Upma Recipe in Marathi – Upit Recipe in Marathi उपमा रेसिपी मराठी उपमा हा पदार्थ रव्यापासून बनवला जाणारा एक पदार्थ आहे जो सहसा लोक सकाळच्या नाश्त्यासाठी बनवतात. आपली जर सकाळी कामावर जायची गडबड असेल पण आपल्या घरातील इतर लोकांना नाश्त्याची सवय असे आणि आपल्याला घरातील इतर लोकांच्यासाठी गडबडीने नाश्ता बनवायचा असेल तर आपण शिरा, पोहे किंवा उपमा बनवू शकतो कारण शिरा पोहे जसे झटापट बनतात तसाच उपमा देखील एक झटपट बनणारा पदार्थ आहे. उपमा हा पदार्थ खूप सोपा आहे आणि हा कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम नाश्त्याचा प्रकार बनू शकतो.
उपमा या पदार्थाला उपीट देखील म्हणतात आणि उपमा हि रेसिपी आपण रवा किंवा सुजी पासून बनवू शकतो. आज या लेखामध्ये आपण उपमा कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत.
उपमा रेसिपी मराठी – Upma Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
उपमा म्हणजे काय – upama recipe in marathi
उपमा हा एक दक्षिण भारतीय प्रकार असून हा पदार्थ रवा किंवा सुजी पासून बनवतात आणि यामध्ये तूप, कांदा, आले, मोहरी, मिरची, उडदाची डाळ, मीठ आणि कोथिंबीर घालून केला जातो.
उपमा हा नाश्त्यासाठी बनवला जाणारा दक्षिण भारतीय प्रकार आहे जो गडबडीच्या वेळी झटपट बनतो. आता आपण झटपट उपमा कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.
- नक्की वाचा: शिरा रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
- १ वाटी रवा.
- २ वाटी पाणी.
- २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ छोटा टोमॅटो ( चिरलेला ).
- १ चमचा उडदाची डाळ.
- १/२ मोठा चमचा तेल किंवा तूप.
- १/२ चमचा मोहरी.
- ५ ते ६ कडीपत्ता पाने.
- मीठ ( चवीनुसार ).
- कोथिंबीर.
पध्दत पहिली
- सर्वप्रथम रेसिपीसाठी वापरला जाणारा रवा ताटामध्ये घेवून चांगला निवडून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि त्यामध्ये रवा घालून ४ ते ५ मिनिटे चांगला भाजून घ्या ( टीप : रवा चांगला भाजला नाही तर आपला मऊ आणि सुट्टा होणार नाही ).
- कढईतील रवा भाजताना रव्याला चमच्याने सारखे वरती खाली करा.
- आणि हे करत असताना दुसरीकडे एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घाला आणि ते उकळून घ्या.
- आता भाजलेला रवा एका ताटामध्ये काढून त्या कढईमध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि आणि कडीपत्ता घाला आणि ते २ सेकंद हलवा मग त्यामध्ये कांदा घाला आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- एकदा कांद्याला लालसर रंग आला कि त्यामध्ये डाळ टाका आणि ती मिक्स करून थोडा वेळ भाजा.
- त्यानंतर आता यामध्ये उकळलेले पाणी घाला आणि ते सर्व मिश्रण एकत्र करा आणि त्याला एक उकळी आणा. पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये भाजलेला रवा, मीठ ( चवीनुसार ) आणि टोमॅटो घाला आणि कढईवर झाकण घालून त्याला २ ते ३ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या त्यामुळे त्यामधील रवा फुलेल.
- शेवटी गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालून ती मिक्स करा आणि उपमा एका प्लेटमध्ये घालून त्यावर बारीक शेव घालून त्यावर एक लिंबूची फोड ठेवून सर्व्ह करा.
पध्दत दुसरी
- आता आपण उपमा बनवण्याची दुसरी पध्दत पाहूया.
- आता गॅसवर कढई ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि मग त्यामध्ये
- कढईमध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि आणि कडीपत्ता घाला आणि ते २ सेकंद हलवा मग त्यामध्ये कांदा घाला आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- एकदा कांद्याला लालसर रंग आला कि त्यामध्ये डाळ टाका आणि ती मिक्स करून थोडा वेळ भाजा.
- मग त्यामध्ये रवा घाला आणि रवा तुपामध्ये चांगला भाजा.
- रवा भाजल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घाला आणि सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
- मग त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्या आणि त्यावर झाकण घालून ३ ते ४ मिनिटे वाफ येवू द्या.
- तुमचा गरम गरम उपमा तयार झाला.
आता आपण गव्हापासून बनवलेली सुजीचा उपमा कसा बनवायचा याबद्दल आता आपण पाहूयात. चला तर मग पाहूयात सुजीचा उपमा कसा बनवायचा आणि त्याला काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: कांदा पोहे रेसिपी मराठी
सुजी उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आपल्याला बाजारातून काही गडबडीने विकत आणावे लागत नाही.
- १ वाटी सुजी.
- २ वाटी पाणी.
- २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या.
- १ कांदा ( चिरलेला ).
- १ चमचा मोहरी
- ३ ते ४ कडीपत्ता पाने.
- थोडेसे जिरे.
- १ छोटा टोमॅटो ( चिरलेला ).
- दीड चमचा लाल मिरची पावडर.
- १/४ हळद.
- कोथिंबीर.
- १/२ मोठा चमचा तेल.
- सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि त्यामध्ये सुजी घाला आणि ती चांगली भाजून घ्या आणि ती भाजल्यानंतर सुजी कढईमधून ताटामध्ये काढून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
- कढईमध्ये गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये जिरे, कडीपत्ता आणि कांदा खाला आणि ते चांगले भाजून घ्या.
- मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याच्या पाकळ्या घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
- आता त्यामध्ये गरम पाणी घाला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजलेली सुजी, टोमॅटो आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून कढईवर झाकण घालून सुजी ५ ते ६ मिनिटे शिजवा.
- ५ ते ६ मिनिटांनी सुजी मऊ झाली असेल तर ती शिजलेली असते आणि सुजी शिजली नसेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी घालून आणि थोडा वेळ शिजवा.
- सुजी उपमा चांगला शिजला कि त्यामध्ये कोथिंबीर घालून ती मिक्स करा आणि सुजी उपमा गरम गरम सर्व्ह करा.
टिप्स ( tips )
- तुम्ही रवा बाजारातून आणल्यानंतर निवडून भाजून एक डब्यांमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता.
- उपमा या पदार्थामध्ये तुम्ही लिंबूचा रस देखील घालू शकता.
- रव्याच्या किंवा सुजीच्या उपमा रेसिपीमध्ये आपण ओले मटार देखील घालू शकतो.
आम्ही दिलेल्या upma recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उपमा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या south indian upma recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि upma recipe in marathi youtube माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये upama recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट