पतंगराव कदम यांची माहिती Dr Patangrao Kadam Information in Marathi

dr patangrao kadam information in marathi पतंगराव कदम यांची माहिती, मध्यमवर्गीय कुटुंबातील डॉ पतंगराव कदम हे भारती विद्यापीठाचे संस्थापक आहेत आणि भारती विद्यापीठ हे जवळ जवळ सगळ्यांच्या परिचयाचे आहे आणि आज आपण या लेखामध्ये पतंगराव कदम यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. डॉ पतंगराव कदम यांची ओळख भारती विद्यापीठाचे संस्थापक म्हणून आहे आणि त्यांचे शिक्षण संस्था उभारणे हे आयुष्यातील एक महत्वाचे ध्येय होते.

त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि दहावी परीक्षा देऊन उतीर्ण होणारे ते गावातील पहिले व्यक्ती होते पुढे त्यांनी दहावीच्या शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षण तज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि हे साताऱ्यामध्ये होते आणि त्यांनी तेथून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

१९६१ मध्ये ते पुण्यामध्ये आले आणि त्यांनी अर्धवेळ शिक्षक म्हणून काम केले तसेच त्यांनी पी. एच. डी चे शिक्षण देखील पूर्ण केले आणि १९६४ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि त्याचबरोबर त्यांनी इतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्ये देखील केली.

आणि त्यांच्या चांगल्या कार्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले जसे कि उद्योग भूषण पुरस्कार, लोकाश्री आणि इतर अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले होते. चला तर खाली आपण पतंगराव कदम यांच्याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.

dr patangrao kadam information in marathi
dr patangrao kadam information in marathi

पतंगराव कदम यांची माहिती – Dr Patangrao Kadam Information in Marathi

नाव डॉ पतंगराव कदम
जन्म८ जानेवारी १९४४
जन्मठिकाणसांगली जिल्ह्यातील सोनसळ (महाराष्ट्र)
ओळखभारती विद्यापीठाचे संस्थापक आणि राजकारणी
मृत्यू९ मार्च २०१८

डॉ पतंगराव कदम यांची वैयक्तिक माहिती आणि शिक्षण – personal information and education

डॉ पतंगराव कदम यांचा जन्म ८ जानेवारी १९४४ मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये  झाला. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यामुळे ते शिक्षण घेण्यासाठी गावापासून ५ ते ६ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेमध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि ते दहावी उतीर्ण होणारे त्यांच्या गावातील पहिले व्यक्ती होते.

त्यांनी पुढे साताऱ्यामध्ये कॉलेजचे शिक्षण घेतले आणि पुढे त्यांनी पुण्यामध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची ओळख जरी भारती विद्यापीठाचे संस्थापक म्हणून असली तरी ते एक राजकारणी होते त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मदत, वन आणि भूकंप पुनर्वसन मंत्री मंत्री म्हणून काम केले.

राजकीय कारकीर्द – political information

डॉ पतंगराव कदम यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात १९८५ पासून केले आणि ते त्या वर्षी भिलवडी मतदान संघातून आमदार म्हणून निवडून आले आणि पुढे त्यांनी कारकीर्द सुरु ठेवली आणि परत ते पाच वर्षांनी त्याच मतदान संघातून निवडून आले म्हणजेच ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

तसेच त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मंत्री म्हणून देखील राजकीय कारकीर्द पार पाडली आहे ते १९९० मध्ये पहिल्यांदा मंत्री बनले आणि या काळामध्ये त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून आपली कामगिरी बनली.

तसेच पुढे त्यांनी वन मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, उद्योग मंत्री, पाठबंधारे मंत्री अश्या प्रकारे वेगवेगळी मंत्री पदे सांभाळली. ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेकवेळा बहुमत मतांनी निवडून आले आणि वेगवेगळ्या क्षेत्राचा राज्यकारभार सांभाळला.

डॉ पतंगराव कदम यांच्या विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • डॉ पतंगराव कदम यांना सामाजिक कार्याची आणि लोकांना मदत करण्याची देखील आवड होती त्यामुळे त्यांनी धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली ज्याद्वारे गरजू लोकांना आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाते.
  • डॉ पतंगराव कदम यांनी कमवा आणि शिका या योजनेमार्फत पुण्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यांनी त्यांचे पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले होते.
  • पुण्यामध्ये असताना त्यांनी १९६२ मध्ये अध्यापनाचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यांनी पुढे पुण्यातील एका शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून काम केले.
  • त्यांनी भारती विद्यापीठ या शिक्षण संस्थेची स्थापना केली तसेच त्यांनी त्याबरोबर बँक, साखर कारखाने, दुध संस्था आणि सूतगिरण्यांची देखील स्थापना केली.  
  • पतंगराव कदम यांनी शिक्षण तज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून समर्पित समाजसेवेचे धडे घेतले होते.
  • आदर पूनावाला यांना लस या कामासाठी पतंगराव कदम हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत.
  • त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द हि कॉंग्रेस या पक्षामध्ये राहून पार पाडली.
  • २०१६ च्या अगोदर राष्ट्रीय कॉंग्रेसच्याहातून सत्ता निसटली होती त्यामुळे २०१३ मध्ये डॉ पतंगराव कदम यांनी निवडणुकीमध्ये स्वता पुढाकार घेऊन कॉंग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेमध्ये आणले.
  • डॉ पतंगराव कदम हे महाराष्ट्रराज्य रस्ता वाहतूक महामंडळाचे संचालक होते त्याचबरोबर ते कोल्हापूरमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत.
  • डॉ पतंगराव कदम यांनी वयाच्या २० व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना एका छोट्याश्या खोलीमध्ये केली होती. भारती विद्यापीठामध्ये वैद्यक, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या सारख्या विविध विषयातील १४० शैक्षणिक संस्था आहेत.
  • या विद्यापीठाचे कँम्पस हे देशभरामध्ये आहेत जसे कि मुंबई, दिल्ली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली इत्यादी आणि दरवर्षी ४ ते ५ लाख विद्यार्थी गेट परीक्षा देऊन या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात.

मृत्यू – death

डॉ पतंगराव कदम यांचा मृत्यू ९ मार्च २०१८ मध्ये म्हणजेच वयाच्या ७२ व्या वर्षी मुंबई मध्ये असणाऱ्या लीलावती रुग्णालयामध्ये मूत्रपिंडाच्या विकारामुळे झाला.

आम्ही दिलेल्या dr patangrao kadam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पतंगराव कदम यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr patangrao kadam biography in marathi या dr patangrao kadam mahiti in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dr patangrao kadam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!