Essay on Good Manners in Marathi चांगल्या सवयी निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये चांगल्या सवयी किंवा चांगले शिष्टाचार या विषयावर निबंध लिहिणार आहोत. एकादी चांगली व्यक्ती किंवा त्याचे व्यक्तिमत्व हे त्याच्या चांगल्या सवयींच्यामुळे किंवा त्याच्या चांगल्या वागण्यामुळे समजते आणि प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे असते कारण त्यावरूनच तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीसोबत चांगले बोलू शकतो, आपल्याहून मोठ्या व्यक्तीचा आदर करू शकतो, तसेच तो विनम्र राहू शकतो, तसेच इतर लोकांना मदत करू शकतो असे सर्व गुण चांगल्या सवयी असणाऱ्या लोकांच्यामध्ये असतात.
आपल्याला चांगल्या सवयी लावणारे हे आपले आई – वडील असतात म्हणजेच आपल्याला चांगल्या सवयी आणि चांगले वळण लागण्याला घरापासूनच सुरुवात होते. अनेक आई वडिलांना वाटते कि आपल्या मुलाला लहानपणीपासुनच चांगले संस्कार लागले पाहिजेत तसेच त्याला चांगल्या सवयी असल्या पाहिजेत म्हणजेच तो मोठे झाल्यानंतर देखील त्या चांगल्या सवयी पुढे चालू ठेवेल. मुलांच्यावर चांगल्या सवयींचे संस्कार हे लहान पणी पासूनच केले तर मुले आयुष्यभरासाठी चांगले शिष्टाचार शिकतील.
चांगल्या सवयी निबंध मराठी – Essay on Good Manners in Marathi
Essay on Good Habits in Marathi
चांगल्या सवयीची किंवा चांगल्या संस्काराची मुले त्यांना म्हणतात जी मुले सकाळी लवकर उठतात, अंघोळ करून देवाचा आशीर्वाद घेतात, आई वडिलांचा आशीर्वाद घेतात, आई वडिलांची आज्ञा पाळतात तसेच त्यांना उलट उत्तर देत नाहीत, त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करतात. त्याच बरोबर सकाळी लवकर उठून व्यायाम करतात किंवा सूर्य नमस्कार घालतात त्याचबरोबर नियमितपणे अभ्यास करतात तसेच घरातील कामांना हातभार लावतात.
त्याचबरोबर चांगल्या सवयीची मुले कधीच खोटे बोलत नाहीत तसेच कधीच ते वाईट मुलांशी संगत करत नाहीत आणि अशी प्रकारच्या चांगल्या सवयी असणारी मुले कधीच कोणत्याही गोष्टीमध्ये मागे पडत नाहीत तसेच ते मोठे झाल्यानंतर देखील आपल्या आई – वडिलांची काळजी घेतात, तसेच सगळ्यांच्याबरोबर विनम्र पणे बोलतात तसेच सर्वांना मदत करतात.
आपण लहानपणापासूनच चांगल्या शिष्टाचाराचा अभ्यास करतो, जी आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी एक पायरी आहे. लहान मूल हे प्रथम त्यांच्या पालकांकडून शिकते आणि त्यांच्या वर्तनाची कॉपी करण्याचा प्रयत्न करते. चांगले आचरण सर्वत्र आणि सर्वांकडून शिकले जाऊ शकते. चांगल्या शिष्टाचाराची व्याख्या अशी क्रिया किंवा सवयी म्हणून केली जाऊ शकते जी एखाद्या व्यक्तीला सुसंस्कृत, प्रौढ, समजूतदार आणि सौम्य बनवते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण शेकडो स्त्री-पुरुषांना भेटतो आणि त्यांच्याशी चांगले वागणे आवश्यक आहे.
अनेक चांगले शिष्टाचार आहेत जे आपल्याला चांगली जीवनशैली मिळविण्यात मदत करू शकतात. आपण आपल्या कुटुंबातून, शाळेतून किंवा समाजातून शिष्टाचार शिकतो. ते शिकण्यासाठी विशिष्ट जागा नाही. आपण ते कुठूनही शिकू शकतो. आपल्या जीवनात अनेक शिष्टाचार आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आमच्या शाळेत आणि घरात पाळण्यासारख्या अनेक पद्धती आहेत.
जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जर असे केले तर तुम्ही त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या लिस्ट मध्ये अगदी सहजपणे येवू शकतात अश्या प्रकारे आपल्याला चांगल्या सवयी असल्या कि आपल्याला वेगवेगळे फायदे देखील होतात.
शिष्टाचारामुळे किंवा चांगल्या सवयींच्या मुले काय होते तर चांगल्या सवयींच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, तसेच आपण सभ्य बनण्यास मदत होते, कामाच्या ठिकाणी जर तुम्ही या पद्धतींचे पालन केले तर तुम्ही विश्वासार्ह व्हाल. तुमच्या नोकरीच्या आयुष्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर आपण आपले मित्र आणि कुटुंबियांशी चांगले संबंध राखू शकतो, आम्ही आमच्या शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांचे आवडते बनतो अश्या प्रकारे आपल्या चांगल्या सवयीमुळे अनेक फायदे होतात.
चांगल्या सवयीमध्ये समविष्ट होणारे शिष्टाचार :
- सर्वांशी विनम्रपणे वागणे किंवा बोलणे.
- इतरांची मदत करणे.
- आपल्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर करणे.
- आई वडिलांची आज्ञा पाळणे तसेच आई वडिलांचा आशीर्वाद घेणे.
- आई वडिलांना कधीच उलट उत्तर न देणे तसेच त्यांची काळजी घेणे.
- स्वताची कामे स्वत करणे आणि आपल्या कामांच्यासाठी कोणावरहि अवलंबून न राहणे.
- आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती भेटल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करणे.
- सकाळी लवकर उठून व्यायाम करणे तसेच अंघोळ करून देवाजवळ प्रार्थना करणे तसेच सकाळी आपल्या आई वडिलांचा देखील आशीर्वाद घेणे.
- त्याचबरोबर काही करण्यापूर्वी आपल्या आई वडिलांची परवानगी घेणे.
- कधीहि खोटे न बोलणे तसेच चांगल्या मुलांची सांगत करणे.
आपण घरामध्ये आणि समाजामध्ये देखील अनेक शिष्टाचार पाळतोच पण आपण शालेय शिक्षण घेताना देखील अनेक शिष्टाचार पाळले पाहिजे ज्यामुळे आपल्या चांगल्या सवयी असणारा विद्यार्थी म्हणून ओळखले जाईल. शाळेत आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आपण शिस्त पाळली पाहिजे. जे विद्यार्थी कमकुवत आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. आपण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे.
त्याचबरोबर शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांच्यासोबत चांगले वागले पाहिजे त्याचबरोबर वर्गामध्ये प्रवेश करताना शिक्षकांची परवानगी घेतली पाहिजे, शिक्षकांच्या सर्व आज्ञांचे पालन केले पाहिजे या प्रकारच्या शिष्टाचारांचे पालन करणे हे देखील चांगल्या सवयींचे उदाहरण आहे आणि हे शिष्टाचार आपण शाळेमध्ये पाळले तर आपण एक चांगले वूद्यार्थी बनू शकतो आणि आपण चांगले विद्यार्थी बनलो तर आपण एक यशस्वी व्यक्ती देखील बनू शकतो.
अश्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या सवयींचे ( good manners ) महत्व आहे. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या सवयी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते तसेच चांगल्या सवयी आपल्याला यशस्वी देखील बनवतात.
आम्ही दिलेल्या essay on good manners in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चांगल्या सवयी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on good manners in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट