Essay on Kingfisher in Marathi खंड्या पक्षावर मराठी निबंध किंगफिशर म्हणजेच खंड्या हा पक्षी प्रामुख्याने बल्लगिरिया, तुर्की, पश्चिम आशिया व भारतीय उपखंडा पासून ते फिलिपीन्स पर्यंत आढळून येतो. किंगफिशर हा पक्षी जो मराठीमध्ये खंड्या या नावाने प्रसिद्ध आहे. हा पक्षी लहान आकाराचा असतो आणि पाणथळ जागेवर आढळून येतो. हा पक्षी दिसायला अगदी सुंदर असतो या पक्षाचे चमकदार निळ्या रंगाचे पंख लोकांना आकर्षित करतात. खंड्या पक्षाची नवीन ओळख म्हणजे मासे पकडणारा रंगीबिरंगी पक्षी अशी देखील आहे. किंगफिशर उर्फ खंड्या या पक्षाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे हा पक्षी एक मांसाहारी पक्षी असून तो मासेमारी मध्ये पारंगत आहे आणि म्हणूनच त्याला किंगफिशर असे नाव देण्यात आले आहे.
हा पक्षी माशांची शिकार करतो आणि मराठी मध्ये कोळी बांधवांना धीवर म्हणतात कारण धीवर म्हणजे मासे पकडणारा आणि म्हणूनच आता किंग फिशर या पक्षाची नवीन ओळख म्हणून त्याला धीवर हे नाव दिलं गेलं आहे. खंड्याची मासे पकडण्याची पद्धत बघण्याजोगी आहे. झाडाच्या फांदीवर बसून माशांवर लक्ष ठेवून असतो आणि पाण्यात एखादा मासा दिसला की लगेच तिरकस सूर मारून मासा चोचीत पकडतो.
किंगफिशर (खंड्या) पक्षावर मराठी निबंध – Essay on Kingfisher in Marathi
Kingfisher Essay in Marathi
खंड्या पक्षी झाडावर बसून क्लिक्, क्लिक् किंवा किल्, किल् असा आवाज काढतो आणि म्हणूनच त्याचं किल्किला असे देखील नाव प्रचलित आहे. खंडाच्या शरिरा वरती बऱ्याच ठिकाणी तपकिरी रंग पसरलेला आहे. तर या पक्षाला चमकदार निळ्या रंगाचे पंख लाभलेले आहेत ते त्याला आणखीन सुंदर बनवतात. इतर पक्षांच्या तुलनेत या पक्षाला अतिशय लहान पाय असतात व लांब चोच असते. या पक्षाचा लहान आकारा आणि अत्यंत आकर्षित रूप बघणाऱ्याला मोहीत करत.
या पक्षाचे डोळे धारदार व तीक्ष्ण असतात त्यामुळे हा पक्षी बराच वेळ पाण्यावरून उडू शकतो. मासे पकडणे व मासे खाण्यामध्ये हा पक्षी पारंगत आहे. खंड्या हा चपळ व वेगवान पक्षी आहे. माशांची शिकार करण्यासाठी हा पक्षी पाण्यावर घिरट्या घालत असतो आणि मासा दिसताच त्यावरती अतिशय चपळाईने झडप घालून त्याला चोचीने पकडतो. मासे खाणं खंड्या ची आवडती गोष्ट असल्यामुळे खंड्या नदी, ओढे, तळी यांच्या काठी तो हमखास आढळून येतो.
छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक, कृमी, गोगलगाई, कीटक कोळी इत्यादी मुख्य खाद्य आहे. किंग फिशर या पक्षाला अनेक नावे आहेत. खंड्या, किलकिल्या, धीवर, लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या, तीबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या. खंड्या या पक्षाचं पृथ्वीवरील वास्तव्य सुमारे सत्तावीस दशलक्ष वर्षापासून आढळून आलं आहे. या पक्षाच्या एकूण ९० प्रजाती आढळतात आणि त्यातील नऊ प्रजाती या भारतात आढळून येतात.
