Dhirubhai Ambani Biography in Marathi – Dhirubhai Ambani Information in Marathi धीरूभाई अंबानी माहिती धीरजलाल हिराचंद अंबानी. धीरूभाई अंबानी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. हे रिलायन्स इंडस्ट्रीज ची स्थापना करणारे भारतीय उद्योगपती होते. अंबानी यांनी १९७० मध्ये रिलायन्स ही कंपनी सार्वजनिक केली आणि २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर याची किंमत US$ ७.९ अब्ज होती. २०१६ मध्ये धीरूभाई अंबानी यांना त्यांच्या व्यापार आणि उद्योगातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा पुरस्कार करण्यात आला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या महान उद्योगपतींची माहिती जाणून घेणार आहोत.
धीरूभाई अंबानी माहिती – Dhirubhai Ambani Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | धीरूभाई अंबानी |
जन्म (Birthday) | २८ डिसेंबर १९३५ |
जन्म गाव (Birth Place) | चोरवड, गुजरात |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | भारतीय उद्योगपती |
मृत्यू (Death) | ६ जुलै २००२ |
Dhirubhai Ambani Information in Marathi
जन्म
धीरज लाल हिराचंद अंबानी यांचा जन्मा २८ डिसेंबर १९३५ रोजी चोरवड, गुजरात या छोट्याशा गावात झाला. धीरूभाई अंबानी हे हिराचंद गोवर्धनभाई अंबानी यांचे पुत्र होते. त्यांचे वडील एका छोट्याशा गावातील शाळेत शिक्षक होते. धीरूभाई अंबानी यांनी कोकीला सोबत लग्न केले आणि त्यांना मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, भद्रशाम कोठारी आणि दीप्ती दत्तराज साळगावकर अशी चार मुले झाली.
धीरूभाई अंबानी फक्त दहावी उत्तीर्ण होते. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर त्यांनी एक छोटीशी नोकरी करायला सुरुवात केली असं म्हटलं जातं की त्यांचा सुरुवातीचा पगार फक्त केवळ तीनशे रुपये होता. परंतु खूप महिनत, कष्ट करून, वेळ देऊन ते एक यशस्वी उद्योगपती बनले. धीरूभाई अंबानी यांचे सुरुवातीचे दिवस हलाखीचे व कष्टमय होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना
घरच्या परिस्थितीमुळे धीरूभाई अंबानी यांना लहान वयामध्ये काम करावं लागलं होतं. परंतु, धीरूभाई अंबानी यांना एक उद्योगपती व्हायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीला फळे विकायला सुरुवात केली परंतु ते काही फारसं चालू शकल नाही. मग पुढे त्यांनी गावातील धार्मिक ठिकाणांवर पकोडे विकायला सुरुवात केलं परंतु हे कामही फारसं काही यश मिळू शकलं नाही. मग पुढे धीरूभाई अंबानी यांनी शेवटी नोकरी करण्याचा विचार केला.
धीरूभाई अंबानी यांनी लहान वयातच नोकरी करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी तीनशे रुपये पगारावर दिवस काढले. धीरूभाई अंबानी जेव्हा सतरा वर्षाचे होते तेव्हा ते येमेनला गेले जिथे त्यांचे भाऊ रमनिकलाल काम करत होते. येमेन मध्ये धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काही काळ काम केलं त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी दर महिना तीनशे रुपये पगारावर नोकरी केली. पुढे ते त्या कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाले. त्यानंतर काही काळ येमेन मध्ये घालवल्यानंतर ते वर्षांनी भारतामध्ये परत आले.
येमेन मध्ये राहून त्यांनी व्यापारी बनण्याचे स्वप्न पाहिलं. सन १९५८ मध्ये धीरूभाई अंबानी भारतात परतले आणि त्या पुढे त्यांनी व्यापारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिनत करण्यास सुरुवात केली. त्यांचा चुलत भाऊ चंपक्लाल यांच्या सोबत माजीन हा कापड व्यवसाय सुरू केला. माझिन यामेन मध्ये मसाले आणि रेयाॅन यांसारख्या वस्तूंची निर्यात करत असे आणि पॉलिस्टर आयात करायचे. धीरूभाई अंबानी यांनी पहिले कार्यालय मज्जित बंदर येथील नरसिंहच्या रस्त्यावर उभारले होते.
धीरूभाई अंबानी यांनी बिजनेस ची सुरुवात अगदी छोट्या जागेत केली. ते तीस मीटर चौरस हे कार्यालयाचे क्षेत्रफळ होतं. तर ३५० स्क्वेअर फुट एरिया मध्ये त्यांनी तीन खुर्च्या, एक टेलिफोन आणि टेबल फार कमी पण मात्र महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या होत्या. इथूनच रिलायन्स कंपनीची सुरुवात झाली. जास्तीत जास्त उत्पादन तयार करून जास्त नफ्यावर लक्ष देणं हे धीरूभाई अंबानी यांच त्या वेळेस ध्येय होतं. त्या काळी धीरूभाई अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईतील भुलेश्वर येथे एका लहान अपार्टमेंटमध्ये राहत होते.
सन १९५६ मध्ये धिरुभाई अंबानी आणि चंपक्लाल यांची भागीदारी संपुष्टात आली. कारण धीरूभाई अंबानी आणि चंपक्लाल या दोघांचा देखील व्यवसाय चालवण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. आणि म्हणूनच त्यांची भागिदारी देखील काही फारशी चांगली झाली नाही. धीरूभाई यांना मार्केटिंगच चांगलं ज्ञान होतं. ते जोखीम घेणारे म्हणूनही ओळखले जायचे आणि त्यांचा असा विश्वास होता की उत्पन्न वाढवण्यासाठी इन्व्हेंटरी तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.
