रमजान ईद माहिती मराठी Eid Information in Marathi

eid information in marathi रमजान ईद माहिती मराठी, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात आणि हे वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक हे आप आपले वेगवेगळे सण साजरे करत असतात तसेच ईद हा एक प्रकारचा सण आहे जो इस्लाम धर्माचे लोक साजरे करतात आणि हा सण इस्लाम धर्मातील सर्वात मोठा सण आहे जो सर्व मुस्लीम बांधव साजरा करतात आणि आज आपण या लेखामध्ये ईद या सणाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ईद हा सण मुस्लीम बांधव साजरा करतात आणि हा सण त्यांच्या रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीस साजरा केला जातो आणि या रमजान महिन्यात मुस्लीम लोक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात.

आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजेच इद दिवशी सर्वजन मशिदीमध्ये एकत्र येऊन त्यांच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. ईद हा सण मुस्लीम लोकांच्यामध्ये कुटुंबासाठी एकत्र येण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी स्वताला समर्पित करण्याची वेळ असते आणि या दिवशी मुस्लीम प्रार्थनेसाठी मशिदिंना भेट देतात.

तसेच या दिवशी मुस्लीम लोकांच्यामध्ये नोवीन पोशाख घालण्याची देखील प्रथा असते. रमजान महिना हा वर्षातील नववा महिना आहे आणि शव्वालच्या १० व्या महिन्याच्या सुरुवातीला ईद साजरा केला जातो म्हणजेच ईद हा सण नवीन चंद्राच्या पहिल्या दर्शनाने सुरु होतो.

eid information in marathi
eid information in marathi

रमजान ईद माहिती मराठी – Eid Information in Marathi

ईद अल फित्र म्हणजे काय – eid meaning in marathi

  • ईद अल फित्र या शब्दाचा अर्थ असा होतो कि उपवास सोडण्याचा सण आणि ईद हे रमजानच्या शेवटी येते आणि हा उपवासाच्या महिन्याचा म्हणजेच रमजान महिन्याचा शेवटचा दिवस असतो. रमजानच्या सुरुवाती प्रमाणेच ईदची सुरुवात देखील नवीन चंद्राच्या पहिल्या दर्शनाने होते. ईद अल फित्र हा सण सर्व मुस्लीम बांधव साजरा करतात आणि या दिवशी ते मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करतात.
  • ईद म्हणजे अरबी भाषेमध्ये मेजवानी आणि ईद अल फित्र म्हणजे उपवास तोडण्याची मेजवानी.

ईद या सणाचे स्वरूप

ईद या सणादिवशी सर्व मुस्लीम लोक मशिदीमध्ये नमाजासाठी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रगतीसाठी आणि काल्यानासाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी मुस्लीम लोक ईद मुबारक अश्या शुभेच्छा देखील देतात. त्याचबरोबर या दिवशी मुस्लीम लोक नवीन कपडे घालतात तसेच ते मशिदीच्या वाटेवर खजूर सारखे गोड पदार्थ वाटण्याची आणि खाण्याची पध्दत आहे तसेच ते त्या ठिकाणी एक छोटी प्रार्थना करतात ज्याला तकबीर असे म्हणतात.

त्याचबरोबर ईदच्या प्रार्थनेपूर्वी प्रत्येक मुस्लिमाने गरिबांना खायला मदत करण्यासाठी जकात अल फित्र नावाच्या धर्मादाय संस्थेला देणगी देणे देखील बांधकारक असते. ईद या सणादिवशी देशामध्ये सार्वजनिक सुट्टी दिलेली असते आणि अनेक लोक या दिवशी मोठ्या जेवणाचा आनंद देखील घेतात. या सणादिवशी मेजवानी असते तसेच प्रार्थना केली जाते एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.

मेजवानी

ईद हा सण मुख्यता रमजान मधील उपवास सोडण्याचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी केली जाते. या दिवशी लोक सहसा मित्र आणि कुटुंबांसोबत एकत्र जमून सामायिक जेवणाचा आनंद घेतात. यामध्ये अनेक गोड पदार्थ असतात तसेच वेगवेगळ्या प्रकारे शिजवलेले मांस देखील असते तसेच यामध्ये भाजलेले काही धान्याचे प्रकार देखील असतात.

प्रार्थना

प्रार्थना हि इस्लामच्या पाच स्तंभापैकी एक आहे आणि मुस्लीम प्रत्येक वेळी मक्काकडे तोंड करून दिवसातून पाच वेळा प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतात. ईद दिवशी देखील सर्व मुस्लीम लोक मशिदीमध्ये जातात आणि त्यांच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात.

भेटवस्तू

आपल्याला माहित आहे कि आपण बहुतेक सणांना आपल्या प्रियजणांना भेट छोटी मोठी कोणतीही भेटवस्तू देतो तसेच ईद या सणामध्ये देखील मुस्लीम लोक आपल्या प्रियजणांना छोट्या मोठ्या भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू सोबत ईद मुबारक अश्या शुभेच्छा देखील देतात.

 ईद सणाचा इतिहास आणि महत्व – eid e milad information in marathi

ईद या सणाविषयी आणि रमजान महिन्याविषयी इस्लामलोकांच्यामते असे मानले जाते कि त्यांचे पवित्र कुराण प्रेषित मुहम्मद हे रमजान महिन्यामध्ये अवतरले होते आणि म्हणून इस्लाम लोक हा महिना पवित्र मानतात आणि या महिन्यामध्ये मुस्लीम बांधव पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास करतात आणि असे ते महिनाभर रोज करतात आणि संध्याकाळी फळे खातात तसेच ते या महिन्यामध्ये अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी समर्पित करतात आणि महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र असते ज्यामध्ये सर्व मुस्लीम मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करतात तसेच हा सण मुस्लीम लोक भरभरून जेवणासह साजरा करतात.

ईद हा सण केंव्हा असतो ?

इस्लाम धर्म हा चंद्र कॅलेंडरचे अनुकरण करतो ज्याचा अर्थ दरवर्षी ईद या सणाची तारीख बदलत असते आणि मुस्लीम समाजातही वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळी ईद साजरा करतात. काही लोकांचा असा विश्वास आहे कि चंद्राच्या टप्प्यांचा अंदाज लावण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर करू शकतो आणि ईदची तारीख आधीच ठरवू शकतो तसेच काही ठिकाणी चंद्रकोर पाहण्याच्या पध्दतीचा अवलंब करून ईद सण साजरा केला जातो.

ईद या सणाविषयी तथ्ये – facts 

  • ईद अल फित्र हा सण एक धार्मिक सण आहे आणि या सणाला उपवास तोडण्याचा सण म्हणून ओळखले जाते.
  • ईद हा सण इस्लाम धर्मातील सर्वात मोठा सण आहे जो सर्व मुस्लीम बांधव साजरा करता.
  • ईद या सणादिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेले असतात ज्याला मेजवानी म्हणतात तसेच सर्व मुस्लीम लोक नवीन कपडे परिधान करून मशिदी मध्ये प्रथांना करण्यासाठी जातात तसेच त्या ठिकाणी त्यांच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर या सणादिवशी मुस्लीम लोक आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतात तसेच या दिवशी ते एकमेकांना ईद मुबारक अश्या शुभेच्छा देखील देतात.
  • हा सन रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो म्हणजेच या दिवशी महिनाभर केलेला उपवास सोडला जातो.
  • ईद या सणादिवशी देशामध्ये सार्वजनिक सुट्टी दिलेली असते आणि अनेक लोक या दिवशी मोठ्या जेवणाचा आनंद देखील घेतात.
  • ईद हा सण जग्भारातीन मुस्लीम लोकांच्या मार्फत साजरा केला जाणारा इस्लामिक सण आहे.

आम्ही दिलेल्या eid information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रमजान ईद माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या eid a milad information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of eid in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!