खंड्या हा पक्षी पृथ्वीवर सर्वत्र आढळून येतो मात्र पृथ्वीचा ध्रुवीय व वाळवंट क्षेत्र याला अपवाद आहे. या पक्ष्यांच्या बहुतांशी प्रजाती ऑस्ट्रेलिया मध्ये सर्वात जास्त आढळून येतात. हे पक्षी झाडांच्या फांद्यावर आणि सर्वात जास्त करून पाणथळ ठिकाणी आढळून येतात. झाडावर राहणारे पक्षी झाडावरील किडे खातात तर पाणथळ ठिकाणी आढळणारे पक्षी पाण्यातील मासे खातात. भारतात खंड्या पक्षाची सर्वसामान्य जात सर्वत्र आढळून येते हे पक्षी वेगवेगळ्या जातींचे आणि वेगवेगळ्या आकाराचे आढळून येतात आणि यामुळेच त्यांचे रंग देखील वेगवेगळे असतात.
मेगासॅरेल मॅक्झीमा हा खंड्या पक्षाचा प्रकार सर्वात मोठा किंगफिशर पक्षी आहे. या पक्षाचा वजन जवळपास ३५५ ग्राम असून याची लांबी ४५ सेंटिमीटर इतकी आहे. मुख्यता खंड्या पक्षी हे त्यांच्या लहान आकारा साठी विशेष प्रसिद्ध आहेत. खंड्या पक्षी बराच वेळ पाण्यावर उडू शकतो आणि सोबतच त्याचे डोळे फार तीक्ष्ण असतात त्यामुळे आकाशात उडताना या पक्षाला जमिनीवरचे स्पष्टपणे दिसू शकत.
खंड्या मादी एका वेळेला पाच ते दहा अंडी देते. खरंतर मादी एका वेळेला दोन ते पाच अंडी देऊ शकते परंतु या पक्षाच्या अनेक प्रजाती आढळून येतात त्यामुळे काही काही प्रजातींमध्ये एका वेळेला दहा अंडी घालण्याची क्षमता देखील असते. यानंतर दोन्ही नर व मादी मिळून या अंड्यांना उब देतात आणि जवळपास पुढील दोन ते तीन महिने पिल्लू मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेतात. खंड्या पक्षी हा कुशल शिकारी च्या प्रकारातला एक पक्षी आहे कारण या पक्षाने शिकार्यावर केलेला हल्ला आतापर्यंत दरवेळी यशस्वी ठरलेला आहे.
या पक्षाला हिंदीमध्ये राम चिरिया असे देखील म्हटलं जातं. किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षाच्या अनेक प्रजाती आढळून येतात परंतु ऑस्ट्रेलियामध्ये या पक्षाच्या सर्वात मोठ्या आकाराच्या प्रजाती आढळून येतात तर आफ्रिकेमध्ये सर्वात लहान आकाराच्या प्रजाती आढळून येतात. मादी खंड्या ही नर खंड्या पेक्षा सर्वात सुंदर व तेजस्वी दिसते.
खंड्या पक्षाची स्मॉल ब्लू किंग फिशर ही सर्वात छोट्या आकाराची प्रजाती आहे या प्रजातीचा खंड्या पक्षी चिमणीच्या आकाराचा असतो आणि या पक्षाचे शरीर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे असते. आशिया व आफ्रिकेमध्ये आढळून येणारा पीईड खंड्या या प्रजातीचे पक्षी पांढऱ्या रंगाचे असतात तसेच या पक्ष्याची चोच मजबूत, लांब आणि अधिक धारदार असते ज्याने मासे सहज पकडायला मदत होते. ओरिएन्टल ड्वाफऺ
ज्याला ब्लॅक बॅक्ड खंड्या किंवा थ्री खंड्या या नावानेदेखील ओळखले जाते. ही प्रजाती प्रामुख्याने भारतामध्ये आणि दक्षिण आशिया मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. गडद निळा, तपकिरी पिवळा आणि जांभळ्या या रंगांमध्ये ही प्रजाती आढळून येते. स्टॉर्क ब्लेड खंड्या ही प्रजाती प्रामुख्याने उष्ण कटिबंधात आढळून येते या प्रजातीचे पक्षी भारतामध्ये दक्षिण भागात पाहायला मिळतील. तसेच या पक्षाची लांबी जवळपास पस्तीस सेंटीमीटर असते.
या पक्षाचा रंग निळा व फिकट पिवळसर असतो निळा हा रंग पक्षाच्या पंखांवर असतो तर पिवळसर रंग हा त्याच्या समोरच्या भागावरील असतो तसेच या पक्षाला तपकिरी रंगाची चोच देखील असते जी अतिशय लांब व मजबूत असते. या प्रकारातील पक्षी प्रामुख्याने बेडूक, उंदीर, मासे हे अन्न खातात. रिव्हर खंड्या पक्षी म्हणजेच जो वाईट स्प्रेड खंड्या पक्षी नावाने देखील ओळखला जातो आणि दक्षिण आशिया मध्ये किंवा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांसारख्या देशांमध्ये विपूल प्रमाणात आढळून येतो.
खंड्या पक्षाची एक आकर्षक प्रजाती म्हणजे ब्राऊन विंग खंड्या या खंड्या पक्षाचे पंख तपकिरी रंगाचे असतात आणि म्हणूनच ते फार सुंदर व आकर्षक असतात. हे पक्षी प्रामुख्याने बंगाल येथील सुंदर्बन जंगलांमध्ये पहायला मिळतील. या पक्षाच्या मानेचा वरचा पूर्ण भाग नारंगी रंगाचा तर मानेच्या खालून ते शेट्टी पर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा असतो आणि शेपटीच्या टोकावर थोडासा फिकट निळसर रंग आढळून येतो. असा हा विविध रंगांनी भरलेला ब्राऊनिंग खंड्या पक्षी दिसायला अतिशय आकर्षक दिसतो आणि या पक्षाची लाल लांब चोच आणि लाल पाय याला अजूनच सुंदर बनवतात. उ
ष्णकटिबंधीय खारफुटी जंगलांमध्ये आढळून येणारे हे पक्षी जगातील भारत, म्यानमार, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये पाहायला मिळतात. खंड्या च्या सामान्य प्रजातींपैकी एक असणारा ब्ल्यू ईयर्ड खंड्या पक्षी दक्षिण आशिया मध्ये आढळून येतो आणि आणि भारतातील ही सामान्य खंड्याची जात आहे. या पक्षाचे वर्णन सांगायचं झालं तर याचा पाठीमागचा भाग गडद निळा रंगाचा तर पुढील भाग नारंगी रंगाचा असतो आणि चोच काळ्या रंगाची असते. या प्रकारचे पक्षी प्रामुख्याने जलाशयाच्या ठिकाणी आपले घरटे बांधण्याचा प्रयत्न करतात.
व्हाईट थोर्टेड खंड्या हा पक्षी व्हाईट ब्रेस्टेड म्हणून देखील ओळखला जातो. हा पक्षी प्रामुख्याने भारतीय उपखंडामध्ये आढळणारा खंडाच्या सामान्य प्रजातींपैकी एक आहे भारतातील शहरी भागांमध्ये हा पक्षी पहायला मिळतो. आकाशी रंगाचे पंख आणि बाकीचा भाग हा विटकरी रंगाचा असतो आणि तिकडचा भाग पांढरा रंगाचा असतो त्यामुळे ह्याला व्हाईट ब्रेस्टेड अंड्या असं नाव देण्यात आलं आहे लाल रंगाचे पाय असणारा हा खंड्या याच्या मोठ्या आवाजामुळे देखील ओळखला जातो.
सरासरी १०.४ ग्रॅम वजन आणि आकार दहा सेंटिमीटर असणारा आफ्रिकन वामन किंगफिशर हा सर्वात लहान प्रजाती आहे. खंड्या या पक्षाच्या अनेक प्रजाती आहेत परंतु या प्रजाती खंड्या चे वेगवेगळे रूप दर्शवतात. जरी खंड्या सर्वत्र पाहायला मिळत असला तरी तो दुर्मिळ पक्षां पैकीच एक आहे. त्याचं मन मोहित करणारं रूप त्याला दुर्मिळ बनवतं. आज-काल खंडाच्या बऱ्याच प्रजाती देखील नाहीशा होत चालल्या आहेत.
खंड्या पक्षाच आयुष्यमान जवळपास दहा वर्षे इतक असतं. खंड्या या पक्षाचे शास्त्रीय नाव ॲलसिडो थिस आहे. वेगवेगळ्या प्रकाराची रंग विविधता, आकार विविधता, लांब चोच, मांसाहारी अशी खंड्या पक्षाची वैशिष्ट्य आहेत. खंड्या पक्षाचा जन्म म्हणजे निसर्गाचं दुसरं बहरलेलं रूपच आहे.
आम्ही दिलेल्या essay on kingfisher in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर किंगफिशर (खंड्या) पक्षावर मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short essay on kingfisher in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kingfisher ESSAY in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on kingfisher bird in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट