दुधी हलवा रेसिपी मराठी Dudhi Halwa Recipe in Marathi

Dudhi Halwa Recipe in Marathi दुधी हलवा रेसिपी दुधी हलवा हि एक भारतीय गोड डिश आहे जी आपण मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना किंवा खास क्षणांना एक गोड पदार्थ म्हणून बनवू शकतो. दुधी हलवा देखील जसा आपण गाजर हलवा बनवतो त्याच प्रकारे बनवतो परंतु त्यामध्ये आपण गाजर वापरतो आणि यामध्ये आपण दुधी. दुधी हलवा बनवताना कोवळे दुधी स्वच्छ धुवून ते खिसून घेतले जातात आणि मग ते एका कढई मध्ये मध्यम आचेवर तुपामध्ये खीस चांगला भाजला जातो आणि मग त्यामध्ये दुध आणि साखर घालून ते चांगले मिक्स करून दुधामध्ये शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शेवटी तुपामध्ये तळलेले ड्राय फ्रुट्स टाकले जातात.

दुधी हलवा हा भारतामध्ये काही ठिकाणी इतका प्रसिध्द आहे कि तो त्या ठिकाणी सतत बनवून खाल्ला जातो तसेच बहुतेक हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवला जात असावा. दुध हलवा हि अशी स्वादिष्ट आणि गोड रेसिपी आहे जी लहान मुलांच्यापासून सर्वांना आवडू शकते.

दुधी हलवा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी आपण खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनवू शकतो. चला तर मग आता आपण स्वादिष्ट आणि गोड दुधी हलवा कसा बनवायचा ते पाहूयात.

dudhi halwa recipe in marathi
dudhi halwa recipe in marathi

दुधी हलवा रेसिपी मराठी – Dudhi Halwa Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

दुधी हलवा रेसिपी कशी बनवायची ? 

दुधी हलवा बनवताना कोवळे दुधी स्वच्छ धुवून ते खिसून घेतले जातात आणि मग ते एका कढई मध्ये मध्यम आचेवर तुपामध्ये खीस चांगला भाजला जातो आणि मग त्यामध्ये दुध आणि साखर घालून ते चांगले मिक्स करून दुधामध्ये शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शेवटी तुपामध्ये तळलेले ड्राय फ्रुट्स टाकले जातात.

दुधी हलवा रेसिपी – how to make dudhi halwa recipe in marathi

दुधी हलवा रेसिपी हि एक भारतीय रेसिपी आहे जी आपण जेवणामध्ये एक गोड पदार्थ म्हणून खावू शकतो. हलवा हा दुधीच्या खीस, तूप, दुध आणि साखर हे मुख्य साहित्य वापरून बनवला जातो हा पदार्थ खूप उत्तम बनतो आणि लागतो म्हणून तर काही लोक हा पदार्थ खाण्यासाठी वेढे होतात.

दुधी हलवा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी आपण खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनवू शकतो आणि हा बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर मग दुधी हलवा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते .

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

दुधी हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dudhi halwa recipe 

दुधी हलवा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते आणि उपलब्ध नसलेले साहित्य आपण बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण दुधी हलवा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी दुधी खीस.
  • ३ ते ४ चमचे तूप.
  • दीड वाटी दुध.
  • अर्धी वाटी साखर.
  • अर्धा चमचा वेलची पावडर.
  • ३ चमचे काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे.

दुधी हलवा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dudhi halwa recipe 

दुधी हलवा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा गोड पदार्थ लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून दुधी हलवा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम दुधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग खिसनीच्या सहाय्याने याचा खीस पाडून घ्या ( आपण वर २ वाटी खीस सांगितला आहे ).
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई एकदा गरम झाली कि त्यामध्ये ३ ते ४ चमचे तूप घाला.
  • तूप गरम झाले कि त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे घाला आणि ते तुपामध्ये चांगले २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढून ठेवा.
  • आता कढईमध्ये आणखीन तूप घालण्याची गरज असेल तर त्यामध्ये तूप घाला आणि मग त्यामध्ये आपण करून ठेवलेला २ वाटी खीस घाला आणि तो खीस सतत हलवत राहून ५ ते ६ मिनिटे तुपामध्ये चांगला भाजा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देखील भाजला तरी चालेले पण खाली लागू देवू नका.
  • ते चांगले भाजले कि त्यामध्ये गरम दुध घाला आणि मग ते मिक्स करून थोडा वेळ त्याच्यावर झाकण लावून शिजू द्या आणि थोड्या वेळाने त्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घाला आणि ते मिक्स करा आणि परत झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे शिजवा.
  • शेवटी यामध्ये आपण भाजून ठेवलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.
  • तुमचा दुधी हलवा खाण्यासाठी तयार झाला.

दुधी हलवा कसा सर्व्ह करावा – serving suggestions 

  • दुधी हलवा आपण तसाच जेवणामध्ये एक गोड पदार्थ म्हणून खावू शकतो किंवा जेवणानंतर खावू शकतो.

आम्ही दिलेल्या dudhi halwa recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दुधी हलवा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dudhi halwa recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dudhi bhoplyacha halwa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dudhi bhopla halwa recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!