चिरलेला ).
  • १ चमचा मोहरी
  • ३ ते ४ कडीपत्ता पाने.
  • थोडेसे जिरे.
  • १ छोटा टोमॅटो ( चिरलेला ).
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ हळद.
  • कोथिंबीर.
  • १/२ मोठा चमचा तेल.

सुजी उपमा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make suji upma 

  • सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि त्यामध्ये सुजी घाला आणि ती चांगली भाजून घ्या आणि ती भाजल्यानंतर सुजी कढईमधून ताटामध्ये काढून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये जिरे, कडीपत्ता आणि कांदा खाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याच्या पाकळ्या घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
  • आता त्यामध्ये गरम पाणी घाला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजलेली सुजी, टोमॅटो आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून कढईवर झाकण घालून सुजी ५ ते ६ मिनिटे शिजवा.
  • ५ ते ६ मिनिटांनी सुजी मऊ झाली असेल तर ती शिजलेली असते आणि सुजी शिजली नसेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून आणि थोडा वेळ शिजवा.
  • सुजी उपमा चांगला शिजला कि त्यामध्ये कोथिंबीर घालून ती मिक्स करा आणि सुजी उपमा गरम गरम सर्व्ह करा.

लापशी रेसिपी – lapsi recipe in marathi 

लापशी रेसिपी हि एक महाराष्ट्रीयन पारंपारिक गोड आणि आणि पौष्टिक डिश आहे जी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण हि खूप सोपी आणि झटपट बनणारी लापशी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

लापशी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make lapsi recipe 

लापशी रेसिपी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि जे साहित्य लागते ते काही वेळा लापशी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही वेळा ते साहित्य उपलब्ध नसते त्यावेळी ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर आता आपण लापशी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी दलिया ( गव्हाचा पडलेला मोठा मोठा रवा ).
  • ३ वाटी पाणी.
  • १ वाटी गुळ ( खिसलेला ).
  • २ ते ३ चमचे तुप.
  • २ चमचे बदाम तुकडे.
  • १ चमचे काजू तुकडे.
  • १ चमचा बेदाणे.
  • १/२ चमचा वेलची पावडर.

लापशी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make lapsi recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून लापशी कशी बनवायची ते पाहूयात.

  • लापशी बनवताना सर्वप्रथम दलिया स्वच्छ निवडून घ्या आणि मग तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील बाजूला ठेवा.
  • मग गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि ते गरम झाले कि त्यामध्ये २ चमचे तूप घाला आणि ते गरम झाले कि त्यामध्ये प्रथम काजूचे तुकडे टाका आणि ते चांगले लालसर होईपर्यंत भाजा आणि ते भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवा.
  • आता त्यामध्ये काजू घाला आणि ते देखील भाजून घ्या आणि बेदाणे देखील तुपामध्ये परतवून घ्या आणि मग ते बाजूला काढून ठेवा.
  • आता या भांड्यामध्ये आणखी थोडे तूप घाला आणि मग त्यामध्ये दलिया घालून ते ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर चांगले परतून किंवा भाजून घ्या ( दलिया भाजताना तो करपणार नाही याची काळजी घ्या ). ( भाजल्यानंतर गॅस बंद करा )
  • आता ते दुसरीकडे एका भांड्यामध्ये ३ वाटी पाणी गया आणि ते मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये गुळ घाला आणि तो थोडा विरघळू द्या मग गुळ विरघळला कि त्यामध्ये भाजलेला दलिया घाला आणि मिक्स करा.
  • त्यानंतर लगेचच यामध्ये वेलची पावडर आणि तळलेले ड्राय फ्रुट्स घाला आणि मिक्स करा.
  • आणि ते झाकण लावून चांगले शिजवून घ्या.
  • ते मऊ शिजले कि आपली लापशी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

आम्ही दिलेल्या daliya recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दलिया रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या daliya khichdi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dalia recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!