Essay on Guru Shishya in Marathi Language गुरु शिष्य निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये गुरु शिष्य या विषयावर निबंध लिहिणार आहोत. गुरु शिष्याच्या नाते हे एक अतूट नाते असते गुरु म्हणजे जो शिष्यामध्ये ज्ञानाची भर पडतो आणि जगामध्ये कसे वावरायचे हे शिकवतो तो म्हणजे गुरु असतो. गुरु शिष्याचे नाते हे खूप महत्वाचे असते आणि म्हणूनच म्हणतात ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ म्हंटले जाते. चला तर मग आता आपण गुरु शिष्याचे नाते कसे आणि आणि गुरु आपल्या शिष्याला कसे घडवतो हे या निबंधाच्या मार्फत पाहूयात. पूर्वी गुरु शिष्याचे नाते हे इतके घट्ट होते कि गुरूने जी काही आज्ञा दिली आहे.
आणि ती कोणतीही असो शिष्य लगेच न काही म्हणता न काही अडे वेडे घेता पूर्ण करत होते परंतु सध्या गुरु शिष्याच्या नात्यातील आपुलकी खूप कमी झाली आहे. कुंभार जसे मातीला आकार देवून सुंदर असेः मडके बनवतो तसेच गुरुचे देखील काम असते म्हणजे आपल्या शिष्याला चांगले ज्ञान देवून त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी घडवणे.
गुरु शिष्य निबंध मराठी – Essay on Guru Shishya in Marathi Language
Guru Shishya Marathi Nibandh
गुरु हि अशी व्यक्ती आहे जी आपल्या शिष्याला अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेतो तसेच अंधारातून प्रकाशाकडे नेतो तसेच कोणत्याही व्यक्तीच्या यशाच्या मागे गुरुचे कष्ट असतात. गुरु हि शिष्याच्या जीवनातील अशी व्यक्ती असते जी शिष्याला शिक्षणामध्ये तर मदत करतेच पण इतर गोष्टीमध्ये देखील शिष्याला मार्ग दाखवण्याची मोठी कामगिरी गुरु करतो आणि म्हणूनच गुरूला शिष्याच्या आयुष्यामध्ये महत्वाचे स्थान असते.
भारतामध्ये गुरु शिष्य या नात्याला खूप महत्वाचे स्थान आहे आणि भारतामध्ये गुरु शिष्य हि परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे आणि गुरूला पूर्वीपासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी पदवी देवून गुरूला सर्वोच्च मानले आहे. गुरु शिष्याची परंपरा हि पूर्वी पासून आणि खूप जुनी परंपरा आहे आणि हे आपल्याल सर्वांना माहीतच आहे.
कारण एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांची कथा कोणाला माहित नाही हि कथा सर्वांना माहित आहे. एकदा गुरु द्रोणाचार्य पाडवांना धनुर्विद्या आणि धनुष शास्त्र शिकवत असताना हे एकलव्याने काबून पहिले होते आणि त्याने देखील द्रोणाचार्यांना आपले गुरु मानून धनुर्विदेची साधना आपलीआपण करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी एकलव्य धनुर्विद्या यामध्ये पारंगत झाला त्यावेळी त्याने आपल्या ह्या कलेचे प्रदर्शन गुरु द्रोणाचार्याच्या समोर केले त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी त्याला विचारले कि तुजे गुरु कोण आहेत.
आणि तुला हि विद्या कोण शिकवली त्यावेळी एकलव्याने द्रोनाचार्यांचे नाव सांगितले आणि त्यांनी मी हि विद्या तुम्ही शिकवताना लांबून बघून अवगत केली आहे असे सांगितले त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला आणि त्यावेळी त्याने त्याचा उजव्या हाताचा अंगठा कापून दिला. अश्या प्रकारे पूर्वी गुरु शिष्याचे नाते होते.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप महत्वाचे स्थान आहे आणि पूर्वीच्या काळी तर शिष्य गुरूची सर्व आज्ञा पाळत होते आणि भारतातील पूर्वीच्या काळातील गुरु शिष्याची नाती हि अजूनही प्ररणा देवून जातात आणि आपल्याला सांगतात कि गुरु आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा असतो आणि तो आपले जीवन घडवण्यासाठी तसेच आपल्याला जगामध्ये वावरण्यासाठी कसा मदत करतो तसेच आपल्या ज्ञानामध्ये आजू कशी भर पाडतो.
