ईव्हीएम मशीन माहिती EVM Machine Information in Marathi

evm machine information in marathi ईव्हीएम मशीन माहिती, आज आपण या लेखामध्ये इव्हीएम (EVM) मशीन काय आहे आणि त्याचा उपयोग कश्यासाठी होतो या बद्दल संपूर्ण माहिती खाली आपण घेणार आहोत. इव्हीएमचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (electronic voting machine) असे आहे आणि याला मराठीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हटले जाते. भारत हा आपला देश लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये लोकांच्यामार्फत नेता निवडला जातो आणि हा नेता निवडण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात आणि ह्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या मार्फत घेतल्या जातात.

त्यामुळे मतदाराला मतदान करणे देखील सोपे जाते आणि मतदान मोजणी करण्यासाठी देखील सोपे पडते त्यामुळे या मशीनमुळे मतदान प्रक्रियेतील बराचसा वेळ हा वाचला जातो. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा शोध हा १९ व्या शतकाच्या शेवटी म्हणजेच या यंत्राचा शोध १९९० मध्ये लागला आहे आणि या मशीनचा विकास आणि चाचणी हि सर्व प्रथम इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ने केली होती.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र येण्या अगोदर मतदान प्रक्रिया हि कागदाच्या चिठ्ठीवर घेतली जाते होती आणि त्यामुळे अनेक गडबड व्हायचे तसेच मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडायचा त्यामुळे मशीनचा शोध लावण्यात आला त्यामुळे मतदान प्रक्रिया हि सुलभ आणि सोपी बनली. चला तर आता आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र या विषयी सविस्तर माहिती खाली घेवूया.

evm machine information in marathi
evm machine information in marathi

ईव्हीएम मशीन माहिती – EVM Machine Information in Marathi

इव्हीएम मशीन म्हणजे काय ?

इव्हीएम हे एक इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन आहे ज्याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (electronic voting machine) म्हणतात. या मशीनचा वापर हा वेगवेगळ्या निवडणुकींच्यासाठी एका योग्य नेत्याला मतदान करण्यासाठी केला जातो. हे एक मायक्रोकंट्रोलर आधारित साधन आहे जे निवडणूक प्रक्रियेचे अधुनीकरण करण्यासाठी शोधले आहे.

निवडणुकीमध्ये इव्हीएम मशीनचा वापर कसा केला जातो – evm machine demo in marathi

इव्हीएम मशीनमुळे निवडणूक प्रक्रिया हि खूप सुलभ आणि सोपी बनली आहे कारण आपण मतदानाच्या वेळी आपल्या आवडत्या नेत्याला एक बटण दाबून मतदान करू शकतो. आपण ज्या वेळी एका उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबतो त्यावेळी लाल दिवा चमकतो तसेच आपल्याला लांब बीप देखील ऐकू येते.

  • सर्प्रथम मतदान क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बुथवर पीठासीन अधिकारी बॅलेट युनिट सक्षम करतील
  • आता बॅलेट युनित्वरील निळे बटन हे तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या चिन्हावर आणि नावावर दाबा.
  • आता तुम्ही बटनावर दाबल्यानंतर उमेदवाराच्या चिन्हावर आणि नावावर लाल दिवा चमकेल आणि आपल्याला लांब बीप ऐकू येईल ती थोड्या वेळाने बंद होईल.
  • तसेच मतदाराला यामध्ये त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे याचे नाव आणि चिन्ह असणारी मतपत्रिका प्रिंट दिसेल.

इव्हीएम मशीनचे फायदे – evm machine benefits in marathi

इव्हीएम मशीनमुळे मतदान प्रक्रिया हि खूप सोपी आणि सुलभ झाली तसेच यामुळे अनेक फायदे देखील झाले ते फायदे काय आहेत ते खाली आपण पाहूया.

  • ज्यावेळी कागदी मतदान प्रक्रियेमध्ये अवैद्य मतपत्रिका काढून टाकणे शक्य नव्हते परंतु ज्यावेळीपासून मतदान हे इव्हीएम मशीनद्वारे सुरु झाले आहे त्यावेळी पासून अवैद्य मतांची यादी काढून टाकली जाते.
  • कागदी मतदानाच्या वेळी अनेक मतपत्रिका छापाव्या लागत होत्या त्यामुळे कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. तसेच वाहतूक, साठवणूक या साठी पैसे खर्च होत होते परंतु मशीनमुळे मतदान करणे हे एका बटनावर शक्य झाले त्यासाठी कोणत्याही प्रकारची मतपत्रिका छापण्याची गरज लागली नाही.
  • मतदाराला मतदान करणे सोपे आणि सुलभ झाले.
  • या मशीनद्वारे आपण मतदान अचूकपणे दर्शवले आहे कि नाही या बद्दल पाहता येते.
  • इव्हीएम मशीनचा वापर करून मतदान केल्याने मतदान प्रक्रिया हि खूप सोपी झाली आहे कारण म्हणजेच मतपत्रिकेमध्ये उमेदवाराला चिन्हाकित करून ते पेटीमध्ये टाकण्याचे काम वाचले आणि एक बटन दाबून मतदान करणे सोपे झाले.
  • इव्हीएम मशीनमुळे मतदाराला त्याच्या आवडत्या उमेदवाराला त्याच्या नावासमोरील आणि चिन्हासमोरील निळे बटन दाबून मताची नोदणी करणे सोपे झाले.
  • इव्हीएम मशीनमुळे मतांची मोजणीला देखील वेग मिळाला आणि त्यामुळे मतदानाचा निकाल हा काही तासामध्ये समजला.
  • या मशीनमुळे प्रती व्यक्ती फक्त एकच मत नोंदवता येईल कारण ते मशीन एकदा बटन दाबले कि मताची नोंदणी करून घेते.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी विशेष तथ्ये – facts 

  • या यंत्राचा शोध १९९० मध्ये लागला आहे आणि या मशीनचा विकास आणि चाचणी हि सर्व प्रथम इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ने केली होती.
  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र येण्या अगोदर मतदान प्रक्रिया हि कागदाच्या चिठ्ठीवर घेतली जाते होती.
  • इव्हीएम मशीनमध्ये केबलने जोडलेले कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट असते. कंट्रोल युनिट हे मतदान अधिकाऱ्यांच्या मालकीचे असते तसे मतदान युनिट हे मतदानासाठी एका कक्षेमध्ये ठेवले जाते.
  • या मतदान यंत्राच्या वापरासाठी कायदेशीर आधार हा आवश्यक होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १९८३ नंतर मशीन वापरता आले नाही त्यानंतर डिसेंबर १९८८ नंतर संसदेने कायद्यामध्ये सुधारणा करून निवडणूक आयोगाला यंत्र वापरण्याचे अधिकार दिले.
  • इव्हीएम मशीनचा वापर वीज नसताना देखील करता येतो म्हणजेच हे मशीन वीज नसलेल्या भागामध्ये देखील वापरणे शक्य आहे कारण ते बॅटरिजवर देखील चालते.
  • २००४ मध्ये देशभरामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये सर्व केंद्रामध्ये १०.७५ लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला होता आणि तेव्हापासून सर्व निवडणुका ह्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेतल्या जातात.
  • मतदान संपल्यानंतर कंट्रोल युनिटच्या डब्यामध्ये असलेला निकाल स्वीच दाबून मतमोजणी केंद्रावर त्वरित निकाल कळू शकतो.
  • इव्हीएममधील मते १० वर्षापर्यंत साठवता येतात
  • इव्हीएमचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ( electronic voting machine) असे आहे.
  • इव्हीएम हे प्रत्येकी फक्त ४०० मते नोंदवू शकतात.
  • इव्हीएममध्ये एक सीलबंद सुरक्षा चीप असते जेणेकरून इव्हीएममधील च्या प्रोग्रॅमिंगला हानी न पोहचवता एकदा मतांची नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये मतांची हेराफेरी होऊ नये.

आम्ही दिलेल्या evm machine information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ईव्हीएम मशीन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या evm machine demo in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि evm machine che fayde in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये evm machine history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!