डॉक्टर निबंध मराठी Essay on Doctor in Marathi

Essay on Doctor in Marathi डॉक्टर निबंध मराठी मला आजही माझ्या शालेय आयुष्यातील कधीही न विसरता येणारा असा अविस्मरणीय प्रसंग जशास तसा आठवतो. मी जेंव्हा आठवीच्या वर्गात शिकायला होते, तेंव्हा श्रध्दा पाटील नावाची माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती तिच्या दैनंदिन जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट मला सांगायची आणि स्वतःच मन माझ्यासमोर हलकं करायची. एकदा श्रद्धाची आई खूप आजारी पडली होती. परंतू, आईला दवाखान्यात नेण्यासाठी श्रध्दाकडे पुरेशे पैसे नव्हते; त्यात श्रद्धाचे वडील दारू पिऊन तिच्या आईला खूप मारहाण करायचे. त्यामुळे, आईची सगळी जबाबदारी बिचाऱ्या एकट्या श्रद्धावरचं पडली होती.

जेंव्हा श्रध्दाकडून मला तिच्या आईच्या तब्येतीबद्दल कळलं, तेंव्हा मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे, शाळा संपल्यानंतर मी किंचित देखील वेळ वाया न घालवता माझ्या एका  ओळखीच्या डॉक्टरांना जाऊन भेटले आणि त्यांना घडलेली सगळी हकिकत सांगितली. घडलेला प्रकार ऐकल्यानंतर डॉक्टर काकांनी तत्काळ श्रद्धाच्या आईला दवाखान्यात दाखल करायला सांगितलं.

essay on doctor in marathi
essay on doctor in marathi

डॉक्टर निबंध मराठी – Essay on Doctor in Marathi

Doctor Essay in Marathi

दुसऱ्या दिवशी मी श्रध्दाला दिलासा दिला आणि तिच्या आईला तपासणीसाठी दवाखान्यात आणलं. पण, तपासणी केल्यानंतर आमच्यासमोर एक धक्कादायक बाब समोर आली! श्रद्धाच्या आईला ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टर काकांचं बोलणं ऐकल्यानंतर श्रध्दा खूप मोठमोठ्याने रडत होती. खरंतर, मी डॉक्टर काकांना आधीच श्रध्दाच्या घरच्या परिस्थितीबद्दल सगळं सांगितलं होतं.

त्यामुळे, डॉक्टर काकांनी श्रध्दाला जवळ घेतलं आणि तिला तिच्या  आईची संपूर्ण ट्रीटमेंट मोफत करण्याचं वचन दिलं. मित्रहो, तेंव्हा खऱ्या अर्थाने मला कळलं की डॉक्टरांना देवाचं रूप का मानलं जातं! शिवाय, आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या देशात अगदी पुर्वीच्या काळापासून डॉक्टरांना देवदुत मानलं जातं.

खरंतर, यामागचं मुख्य कारण म्हणजे डॉक्टर अर्थात वैद्य कित्येक जीवांना नवीन जीवन देत असतात हे होय.  त्यामुळे, आजकाल सगळीकडे केवळ डॉक्टरांमुळे कित्येक नानाविध वैद्यकीय परिस्थितींचे निदान आणि उपचार शक्य झाले आहेत.

शिवाय, आजच्या एकविसाव्या शतकामध्ये झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे डॉक्टरांच्या मदतीसाठी उत्तम दर्जाचे ज्ञान, तसेच त्यांना आवश्यक असलेली साधने सहज उपलब्ध होत आहेत. तसेच, आजकाल अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांच्या मदतीला अनेक वैद्यकीय कर्मचारी देखील उपलब्ध असतात.

आपणा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी विशेषतः डॉक्टरांवर अवलंबून राहते. यांखेरीज, आपण सर्वजण देखील आपल्या आरोग्याच्या संदर्भात कोणतीही समस्या उद्भवली की लगेच डॉक्टरांची भेट घेतो आणि आपल्या समस्येचं निराकरण करतो. पण मित्रहो, डॉक्टरांना भेट देताना तुम्ही कधी एका गोष्टीचं निरीक्षण केलं आहे का?

आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टरांनी तपासणी करताच आपल्या मनात इतकी सकारात्मक क्षमता तयार होते की त्यांनी जरी म्हटलं की उद्यापर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल की खरोखरच आपण दुसऱ्या दिवशी ठणठणीत बरे होतो.

यामागचं मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या मनात डॉक्टरांबद्दल असणारा विश्वास होय! शिवाय, डॉक्टर देखील रुग्णामध्ये वारंवार सुरक्षिततेची भावना निर्माण करत असतात. परंतू असे असले तरी, गेल्या काही दशकांमध्ये मात्र कित्येक लक्षाधीश परिदृश्यांपैकी अनेक जास्तीत जास्त निराशावादी घटनांनी डॉक्टरांचा पैशांचा व्यवसाय उघडकीस आणला, त्यामुळे  रुग्णांच्या मनातील डॉक्टरांबद्दलच्या विश्वासाचा केसाने गळा कापला गेला.

खरंतर या घटनांमुळे सगळ्यांसमोर असा प्रश्न उपस्थित होतो की या व्यवसायामध्ये आजचे डॉक्टर किती जबाबदार आहेत? काही ठिकाणी तर अनेक डॉक्टर भ्रष्ट माध्यमांचा वापर करताना रंगी हात पकडले गेले आहेत. शिवाय, “स्त्रीभ्रूणहत्या करणे” कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असूनही अनेक डॉक्टर गुपचुप पद्धतीने पैसे घेऊन स्त्रीभ्रूणहत्या करताना आपल्याला दिसून येतात.

परंतु, दुसरीकडे मात्र असेदेखील बरेच डॉक्टर आहेत जे जबाबदारीने स्वतःचे कार्य करतात आणि लोकांना मनापासून सेवा देतात.

तसेच, लोकांची मनोभावे सेवा करणारे हे देवदूत  डॉक्टर इतर व्यावसायिक डॉक्टरांप्रमाणे केवळ पैशाची कमाई करण्याच्या हेतूने या वैद्यकीय व्यवसायाचा स्वीकार करीत नाहीत. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक प्रगतीमुळे तांत्रिकदृष्ट्या, नवीन वैद्यकीय उपकरणांची उत्क्रांती झालेली आहे तसेच, अनेक नानाविध रोगांच्या समस्यांशी निगडित अनेक प्रगतशील सुधारित मार्ग देखील सहज शक्य झाले आहेत.

परंतू, दुसरीकडे मात्र नैतिकदृष्ट्या या क्षेत्रात अपयश आले आहे हे तितकेच खरे! मित्रहो, आपल्या भारत देशात वैद्यकीय व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. परंतू,  वैद्यकीय व्यवस्थेच्या बाबतीत आपल्या देशात अनेक समस्या देखील उद्भवल्या आहेत.

संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम डॉक्टरांपैकी काही डॉक्टरांचे समूह जरी आपल्या भारत देशातील असले, तरीदेखील ही उल्लेखनीय प्रगती खराब होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भ्रष्टाचारसारख्या समस्यांमुळे भारताचे स्थान वैद्यकीय  भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वोच्च बनले आहे.

मित्रहो, आता आपण भारतीय वैद्यकीय क्षेत्रात कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो; ते पाहुयात. आपल्या भारत सरकारने कित्येक सरकारी दवाखाने तसेच, अनेक नर्सिंग होम्स स्थापन केले आहेत. परंतू, त्यांची पायाभूत संरचना आणि तेथील सोईसुविधा पुरवणारी यंत्रणा इतकी खराब आहे की बहुतेक लोक तिथे जाण्यास अजिबात प्राधान्य देत नाहीत.

तसं पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की भारत सरकार आरोग्य सेवांवर पुरेपूर खर्च करत असते. परंतू, मधल्या टप्प्यातील लोकांच्या भ्रष्टाचारामुळे सरकार खर्च करत असलेले पैसे वैद्यकीय व्यवस्थेपर्यंत सुरक्षितरित्या पोहचत नाहीत. या एकंदरीत परिस्थितीमुळे जास्तीत जास्त लोक आज खासगी क्षेत्राकडे आकर्षित होताना आपल्याला दिसून येतात. मित्रहो, यामागचे मुख्य कारण म्हणजे खासगी दवाखान्यांमध्ये सरकारी दवाखान्याच्या तुलनेत अधिक चांगल्या सोईसुविधा दिल्या जातात.

शिवाय, खासगी दवाखान्यांत प्रत्येक रुग्णाकडे विशेष लक्ष देखील दिले जाते. परंतू, असे असले तरी खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा मुख्य हेतू हा रुग्णांवर उपचार करण्याऐवजी पैसे कमवणे हाच असतो. शिवाय, सगळेच रुग्ण स्वतःचे आरोग्य सदृढ बनवण्यासाठी डॉक्टरांवर अवलंबून राहतात.

परंतू, जास्तीत जास्त रुग्णांमध्ये वैद्यकीय परिस्थितीबद्दलच्या ज्ञानाची कमतरता असते आणि त्यातच त्यांचा डॉक्टर लोकांवर आंधळा विश्वास देखील असतो. त्यामुळे, रुग्णांच्या अज्ञानाचा आणि विश्वासाचा हे डॉक्टर लोक खूप मोठ्या प्रमाणावर गैरफायदा उचलतात. गरजेची नसलेली असंख्य औषधे आणि निरनिराळ्या आरोग्याच्या संदर्भातील टॉनिक्सचे  वर्णन करणे तर खूप सामान्य झाले आहे.

खरंतर, पैशाची कमाई करण्याचा आजच्या आधुनिक आणि प्रगतशील डॉक्टर लोकांचा हा एक उत्तम मार्ग बनला आहे, हे मात्र खरं! पण मित्रांनो, शरीराला गरज नसताना देण्यात येणाऱ्या औषधांचा तसेच, इंजेक्शनचा अनेक रुग्णांवर दुष्परिणाम देखील होतो. परंतु, याबद्दल डॉक्टरांना जाणीव असूनही त्यांना रुग्णांची काळजी वाटत नाही.

कारण, आजची वैद्यकीय परिस्थिती म्हणजे “रुग्णांना जास्त आजार म्हणजे डॉक्टरांसाठी जास्त पैसे” अशी बनली आहे. यांखेरीज, काही ठिकाणच्या  दवाखान्यांमध्ये तर अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यात अनेक लोकांना काही सामान्य आजारामुळे रुग्णालयात दाखल केले गेले आहे, परंतू येथेही औषधांप्रमाणे गरज नसताना केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक कालावधीपेक्षा जास्त काळ राहावे लागले आहे.

मित्रहो, असं करण्यामागचा मुख्य उद्देश हा रुग्णांकडून जास्त पैसे उकळणे हाच असतो. पण, हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. आपल्या भारत देशात वैद्यकीय आरोग्य सेवा सुधारण्याची अत्यंत मूलभूत आवश्यकता म्हणजे आपल्या देशात एक चांगला डॉक्टर असणे, ही होय. त्यासाठी, आपल्या देशाच्या सरकारने वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी त्याचबरोबर, प्रतिभा स्थलांतर रोखण्यासाठी झपाझप पावले उचलली पाहिजेत. तेंव्हाच कुठंतरी आपल्या देशातील वैद्यकीय परिस्थिती पहिल्यासारखी होईल आणि लोक पुन्हा एकदा डॉक्टरांमध्ये परमेश्वराला पाहतील.

– तेजल तानाजी पाटील

बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या essay on doctor in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay in marathi language on doctor या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on doctor in marathi for kids माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on doctor 250 words in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!