जर लहान मुलांना लहानपणीपासूनच शिक्षणामध्ये भर पडायचा असेल तर तो अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षकच पाडू शकतो त्याचबरोबर लहान मुलांच्या मनावर खोल प्रभाव गुरूचा पाडू शकतात. जरी गुरुचे काम हे आपल्या शिष्याला शिक्षण देणे. त्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकवने तसेच त्याला जगामध्ये वावरण्यासाठी परिपूर्ण बनवणे असले तरी शिष्याने देखील गुरूने जे काही शिकवले आहे आणि जे काही सांगितले आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे.
म्हणून मनपूर्वक आत्मसात करणे ह शिष्याचे काम आहे तसेच गुरूचा आदर करणे तसेच गुरूचे आभार मानणे हे शिष्याचे महत्वाचे काम आहे. पूर्वीच्या काळी शिष्य आपल्या गुरुसाठी काहीही करण्यासाठी तयार होत होते तसेच आपल्या गुरूचा शब्द मोडत नव्हते आणि गुरूच्या पायाची धूळ आपल्या कपाळावर लावून घेत होते पण सध्या हि गुरु शिष्याची व्याख्या थोडी बदलली आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि सध्या शिष्याने जरी गुरूचा आदर केला तरी खूप आहे.
पूर्वी देखील असे होते आणि आज देखील असे आहे कि शिष्य जितका नम्र, हुशार आणि गुरुचे सर्व ऐकतो तो शिष्य गुरूचा आवडता असतो तसेच त्याला चांगले शिक्षण मिळू शकतो आणि शिष्य जितका अहंकारी आणि गुरुची कोणतीही गोष्ट ऐकत नाही तो गुरूचा नावडता असतो आणि तो कायम गुरु कडून दुर्लक्षित राहतो. गुरूला आपण शिक्षक, आचार्य या नावानी देखील ओळखू शकतो आणि भारतामधील तत्वज्ञान सांगते कि जशी मुले आपल्या आई वडिलांचा आदर करतात.
तसेच त्यांनी त्यांच्या गुरूचा देखील आदर केला पाहिजे कारण आपल्या ज्ञानामध्ये अनेकजण भर पडतात पण त्यामधील मोलाचा वाटा हा गुरूचा असतो आणि ज्ञानाचा वापर करून आपण आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. पण आज गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये काही अंतर आले आहे आणि आजच्या या धुनिक जगामध्ये संस्काराचे स्वरूप कोठेतरी हरवले आहे आणि गुरु शिष्याच्या नात्यातील आपुलकी कोठेतरी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते.
पण गुरु शिष्याचे नाते जितके घट्ट आणि चांगले असते तितकेच शिष्यावर शिक्षणाचा प्रभाव हा चांगला पडतो. गुरूने आपल्या शिष्याला चागल्या प्रकारे शिकवले पाहिजे तसेच त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे आणि त्याला चांगले घडवले पाहिजे. जर शिक्षक आपली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडण्यास अयशस्वी ठरले तर समाजाचे नुकसान होते कारण काही विद्यार्थी हे चांगले शिक्षण घेवून मोठे बनून सामाजिक कार्य करतात त्यामुळे शिक्षकाने आपले काम चोख पार पाडले पाहिजे. भारतामध्ये गुरु शिष्याचे हे महत्व सांगण्यासाठी गुरु पोर्णिमा तसेच शिक्षक दिवस साजरा केला जातो.
भारतामध्ये अनेक गुरु शिष्याची आदर्श उदाहरणे आहेत जसे कि एकलव्य आणि द्रोणाचार्य, सांदिपनी आणि श्री कृष्ण, प्रभू श्री राम आणि गुरु वशिष्ट, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन यासारखी अनेक गुरु शिष्याची आदर्श उदाहरणे भारतामध्ये होवून गेली.
आम्ही दिलेल्या essay on guru shishya in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गुरु शिष्य निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Guru Shishya marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Guru Shishya in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट