निलगिरी झाडांची माहिती Eucalyptus Tree Information in Marathi

eucalyptus tree information in marathi – nilgiri tree information in marathi निलगिरी झाडांची माहिती, जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या आकाराची आणि औषधी झाडे आहेत आणि त्यामधील एक मोठ्या आकाराचे आणि औषधी गुणधर्म असणारे झाड म्हणजे निलीगिरीचे झाड आणि ह्या वेगाने वाढणाऱ्या सदाहरित झाडाविषयी खाली आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. ऑस्ट्रेलिया या देशातील मूळ असणारे निलगिरीचे झाड हे वेगाने वाढणारे झाड असून हे झाड १३० ते १६० मीटर उंच वाढू शकते आणि या झाडाला जगातील सर्वात उंच झाडांच्यापैकी एक मानले जाते.

या झाडाच्या औषधी गुणधर्मामुळे या झाडांची लागवड भारत, स्पेन, पोर्तुगाल, चीन, इजिप्त, दक्षिण अमेरिका, अल्जेरिया, उत्तर आफ्रिका या देशांच्यामध्ये केली जाते. निलीगिरी झाडाच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि ह्या मधील काही वृक्षासारखी मोठी आकाराची वाढतात तर काही शोभेच्या झुडुपासारखी वाढतात.

या मधील औषधी म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रकाराला अनेकदा ऑस्ट्रेलियन फिव्हर ट्री किंवा ब्लू गम म्हणून ओळखले जाते. या झाडाच्या पानांची लांबी हि ४ ते १२ इंच लांब असते आणि हि पाने हिरव्या रंगाची आणि चमकदार असतात. चला तर खाली आपण निलीगिरी विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.

eucalyptus tree information in marathi
eucalyptus tree information in marathi

निलगिरी झाडांची माहिती – Eucalyptus Tree Information in Marathi

झाडाचे नावनिलगिरीचे झाड
इंग्रजी नावEucalyptus
मूळऑस्ट्रेलिया
झाडांची लागवडभारत, स्पेन, पोर्तुगाल, चीन, इजिप्त, दक्षिण अमेरिका, अल्जेरिया, उत्तर आफ्रिका
झाडाचा वापरऔषधी वनस्पती आणि लाकूड

निलगिरी वनस्पतीचे मूळ आणि इतिहास – origion and history

ऑस्ट्रेलिया देशामध्ये प्राचीन काळापासून आदिवासी जमातींच्यामध्ये शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यासाठी म्हणजेच ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी, दमा या सारख्या अनेक आरोग्य समस्यांच्यावर उपाय म्हणून निलीगिरीचा वापर केला जात होता.

त्याचबरोबर १८०० च्या मध्यात जर्मन वनस्पती शास्त्रज्ञ आणि संशोधक जहांगीरदार फर्डीनांड फॉन मिलर यांनी वनस्पतीचे औषधी गुणधर्म जगासमोर आणले. १८६० मध्ये ऑस्ट्रेलियामधील व्हीक्टोरिया मध्ये निलगिरीचे व्यावसायिक उत्पादन सुरु झाले.

निलीगिरी विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • निलगिरीची झाडे हि जगामधील सर्वात जलद आणि उंच वाढणारी झाडे आहेत.
  • हवाई या देशामध्ये निलगिरीच्या झाडांची लागवड हि सुरुवातीला इंधनाचे स्तोत्र म्हणून केली जात होती तसेच वारा रोखण्यासाठी आणि धूप नियंत्रणासाठी केली जात होती.
  • पूर्वीच्या काळी या झाडांचा वापर त्यांच्या औषधी गुणांच्यासाठी केला जात होता त्याचबरोबर या झाडाचे लाकूड देखील अनेक उपयोगाच्यासाठी वापरले जात होतो.
  • निलीगिरी झाडाला फुले येतात परंतु त्या फुलांना पाकळ्या नसतात आणि संपूर्ण ब्लुममध्ये मध्यवर्ती शंकूसारख्या कळीमधून बाहेर पडणाऱ्या शेकडो पुंकेसरांची समावेश असतो.
  • या जातीच्या बहुतेक झाडांना गोलाकार देठ असतात आणि या झाडाचे दांडे हे चौरसाच्या जवळ असतात आणि या निलगिरीच्या झाडांचा देठ आणि फांद्या देखील आकर्षक दिसतात.
  • निलीगिरी झाडाचा वापर हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गुणधर्मासाठी केला जातो आणि या वनस्पतीचा वापर हा मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी केला जातो.
  • निलीगीरीचे झाड हे अतिशय वेगाने वाढणारे झाड आहे आणि या झाडाच्या ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रजाती आहेत.

निलगिरी वनस्पतीचा औषधी उपयोग – medical uses

जगभरामध्ये अनेक अश्या औषधी वनस्पती आहेत ज्याचा वापर हा अनेक औषधे बनवण्यासाठी तसेच अनेक आरोग्य समस्यांच्यावर उपचार करण्यासाठी केला जात होता आणि तसेच निलगिरी वनस्पती देखील एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.

आणि या वनस्पतीचा वापर हा प्राचीन काळामध्ये आयुर्वेदामध्ये अनेक आरोग्य समस्यांच्यावर उपचार करण्यासाठी केला जात होता आणि आज देखील या वनस्पतीचा वापर हा औषधी गुणधर्मांच्यासाठी केला जातो. खाली आपण निलगिरी वनस्पतीचे काही औषधी उपचार पाहणार आहोत.

  • खोकला आणि सर्दी हि सामान्य आरोग्य समस्या आहे हि समस्या अनेक आयुर्वेदिक उपचार करून कमी करता येते आणि तसेच खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी निलगिरीपासून अनेक औषधे बनवलेले आहेत त्यामुळे खोकला सर्दी कमी होण्यास मदत होते.
  • रक्तसंचय दूर करण्यासाठी नाक आणि छातीवर निलगिरीचे मलम वापरले जाते.
  • त्याचबरोबर बरेच लोक खोकल आणि फ्लू कमी करण्यासाठी निलगिरीचे बाजारामध्ये मिळणारे तेल पाण्यामध्ये २ ते ३ थेंब टाकले जाते आणि ते उकळून त्याची वाफ घेतली जाते त्यामुळे खोकला किंवा ताप कमी होण्यास मदत होते.
  • निलीगिरी हे दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले ठरू शकते आणि हे एक अॅन्टीसेप्टिक म्हणून वापरले जाते.
  • जर एखाद्या व्यक्तीला छातीमध्ये कफ होण्याचा त्रास होत असेल तर निलगिरीच्या वाफेमुळे छातीतील कफ देखील कमी होण्यास मदत होते.
  • निलीगिरी या वनस्पतीमध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे या वनस्पती पासून बनवलेल्या औषधांचा वापर हा दमा, मलेरिया आणि इतर अनेक मोठे रोग देखील कमी करण्यास देखील मदत करतात.
  • जर एकाद्या व्यक्तीला सांधीवातेचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी या पासून बनणाऱ्या तेलाचा वापर हा सांध्यांचा मसाज करण्यासाठी केला आणि नियमित मसाज केल्यामुळे सांधीवात या समस्येपासून आराम मिळतो.
  • निलीगिरी पासून बनवलेले मला हे जखमांच्यावर आणि फोड या समस्येवर उपयोगी ठरू शकते.
  • तसेच निलगिरीचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
  • लोकांच्या कडून अनेक कीटकनाशकांचा वापर हा शेतामध्ये होत असतो आणि निलगिरीचा वापर देखील कीटकनाशक बनवण्यासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या eucalyptus tree information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निलगिरी झाडांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nilgiri tree information in marathi या eucalyptus meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about eucalyptus tree in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये eucalyptus tree information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!