माझा आवडता प्राणी ससा निबंध Essay on My Favourite Animal Rabbit in Marathi

Essay on My Favourite Animal Rabbit in Marathi माझा आवडता प्राणी ससा निबंध ससा म्हटलं तर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते सुंदर, गोंडस, शुभ्र रंगाचा ससा. लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच परिचयाची आहे. ससा हा प्राणी सगळ्यांनाच आवडतो. ससा हा दिसायला अतिशय सुंदर, गोंडस, नाजूक, पांढर्‍या शुभ्र रंगाचा असतो. सस्याची शरीर रचना सांगायची झाली तर ससा हा छोटासा, लहान, सुंदर व दोन मोठे कान व पाठीमागे छोटी, गोंडस शेपटी ‌असणारा प्राणी आहे. सस्याच्या तोंडात समोर दोन व खालच्या भागाला दोन असे धारदार दोन मोठ्या दातांच्या जोड्या असतात.

सस्यांचे देखील दोन प्रकार पडतात. एक रानटी ससा आणि एक पाळीव ससा. पाळीव ससा हा बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतो. परंतु रानटी ससा फक्त जंगलातच पहायला मिळतो. कारण रानटी ससा आकाराने मोठे असतात आणि त्यांना घरी ठेवणं किंवा त्यांचं पालनपोषण करणे अतिशय अवघड असतं. रानटी ससा मुख्यता रानातले कोवळे गवत खातो, तसेच शेतातील भाज्या किंवा गाजर असे वनस्पती खातात.

essay on my favourite animal rabbit in marathi
essay on my favourite animal rabbit in marathi

माझा आवडता प्राणी ससा निबंध – Essay on My Favourite Animal Rabbit in Marathi

Essay on Rabbit in Marathi

सस्याचं  मनमोहक रुप सर्वांनाच आवडत. त्यामुळे बरेच जण ससा घरांमध्ये पाळीव प्राण्या सारख पाळतात. पाळीव ससा हा वेगळा असतो. ससा हा सस्तन प्राणी आहे. सस्याच्या अनेक जाती आहेत त्यामध्ये रानटी ससे आणि पाळीव ससे वेगळी येतात. पाळीव मध्ये देखील अनेक प्रकारचे ससे पाहायला मिळतात सस्यांच्या अशा विशेष प्रजाती आहेत ज्या आपण घरी पाळू शकतो.

मादी ससा एका वेळेस साधारण दहा ते बारा पिल्लांना जन्म देते. मादी सशांच्या गर्भावस्थेचा कालावधी ३० ते ३२ दिवसांचा असतो. जन्माला येताच ससे डोळे उघडत नाहीत. मुख्यतः ससे तीन रंगाचे आढळतात पांढरा रंगाचा ससा, काळ्या रंगाचा ससा आणि पिवळट तपकिरी रंगाचा ससा. ससा हा अतिशय चपळ आणि वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो.

बहुतांश वेळी आपल्याला पांढऱ्या रंगाचे ससे पाहायला मिळतात कारण की त्या सर्वांचा शुभ्र पांढरा रंग सगळ्यांनाच आकर्षित करतो. सशांचे डोळे लाल असतात. मुख्यता आपण सशांना गाजर गवत खाताना बघितलं असेल परंतु सशाला कांदा मुळा लसुन गाजर गवत खाण्यास देऊ नये. ससा हा एक भित्रा प्राणी आहे.

ससा वेगवान प्राणी असल्यामुळे तो फार वेगाने धावतो जवळपास ३५ ते ४० मीटर प्रतिमिनिट वेगाने ससा धाऊ शकतो. ससा फार वेगाने उड्या मारत पळतो. सस्याच्या अनेक प्रजाती आढळतात संपूर्ण विश्वभरा मध्ये सस्यांच्या ३०५ प्रजाती आहेत. या ३०५ प्रजाती मधील सस्यांची सर्वात मोठी प्रजाती म्हणजे जर्मन जायंट होय. आणि या तीनशे पाच प्रजाती मधील नेदरलांड द्वाफ ही सर्वात लहान प्रजाती आहे. मादी ससा जेव्हा पिल्ला जन्म देते तेव्हा त्यांची जन्म देण्याची पद्धत थोडी वेगळी असते.

सुरुवातीला मादी ससा आधी एक बीळ बनवते आणि त्यामध्ये आपली केस आणि पालापाचोळा गोळा करून आपल्या पिलांसाठी उबदार वातावरण तयार करते. ससे जन्माला येतात तेव्हा त्यांच्या अंगावर केस नसतात परंतु हफत्या भराच्या कालावधीमध्ये त्यांच्या अंगावर केस येण्यास सुरुवात होते. की सुरुवातीचे काही दिवस पिल्ले डोळे देखील उघडत नाहीत.

सशाचे मोठे कान बऱ्याचदा सर्वांना आकर्षित करतात सशाचे कान साधारण तीन ते चार इंचाचे असतात. सश्याला २८ दात असतात. सशाचे हे दात आयुष्यभर सतत वाढतच राहतात. सशांचे खास वैशिष्ट सांगायचं झालं तर ससे आपल्या दोन्ही डोळ्यांनी ३६० डिग्री पर्यंत पाहू शकतात. म्हणजेच ससा आपले डोकं न हलवता चारही बाजूला पाहू शकतो. आणि त्यांचे डोळे इतकी तीक्ष्ण असतात कि सशांना चारही बाजूंच दिसू शकतं. म्हणूनच सशांची शिकार करणे अवघड जातं.

सस्यांच्या मिशा त्यांच्या रुंदी एवढ्या असतात त्यावरून त्यांना समजते की ते एखाद्या बिळात शिरू शकतात की नाही. सशांचे डोळे हे अतिशय तीक्ष्ण असतात. सस्यांची नजर चांगली असते सशांची वास घेण्याची क्षमता चांगली असते सशांची ऐकण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे ससे त्यांच्या शिकाऱ्यांना लगेच ओळखू शकतात.

ससा हा एक आळशी प्राणी म्हणून देखील ओळखला जातो. ससा दिवसात जवळपास आठ वेळा झोपतो. ससाचे आयुष्यमान कमी असते ते जवळपास दहा ते बारा वर्षे जगू शकतात. ससे पालन हा एक अतिशय उत्तम व्यवसाय आहे. इतर देशांमध्ये सशाचे मासं देखील खाल्ले जाते सस्याचे मासं हे अतिशय चविष्ट व मऊ असते म्हणून त्याला फार मोठी मागणी असते.

ससा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा प्राणी आहे त्याच मुख्य कारण म्हणजे त्याचा शुभ्र पांढरा रंग. ससा आणि कासवाची शर्यत ही गोष्ट तर संपूर्ण विश्वामध्ये परिचयाची आहे. बरेच लोक अतिशय आवडीने घरामध्ये ससा पाळतात. ससा हा अतिशय संवेदनशील प्राणी आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच धोक्याची जाणीव होते. सशाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची मऊ कातडी.

ससे हे सस्तन प्राण्यांच्या वर्गामध्ये येतात. पाळीव सशांच्या पाच प्रजाती आहेत. तर जंगली सशांच्या तेरा प्रजाती आहेत. त्यामध्येही अनेक प्रकारचे विविध ससे आढळतात. बरेच लोक ससे आवडीने घरी पाळतात याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे मऊ, ऊबदार अगं, त्यांचा शुभ रंग आणि ससे हे चपळ असल्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणे अतिशय सोपं असतं.

तसेच ससे हे माणसांशी लगेचच चांगले संबंध तयार करतात त्यांना  व्यायाम करायला देखिल आवडतो जर आपल्याला ससा घरी पाळायचा असेल तर त्याची भरपूर काळजी घ्यावी लागेल. त्याला योग्य तो आहार द्यावा लागेल सस्यांना व्यायाम करायला देखील आवडतात त्यामुळे त्यांच्या आसपास लहान मुलांची खेळणी ठेवणे गरजेचे आहे.

सस्याला पिंजऱ्यामध्ये बंद ‌ठेवू नये. पाळीव ससे घरातील ताजे गाजर व ताज्या हिरव्या भाज्या खातात. सस्याची श्रवणशक्ती चांगली असते त्यामुळे सस्याला शिकारऱ्याची चाहूल लागताच शिकाऱ्याला भूल देण्यासाठी ते झिगझाॅग पद्धतीने धावतात. अर्थातच ससे फार चपळ असतात. सशांना चार पाय असतात ज्यामध्ये त्यांचे मागील दोन पाय त्यांच्या पुढच्या दोन पायां पेक्षा जास्त मजबूत व मोठे असतात.

ससे स्वतःचे रक्षण करण्यासाठी बिळात जाऊन लपतात. सशाला घेऊन समाजामध्ये बरेच समज-गैरसमज आहेत काही लोक सशामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते म्हणून पाळतात तर काही लोक मनोरंजनासाठी ससे पाळतात तर काही लोक सशांन पासून मास उत्पादन होण्यासाठी ससे पाळतात. सस्याचे वैज्ञानिक नाव ओरीकटोलॅगस क्युनिक्युलस असे आहे.

सस्या ची लांबी ५० सेंटिमीटर ते १२९ सेंटीमीटर इतकी असू शकते. सस्याचे वेगवेगळ्या प्रजाती आणि वेगवेगळे प्रकार आहेत त्यावरून सस्याचे वजन हे दोन किलो पासून ते २२ किलो पर्यंत असू शकत. ससा जंगलामध्ये आठ ते दहा वर्ष जगू शकतो तर पाळीव ससा १५ ते १८ वर्ष जगतात. सशांच्या वेगवेगळ्या प्रजाती असल्यामुळे वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ससे पाहायला मिळतात.

लहान प्रजातींचे ससे सात ते आठ इंच इतकी असतात. तर मोठ्या प्रजातींचे ससे १९ ते २० इंच इतकी असतात. ससा जास्तीत जास्त तीन मीटर लांब उडी मारू शकतो. ससा हा शाहकारी प्राणी असल्यामुळे ससा मास खात नाही सशांच्या आहारामध्ये गवत, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राऊट, फळे, बियाणे, मुळे इत्यादींचा समावेश असतो.

ससा हा प्राणी सर्वत्र जगभर आढळतो परंतु मूळचे ससा हा युरोप आणि आफ्रिकेतला प्राणी आहे. जंगली ससे हे साधारणतः जंगल, कुरण, वाळवंट प्रदेश, गवताळ भाग आणि तुंद्रा व आंध्र प्रदेशात आढळू शकतात. समाजामध्ये सस्यां वरून बऱ्येच समज आहेत. ससा स्वप्नात दिसणे ही एक शुभ व अशुभ गोष्ट मानली जाते असा देखील समज आहे.

आपण स्वप्नांमध्ये कोणत्या रंगाचा ससा पाहतोय व कोणत्या स्थितीमध्ये ससा पाहतोय या घटकांवर ससा स्वप्नात दिसणे हे शुभ आहे की अशुभ आहे हे ठरवलं जातं. जर पांढरा ससा स्वप्नात दिसत असेल तर ती एक शुभ घटना मानली जाते पांढरा ससा स्वप्नात दिसणे याचा अर्थ म्हणजे आपल्याला भरपूर यश प्राप्त होणार आहे.

जर स्वप्नामध्ये काळा ससा दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे आपल्याला यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. भरपूर परिश्रम घेऊन बऱ्याच अडचणींचा सामना करून भरपूर मेहनत घेऊनच आपल्याला यश प्राप्त होईल. तर आपल्या स्वप्नामध्ये ससा मरताना दिसत असेल तर ते स्वप्न हे सूचित करतो की आपल्या आयुष्यात आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागेल आणि बऱ्याच संकटांचा सामना केल्यावर आपले सर्व संकट दूर होतील.

ससा स्वप्नात दिसणे हे ज्योतिष शास्त्राप्रमाणे शुभ किंवा अशुभ मानलं जातं ससा आपल्या स्वप्नांमध्ये कोणत्या अवस्थेत आहे या अवस्थेवरून ससा स्वप्नात येणे हे शुभ आहे की अशुभ आहे  हे ठरत. सशांचे मासे सर्वात चविष्ट असत. म्हणूनच ससे पालन हा व्यवसाय प्रामुख्याने बऱ्याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालवला जातो.

सशाच्या हालचालीवर जर आपण बराच वेळ बरेच दिवस लक्ष ठेवलं तर ससा आपल्यावर हल्ला देखील करू शकतो. फ्लेमिष जियंट हा जगातील सर्वात लांब ससा आहे. वर्ल्ड रेकॉर्ड नुसार ससा १२९ सेंटिमीटर लांब असतो आणि त्याचे वजन एकवीस ते २२ किलो इतक असू शकत.

आम्ही दिलेल्या essay on my favourite animal rabbit in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता प्राणी ससा निबंध short essay on my favourite animal rabbit in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on rabbit in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay in marathi on rabbit माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये short essay on rabbit in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!