dr r chidambaram information in marathi डॉ. राजगोपाल चिदंबरम यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये एक प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. आर चिदंबरम यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. डॉ. आर चिदंबरम यांचे नाव राजागोपाल चिदंबरम असे आहे आणि यांचा जन्म हा तमिळ नाडू मधील चेन्नई मध्ये १२ नोव्हेंबर १९३६ मध्ये झाला आणि चिदंबरम यांनी त्यांचे शिक्षण हे मेठर आणि चेन्नई मध्ये केले आणि त्यांनी त्यांचे बी. एस्सी (B.Sc) चे शिक्षण हे भौतिक शास्त्रातून केले आणि त्यांनी मद्रास युनिवर्सिटीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवला.
मग त्यांनी मद्रास युनिवर्सिटीमध्ये १९५८ मधेचे भौतीकशास्त्र मधून एम.एस्सी (M.Sc) पूर्ण केली. डॉ. आर चिदंबरम हे एक प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ आहेत आणि ते भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील अविभाज्य भूमिकेसाठी ओळखले जातात. डॉ. आर चिदंबरम यांनी भारताच्या फेडरल सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले होते तसेच त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे संचालक म्हणून देखील काम केले होते. चला तर खाली आपण डॉ. आर चिदंबरम यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
डॉ. आर चिदंबरम यांची माहिती मराठी – Dr R Chidambaram Information in Marathi
नाव | डॉ. आर चिदंबरम (राजागोपाल चिदंबरम) |
जन्म | १२ नोव्हेंबर १९३६ |
जन्म ठिकाण | तमिळ नाडू राज्यातील चेन्नई मध्ये |
शिक्षण | एम.एस्सी (M.Sc) भौतिकशास्त्र |
मिळालेले पुरस्कार | पद्मश्री आणि पद्मविभूषण |
डॉ. आर चिदंबरम यांचा जन्म आणि जन्मठिकाण
डॉ. आर चिदंबरम यांचे नाव राजागोपाल चिदंबरम असे आहे आणि यांचा जन्म हा तमिळ नाडू मधील चेन्नई मध्ये १२ नोव्हेंबर १९३६ मध्ये झाला
डॉ. आर चिदंबरम यांचे शिक्षण – education
डॉ. आर चिदंबरम यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि प्रारंभिक शिक्षण हे मेठर आणि चेन्नई मध्ये झाले आणि मग त्यांनी त्यांचे बी. एस्सी (B.Sc) चे शिक्षण हे भौतिक शास्त्रातून केले आणि त्यांनी मद्रास युनिवर्सिटीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवला.
मग त्यांनी मद्रास युनिवर्सिटीमध्ये १९५८ मधेचे भौतीकशास्त्र मधून एम.एस्सी (M.Sc) पूर्ण केली. त्यांच्या ग्रॅज्यूएशननंतर त्यांची अनुशास्त्रातील आवड थोडी कमी झाली आणि त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये जास्त लक्ष घातले आणि त्यांना भौतिकशास्त्रामध्ये आवड निर्माण झाली आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये भौतिकशास्त्रामध्ये देखील काम केले तसेच त्यांना क्रिस्टलग्राफी आणि कंडेन्स्ड मॅटर फिजिक्समध्ये देखील खूप आवड होती.
डॉ. आर चिदंबरम यांची कारकीर्द
त्यांनी त्यांचे भौतिकशास्त्रामधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक संशोधन केंद्रामध्ये कामगिरी केली आणि पोखरण यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. खाली आपण डॉ. आर चिदंबरम यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
- डॉ. आर चिदंबरम हे पोखरण एक जे १९७५ मध्ये करण्यात आले होते आणि पोखरण दोन जे १९९८ मध्ये करण्यात आले होते आणि त्यांना यासाठी चाचणी तयारीचे समन्वय साधले होते आणि त्यांना या कार्यासाठी विशेषता ओळखले जाते.
- त्यांनी भारतातील अनेक संशोधन केंद्रामध्ये काम केले आणि त्यांनी भारताच्या अणुउर्जा आयोगाचे देखील अध्यक्ष होते.
- डॉ. आर चिदंबरम यांनी भारताच्या फेडरल सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले होते तसेच त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे संचालक म्हणून देखील काम केले होते.
- २००८ मध्ये त्यांची निवड आयएइएफ च्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले.
- डॉ. आर चिदंबरम यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये भारताच्या अण्वस्त्र विभागामध्ये देखील काम केले आणि महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांनी पोखरण चाचणीमध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली.
- त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट केल्यानंतर ते भाभा अनु संशोधन केंद्रामध्ये सहभागी झाले आणि ते भौतिक संशोधन करणाऱ्या भौतिकशास्त्र गटाचे संचालक म्हणून देखील काम पहिले.
- तसेच ते अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी काम करत असताना अणुउर्जा या क्षेत्रातील विकासाला गती देण्याचे काम त्यांनी केले.
- तसेच त्यांनी भारतीय लष्कराला राजस्थानमधील पोखरण चाचणी रेंज या ठिकाणी अनुचाचणीचे ठिकाण तयार करण्यासाठी मदत केली.
- अंतरराष्ट्रीय संघाच्या १९९८ च्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी युएस मध्ये व्हिसासाठी संपर्क साधला त्यावेळी त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नवहता.
- त्यांनी भारत सरकारची प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कामगिरी पार पाडली आणि ते फेडरल सरकारच्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष वैज्ञानिक सल्लागार देखील होते.
- डॉ. आर चिदंबरम यांनी भारत देशामधील सुमारे १५०० शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रांशी जोडण्यासाठी त्यांनी एक हाय स्पीड नॅशनल नॉलेज नेटवर्क तयार केले होते.
डॉ. आर चिदंबरम यांना मिळालेले पुरस्कार – awards
- डॉ. आर चिदंबरम यांना १९९६ मध्ये इंडियन मटेरीअल रिसर्च सोसायटीचा प्रतिष्ठित मटेरीयल सायंटिफिक ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता.
- १९९५ मध्ये त्यांना इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनचा सी व्ही रमण जन्मशताब्दी पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
- इंडियन न्युक्लिअर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार हा २००६ मध्ये देवून त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
- १९९६ मध्ये त्यांना आर दि बिर्ला पुरस्कार इंडियन फिजिक्स असोसिएशनने दिला.
- त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि या महत्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांना १९७५ मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
- तसेच त्यांना १९९९ मध्ये देशाचा दुसऱ्या क्रमांकावर असणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आम्ही दिलेल्या dr r chidambaram information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डॉ. आर चिदंबरम यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dr r chidambaram information in marathi language या dr r chidambaram biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about dr r chidambaram in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dr r chidambaram nuclear scientist information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट