Election Form 6 in Marathi मतदान अर्ज ६ ची माहिती आज आपण या लेखामध्ये निवडणूक फॉर्म ६ या विषयी माहिती घेणार आहोत. म्हणजेच हा फॉर्म काय आहे आणि हा फॉर्म कशासाठी वापरतात या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती घेणार आहोत. मतदान हा एक आपल्याला भारतीय लोकशाहीने दिलेला अधिकार आहे जो आपण बजावला पाहिजे आणि देशाच्या विकासासठी योग्य नेता निवडला पाहिजे. भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि तसेच भारतामध्ये आपल्या देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला एक उत्तम नेता किंवा व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारालाच मतदान म्हणतात.
तुमच्या एका मतदानाला खूप किमत आहे कारण तुमचे एक मत एखाद्या उमेदवाराला जिंकवू शकते किंवा मग हरवू शकते पण आपण मतदान करताना चांगला विचार करून मतदान केले पाहिजे कारण जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर आपल्या भागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास अवलंबून असतो आणि म्हणूनच आपण आपले मतदानाची कायदेशीर नोंदणी केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मतदान अर्ज ६ भरून नोंदणी करावी लागते आणि आपला हक्क मिळवून घ्यावा लागतो.
मतदान अर्ज ६ (election form 6) म्हणजे हा एक प्रकारचा अर्ज असतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रथमच मतदारासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करण्यासाठी जो अर्ज वापरला जातो त्याला मतदान अर्ज ६ ( election form 6 ) म्हणून ओळखले जाते. मतदार ओळखपत्र हे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेले दस्तऐवज म्हणजेच एक सरकारी कागदपत्र आहे आणि आपण ते ओळखीचा पुरावा म्हणून वापरू शकतो.
नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल ( NVSP ) आणि भारतीय निवडणूक आयोग ( ECI ) ने विकसित केलेले पोर्टल आता उमेदवारांना मतदार ओळखपत्रासाठी सहज नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देत आहे. तुम्ही आता तुमच्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी फॉर्म ६ भरून आणि सबमिट करू शकता.
मतदान अर्ज ६ ची माहिती – Election Form 6 in Marathi
Voter ID Form 6 in Marathi
मतदान म्हणजे काय ?
भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि तसेच भारतामध्ये आपल्या देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला एक उत्तम नेता किंवा व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारालाच मतदान म्हणतात.
मतदान अर्ज ६ म्हणजे काय – election form 6 in marathi online
मतदान अर्ज ६ ( election form 6 ) म्हणजे हा एक प्रकारचा अर्ज असतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रथमच मतदारासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करण्यासाठी जो अर्ज वापरला जातो त्याला मतदान अर्ज ६ ( election form 6 ) म्हणून ओळखले जाते.
मतदान अर्ज ६ चे फायदे – benefits
मतदान अर्ज ६ ( election form 6 ) भरल्यामुळे आपल्याला सहज रित्या मतदान करण्यासाठी नोंदणी करता येते त्याचबरोबर मतदान नोंदणी केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे देखील होतात. चला तर मग मतदान अर्ज ६ ( election form 6 ) चे काय काय फायदे आहेत ते आत आपण पाहूयात.
- ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रथमच मतदारासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मदत होते.
- मतदाराला त्याचा मतदान करण्याचा अधिकार मिळतो.
- मतदान ओळखपत्र आपण इतर कामांच्यासाठी पुरावा म्हणून वापरू शकतो.
- एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करण्यासाठी मतदान अर्ज ६ ( election form 6 ) वापरला जातो.
- मतदान अर्ज ६ ( election form 6 ) मुख्य फायदा म्हणजे आपली मतदान नोंदणी होते.
मतदान अर्ज ६ हा सबमिट करून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया – Process submit form 6 for voting card
Election Form No 6 in Marathi
मतदान ओळखपत्र हे खूप गरजेच असते म्हणजेच आपल्याकडे मतदान ओळखपत्र असेल तर आपण मतदानाचा अधिकार बजावू शकतो त्याचबरोबर आपण अनेक प्रकारच्या कायदेशीर कामासाठी मतदान ओळखपत्र पुरावा म्हणून देऊ शकतो आणि अश्या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी मतदान ओळखपत्र खूप गरजेचे असते आणि म्हणूनच आपण मतदान अर्ज ६ ( election form 6 ) भरून आपण मतदान ओळखपत्र मिळवू शकतो. चला तर मग आता आपण मतदान अर्ज ६ ( election form 6 ) कसा भरायचा आणि सबमिट करायचा ते पाहूयात.
- मतदान अर्ज ६ ( election form 6 ) सबमिट करताना सर्वप्रथम आपल्याला अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलला म्हणजेच राष्ट्रीय मतदार सेवा याच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल. भेट देण्यासाठी आपल्याला https://www.nvsp.in/ या वेबसाईट पत्त्यावर जावे लागते.
- आता या अधिकृत वेबसाईट पत्त्यावर गेल्यानंतर आपल्याला तेथे अधिकृत वेबसाईटचे पेज उघडलेले दिसेल मग त्या वेबसाईट वर आपल्याला फॉर्म हा पर्याय दिसेल आत्ता त्या पर्यायावर क्लिक करा.
- आता आपल्या समोर स्क्रीनवर आपल्याला फॉर्म चे एक पेज उघडलेले दिसेल आता ते खाली स्क्रोल करा कारण या पेजवर मतदान विषयी अनेक वेगवेगळे फॉर्म असतील. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फॉर्म ६ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- फॉर्म ६ वर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाऊ किंवा आपल्याला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
- आता फॉर्म ६ उघडेल त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा आणि संसदीय मतदारसंघ यासारखी माहिती भरा.
- हि सर्व माहिती भरल्यानंतर खाली पहिल्यांदा वापरकर्ता म्हणून पर्याय असतो त्या पर्यायावर वर क्लिक करा.
- मग खाली स्क्रोल करून राहिलाला भाग भरा.
- आता आपल्या अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- मग त्यानंतर कॅप्चा कोड टाइप करा आणि मग ‘सबमिट’ हा पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करून ते सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर एक पोचपावती क्रमांक तयार केला जाईल.
- तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी तुम्ही नंबर वापरू शकता.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलद्वारे काय काय करू शकतो
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल २५ जानेवारी २०१५ रोजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केले होते. भारतातील मतदारांना सुलभ आणि सोपी सेवा देण्यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) लाँच करण्यात आले. या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) द्वारे कोण कोणत्या सेवा दिल्या जातात ते आता आपण पाहूयात.
- या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) द्वारे मतदार ओळखपत्रासाठी सहज आणि सोप्या पध्दतीने नोंदणी करू शकतो.
- राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) द्वारे आपण मतदार यादीमध्ये आपण आपले नाव शोधू शकतो.
- तुमच्या मतदार ओळखपत्रातील बदल किंवा सुधारणांच्यासाठी आपण अर्ज करू शकतो.
- तुमचा विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) द्वारे तपासू शकतो.
- निवडणूक अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी यांचे संपर्क तपशील या या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) वर असतात.
- या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( NVSP ) द्वारे आपण आपले आधार कार्ड अपलोड करू शकतो आणि ते आपल्या मतदार ओळखपत्राशी लिंक देखील करू शकतो.
अश्या प्रकारे आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतदान विषयक माहिती आपण या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलद्वारे घेवू शकतो.
आम्ही दिलेल्या election form 6 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज 6 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या election form 6 in marathi online या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि voter id form 6 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये election form no 6 in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट