तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम निबंध Essay On Tobacco in Marathi

Essay On Tobacco in Marathi तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम निबंध मराठी असं म्हणतात आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मग आपण कितीही श्रीमंत पैसे वाले असलो आपल्याकडे कितीही सुख-सुविधा असल्या परंतु जर आपल्याकडे चांगलं आरोग्य नसेल तर पैशाची श्रीमंती काही कामाची नसते. आपलं शरीर आपली खरी संपत्ती आहे आणि आपल्या शरीराला योग्य ते वळण लावणे ही आपली जबाबदारी आहे. नियमित योग्य आहार घेणे, व्यवस्थित व्यायाम करणे, वेळेत झोपणे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही व्यसनापासून लांब राहणे अशी योग्य ती काळजी जर आपण घेतली तर आपलं आरोग्य आपले स्वास्थ्य उत्कृष्ट राहील.

परंतु आज समाजामध्ये असे बरेच लोक आहेत. जे व्यसनाच्या आहारी जाऊन आपले स्वास्थ्य बिघडवून घेत आहेत. तसं व्यसनं तर बर्‍याच प्रकारचे असतात त्यातील प्रामुख्याने लोकांना दारू व तंबाखूचे व्यसन असतं आता दारू व तंबाखू या दोन गोष्टी मजेसाठी कितीही चांगल्या वाटत असल्या तरी या गोष्टी कालांतराने आपल्या शरीरावर अगदी घातक परिणाम करतात.

essay on tobacco in marathi
essay on tobacco in marathi

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम निबंध मराठी – Essay On Tobacco in Marathi

तंबाखू मुक्त निबंध मराठी – Essay on Harmful Effects of Tobacco in Marathi

सवय ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा की माणसाला लागली की माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं कधी हे आयुष्य चांगल्यासाठी बदलतं तर कधी वाईटासाठी. जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर अर्थातच चांगली सवय माणसाला चांगलं आयुष्य देते परंतु आपल्या सवयी जर वाईट असतील तर आयुष्यामध्ये आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. असंच तंबाखूचं व्यसन करणे ही देखील वाईट सवय आहे.

आपल्याला सवय तेव्हा लागते जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने करतो जर आपण दररोज तंबाखूचं व्यसन केले तर कालांतराने त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच दिसून येतील. जाहिरातींच्या माध्यमातून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तंबाखूचं व्यसन करणे हे किती घातक आहे इतकंच कशाला तर तंबाखूच्या पुडी वर देखील दररोज तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो असं लिहिलेलं असतं परंतु जे तंबाखूच्या आहारी गेले आहेत. ते ही गोष्ट हलक्या घेतात.

व्यसन ही अतिशय वाईट गोष्ट आहे एकदा एखाद्याला नशेच व्यसन लागलं तर ते सुटता सुटत नाही. तंबाखू ही फार वाईट गोष्ट आहे. एकदा माणसाच्या जिभेला व शरीराला तंबाखू ची सवय लागली तर आयुष्याची बरबादी आहे. अनेक महान संतांनी देखील आपल्या अभंगाच्या किवा ग्रंथांच्या माध्यमातून कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असं बऱ्याच वेळा सांगितलं आहे.

कारण शरीर हे आपलं ऐवज आहे. आपल्या शरीराला मुठीत ठेवण्याचं काम आपलं हृदय करतं त्यामुळे आपला आपल्या हृदयावर ताबा असेल तर आपण कोणतीही गोष्ट अगदी मनापासून आपल्यापासून लांब करू शकतो. असेच व्यसनाच देखील आहे जेव्हा तंबाखू खाण्याची सवय लागते तेव्हा जरी आपला मेंदू आपल्याला कितीही सतर्क करीत असला तरी आपलं मन आपल्याला व्यसनापासून लांब ठेवत नाही. म्हणूनच आपल्या अंतर इंद्रियांवर ताबा असणे अतिशय गरजेचं असतं.

प्रत्येक तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम माहीत असतात परंतू त्या व्यक्तीचं मन त्याला स्वस्थ बसून देत नाही आणि माणूस कोणताही पुढचा मागचा विचार न करता तंबाखूच सेवन करत रहातो. तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे इतकंच कशाला तर तंबाखूच्या पाकिटावर देखील लिहलेल असतं परंतु तंबाखू खाल्याने फक्त कर्करोगच होत नाही तर अजून बरेच वेगवेगळे विकार होतात.

भारतातील बहुतांश लोक तंबाखू गुटका या सगळ्या वाईट गोष्टींचे व्यसन करतात. तंबाखू माणसाला हळूहळू मारते. तंबाखूमुळे कर्करोगाचा अतिशय धोका असतो. ज्या माणसांना श्वास लागणे, मधुमेह, हृदय रोग असे विकार आहेत त्यांनी तंबाखूचं व्यसन करणे अतिशय धोकादायक आहे तंबाखूच्या व्यसनामुळे व उत्पन्नामुळे बऱ्याच जणांना आपल्या आयुष्याशी खेळावं लागते जे लोक तंबाखूच्या शेतात काम करतात त्यांना बऱ्याच रोगांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना फुफ्फुसांशि‌ संबंधित आजार होतात.

त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि असेच काही लक्षणे तंबाखूचे‌ व्यसन करणाऱ्यांच्या शरीरात दिसून येतात. तंबाखूचा वापर व सेवन इतक वाढल आहे की प्रत्येक घरातील एक व्यक्ती तंबाखूचे सेवन करत असते आणि मोठ्यांच्या कडे बघूनच लहान देखील अशा नको त्या गोष्टी आत्मसात करायला शिकतात. आजकाल बरीच बारा सोळा वर्षाची मुले देखील तंबाखूचे सेवन करतात. 

Tobacco Essay in Marathi

जे तंबाखूच्या आहारी जातात त्यांना हि सवय एक तर वाईट संगती पासून लागलेली असते किंवा ती व्यक्ती स्वतःच मज्जा वाटते म्हणून अशा सवयी लावून घेतात. तंबाखूचे सेवन कालांतराने व्यक्तीला शारीरिक रित्या कमजोर बनवते. कधीकधी शिक्षित व्यक्ती देखील तंबाखूचे सेवन करतात. समाजामध्ये साक्षरता नसल्यामुळे बरेच लोक तंबाखूच्या आहारी जात आहेत. समाजामध्ये तंबाखू मुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती नागरिकांपर्यंत पोचवली तर कदाचित तंबाखू पासून काही लोकांच व्यसनमुक्ती होऊ शकते.

तंबाखू किंवा सिगरेटच्या पाकिटावर तंबाखूचे व्यसन करणं किती महागात पडू शकतं याची खबरदारी दिलेली असते परंतु तरीही बरेच लोक तंबाखू सिगरेट याचे व्यसन करतात. जर तंबाखूपासून अनेक लोकांचा जीव वाचवायचा असेल तर तंबाखूच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे. आणि सरकारने देखील तंबाखूमुळे होणारे देशाचं नुकसान देशातील लोकांचे नुकसान लक्षात घेऊन तंबाखू विकण्यास किंवा तंबाखूची आयात निर्यात करण्यास सक्त मनाई केली पाहिजे.

मद्यपान धूम्रपान किंवा तंबाखूचं व्यसन केल्याने हृदयाचे विकार होतात फुफ्फुसाचे विकार होतात रक्तदाबाचा त्रास सुरू होतो रक्तदाब अचानक वाढण्यास सुरुवात होते तर कधी छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे मेंदूचा विकार असे सगळे आजार तंबाखूचे सेवन केल्याने होतात. अर्थातच हे आजार काही लगेच होत नाही तर सातत्याने तंबाखूचे सेवन केल्यामुळे होतात. तंबाखूचे सेवन केल्यामुळे प्रामुख्याने कर्करोगाचा तर आजार होतो कर्करोगा मध्ये देखील तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसांचा व किडनीचा कर्करोग समाविष्ट आहे.

प्रत्येकाला आपलं कुटुंब जवळचं असतं प्रत्येकाच आपल्या कुटुंबावर जिवापड प्रेम असतं परंतु तंबाखूचे व्यसन करणारी व्यक्ती स्वताच्या शरीरासोबत आपल्या जवळच्या माणसांना देखील तितकाच त्रास देत असते तंबाखूचे व्यसन केल्यानं लहान मुलांसमोर देखील चुकीचे आदर्श तयार होतो.

शिवाय तंबाखूच्या सेवनामुळे वेगवेगळे आजार होतात आणि परिणामी मृत्यू देखील होऊ शकतो आणि यामध्ये आपण आपल्या जवळच्या पासून कायमचे दूर जाऊ शकतो आणि ह्याचा त्रास आपल्या घरच्यांना, कुटुंबीयांना, जवळच्यांना देखील तितकाच होऊ शकतो. तंबाखू किंवा इतर कोणत्याही नशेचं व्यसन करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि अशा घातक गोष्टींच व्यसन करणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतो आणि ही एक सवय असल्यामुळे ह्यापासुन आपली मुक्तता होणं थोडं कठीण आहे पण अशक्य नाही.

म्हणूनच यामध्ये सरकारची भूमिका देखील महत्त्वाची ठरू शकते सरकारने देखील अशा घातक गोष्टींच्या विक्रीवर सक्त मनाई घातली पाहिजे किंवा जे कोणी तंबाखू मद्यपान धूम्रपान यांच व्यसन करत असेल त्यांच्यावरती दंड बसवला पाहिजे. तंबाखू पासून व्यसन मुक्ती हवी असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आधी तर देवाने आपल्याला दिलेल्या सर्वात मोठा ऐवज म्हणजे आपलं शरीर याचे महत्त्व जाणून घेतलं पाहिजे.

आपल शरीर किती कामाच आहे आणि त्यामुळे आपल्याला व आपल्या परिसरातील लोकांना व समाजाला त्याचा किती फायदा आहे याचं महत्त्व जाणून घेतले पाहिजे. आज काही लोकांना हात नाही आहेत, काही लोकांना पाय नाही आहेत, काही लोकांना बोलता येत नाही‌ तर काहींना ऐकू येत नाही परंतु या सगळ्यांमध्ये आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे आणि एका बाजूला अशी लोक आहेत जी मध्यपान धूम्रपान तंबाखूचे व्यसन करून आपलं चांगलं सुदृढ शरीर स्वतःच्या हाताने वाट लावून घेतात.

देवाने आपल्याला चांगलं शरिर दिल असेल तर ते निरोगी ठेवणे देखील आपलंच काम आहे. असं म्हणतात आपण त्याच गोष्टी करतो ज्या आपण आपल्या डोळ्यांनी बघतो कानांनी ऐकतो अशाच प्रकारे जो व्यक्ती तंबाखू खात असेल त्याच्या आजूबाजूचे किंवा त्याची मुले देखील त्यांना बघून तंबाखू खायला सुरुवात करतील आणि ही गोष्ट कुठे ना कुठे एक सामाजिक पातळीवर देखील परिणाम करते.

कारण पूर्ण समाजाचा परिणाम एका व्यक्तीवर होऊ शकतो आणि एका व्यक्तीचा परिणाम पुर्ण समाजावर होऊ शकतो. तंबाखू किंवा कुठल्याही व्यसनापासून मुक्ती हवी असेल तर आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ध्येय ठेवा काही तरी स्वप्न ठेवा कारण जेव्हा आपलं स्वप्न मोठं असतं आणि आपल्यामध्ये ते पूर्ण करण्याची जिद्द असते तेव्हा आपल्या मध्ये आणि आपल्या स्वप्नामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट येऊ शकत नाही.

तंबाखू पासून मुक्ती मिळवण्याचे इतरही पर्याय आहेत डॉक्टर कडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या किंवा आपल्या खांद्यावर आपल्या घरच्यांची जबाबदारी आहे किंवा आपल्या समाजाची जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून तंबाखूपासून व्यसनमुक्ती होऊ शकते.

आम्ही दिलेल्या essay on tobacco in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on harmful effects of tobacco in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Tobacco Effects Essay In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tambaku che dushparinam marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!