डॉ एपीजे अब्दुल कलाम Dr APJ Abdul Kalam Information In Marathi

Dr APJ Abdul Kalam Information In Marathi डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती अब्दुल कलाम असं नाव उच्चारल्यावर तोंडावर पहिलं नाव येतं ते म्हणजे “मिसाईल मॅन” आणि “पीपल्स प्रेसिडेंट”. “मिसाईल मॅन” या नावाने जग प्रसिद्ध असणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांनी भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन विभागांमध्ये प्रगती करून दाखवली. भारतातील कित्येक नागरिकांचे आणि तरुण पिढीचं प्रेरणास्त्रोत असलेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे भारताचे ११ वे राष्ट्रपती होऊन गेले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम यांचे फार मोठे योगदान आहे. वैज्ञानिक ते राष्ट्रपती असा अब्दुल कलाम यांचा प्रवास होता.

भारताने वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आज पर्यंत जी काही प्रगती केली आहे त्यातील सर्वात मोठा आणि मोलाचा वाटा अब्दुल कलाम यांना जातो. एक गरीब घरातला साधा नागरिक एक दिवस जगामध्ये प्रसिद्ध होतो यातूनच अब्दुल कलाम यांच्या कडून खुप प्रेरणा घेण्यासारखं आहे. कठीणातून कठीण प्रसंगावर मात करत अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक ही ओळख प्राप्त केली.

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रांमध्ये त्यांनी अग्नी १, अग्नी २, अग्नी ३ प्रक्षेपनास्त्रांची निर्मिती केली. अब्दुल कलाम यांनी अनुशक्ती मध्ये भारताला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलं. इतकेच नव्हे तर वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये होणारी त्यांची चर्चा आणि प्रसिद्धी पाहून त्यांना राष्ट्रपती पदासाठी देखील स्वीकारण्यात आले. आजच्या ब्लॉक मध्ये आपण अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वावर सविस्तर माहिती घेणार आहोत.

dr apj abdul kalam information in marathi
dr apj abdul kalam information in marathi

डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती – Dr APJ Abdul Kalam Information In Marathi

नाव(Name) अब्दुल कलाम
जन्म (Birthday) १५ ऑक्टोंबर १९३१
जन्मस्थान (Birthplace) रामेश्वरम
वडील (Father Name) जैनुलाबिद्दीन मरकायर
आईचे नाव आशिअम्मा जैनुलाबिद्दीन
लोकांनी दिलेली पदवी मिसाईल मॅन
मृत्यू २७ जुलै २०१५

जन्म

एपीजे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि भारतरत्न या पुरस्काराचे मानकरी. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथील एका तमिळ गरीब कुटुंबामध्ये झाला. १९३१ साली १५ ऑक्टोंबर ला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम जन्माला आले. एका अतिसामान्य घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.

परंतु परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग काढणे व आपले स्वप्न पूर्ण करणे ही शिकवण त्यांना मिळाली होती. त्यांची विचारसरणी उच्च असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये काही ना काही मोठं होऊन नवीन आणि चांगलं करून दाखवायची क्षमता होती.

अतिसामान्य घरांमध्ये जन्मलेले एपीजे अब्दुल कलाम पुढे जाऊन स्वतःच्या घराच नाव इतकं मोठ करतील हे कधी त्यांच्या स्वप्नात देखील आलं नसेल. गरिबी हे फक्त एक कारण असतं पण जर मनातून काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट मागे खेचू शकतात नाही. असे अब्दुल कलाम यांचे विचार होते.

अब्दुल कलाम यांनी खूप महिनत, कष्ट करून जिद्दीने, चिकाटीने एक उत्कृष्ट वैज्ञानिक होऊन दाखवलं आणि त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्राच्या अव्वल कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. भारतात सर्वोच्च मानले जाणारे पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, इंदिरा गांधी पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, इत्यादी. या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

शिक्षण

अब्दुल कलाम यांचा जन्म अतिसामान्य घरांमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांनी गरिबी बघितली. याशिवाय त्यांचा परिवारही मोठा होता त्यामुळे घरामध्ये खाण्यापिण्याचे आणि मूलभूत गरजा मिळवण्याचे हाल व्हायचे. अशा परिस्थितीत अब्दुल कलाम यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतः मेहनत घेतली.

अब्दुल कलाम यांचे वडील अतिशय गरीब होते त्यांच्याकडे अब्दुल कलाम यांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. अशा वेळेत अब्दुल कलाम यांनी स्वतः लहानपणी पत्र वाटपाची काम करून त्यातून येणारे पैसे स्वतःच्या शाळेमध्ये भरून शिक्षण पूर्ण केलं. रामेश्वरम मधील एका प्राथमिक शाळेत त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

पुढचं शिक्षण त्यांनी रामनाथपुरममधील श्वाट्ज हायस्कूल येथून पूर्ण केलं. पुढे कॉलेज शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. इंटरमीडिएट या विषयाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९५० मध्ये तिरुचिरापल्ली च्या सेंट जोसेफ या कॉलेजमध्ये बी एस सी साठी प्रवेश घेतला.

पुढे त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना अब्दुल कलाम यांनी अवकाश संशोधन ज्याला इंग्लिश मध्ये एरोनॉटिक्स असे नाव आहे या विषयावर डिप्लोमा पूर्ण केला. या डिग्री नंतर ते भारतातील एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगलोर येथे कार्यरत होते. तिथे त्यांना काही नवीन गोष्टी देखील शिकायला मिळाल्या.

तिथे त्यांनी दोन प्रकारच्या इंजिनवर काम केलं एक म्हणजे पिस्टन आणि दुसरं म्हणजे टरबाइन. या कामामुळे त्यांचा अनुभव अजून वाढत गेला. तिथे त्यांना विमानाच्या इंजिनची देखभाल करण्याची जबाबदारी दिली होती. तिथून पुढे ते अमेरिकेमध्ये गेले तिकडे अब्दुल कलाम यांनी नासा या संशोधन संस्थेमध्ये एरोस्पेस टेक्नॉलॉजी या विषयावर चार ते पाच महिने अभ्यास केला.

१९५८ ते १९६३ संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ प्रशिक्षण सुरू होतं. बघता बघता एका गरीब घरातला सामान्य मुलगा पुढे जाऊन भारतामधील महान वैज्ञानिक म्हणून ओळखू जाउ लागला.

वैयक्तिक आयुष्य

एपीजे अब्दुल कलाम यांचा एक वैज्ञानिक होण्यापर्यंतचा प्रवास खूपच कठीण आणि कष्टदायी होता. लहानपणापासूनच त्यांना संघर्षाची लढा द्यावा लागला. एका गरीब घरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. वडील जेनूलब्दिन यांचा नौका व्यवसाय होता. घरामध्ये एका वेळेच्या जेवनाचे देखील हाल होते. याशिवाय घरामध्ये सात सदस्य देखील होते.

आई वडील एक बहिणी चार भाऊ आणि स्वतः एपीजे अब्दुल कलाम. अब्दुल कलाम हे हुशार होते म्हणूनच त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला परंतु शिक्षण घेण्यासाठी देखील त्यांना खूप संघर्ष करावा लागला ते स्वतः पेपर विकण्याचं काम करायचे शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने देखील घाण ठेवले होते.

घराची परिस्थिती हालाखीची होती परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. उच्च विचारसरणी बाळगणारे एपीजे अब्दुल कलाम यांनी शेवटी एक दिवस स्वतःला सिद्ध करून दाखवले. अफाट मेहनत जिद्द आणि कष्ट करून ते वैज्ञानिक झाले. ते एरोनॉटिकल अभियांत्रिकी होते. अब्दुल कलाम इस्रोचे वैज्ञानिक होते.

त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भारताला एक पाऊल पुढे नेलं त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना भारतातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार भारतरत्न याने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला. अब्दुल कलाम यांना शिक्षणाची आणि काही तरी नवीन करून दाखवण्याची इतकी आवड होती. तसेच ते खूप कर्तुत्ववान व हुशार होते त्यामुळे त्यांचं कधी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतकं लक्ष नव्हतं त्यांच लग्न देखील झालं नाही ते अविवाहित होते.

वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये त्यांनी एकावर एक असे वेगवेगळे चमत्कार करून दाखवले की हे एकमेव असे व्यक्ती असतील ज्यांना त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील या कामगिरीमुळे राजकारणात दरवाजे खुले झाले. २००१ पर्यंत च्या काळामध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. अब्दुल कलाम यांना लेखनाची आवड होती.

तसेच त्यांना लहान मुलांशी गप्पा मारायला देखील खूप आवडायचं. अब्दुल कलाम यांची विचारसरणी अतिशय उच्च होती त्यांच्या मते, जर तुम्हाला सूर्यासारखा जगायचा आहे तर सर्वात प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील. जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभ राहत नाही तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते.

स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत. आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता आणि निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील. ही प्रोत्साहित करणारी थोर वाक्य महान अब्दुल कलाम यांच्या लेखणीतून आली आहेत.

राजकीय आयुष्य

अब्दुल कलाम हे इस्रोचे वैज्ञानिक होते. सुरुवातीच्या काळात अब्दुल कलाम संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये वैज्ञानिक होते. तिकडे त्यांनी हेलिकॉप्टर ची डिझाईन तयार केली. काही काळासाठी त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये काम केलं परंतु पुढे जाऊन ते इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च चे सदस्य बनले.

त्यांच्या वैज्ञानिक कारकीर्दीची खरी सुरुवात १९६३ मध्ये सुरू झाली. अब्दुल कलाम भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील पी एस एल व्ही च्या संशोधनावर काम करत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मधला त्यांचा दांडगा अनुभव त्यांच्या कामी आला. खूप संशोधन वगैरे करून त्यांनी अग्नि आणि पृथ्वी अशा दोन क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आणि यशस्वीरीत्या त्यांची उड्डाण करून दाखवली.

या कार्यामुळे अब्दुल कलाम यांचं जगभर कौतुक झालं आणि भारताला त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर नेऊन ठेवलं. अब्दुल कलाम यांनी लावलेल्या या संशोधना मुळे त्यांना मिसाईल मॅन असे नाव पडले. भारताच्या पंतप्रधानांनी त्यांची भारताचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड केली वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक वेळी पुढील दहा वर्षांमध्ये भारत कसा असला पाहिजे याचे स्वप्न बघितलं सोबतच वैज्ञानिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवले नवीन धोरणा काढल्या.

१९५८ मध्ये अब्दुल कलाम यांना सौरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे सिनियर सायंटिस्ट पद त्यांना मिळालं. तिकडे त्यांनी प्रोटोटाइप होवर्क्राफ्ट या नावाचा मॉडेल तयार केलं. हैदराबादच्या डी आर डी ओ मध्ये त्यांच्याकडे संचालक पद होतं. १९६२ मध्ये अब्दुल कलाम बंगलोर मध्ये भारतीय अवकाश कार्यक्रमास सहभागी होते.

ऐरोडायनामिक्स डिजाइन फायबर रियनफोसर्ड प्लास्टिक या प्रकल्पात त्यांनी सहभाग घेतला होता. १९६३ ते १९७१ अब्दुल कलाम यांनी तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई यांच्यासोबत विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर येथे कार्यरत होते. तेव्हा अब्दुल कलाम सॅटलाईट लॉन्च व्हेईकल प्रोग्राम चे प्रमुख होते.१९७९ मध्ये एसएलव्हि च्या उडान कार्यक्रमाचा संचालकपद अब्दुल कलाम यांच्या हाती होतं.

जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कुत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला. याच काळात ते थुंबा येथे एसएलव्हि -३ या प्रोजेक्ट चे डायरेक्टर होते. १९८१ साली अब्दुल कलाम यांना वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी पाहून भारतातील सर्वोच्च पुरस्कार पैकी एक मानला जाणारा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

१९८५ मध्ये अब्दुल कलाम यांनी त्रिशूळ या अग्निबाणाची निर्मिती केली. १९८८ मध्ये रिसर्च सेंटरची इमारत तयार केली आणि पृथ्वी अग्निबाणांची निर्मिती केली.१९८९ साली त्यांनी अग्नी या अग्निबाणांची निर्मिती केली. १९९० अब्दुल कलाम यांनी आकाश व नाग या दोन अग्निबाणांची निर्मिती केली.

भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम यांनी दिलेले योगदान सर्वात श्रेष्ठ आहे. भारत सरकारने अब्दुल कलाम यांची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कामगिरी पाहून त्यांना राष्ट्रपती पदासाठी तिकीट मिळवून दिलं. २००१ मध्ये अब्दुल कलाम वैज्ञानिक क्षेत्रामधून निवृत्त झाले आणि राजकारणात आले त्यांना राजकारणात यायची अशी काहीच हाऊस किंवा इच्छा नव्हती केवळ आणि फक्त त्यांच्या कार्यामुळे त्यांना राजकारणात येण्याची संधी मिळाली होती.

राजकारणात आल्यावर देखील त्यांनी उत्तम काम करून दाखवलं. २००२ च्या निवडणुकीत अब्दुल कलाम राष्ट्रपती पदासाठी निवडून आले. ९,२२,७८४ मत मिळून अब्दुल कलाम यांचा विजय झाला. आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. राष्ट्रपती भवनामध्ये पाऊल टाकणारे ते असे पहिलेच शास्त्रज्ञ होते.

थेट वैज्ञानिक क्षेत्रातून राजकारणात येणे म्हणजे थोडं नवलच आहे. राष्ट्रपती बनवण्याआधी अब्दुल कलाम यांना आपल्या भारतातला भारतरत्न हा पुरस्कार जो भारतात सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.

२५ जुलै २००२ हाच तो दिवस होता जेव्हा अब्दुल कलाम यांनी अशोका हॉल येथे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि भारतातील ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखू जाऊ लागले. पाच वर्ष ते राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. या काळामध्ये अब्दुल कलाम लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले लोकांकडून अब्दुल कलाम यांना भरपूर प्रेम मिळाले.

त्यांनी कार्यदेखील तसेच केले होते आधी एक नागरिक म्हणून आणि नंतर एक अनुभवी वैज्ञानिक म्हणून आणि एक राष्ट्रपती म्हणून ते प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्वतःला खूप छान रित्या देशासमोर प्रदर्शित करायचे.

लोक तर अब्दुल कलाम यांच्या प्रेमापोटी त्यांना त्यांच्या कार्याची दात देणारे पत्र देखील पाठवायचे. अब्दुल कलाम देखील लोकांना सामान्य जनतेला स्वतःहून भेटायला जायचे ह्याच कारणामुळे ते लोकांमध्ये प्रिय होते. राष्ट्रपती म्हणून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगलाच माहीत होत्या.

जरी त्यांना राजकारणातलं काहीच अनुभव नसला तरी देशाबद्दल त्यांना नेहमीच आपुलकी वाटली आणि देशाला पुढे नेण्यात त्यांनी नेहमीच स्वतः चा वाटा मोठा ठेवला. लोकांकडून अब्दुल कलाम यांना भरपूर प्रतिसाद मिळाला आणि पीपल्स प्रेसिडेंट असं नाव देखील पडलं. राजकारणामध्ये असतानादेखील अब्दुल कलाम यांना काही चढ-उतार आणि काही निर्णय घेताना त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करावा लागला.

परंतु त्यांचे असे विचार होते की परिस्थिती कशीही असो त्यातून बाहेर निघण्यासाठी एक मार्ग नेहमीच असतो. राजकारणाशी कोणताही संबंध नसताना त्यांना राजकारणात राष्ट्रपती पद मिळालं होतं असे ते पहिले व्यक्ती होते. राजकारण मधून निवृत्ती घेतल्यावर अब्दुल कलाम पुन्हा त्यांच्या आवडीनिवडी कडे वळाले. आवडीनिवडी म्हणजे लेखन करणं, समाजकार्य करणे.

एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव:

ज्यांनी स्वतःच्या कार्यातून भारताला आणि संपूर्ण जगाला थक्क करून सोडलं. म्हणजेच आपले भारताचे प्रिय मिसाईल मॅन यांच संपूर्ण नाव अवूल पाकिर जेनूलब्दिन अब्दुल कलाम असे आहे. भारता मध्ये वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अब्दुल कलाम यांनी वेगवेगळे वैज्ञानिक संशोधन करून वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये अव्वल अशी कामगिरी केली आहे. अब्दुल कलाम यांच्या मुळे आज भारत वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक वेगळ्या स्थानावर आहे.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

एपीजे अब्दुल कलाम यांची वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कामगिरी उल्लेखनीय आहे तसंच ते एक चांगले लेखक देखील होते. त्यांनी खूप चांगली चांगली पुस्तके लिहली आहेत. त्यांच्या बहुतांश पुस्तकांमध्ये त्यांनी आपल्या देशावर आणि देशांमध्ये घडणारा विकास यावर लेख लिहिले आहेत. त्यांनी लिहलेली पुस्तक खूपच प्रोत्साहित करणारी आहेत.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली काही पुस्तकं खालील प्रमाणे: “अदम्य जिद्द” या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे. “इग्नायटेड माईंड: अनलीशिंग द पाॅवर विदिन इंडिया” या पुस्तकाचा देखील मराठी अनुवाद प्रज्वलित मने या नावाने उपलब्ध आहे.

इंडिया २०२० ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, इंडिया- माय- ड्रीम, उन्नयन, एव्हीजिनिंग अँन एम्पाॅवर्ड नेशन, फाॅर सोसायटल इन्फॉर्मेशन, विंग्स ऑफ फायर, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट, टर्निंग पॉइंट्स, टारगेट थ्री मिलियन, ट्रान्सेन्डस: माय स्पिरिच्युअल एक्सपिरीयन्सेस विथ प्रमुखस्वामीजी, दीपस्तंभ, अ मॅनिफेस्टो फॉर चेंज, एपीजे अब्दुल कलाम: संपूर्ण जीवन,

बियाँड २०१०: अ व्हिजन फाॅर टुमाॅरोज इंडिया, स्क्वेअरिंग द सर्कल सेवेन स्टेप्स टू इंडियन रेनेसान्स. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकांमधून कित्येक विषयांचे ज्ञान दिले आहे.

या पुस्तकातून खूप काही शिकण्यासारखे आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी भारताची प्रगती होण्यासाठी कुठले मार्ग वापरले पाहिजेत याचे वर्णन केले आहे. सोबतच भारतात काही बदल घडवून आणावे लागत असतील तर ते कशा प्रकारे करावे या सगळ्यांवर सविस्तर माहिती दिली आहे.

मृत्यू

महान व्यक्तिमत्व, कर्तुत्ववान, थोर उच्च विचारसरणी असणारे अब्दुल कलाम यांनी २७ जुलै २०१५ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास कलाम साहेब एका व्याख्यानासाठी गेले होते. हे व्याख्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शिलॉंग मॅनेजमेंट येथे पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर चालू होतं.

व्याख्यानादरम्यान त्यांना जाणवलं की आपली तब्येत थोडीफार नरमली आहे तितक्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अब्दुल कलाम बेशुद्ध पडले तसाच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बेताने हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. आयसीयूमध्ये अब्दुल कलाम यांना ठेवण्यात आलं आणि दोन तासांचा कालावधी नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

अब्दुल कलाम यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ ठिकाणी रामेश्वरम येथे करण्यात आले. रामेश्वरम ला पोहोचल्यावर स्थानिक बसस्थानकावर अब्दुल कलाम यांचे पार्थिव शरीर खुल्या अंगणात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. अब्दुल कलाम यांचा भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे. प्रत्येक चांगल्या माणसाला कधीनाकधी निरोप घ्यावाच लागतो.

परंतू अब्दुल कलाम यांनी भारतासाठी केलेली कामगिरी ही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नेहमीच सर्वत उत्कृष्ट श्रेष्ठ राहील. आज देखील प्रत्येक भारतीयाच्या स्मारणा मध्ये अब्दुल कलाम जिवंत आहेत.

आम्ही दिलेल्या dr apj abdul kalam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती” apj abdul kalam mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about abdul kalam in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि apj abdul kalam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dr abdul kalam information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

x
error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: