Essay on Rashtriya Ekatmata in Marathi – National Unity Essay in Marathi राष्ट्रीय एकता निबंध राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज निबंध राष्ट्रीय एकता हा एक महत्वाचा भाग आहे आणि भारत हा देश राष्ट्रीय एकतेचे उत्तम उदाहरण आहे कारण भारता देश हा विविधतेच्या एकतेने बांधला आहे म्हणजेच भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगेवगळी भाषा बोलणारे, वेगवेगळी संस्कृती असणारे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या परंपरा जपणारे लोक भारतामध्ये राहतात. जर वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक जर एकाच देशामध्ये रहात असतील तर त्यांच्यामध्ये अनेक मतभेद होण्याची शक्यता असते कारण त्यांची भाषा, त्यांची जात, त्यांच्या परंपरा ह्या खूप वेगळ्या असतात आणि ते आपल्या परंपरे प्रमाणे वागत असतील, तर त्यामध्ये आपल्या देशाची आणि मग कोणत्याही राष्ट्राची राष्ट्रीय एक्तामता दिसत नाही.
कारण ते वेगवेगळ्या प्रकारे आपले विचार मांडत असतात, आपल्या परंपरेनुसार सर्व सण व कार्यक्रम करत असतात तसेच अनेक वेळी आपल्याला पाहायला मिळते कि जात आणि धर्म याच्यावरून अनेक दंगली होतात. पण जर आपल्या देशामध्ये सगळ्याच बाजूने चांगली राष्ट्रीय एकता असेल तर आपल्या देशावर कोणीही हल्ला करून शकणार नाही किंवा या गोष्टींचा दुरुपयोग करून घेणारा नाही.
पण जर आपल्या देशामध्ये अनेक गोष्टींच्यासाठी वाद चालले असतील तर ते आपल्या देशासाठी धोक्याचे ठरू शकते म्हणजेच इतर देश त्याचा इतर देश त्याचा फायदा घेवू शकतात. जर भारतामध्ये राष्ट्रीय ऐक्य नसेल तर आणि भारतामध्ये सतत जातीवरून, धर्मावरून, तसेच प्रादेशिक वाद यावरून देशामध्ये भांडण होत असेल तर त्याचा फायदा इतर देश घेवू शकतात.
राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज निबंध – Essay on Rashtriya Ekatmata in Marathi
राष्ट्रीय एकात्मता निबंध – national unity essay in marathi
भारतामध्ये ज्यावेळी राष्ट्रीय ऐक्य नव्हते त्यावेळी ब्रिटीश, फ्रेंच, मुघल, पौर्तुगीज या लोकांनी येवून आपल्या देशावर राज्य केले आणि आपल्या देशातील लोकांच्यावर अत्त्याचार केला तसेच लोकांना त्रास दिला पण अनेक क्रांतीकारक, नेते आपल्यादेशासाठी खूप झटले आणि काहींनी तर आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मग आपला देश पूर्णपणे स्वतंत्र्य झाला आणि मग देशामध्ये लोक स्वतंत्र्यपणे जगू शकले आणि आजपर्यंत भारतातील लोक एकतेने आणि अगदी आनंदाने भारतामध्ये राहतात.
भारतामध्ये विविध धर्म, विवध जाती, विविध भाषा, विविध सण हि विविध जाती, धर्म भाषा हि एकता आहे तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सन अनेक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येवून साजरा करतात. तसेच आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय चलन, राष्ट्रीय गीत यामध्ये आपल्या राष्ट्रीय एकात्मता पाहायला मिळते.
जर आपल्या देशामध्ये अनेक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता असेल तर शत्रू आपल्या देशावर वाईट नजरेने पाहणार नाहीत किंवा आपल्या देशावर आक्रमण करणार नाहीत आणि एक महत्वाचा फायदा आपल्याला राष्ट्रीय एकात्मता असल्यामुळे पाहायला मिळतो. तसेच जर देशामध्ये राष्ट्रीय एकता असेल तर आपण देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम अगदी सहजपणे पूर्ण करू शकतो.
तसेच राष्ट्रीय एकता असल्यामुळे राष्ट्र देखील सुरक्षित आणि शांत राहील. तसेच देश हा एकजुटीने बांधला असेल तर आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करण्यास वाव मिळेल तसेच उद्योग, व्यवसाय आणि विज्ञान क्षेत्रामध्ये देखील आपण चांगली प्रगती करू शकू. तसेच भारतातील राजकीय नेत्यांनी न भांडता किंवा कोणताही वादाचा विषय न घेता जर समंजस पणे सर्व राजकीय प्रश्न सोडवले तर त्यातून खूप मोठी राजकीय एकता दिसेल.
अश्या वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रीय एकता आपण जपू शकतो आणि जगाला राष्ट्रीय एकतेचे उत्तम उदाहरण देऊ शकतो. जर आपल्या जगासमोर राष्ट्रीय एकतेचे उत्तम उदाहरण व्हायचे असल्यास आपण देशातील जातीय वाद प्रथम नष्ट केला पाहिजे आणि ‘भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून भारतामध्ये सर्व जातीच्या लोकांनी अगदी एकीने राहिले पाहिजे. तसेच भारतातील भाषावाद संपवला पाहिजे, लोकांच्या मनातील प्रादेशिक वादाच्या भावना नष्ट झाल्या पाहिजेत अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण राष्ट्रीय एकता जपू शकतो.
परंतु आज पुन्हा भारतामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी वाद होत आहेत जसे किं काश्मीर प्रादेशिक वाद आणि म्हणजेच दहशतवादी म्हणतात कि काश्मीर हा भाग आमचा आहे आणि दहशत वाद्यांनी काश्मीर मधील काही लोकांचे कान भरले आहेत आणि तेथील लोक देखील असे म्हणतात आणि याचाच फायदा घेवून दहशत वाद्यांनी काश्मीर भारतापासून वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतातील काही नेत्यांच्यामुळे काश्मीर भारतापासून वेगळे होण्यापासून वाचले आहे.
तसेच सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जातीय आणि धार्मिक वाद देखील होत आहेत आणि वेगवेगळ्या धर्मातील लोक एकमेकांना मारण्यास उठले आहेत. पण जर आम्ही असे करत बसलो तर लोक त्याचा फायदा घेतील त्यामुळे इतर लोक त्याचा फायदा घेऊन आपल्या देशावर कब्जा करतील आणि राज्य करतील आणि पुन्हा आपल्या देशाला गुलामगिरीमध्ये जगावे लागेल आणि म्हणून भारतातील सर्व धर्माच्या लोकांनी आपले वाद बाजूला ठेवून एकत्र राहून जगाला आपली राष्ट्रीय एक्तामाता दाखवली पाहिजे.
भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यांना आपण भारतीय सेवांचे संरक्षक संत किंवा भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते तसेच हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. ज्यावेळी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगीरीतून स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे उपपंतप्रधान बनले.
ब्रिटिशांनी ज्यावेळी भारत सोडला त्यावेळी ५६५ संस्थान भारताच्या संघराज्यामध्ये नव्हती त्यावेळी वल्लभभाई पटेल यांनी लष्करी पराक्रम वापरून ती संस्थान भारतीय संघराज्याशी जोडण्याचे मोलाचे कार्य केले आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ३१ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकता दिवस हा भारतामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि शाळेमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम असतात तसेच शाळेमध्ये राष्ट्रीय एकतचे महत्व पटवून दिले जाते तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य कार्याबद्दल माहिती दिली जाते.
राष्ट्रीय एकता हि कोणत्याही देशाचा महत्वाचा भाग आहे आणि राष्ट्रीय एकतेला पाया मानले जाते तसेच राष्ट्रीय एकता हि कोणत्याही देशाचा अभिमान असतो आणि म्हणून आपण देशामध्ये राष्ट्रीय एकता टिकवले खूप गरजेचे असते.
आम्ही दिलेल्या essay on rashtriya ekatmata in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rashtriya ekatmata essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi language rashtriya ekatmata essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rashtriya ekatmata essay in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट