birds information in Marathi जर तुम्हाला वेगवेगळ्या सुंदर पक्ष्यांन बद्दल जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खास आहे. कारण या लेखामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती दिली आहे. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती, त्यांचे रंग, ते काय खातात, कुठे राहतात याबद्दल सर्व माहिती या लेखामध्ये दिली आहे.
पक्षी म्हंटल कि वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या जातीचे सुंदर आणि आकर्षित पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतात. जगभरामध्ये कितीतरी पक्ष्यांच्या जाती आहेत तसेच भारतामध्येहि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती आहेत त्यामधील काही भारतीय निवासी आहेत तर पक्षी वेगवेगळ्या देशातून आले आहेत.(birds in Marathi)
30 पक्ष्यांची माहिती मराठी – all Birds Information in Marathi
या लेखामध्ये आपण निरनिराळ्या पक्षांबद्दल माहिती घेणार आहोत. या लेखामाध्ये आम्ही फक्त दहा पक्षांची सर्व माहिती (ten birds information in marathi) देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे त्या पक्षांबद्दल तुम्हाला सर्व माहिती येथे पाहायला मिळणार आहे.
1.मोर ( peacock bird information in marathi )
आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असणारा मोरे दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. मोर हा निळ्या आणि हिरवट रंगाचा असतो, मान लांब आणि डोक्यावर तुरा, लांब पिसारा जो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मोर त्यांचा पिसारा फुलवून पावसामध्ये नृत्य करतात ( असे म्हणतात कि त्याच्या साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो ) आणि त्याचा हा फुललेला पिसारा पाहून मन मोहून जाते. प्राचीन काळापासून मोराने आपल्या डौलाने आणि सुंदरतेने अनेक कविंचे, योध्यांचे आणि देवांचे मन सुद्धा आकर्षित केले आहे.
मोर कुठे व कसे राहतात?
मोर हा पक्षी थव्या मध्ये राहतो त्यामध्ये एक मोर आणि तीन ते चार लांडोरी असतात. मोर हा नर असतो आणि लांडोरी मादी असते. मोर हा पक्षी पानझडीच्या जंगलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. मोर शक्यतो रात्री झाडावर झोपतात.
मोराचा आहार : मोराला धान्य, कीटक, साप, सरडे, झाडाची कोवळी पाने या प्रकारचे अन्न खाण्यासाठी लागते.
वैज्ञानीक नाव | पावो क्रिस्टाटस |
रंग | हिरवा, निळा, तपकिरी, करडा ( विभिन्न रंगचा असतो ). |
आयुष्य | १२ ते २० वर्ष |
वजन | ३ किलो ते ६ किलो |
लांबी | ८६ सेमी ते १०७ सेमी |
मोरा बद्दलची काही तथ्ये
- मोराच्या शेपटीने त्याच्या शरीराचा ६०% भाग झाकला जातो.
- मोराच्या पंखांमध्ये सूक्ष्म रचना असतात ज्या क्रिस्टल्ससारख्या दिसतात.
- मोराला प्रत्येक पायाला ४ बोटे असतात.
- मोराच्या एकूण ३ जाती आहेत आणि त्यामधील २ आशिया आणि आफ्रिका मधून आहेत.
- मोरांना जर घरामध्ये पाळले तर ते ५० वर्षापर्यंत जगू शकतात.
2.पोपट ( parrot bird information in marathi )
पोपट पक्षी हा सिटॅसीडी कुळातील असून पोपटाच्या एकूण ७५ प्रजाती आहेत आणि ६०० हून अधिक जाती आहेत. पोपट हे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे असतात आपल्याला माहित असलेला सामान्य पोपट हा हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची चोच लाल रंगाची असते. पोपटाला इंग्रजी मध्ये पॅरॉट किवा लोरीकीट असे म्हणतात. पोपटाला पाळीव पक्षी म्हणून पाळले हि जाते त्याला एकदा पिंजऱ्याची सवय झाली तर तो फिरून परत पिंजऱ्या मध्ये येतो. पाळलेल्या पोपटाला प्रशिक्षण सुद्धा दिले जाते ( त्यांना बोलायला शिकवले जाते तसेच त्यांना शिष्ठाचारहि शिकवले जातात ). भविष्य सांगण्यासाठी तसेच घराच्या सुरक्षेसाठी पोपटाचा उपयोग केला जातो. पोपट हा पक्षी घरचीच नाही तर जंगलाची सुद्धा शोभा वाढवतो.
पोपट कुठे व कसे राहतात ?
पोपट उंच आणि जास्त पाने असलेल्या झाडावर राहतात तसेच पोपटांना माणसाच्या अवतीभोवती हि राहायला आवडते. पोपट हे उष्ण कटीबंधात राहणारे पक्षी आहेत. हे पक्षी समूहाने राहतात आणि आकाशामध्ये समूहाने उडतात.
पोपटाचा आहार: पोपट हा शाकाहारी पक्षी आहे. पेरू आणि मिरच्या पोपटाचा आवडता आहार आहे आणि त्याचबरोबर पोपट इतर फळे हि खातो जसे कि आंबा, डाळिंब, कवठ इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे धान्यही खातो.
वैज्ञानिक नाव | लोरीक्युलास व्हरनॅलीस |
रंग | हिरवा |
आयुष्य | २५ ते ३० वर्ष |
लांबी | १४ सेंटी मीटर |
वजन | ६४ ग्रॅम ते १.६ किलो |
पोपटा बद्दल काही तथ्ये ( facts of parrot )
- पोपटाच्या चोचीला खूप धार असते त्यामुळे ते अठीशय कठीण खाद्यहि फोडून खावू शकतात.
- पोपट हा अतिशय हुशार पक्षी आहे तो माणसाची नक्कल अगदी हुबेहूब करू शकतो किवा माणसासारखे बोलू शकतो ( म्हणजेच ते ध्वनीचे अनुकरण करू शकतात ).
- पोपटाच्या सर्वच जाती उष्णकटिबंधीय नसतात.
- पोपट हे त्यांच्या पायाने आपला आहार सेवन करतात.
- ककापो पोपट हे उडू शकत नाही.
- पोपटाच्या पिल्ल्लाना चिक म्हणतात.
3.कबुतर ( pigeon bird information in marathi)
जगभरामध्ये आढळणारा कबुतर हा पक्षी पांढर्याशुभ्र रंगाचा असतो आणि जर तो पारव्या रंगाचा असेल तर त्याला पारवा असे म्हणतात. कबुतर हे खूप प्राचीन काळापासून आपल्यामध्ये असणारा पक्षी आहे. कबुतर हा पक्षी कोलबिडी कुळातील असून त्याच्या २५० हून जास्त जाती आहेत. कबुतर हा पक्षी तशी १५० किलोमीटर वेगाने पळू शकतो. या पक्ष्यांची एक खासियत आहे कि ते ३००० किलोमीटरचे अंतर जावून ते परत त्या ठिकाणी येतात. कबुतराची पिल्ले १० ते १५ दिवस बाहेर येत नाहीत ते आतमध्येच मोठी होतात.
कबुतर कुठे व कसे राहतात ?
कबुतर हे सुद्धा समूहाने राहणारा पक्षी असून ते हंगामाच्या काळामध्ये फक्त वेगळे राहतात कारण त्यांना अन्न गोळा करायचे असते. ते शक्यतो माणसांच्या वस्ती जवळच राहतात कारण त्यांना तिथे अगदी सहज पाने अन्न मिळू शकते. कबुतर हा पक्षी बागेमध्ये किवा शेतामाधेही राहतो.
कबुतराचा आहार : कबुतर हा पक्षी शाकाहारी पक्षी असल्या मुले तो सर्वप्रकारचे धान्य खातो जसे कि ज्वारी, तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी तसेच मुग, हरभरा आणि शेंगदाणे या प्रकाचा आहार कबुतराला लागतो. त्याच बरोबर ते फुलांच्या कळ्या आणि छोटी फळे सुद्धा खातात.
वैज्ञानिक नाव | कोलंबा लीव्हिया |
रंग | पांढरा शुभ्र किवा राखाडी |
आयुष्य | ५ ते १० वर्ष |
उंची | ३२ सेंटी मीटर |
वजन | २५० ते ३८० ग्रॅम |
कबुतरा बद्दल काही तथ्ये ( facts of pigeon )
- आफ्रिका, युरोप आणि आशिया या देशांमध्ये कबुतर हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो.
- कबुतर एका वेळी ३ ते ४ अंडी देतात.
- कुबुतराला इंग्रजी मध्ये रॉक डव किवा रॉक पिजन म्हंटले जाते.
- कबुतर हा पक्षी ५००० फुट उंच उडू शकतो.
- कबुतराची स्मरण शक्ती खूप चांगली असते.
4.गरुड ( eagle bird information in marathi)
गरुड हा पक्षी त्याच्या वेगासाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. हा खूप बलशाली आणि बुद्धिमान पक्षी आहे त्याचबरोबर गरुड पक्ष्याची नजर हि खूप तीक्ष्ण असल्यामुळे तो १ ते १.५ मैलावरची शिकार अगदी सहज पणे बघू शकतो आणि जराजरी हालचाल दिसली तर फांदी वरून झेप घेवून आपल्या धारधार नखांनी शिकार करतो आणि ते आपल्या पंज्या मध्ये पकडतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. गरुड या पक्ष्याला मोरघार किवा सर्पगरुड या नावानेही ओळखले जाते त्याचबरोबर गरुडाला संस्कृतमध्ये पान्नागड असे म्हणतात.
गरुड कुठे व कसे राहतात ?
गरुड हा पक्षी उंच झाडावर आणि एकदम वरच्या फांदीवर आपले घरटे बनवतात आणि ते घरटे काड्या, नारळाच्या शेंड्या किवा पाने पाचोळ्यने बनलेले असते.
गरुडाचा आहार : गरूड हा मांसाहारी पक्षी आहे आणि तो साप , उंदीर, बेडूक, पाली, सरडे आणि पाणकोंबडी यासारख्या प्राण्यांचा शिकार करतात
वैज्ञानिक नाव | हॅलीएटस ल्युकोसेफ्लस |
रंग | बहुतेकदा तपकिरी रंग |
लांबी | ५० सेंटी मीटर |
वजन | ४५० ते १८०० ग्रॅम |
आयुष्य | २० वर्ष |
गरुड पक्ष्या बद्दलची काही तथ्ये ( facts of eagle )
- गरुडाची पिल्ले २५ दिवसानंतर अंड्याच्या बाहेर येतात.
- गरुडाला उडताना दिशा बदलण्यास त्याच्या शेपटीचा उपयोग होतो.
- गरुडाच्या ६० जाती आहेत.
- १० जानेवारी हा दिवस eagle day म्हणून साजरा करतात.
5.चिमणी ( sparrow bird information in marathi )
चिमणी या पक्षाचे वर्णन कवितांमध्ये किवा बाल्काठेमध्ये असायचे आणि म्हणूनच चिमणी हा पक्षी लहानपणी सगळयांचा आवडता पक्षी होता. चिमणी हा पक्षी आपल्या सर्वांच्या रोज संपर्कात येणारा पक्षी असून तो आपले घरटे घराच्या छिद्रांमध्ये करते. चिमण्या आत्ता जगभरामध्ये सगळीकडे आढळतात पण पूर्वीच्या काळी चिमण्या आशिया आणि युरोप खंडामध्येचा आढळयच्या. २० मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
चिमण्या कुठे व कसे राहतात?
चिमण्या ह्या ८ ते १० जनांच्या गटामध्ये राहतात आणि ते आपले घरटे इमारतीच्या छिद्रांमध्ये, स्ट्रीटलाईट मध्ये, घरच्या छपरावर, विहिरी मध्ये, झुडपांमध्ये आपले घर बनवतात. ते आपले घर खूप चांगल्या रित्या विणतात.
चिमण्यांचा आहार : चिमण्या धान्य, किडे आणि फळे या प्रकारचा आहार सेवन करतात.
वैज्ञानिक नाव | पासर डोमेस्टिकस |
रंग | राखाडी, पिवळा, विटकरी |
आयुष्य | ३ ते ४ वर्ष |
लांबी | १० सेंटी मीटर |
वजन | २५ ते ३८ ग्रॅम |
चिमणी या पक्ष्याबद्दलची तथ्ये ( facts of sparrow )
- चिमण्यांच्या ४३ प्रजाती आहेत.
- आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
- सन २०२० पासून चिमणी दिवस साजरा केला जातो.
- चिमण्या पिंजऱ्या मध्ये ११ ते १२ वर्ष जगतात.
6.बदक ( duck bird information in Marathi )
बदक हा पक्षी सर्वाना माहित आहेच आणि हा पक्षी पाण्यामध्ये आणि जमिनीवर सुधा राहतो. बदक या पक्ष्याची शरीर रचना स्थूल असते व त्यांची पाय आणि मान आखूड असते. जरी आपण बदक पाण्यामध्ये पोहतानाच बघितले असले तरी ते उत्तम उडू शकतात. बदकांची एक वैशिष्ठ असते त्यांच्या पंखाना तेलकट पण असतो त्यामुळे ते पाण्यामध्ये पोहत असले तरी त्यांचे पंख ओले होत नाहीत .बदक हा अॅनॅडीटी पक्षी कुळातील आहे व ते धृव प्रदेश सोडला तर ते सगळीकडे आढळतात. बदकाच्या एकूण ११५ ते १२० जाती आहेत. भारतामध्ये सिल्हेट मेटा आणि इंडिअन रनर ह्या बदकाच्या जाती आहेत.
बदक कुठे राहतात ?
बदक हे शक्यतो दलदलीच्या प्रदेशात, समुद्रकिनारी , नदी काठी किवा तलाव काठी अश्या पाण्याच्या ठिकाणी आणि पाण्याच्या आसपास राहतात.
बदकाचा आहार : बदक हे सर्वभक्षक पक्षी आहे तो पाण्यामधील छोटे मासे तसेच फळे, पाने गावात हि खातो.
वैज्ञानिक नाव | अॅनस प्लॅटोर्हिक्स डोमेस्टीकस |
रंग | पांढरा, तपकिरी |
आयुष्य | ५ ते १२ वर्ष |
वजन | १ किलो |
लांबी | ६० सेंटी मीटर |
बदक बद्दल काही तथ्ये ( facts of duck )
- बदक हा उभयचर पक्षी आहे.
- मादा बदक हि एका वेळेला १२ अंडी देवू शकते.
- बदक एका दिवसामध्ये ३०० मैल अंतर पार करू शकतात ( उडून ).
- कोंबड्याच्या मांसासारखे बदकांचेही मांस मनुष्य आपल्या आहारामध्ये सेवन करतात
7.बुलबुल ( bulbul bird information in marathi )
बुलबुल हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा मोठा आणि सांळुखी पेक्षा लहान असतो. बुलबुल पक्षी पिकनोनॉटिडी कुळातील आहे आणि जगभरामध्ये ९००० ते १०००० प्रजाती आहेत. ह्या पक्षाचे वर्णन करायचे म्हटले तर त्याचे बारीक शरीर, लांब शेपूट आणि विशेष म्हणजे त्याच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे असणारे केस. बुलबुल हा पक्षी चांगल्या प्रकारे गाऊ हि शकतो पण मादी बुलबुल गाऊ शकत नाही. नर आणि मादी दिसायला एकसारखेच असतात त्यांच्यामधील फरक लवकर समजून येत नाही.
बुलबुल पक्षी कुठे व कसे राहतात?
हा पक्षी जास्ती जास्त मनुष्य वस्तीमध्ये आढळतो किवा तो झाडा झुडपांमध्ये राहतो. बुलबुल पक्षी आपले घरटे वाळलेल्या गवतापासून करतो आणि पक्ष्याच्या घरट्याचा आकार गोल मोठ्या वाती सारखा असतो. बुलबुल हा पक्षी थव्यामध्ये राहतो आणि आपले घरटे दात झुदुपांमध्ये करतात.
बुलबुलचा आहार : बुलबुल हा पक्षी झाडावर राहत असल्यामुळे तो झाडावरील किडे, झाडाची पाने, फळे, फुले यासारखा आहार खातो.
वैज्ञानिक नाव | पिक्नोनोटस कॅफर |
रंग | भिन्न रंग ( काळा, तपकिरी आणि पांढरा |
आयुष्य | १० ते ११ वर्ष |
वजन | २५ ते ४५ ग्रॅम |
लांबी | १९ ते २० सेंटी मीटर |
बुलबुल पक्ष्याची तथ्ये ( facts of bulbul )
- बुलबुल हे पक्षी आफ्रिका आणि पूर्व आणि दक्षिण आशिया मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
- भारतामध्ये ‘गुलदम बुलबुल’ हि जात सर्वात प्रसिध्द जात आहे.
- बुलबुल मादी एका वेळेला २ ते ३ अंडी घालू शकते.
- हा पक्षी २०० वेगवेगळ्या प्रकाराच्या सुरांमध्ये गाऊ शकतो.
- बुलबुल हा इराणचा राष्ट्रीय पक्षी आहे.
8.खंड्या ( kingfisher bird information in marathi)
खंड्या हा पक्षी अलसेडीनिडे कुळातील असून या पक्ष्याच्या ९० वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्या आकारात आणि रंगामध्ये भिन्नता असते. भारतामध्ये या पक्ष्याच्या ४ ते ५ जाती आहे त्यामधील एक जात भारतामध्ये सगळीकडे आढळते. सामान्य खंड्या म्हणजेच जो सगळीकडे आढळतो त्याची पिसे आणि शेपटिचा वरचा भाग आकाशी रंगाचा असतो आणि पोटाचा पूर्ण भाग नारंगी रंगाचा असतो आणि या पक्ष्याची चोच लांब असते.
खंड्या पक्षी कुठे व कसे राहतात?
हे पक्षी उष्ण किवा समशितोष्ण भागामध्ये आढळतात. हे पक्षी आपले घरटे नदी किवा तलाव आहे किवा जिथे जलाशय आहे त्या ठिकाणी झाडावर आपले घरटे बनवतात.
खंड्याचा आहार : खंड्या पक्ष्याचा मासे हा मुख्य आहार आहे.
वैज्ञानिक नाव | हल्चयोन स्म्यर्नेन्सीस |
आयुष्य | १५ वर्ष |
वजन | ६६ ते ८० ग्रॅम |
लांबी | १७ ते १८ सेंटी मीटर |
खंड्या पक्ष्याबद्दल तथ्ये ( facts of kingfisher )
- खंड्या या पक्ष्याची चोच ४ सेंटी मीटर लांब असते.
- मादा खंड्या पक्षी एका वेळी ५ ते १० अंडी घालू शकते.
- हिंदीमध्ये या पक्ष्याला राम चीरीया किवा किलकिला म्हणतात.
9.सुतार पक्षी ( woodpecker bird information in marathi)
सुतार पक्षी हा picidae कुळातील असून या पक्ष्याच्या १८० जाती आहेत. हा पक्षी विशेष करून चोचीने झाडाला होल पाडून आपले घर बनवतो महुणून हा पक्षी प्रसिद्ध आहे आणि त्याला या कारणामुळेच सुतार हे नाव पडले असावे. हे पक्षी ऑस्ट्रोलिया आणि न्यू गिनी सोडून सगळीकडे आढळतात परुंतु हे पक्षी आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
सुतार पक्षी कुठे व कसे राहतात?
हे पक्षी शक्यतो जंगलामध्येच राहतात तसेच या पक्ष्यांच्या काही जाती बांबूच्या जंगलामध्ये राहतात तर काही पक्षी वाळवंटा मध्ये सुध्दा राहतात.
सुतार पक्ष्याचा आहार : सुतार पक्षी धान्य, बिया, शेंगदाणे आणि बेरी या प्रकारचा आहार खातात.
वैज्ञानिक नाव | पिकीडे |
आयुष्य | ५ ते 12 वर्ष |
वजन | ५६० ग्रॅम |
लांबी | ५० सेंटी मीटर |
सुतार पक्ष्याची तथ्ये ( facts of woodpecker )
- तपकिरी रंगाचे केस असलेला पिग्मी वूडपीकर फक्त श्रीलंका, भारत आणि नेपाळ मध्येच आढळतात.
- पिक्यूलेट्स हा सुतार पक्षी हि सर्वात लहान जात आहे.
- या पक्षाला सुतार हे नाव त्यांच्या कामावरून पडले आहे.
10.हंस ( swan bird information in marathi)
हंस हा पक्षी दिसायला खूप सुंदर असतो आणि तो बुध्दिमान हि असतो. आपण सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे हंस बघितलेच आहेत पण हंस हे काळ्या रंगाचे सुध्दा असतात. हे पक्षी आकाशा मध्ये ९० ते ९५ किलोमीटर अंतर ताशी पार करू शकतात पण ते पाण्यामध्ये पोहण्याचा वेग जास्त नसतो.
हंस पक्षी कुठे राहतात?
हंस हा पक्षी उभयचर पक्षी आहे पण हा पक्षी जास्त वेळ पाण्या मध्येच असतात शांत नदी , तलाव, नाले किवा दलदलीच्या ठिकाणी राहतात. हे पक्षी आपली घरे बनवताना पाण्याच्या काठावरची दाट झाडे किवा बेट निवडतात.
हंस पक्ष्याचा आहार : पाण्यातील झाडे किवा पाण्यात बुडलेली झाडे, मोलस्क आणि कीटक या प्रकारचे अन्न ते खातात.
वैज्ञानिक नाव | सिग्नस |
आयुष्य | १० ते १२ वर्ष |
लांबी | १.१ ते १.७ मीटर |
वजन | १५ ते २० किलो |
हंस पक्ष्याबद्दल तथ्ये ( facts of swan )
- मादी हंस एका वेळी ३ ते ९ अंडी देतात.
- हे पक्षी आकाशामध्ये समूहाने उडतात व ते v आकारामध्ये उडतात.
- हंस या पक्ष्याच्या शरीरावर २५००० पेक्षा जास्त पंख असतात.
- हंस पक्षाच्या एकूण ६ प्रजाती आहेत.
11.डोडो पक्षाची माहिती
12.चंडोल पक्षाची माहिती
13.पेंग्विन पक्षाची माहिती
14.बगळा पक्षाची माहिती
15.टर्न पक्षाची माहिती
16.कोकिळा पक्षाची माहिती
17.मकाऊ पोपटा विषयी माहिती
18.किवी पक्षाची माहिती
19.धनेश पक्षाची माहिती
20.दयाळ पक्षाची माहिती
21.सुगरण पक्षाची माहिती
22.घार पक्षाची माहिती
23.कावळा पक्षाची माहिती
24.चिमणी विषयी माहिती
25.फिनिक्स पक्षाची माहिती
26.माळढोक पक्षाची माहिती
27.फ्लेमिंगो पक्षाची माहिती
28.शहामृग पक्षाची माहिती
29.ससाणा पक्षाची माहिती
30.पफ्फिन पक्षाची माहिती
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि (all birds information in Marathi wikipedia) हे निरनिराळे पक्षी कसे आहेत त्याची रचना व त्याचे जीवन कसे आहे. birds information in Marathi language for project हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच birds in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या pakshi chi mahiti in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Excellent information sir thank you so much, God bless you and your team for your efforts. 🙏🙏
आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार अशाच मनोरंजक माहितीसाठी भेट देत रहा. धन्यवाद ..!!
Thank you so much for this information.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
अशाच नवीन माहितीसाठी पुन्हा भेट देत रहा