डीटीपी कोर्सची माहिती DTP Course Information in Marathi

dtp course information in marathi डीटीपी कोर्सची माहिती, दहावी नंतर अनेक मुले हि दहावी नंतर एक छोटा मोठा असा कोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील जॉब साठी उपयुक्त हे कोर्स पाहत असतात आणि त्यामधील एक दहावी नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला करता येणारा कोर्स म्हणजे  डिटीपी (DTP) कोर्स आणि आज आपण या लेखामध्ये डिटीपी विषयी माहिती पाहणार आहोत. डिटीपी या कोर्सचे पूर्ण स्वरूप सर्टिफिकेट इन डेस्कटॉप पब्लिशिंग (certificate in desktop publishing) असे आहे आणि मराठीमध्ये याला डेस्कटॉप प्रकाशन म्हणून ओळखले जाते.

सोप्या भाषेमध्ये डिटीपी वैयक्तिक संगणक किंवा संगणक प्रणालीवर पृष्ठ लेआऊट सॉफ्टवेअर वापरून दस्तऐवज डिझाईन करणे, तयार करणे आणि संपादित करणे आणि हे प्रामुख्याने प्रिंट प्रकाशनाच्या निर्मितीशी संबधित आहेत आणि सध्या डिटीपी हे विविध प्रकारच्या ऑनलाईन सामग्रीच्या निर्मितीमध्ये देखील सामील आहे. डिटीपी हा कोर्स ३ ते ६ महिन्यांचा असतो.

आणि या कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी २ ते ५ हजार पर्यंत फी असते. डिटीपी ऑपरेटर होण्यासाठी त्या संबधित व्यक्तीने संगणक अनुप्रयोग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर संबधित कौशल्ये शिकली पाहिजेत.

dtp course information in marathi
dtp course information in marathi

डीटीपी कोर्सची माहिती – DTP Course Information in Marathi

कोर्सचे नावडिटीपी (DTP)
मराठी नावडेस्कटॉप प्रकाशन कोर्स
पूर्ण स्वरूपसर्टिफिकेट इन डेस्कटॉप पब्लिशिंग (certificate in desktop publishing)
कोर्सचा कालावधी३ ते ६ महिने
कोर्स फी२ हजार ते ५ हजार

डिटीपी म्हणजे काय – dtp meaning in marathi

डिटीपी वैयक्तिक संगणक किंवा संगणक प्रणालीवर पृष्ठ लेआऊट सॉफ्टवेअर वापरून दस्तऐवज डिझाईन करणे, तयार करणे आणि संपादित करणे आणि हे प्रामुख्याने प्रिंट प्रकाशनाच्या निर्मितीशी संबधित आहे.

डिटीपी या कोर्सचे पूर्ण स्वरूप – dtp full form in marathi

सर्टिफिकेट इन डेस्कटॉप पब्लिशिंग (certificate in desktop publishing) असे आहे, आणि मराठीमध्ये याला डेस्कटॉप प्रकाशन म्हणून ओळखले जाते.

डिटीपी ऑपरेटरचे कार्य काय असते ?

टायपोग्राफी दस्ताऐवजचा लेआऊट ( फॉर्म ) आणि दस्ताऐवज मुद्रित करणे या सारख्या बाबींची काळजी घेणे तसेच डिटीपी केवळ कागदपत्रे संपादित करणे, तयार करणे आणि मुद्रित करणे इतकीच कामे करत नसून यामध्ये बॅनर बनवणे, परिपत्रके, साईन बोर्ड, बिझनेस कार्ड आणि पॅकेजिंग मटेरियल या सारख्या गोष्टींची छपाई देखील केली जाते.  

डिटीपी कोर्सचे महत्व – importance 

 • डिटीपी ऑपरेटर हे सॉफ्टवेअर लेअर्स आणि वर्ड प्रोसेसिंग सारख्या कार्यस्थळांना नियोक्ते प्राधान्य देतात.
 • ब्रोशर, बुकलेट्स, पोस्टर्स, फ्लायर्स, न्यूज लेटर्स, बिसिनेस कार्ड्स, लेटरहेड फॉर्म, एचआर डॉक्युमेंट, इन्व्हाईस, मेमो, इंव्हेंटरी शीट आणि लेबल्स या सारखे सर्व फॉरमॅट डिटीपीच्या मदतीने केले जातात.
 • डिटीपी कोर्सच्या मदतीने प्रिंटींग आणि ग्राफिक डिझाईन करू शकतो.
 • तसेच यामुळे आपण संगणक प्रणालीवर पृष्ठ लेआऊट सॉफ्टवेअर वापरून दस्तऐवज डिझाईन करणे, तयार करणे आणि संपादित करणे आणि हे प्रामुख्याने प्रिंट प्रकाशनाच्या निर्मितीशी संबधित कामे करू शकतो.

डिटीपी कोर्सनंतर करता येणारी कामे

डिटीपी हा कोर्स एक कौशल्य विकास प्रशिक्षण आहे किंवा आपण याला व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम देखील म्हणू शकतो. डिटीपी या कोर्समध्ये प्रिंटींग टेक्नोलॉजी, ग्राफिक डिझाईन, संगणक अप्लिकेशन आणि डिटीपी सॉफ्टवेअर या विषयांच्याविषयी प्रशिक्षण दिले जाते. आपण खाली हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची कामे करू शकतो या बद्दल काही माहिती घेवूया.

 • दस्ताऐवज आणि ग्राफिक कार्य करणे तसेच क्लायंटच्या गरजेनुसार कागदपत्रे मुद्रित करणे.
 • संबधीत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ऑपरेट करणे.
 • संबधित संपादन सॉफ्टवेअर वापरून कागदपत्रे तयार करणे तसेच संबधित सॉफ्टवेअर वापरून ग्राफिक तयार करणे.
 • वैयक्तिक संगणक आणि प्रिंटर हे स्वातंत्र्यपणे हाताळणे आणि ऑपरेट करणे.

डिटीपी कोर्सचा कालावधी – duration 

डिटीपी कोर्स हा आपण दहावी नंतर करू शकतो आणि या कोर्स चा कालावधी हा प्रत्येक संस्थेनुसार बदलू शकता काही संस्थेमध्ये या कोर्सचा कालावधी हा तीन महिने असतो तर काही संस्थेमध्ये या कोर्सचा कालावधी हा सहा महिने असतो. डिटीपी कोर्स हा साधारणपणे ३ ते ६ महिन्याच्या कालावधीचा असतो.

डिटीपी कोर्सची फी – dtp course fees

डिटीपी कोर्सची फी हि प्रत्येक प्रत्येक संस्थेनुसार बदलत असते म्हणजेच वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळी फी आकारली जाते आणि हे त्या ठिकाणच्या शिकवण्याच्या पध्दतीवर तसेच तेथील सोयींच्यावर अवलंबून असते. साधारणपणे या कोर्सची फी हि २ ते ५ हजार पर्यंत असते. तसेच काही नावाजलेल्या संस्था ह्या कोर्सचे प्रशिक्षण शुल्क १५ हजार पर्यंत आकारतात.

पात्रता निकष – dtp course eligibility 

कोणत्याही व्यक्तीला कोणताही कोर्स करण्यासाठी अनेक पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि डिटीपी हा कोर्स करण्यासाठी देखील त्या संबधित विद्यार्थ्याला पात्रता निकष पार पाडवे लागतात. चला तर आता आपण डिटीपी कोर्स कोर्ससाठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहूया. पात्रता निकष देखील संस्थेप्रमाणे बदलू शकतात.

 • कोर्स करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी ८ वी किंवा  १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि ते देखील चांगल्या गुणांनी पूर्ण केले पाहिजे कारण प्रवेशासाठी पात्र समजण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणीक पात्रता आहे.
 • त्या व्यक्तीला संगणकाचे बेसिक ज्ञान असले पाहिजे.

डिटीपी अभ्यासक्रम – dtp course syllabus 

खाली आपण डेस्कटॉप प्रकाशनामध्ये केले जाणारे काही अभ्यासक्रम पाहणार आहोत. चला तर खाली आपण काही मुख्य विषय पाहूया.

 • वेब डिझायनिंग.
 • तांत्रिक आणि व्यवसाय लेखन.
 • डिजिटल इमेजिंग.
 • डेस्कटॉप प्रकाशन मुलभूत तत्वे.
 • मल्टीमिडीया डिझाईन

आम्ही दिलेल्या dtp course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डीटीपी कोर्सची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dtp meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि dtp full form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!