यातून बाहेर पडून धीरूभाई अंबानी यांनी कापूस व्यापारात पाऊल ठेवलं त्यांना माहीत होतं की यामध्ये तोटा होण्याची जास्त भीती आहे परंतु तरीही त्यांनी एका छोट्याशा दुकानांमध्ये हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या मार्केटिंग मधील उत्तम कौशल्याने त्यांनी बॉम्बे कॉटन ट्रेडर्स ऑर्गनायझेशन चे संचालक पद मिळवलं. आता धीरूभाई अंबानी यांना वस्त्र उद्योगाचा चांगलाच अनुभव मिळाला होता. ते या व्यवसायात पारंगत झाले होते आणि म्हणूनच १९६६ मध्ये त्यांनी आमदाबाद नैरो येथे टेक्स्टाईल गिरणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
या उद्योगामध्ये पॉलिस्टर धाग्यांचा वापर केला जात असे. धीरूभाई अंबानी यांनी बाजारपेठेला विमल यांची ओळख करून दिली. हा ब्रँड त्यांनी इतका मोठा बनवला की भारताच्या अगदी ग्रामीण भागातही हा ब्रँड घरगुती नाव बनला. १९६६ मध्ये त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉपोरेशन नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलले आणि आता ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणून ओळखली जाते. १९७७ मध्ये रिलायन्स कंपनीने आपला आयपीयो जाहीर केला.
तेव्हा ५८ हजार गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. धीरूभाई अंबानी यांना त्यांच्या कंपनीवर खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यांनाच आवाहन केले होते की जो कोणी आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करेल त्याला केवळ नफाच मिळेल. पुढे हाच उद्योग धीरूभाई अंबानी यांनी विविध क्षेत्रामध्ये विस्तारित केला.
पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार माहिती, तंत्रज्ञान, उर्जा, वीज, किरकोळ वस्तू, उद्योग पायाभूत सेवा, भांडवली, बाजार आणि रसद अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हा व्यवसाय विस्तारला गेला. ६ जुलै २००२ रोजी मुंबईत यांचे निधन झाले. रिलायन्स कमर्शियल कॉपोरेशन ची स्थापना १९६६ मध्ये पॉलिस्टर फॉर्म म्हणून झाली होती. १९७३ मध्ये कंपनीचे नाव रिलायन्स इंडस्ट्रीज असे ठेवण्यात आले. तर कंपनीने पेट्रोलियम आणि आर्थिक सेवेत प्रवेश केला. त्यांच्या निधनानंतर कंपनीचे प्रमुख यांचे दोन पुत्र अनिल अंबानी मुकेश अंबानी झाले.
पुरस्कार व प्रेरणादायी विचार
धीरूभाई अंबानी यांचे सुरुवातीचे दिवस हलाखीचे होते. त्यांनी अगदी तीनशे रुपये दर महिन्यापासून सुरुवात केली होती. परंतु त्यांची स्वप्नं फार मोठी होती आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की मोठी स्वप्ने बघितली की ती पूर्ण देखील होतात. अगदी गरीब आणि सामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील त्यांनी उद्योगपती होण्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात देखील उतरवल. धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या अनुभवातून देशभरातील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आपले प्रेरणादायी विचार मांडले.
त्यांनी मांडलेले विचार पुढील प्रमाणे. त्यांच्या मते ‘एक योग्य उद्योजक जोखीम घेण्यामुळे जन्माला येतात’. ‘मोठा विचार करा, वेगाने करा, पुढचा विचार करा कल्पनांवर कोणाचीही मक्तेदारी नाही’. ‘बहुतेक लोकांना असे वाटते की संधी मिळणे भाग्यावर अवलंबून असते माझा विश्वास आहे की संधी आपल्या सभोवताली आहेत’. ‘जर आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला नाही तर कोणीतरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामावर ठेवेल’.
‘संकटातही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा अडचणींना संधी मध्ये रुपांतर करा शेवटी तुम्हाला यश मिळेल’. धीरूभाई अंबानी यांना भरपूर पुरस्कार आणि मान्यता मिळाली आशिया विक मासिकातून मिळालेल्या माहितीनुसार धीरूभाई अंबानी हे १९९६, १९९८ आणि २००० यावर्षी आशियातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये ५० व्या क्रमांकावर होते.
१९५८ मध्ये पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल द्वारे त्यांना डिनचे पदक मिळाले होते. आणि धीरूभाई अंबानी हे पहिले भारतीय होते ज्यांना डिनचे पदक देण्यात आलं होतं. सन २००० मध्ये केमटेक फाउंडेशन तर्फे त्यांना कॉन्फरर्ड मॅन ऑफ द सेंचुरी अवॉर्ड देण्यात आला होता. २००१ मध्ये धीरूभाई अंबानी यांना इकॉनॉमिक टाईम पुरस्कार मिळाला. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ने त्यांना विसाव्या शतकातील माणूस असे नाव दिले होते. जानेवारी २०१६ मध्ये धीरूभाई अंबानी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मृत्यू
सन १९८६ मध्ये धीरूभाई अंबानी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आणि या झटक्यामुळे त्यांचा उजव्या हाताला अर्धांगवायू झाला होता. परंतु २४ जून २००२ मध्ये त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ६ जुलै २००२ रोजी धीरूभाई अंबानी यांच निधन झालं.
आम्ही दिलेल्या dhirubhai ambani biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर धीरूभाई अंबानी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhirubhai ambani information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dhirubhai ambani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट