बदकाची माहिती Duck Information in Marathi

Duck Information in Marathi बदकाची माहिती मराठी बदक हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयातील पक्षी आणि बदक badak in marathi हा पक्षी बहुतेकदा आपल्याला पाण्यामध्येच पाहायला मिळतो. बदक हा अॅनॅडीटी कुळातील पक्षी असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव अॅनस प्लॅटोर्हिक्स डोमेस्टीकस आहे. या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हणटले तर या पक्ष्याची शरीर रचना अगदी स्थूल असते, त्याचे पाय आणि मान आखूड असते, आकार ५५ ते ६० सेंटी मीटर आणि या पक्ष्याचे वजन १ किलो पर्यंत असते. या पक्ष्याची एक विशेषता म्हणजे या पक्ष्यांच्या पंखांना तेलकटपणा असतो त्यामुळे ते जरी पाण्यामध्ये पोहत असले तरी या पक्ष्यांचे पंख ओले होत नाहीत.

बदकाला जरी आपण कित्येकदा पाण्यामध्ये पोहताना पहिले असले तरी हे पक्षी उत्तम प्रकारे उडू हि शकतात. बदक हा पक्षी धृव प्रदेश सोडला तर जगभरामध्ये सगळीकडे आढळतात. जगभरामध्ये बदकाच्या ११५ ते १२० जाती आहेत आणि भारतामध्ये सिल्हेटा मेटा आणि इंडियन रनर ह्या बदकाच्या जाती प्रसिध्द आहेत.

Duck Information in Marathi
Duck Information in Marathi

बदकाची माहिती मराठी – Duck Information in Marathi

नावबदक(duck in marathi)
प्रकारपक्षी
इंग्रजीduck
कुळअॅनॅडीटी
वैज्ञानिक नावअॅनस प्लॅटोर्हिक्स डोमेस्टीकस
रंगपांढरा, तपकिरी किवा हिरवा
आकार / लांबी५५ ते ६० सेंटी मीटर
वजन1 किलो
आयुष्य५ ते १२ वर्ष

बदक पक्षी कुठे राहतात ( habitat )

आपण बदक या पक्ष्याला बहुतेकदा पाण्यामध्ये पोह्तानाच पहिले आहे आणि पाण्यामध्ये पोहणे या पक्ष्यांना आवडते. त्यामुळे हे पक्षी तलाव, नदी, ओढे, नाले, समुद्रकिनारी किवा दलदलीच्या प्रदेशमध्ये पाहायला मिळतात.

बदक या पक्ष्याचा आहार ( food )

बदक हा पक्षी सर्व आहारी आहे, म्हणजेच हा पक्षी शाकाहारी तसेच मासाहारी आहार खातो. हे पक्षी पाण्यामध्ये आपला खूप वेळ पाण्यामध्ये घालवत असल्यामुळे हे पाण्यातील लहान उभयचर प्राणी, मासे, बेडूक, पाण्यातील वनस्पती खातात त्याचबरोबर हे पक्षी कधी कधी पाणे, फळे किवा गवतही खातात.

बदक पक्ष्याचे 5 प्रकार ( types of duck bird )

बदक हा स्थलांतरीत पक्षी असल्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या जातीचे बदक पाहायला मिळतात. जगभरामध्ये बदकाच्या ११५ ते १२० जाती आहेत आणि भारतामध्ये सिल्हेटा मेटा आणि इंडियन रनर ह्या बदकाच्या जाती प्रसिध्द आहेत. भारतामध्ये आढळणारे काही बदकाचे प्रकार खाली दिले आहेत.

1.इंडियन स्पॉट बिल बदक ( indian spot billed duck )

इंडियन स्पॉट बिल बदक हे पक्षी स्थलांतर करत नाहीत किवा हे पक्षी प्रवासी पक्षी नाहीत ( हे बदक भारतातील स्थानिक बदक आहेत ). या प्रकरचे बदक हे भारतीय उपखंडातील गोड्या पाण्याच्या ओल्या जागेत आढळतात. इंडियन स्पॉट बिल बदक हि भारतातील सर्वात सामान्य बदकाची जात आहे.  हे बदक जेथे राहतात तेथे त्यांना जर अन्न, निवारा आणि वातावरण जर चांगले मिळाले तर ते त्यांची राहण्याची जागा सारखी बदलत नाहीत.

या पक्ष्याचे शरीर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे असते वरती ते पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यावर काळ्या रंगाचे स्पॉट असतात आणि ते खाली काळ्या रंगाचे असतात. या पक्ष्यांचे चोचीचे टोक पिवळ्या रंगाचे असते आणि चोच काळ्या रंगाचे असते दोन्ही डोळ्या जवळ लाल रंगाचा स्पॉट असतो. या पक्ष्याचा आकार ५५ ते ६५ सेंटी मीटर असतो आणि पंख ८५ ते ९५ सेंटी मीटर लांब पसरतात. या पक्ष्याचे वजन ७०० ते १५०० ग्रॅम असते.

2.नॉर्थेर्ण पिनटेल बदक ( northern pintail duck )

नॉर्थेर्ण पिनटेल बदक हि एक भारतामध्ये प्रवास करणारी बदकाची जात आहे. नॉर्थेर्ण पिनटेल हे बदक धरणांचे तलाव, उथळ व गोड्या पाण्याचे तलाव किवा नदी अश्या पाण्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. हे बदक राखाडी रंगाचे आहेत आणि यांच्या पंखावर काळ्या रंगाचे शेड असतात तसेच या पक्ष्याची शेपूट एकदम टोकदार असल्यामुळे या बदकाला पिनटेल हे नाव पडले आहे आणि मानेचा थोडासा भाग आणि डोके तपकिरी रंगाचे असते. या बदकाचे वजन १ ते १.५ किलो असते.

3.माल्लार्ड बदक ( mallard duck )

माल्लार्ड हे बदक दिसायला थोडे इंडियन स्पॉट बिल बदकासाराखेच असतात आणि हे पक्षी कमीत कमी १० वर्ष जगू शकतात. या मध्ये नर बदकाचे डोके चमकदार हिरव्या रंगाचे असते आणि आणि पंख दुसर असतात पण मादी बदकाचे पिसारा तपकिरी रंगाचा असतो. हे पक्षी भारतामध्ये विपुल प्रमाणात आढळतात आणि या पक्ष्यांना ओल्या प्रदेशमध्ये राहायला खूप आवडते. उत्तर काश्मीरमध्ये गोड्या पाण्यामध्ये आणि भरतपूर पक्षी अभयारण्यामध्ये देखील आढळतात.

4.टफ्टेड बदक ( tufted duck )

टफ्टेड बदकाएक ला मराठीमध्ये शेंडी बदक या नावाने ओळखले जाते आणि हि एक लहान बदकाची जात आहे . हा बदक पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो आणि पंखांचा मधला भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि या पक्ष्याला डोक्याच्या पाठीमागे काळ्या रंगाची शेंडी असते. हे पक्षी पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये आढळतात आणि या पक्ष्यांना थंड पाण्यामध्ये, किनारपट्टीचे सरोवर किवा दलदलीच्या प्रदेशांमध्ये राहायला खूप आवडते.

5.गारगने बदक ( garganey duck )

गारगने बदक हे एक स्थलांतरित पक्षी आहे आणि हे बदक हिवाळ्याच्या दिवसामध्ये भारतामध्ये संत्रांगाची झील या ठिकाणी आढळतात त्याच बरोबर हे बदक आशिया आणि युरोपमध्ये हि आढळतात. गारगने हा बदक दुसऱ्या बदकाच्या तुलनेत लहान असतो.

बदक पक्ष्याविषयी अनोखी तथ्ये ( facts about duck bird )

  • मादी बदक एका वेळी १० ते १२ अंडी देते.
  • बदक हा उभयचर पक्षी आहे.
  • कोंबड्यांच्या मांसासारखे बदकाचेही मांस मनुष्य आपल्या आहारामध्ये सेवन करतात.
  • बदक एका दिवसामध्ये ३०० मैल अंतर पार करू शकतात ( उडून ).
  • बदक हे लाल, निळे, हिरवे, तपकिरी किवा पांढऱ्या रंगामध्ये असू शकतात.
  • बदक हे पक्षी आयुष्य भरासाठी सोबती बनवत नाहीत तर ते एका वर्षासाठी जोडीदार बनवतात.
  • बदक या पक्ष्याच्या पायाला जाळीदार पंजे आहेत जेणेकरून हे पक्षी पाण्यावर अगदी सहजपणे पोहू शकतील.
  • बदकाचे आयुष्य ७ ते १० वर्ष असते.
  • बदकांच्या कॉलचा आवाज क्वेक क्वेक असा येतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा बदक पक्षी duck information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. duck bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about duck bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही बदक पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या duck in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही duck information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!