माझी आवडती कला चित्रकला निबंध Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi

Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi माझी आवडती कला चित्रकला निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद किंवा कशाचे तरी वेढ हे असतेच आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कामासोबत आपला कोणतातरी छंद जोपासण्याचा प्रयत्न करतच असते तसेच माझा देखील एक आवडता छंद आहे आणि हा माझा आवडता छंद बहुतेक लोकांचा आवडता असतो आणि तो म्हणजे चित्रकला. चित्रकला करणे मला खूप आवडते कारण हे करताना आपले मनोरंजन होते तसेच यामध्ये आपले मन रमून जाते तसेच चित्रकलेमुळे आपल्या मनातून वेगवेगळ्या कल्पना निर्माण होतात.

Essay on my favourite hobby drawing in Marathi
Essay on my favourite hobby drawing in Marathi

माझी आवडती कला चित्रकला निबंध – Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi

My Favorite Hobby Drawing Essay in Marathi

चित्रकलेची आवड मला मी लहान असल्यापासूनच होती आणि हि आवड ओळखून मला माझ्या बाबांनी चित्रकला वही तसेच पेन्सिल, खोडरबर, स्केचपेन, रंगाचे खडू तसेच वॉटर कलर यासारखे समान आणून दिले होते आणि हे सर्व साहित्य मिळाल्या मुले मला चित्र काढण्याची उस्तुकता आणखीन वाढायची आणि मी लहान असताना वेगवेगळ्या प्रकारची फुले, फळे आणि कार्टूनचे चित्र काढत होतो आणि बाबांच्या सांगण्यावरून त्यांना योग्य तो रंग देत होतो.

त्यामुळे माझा छंद हि जोपासला जायचा आणि त्यातून मला काहीतरी शिकता देखील यायचे तसेच मी लहान असताना ज्यावेळी पहिल्यांदा सध्या पेन्सिलने चित्र काढले होते त्यावेळी ते खूप छान आले होते आणि त्यामुळे मला खूप चांगले वाटले होते आणि त्यामुळे माझा अत्विश्वास वाढला आणि मग मी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढायला सुरुवात केले.

ज्या वेळी मी लहान असताना पहिल्यांदा जी चित्रे काढली ती पेन्सिलने काढलेली चित्रे होती कारण माझ्याकडे तसे चित्रकलेचे कोणतेच साहित्य नव्हते ज्यावेळी बाबांनी माझी चित्रकलेची वही बघितली त्यावेळी बाबांना देखील माझी पेन्सिलने काढलेली चित्र आवडली आणि त्यामुळे त्यांनी मला चीत्रकलचे साहित्य आणून दिले. ज्यावेळी माझ्याकडे रंग आले त्यावेळी मी चित्रामध्ये रंग भरू लागलो आणि काही चित्रामध्ये काही तरी वेगळेपणा करू लागलो आणि त्यामुळे मला चित्रकलेची आणखीन आवड निर्माण झाली.

ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी आमच्या शाळेमध्ये इयत्ता सहावी पासून चित्रकलेचे तास घेण्यास देखील सुरुवात झाली आणि चित्रकला शिकवण्यासाठी एक सर आले आणि ते आमचा रोज एक तास चित्रकलेचा तास घेत होते. आमचे सर चित्रकला खूप छान काढायचे आणि ते काही मिनिटामध्ये चित्र पूर्ण करायचे आणि अगदी उत्तम चित्र काढायचे.

मला देखील चित्रकलेमध्ये काहीतरी करता येईल असे वाटू लागले आणि त्याच्याकडून मला चांगली प्रेरणा मिळाली. मला चित्रकलेची आवड असल्यामुळे त्यांनी दिलेले चित्र मी चांगलेच काढत होते आणि सर माझे चित्र पाहून माझे कौतुक करत होते आणि माझ्यासाठी आनंदाची बाब म्हणजे आमच्या वर्गामध्ये मलाच चांगले चित्र काढता येत होते आणि त्यामुळे मी चित्रकला शिकवणाऱ्या सरांचा आवडता विद्यार्थी होतो माझी चित्र काढण्याची कला चांगली असल्यामुळे मला ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देखील करत होते.

तसेच मी चित्रकलेचा क्लास त्याच सरांच्या कडे लावला आणि वेगवेगळ्या प्रकारची चित्रे कशी काढ्याची ते शिकलो. सध्या मी अनेक प्रकारची चित्रे काढू शकतो जसे कि निसर्ग चित्र, स्मरण चित्र, आकृती चित्र किंवा भूमिती चित्र, वस्तू चित्र, रेखा चित्र या प्रकारची वेगवेगळी चित्रे काढतो आणि मला निसर्ग चित्र आणि रेखा चित्र काढण्यास खूप आवडतात आणि माझ्या निसर्ग चित्राचे तर सर्वजन खूप कौतुक करतात आणि सर्वांना माझे निसर्ग चित्र खूप आवडते.

मला चित्रकला लहानपणी पासून खूप आवडत असल्यमुळे मी चित्रकलेच्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि त्यामध्ये माझा नंबर देखील यायचा आणि या स्पर्धेंमध्ये मिळालेले प्रमाणपत्रे तसेच मेडल हि मी माझ्या घरामध्ये संग्रहित करू ठेवले आहे आणि मी अजूनही चित्रकलेच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतो पण सध्या जगामध्ये स्पर्धा खूप वाढली आहे आणि माझेसारखे अनेक चित्राची आवड असणारे कलाकार आहेत जे एकदम सुंदर चित्र काढतात. 

मी जरी माझ्या या छंदाला करियर म्हणून पहिले नसले तरी मी आजही हा छंद जोपासतो कारण मला ते आवडते. मी माझ्या सध्याच्या रोजच्या कामाचा कंटाळा घालवण्यासाठी चित्र काढतो ती रंगवतो त्यामुळे माझे मन अगदी प्रसन्न होवून जाते. तसेच मी लहानपणी पासून काढून ठेवलेली चित्रे संग्रहित करून ठेवली आहेत कारण त्यामध्ये माझ्या काही आनंदायी आठवणी आहेत.

तसेच काही अशी चित्रे देखील आहेत ज्यामुळे माझे लोकांनी खूप कोडकौतुक केले अशी चित्रे मी फ्रेम करून माझ्या रूम मध्ये लावली आहेत तसेच घराच्या हॉल मध्ये देखील लावली आहेत आणि त्या चित्रांच्याकडे पहिले कि माझ्या अनेक आठवणी ताज्या होतात.

चित्रकला हा छंद मला सुखदायी अनाद देतो तसेच मी कधी चित्र काढण्यासा बसले तर मला माझ्या सर्व दुखांचा तसेच माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणींचा तसेच समस्यांचा मला विसर पडतो आणि मी चित्र काढण्यात रमून जातो तसेच माझ्या घरातील सर्व व्यक्ती देखील मला चित्र काढण्यास प्रोत्साहित करतात आणि मी काढलेल्या चित्राचे कौतुक देखील करतात आणि ते असे नेहमीच करत आले आहेत आणि त्यामुळे नेहमीच मला चित्र काढण्यास उत्साह मिळाला आहे.

कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्या घरातील लोकांची साथ असणे खूप गरजेचे असते कारण त्यामुळेच आपण काही तरी करू शकतो आणि अश्याप्रकारे माझ्या कलागुणांना माझ्या घरामध्ये वाव मिळाला. माझ्यासाठी एक आवडता क्षण म्हणजे मी १२ वी मध्ये असताना जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये मी माझ्या आवडीचे आणि मी काढलेले सर्वांना आवडणारे निसर्ग चित्र काढले होते.

आणि हे चित्र स्पर्धेमधील एक उत्तम चित्र होते आणि आमच्या चित्रकलेच्या स्पर्धेचे परीक्षक हे जिल्ह्यातील प्रसिध्द चित्रकार होते आणि त्यांनी माझ्या चित्राचे खूप कौतुक केले होते आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटला होता आणि हा माझ्या आयुष्यातील एक आनंदाच्या क्षणांपैकी एक होता. अश्या प्रकारे मी माझ्या चित्रकलेसाठी असणारी आवड जोपासली.  

आम्ही दिलेल्या Essay on my favourite hobby drawing in Marathiमाहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझी आवडती कला चित्रकला निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favorite hobby drawing essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!