Maza Desh Nibandh in Marathi माझा देश महान “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा” हो खरोखरच, या जगात माझा भारत देशच सर्वात सुंदर आणि वेगळा आहे. कारण माझ्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. इथे विविधतेत एकता आहे. नमस्कार मित्रहो आजच्या या लेखात आपण माझा देश म्हणजेच आपल्या भारत देशावर निबंध पाहणार आहोत. हा निबंध आपण विविध इयत्ते करिता तसेच स्पर्धापरीक्षा व भाषणे यामध्ये देखील याचा वापर करू शकतो. याचा वापर करून आपण परीक्षेमध्ये छान गुण मिळवू शकता.
भारत माझा देश मराठी निबंध – Maza Desh Nibandh in Marathi
वेगवेगळी माती जरी ही
एकच आहे भूमी |
हिंदू- मुस्लिम अशीख ईसाई
सारे एकच आम्ही ।
या ओळींप्रमाणेच माझ्या देशाल सर्व जाती-धर्मांचे, वेगवेगळ्या परंपरा, संस्कृती जपणारे, वेगवेगळी भाषा बोलणारे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र नांदतात. भारत माझा देश आहे असे जेव्हा आपण अभिमानाने बोलतो तेव्हा आपली छाती कशी गर्वाने फुलते.
- नक्की वाचा: माझी आजी निबंध मराठी
भारताची संस्कृती ही अन्य देशांच्या तुलनेत वेगळी आहे. भारताला अनेक महापुरुषांचा, संतांचा सहवास लाभला आहे. इथेच अनेक महान शास्त्रज्ञ कलावंत, खगोलशास्त्रज्ञ, नेत्यांचा वीरांचा जन्म झाला आहे. त्यांनी भारतीयांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. संतांनी पवित्र असे विचार, भारतीयांना दिले आहेत.
भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील जवळजवळ ८०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतीत प्रामुख्याने तांदूळ, ऊस, गहू, ज्वारी, बाजरी इ. पीके घेतली जातात. भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळी पीके तेथील हवामानानुसार पीकवली जातात.
- नक्की वाचा: भारतीय शेतकरी निबंध
भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताच्या उत्तरेला उत्तुंग असा हिमालय पर्वत पसरला आहे. दक्षिण दिशेला हिंदी महासागर, पश्चिम दिशेला अरबी समुद्र, आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर लाभला आहे. भारताच्या प्रत्येक राज्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला भारतातच गोकु कडवणारी थंडी आणि अनुभवायला धामाधुम करायला लावणारी ठिकाण मिळते आहेत.
आग्रातील आश्चर्य असणारा ताजमहालही भारतातच आहे. काश्मिरला भारताचे शीर (भारताचे नंदनवन) आणि कन्याकुमारीला भारताचे पाय समजले जाते. जर आपण काश्मिर ते कन्या कुमारी असा प्रवास केला तर तेथे आपल्याला भाषा, पोशाख अगरी 13 खाद्यसंस्कृतीतही विविधता आढळते. भारत हा एकमेव असा देश आहे जेथे खाद्य पदार्थाची एवढी विविधता आहे.
- नक्की वाचा: आवडता सण दिवाळी निबंध
तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, त्यात वर केशरी मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. तर पांढऱ्या रंगामध्ये चोवीस आऱ्या असलेले अशोक चक्र आहे. भारत देश हा अनेक वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात होता. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताला संविधान लागू झाले आहे. म्हणून १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतातील प्राणी, पक्षी, फळे फुले, हवामान या सगळ्या बाबतीत विविधता आहे. भारताचा वाघ हा राष्ट्रीय प्राणी, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आणि कमल हे राष्ट्रीय फूल आहे, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, रुपया हे भारताचे चलन आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. भारतात गंगा ही एक पवित्र नदी मानली जाते. गंगा, यमुना, सतलज था नदयांनी भारताची भूमी सुजलाम ‘सुफलाम’ केली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहेत, तर भौगोलिक दृष्ट्या जगात सातवा क्रमांक आहे.
भारत माझा देश कविता:
जहाँ डाल डाल पर
सोने की चिड़िया
करती है बसेरा
वह भारत देश हे मेरा
वह भारत देश हे मेरा
या ओळींप्रमाणेच भारत हा एक सुख संपन्न, धनवान, देश होता. पण ब्रिटिश पोर्तुगीज, इंग्रजांच्या आक्रमणां मुळे भारताला एक भारताची दैनीय अवस्था झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाले पूण त्यानंतर भारतात गरीबी, बेरोजगारी, प्रांतीयवाद, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार अशा मोठ्या समस्या उभ्या राहिल्या. या समस्या देशाच्या विकासाच्या आड येत आहेत.
- नक्की वाचा: माझी आई निबंध
आपण सर्वांनी मिळून या गोष्टी शेखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि विकसनशील देशांच्या यादीतून आपण विकसित देशांच्या यादीत आपले नाव आणले पाहिजे. म्हणून प्रत्येक नागरीकाने यासाठी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आणि भारताला एक पून्हा सोने की चिड़िया बनवले पाहिजे.
या शूमीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात भारताचे नाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाहिजे. जागतिक महामारी, पूर, भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, दुष्काळ, कोरोना (COVID – १९) यांसारख्या आपत्तीमध्येही भारताने माणुसकीच्या नात्याने सर्वानाच मदत केली आहे. भारत देशातरी विविधता असून देखील सर्वजण अशावेळी एकमेकांच्या. मदतीला धावून येतात. जर आपण असेच एकमेकांना सहाय्य करून निसर्गाचे जतन केले पर सिर्भ नियमांचे पालन केले, तर अशा आपत्ती उद्भवणार नाहीत.
अशा या सर्वधर्म समभाव असाणाया, विविधतेखील एकता जपणारया, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशात माझा जन्म झाला हे माझे भाग्य समजतो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिये अमुचा एक भारत देश महान।
भारत माता की जय !!!
आम्ही दिलेल्या maza desh nibandh marathi madhe माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “भारत माझा देश मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza desh nibandh in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza desh marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majha desh essay in marathi या लेखाचा वापर maza bharat desh nibandh in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Nice
प्रतिसादाबद्दल धन्यवाद