डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय Eye Dark Circle Remove Tips in Marathi

eye dark circle remove tips in marathi डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय आज आपण या लेखामध्ये आय डार्क सर्कल्स म्हणजेच डोळ्यांच्या भोवती झालेली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहणार आहोत. सध्या अनेक आरोग्य विषयक तसेच आपल्या सौंदर्याविषयक अनेक अडचणी किंवा समस्या उद्भवत आहेत आणि त्यामधील एक म्हणजे डोळ्यांच्या खाली तयार होणारी वर्तुळे हि आजकाल एक सामान्य समस्या होऊन बसली आहे आणि याने अनेक लोक त्रस्त आहेत आणि त्यामध्ये स्त्रिया असोत वा मग पुरुष या दोघांनाही या समस्येला सामोरे जावे लागते.

डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळ होण्याचे कारण म्हणजे काही लोक लॅपटॉप वरती सतत काम करत असतात अशा लोकांच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे निर्माण होतात तसेच काही लोकांना ते अनुवंशिकतेने देखील होऊ शकते अश्या प्रकारे डोळ्याच्या भोवती वर्तुळे होण्याची अनेक कारणे आहेत.

डोळ्याभोवती काळी वर्तुळे उटली असतील तर आपला चेहरा खराब दिसतो परंतु हि समस्या जर आपल्याला उद्भवली तर आपल्याला काळजी करण्याचे काय कारण नाही कारण आपण घरातील अनेक आयुर्वेदिक उपचार करून काही दिवसामध्ये कमी होऊ शकतात. आपण डार्क सर्कल्स (eye dark circle) कमी करण्यासाठी अनेक टिप्स वापरून ते पूर्णपणे कमी करू शकतो म्हणून खाली आपण काही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्स पाहणार आहोत.

eye dark circle remove tips in marathi
eye dark circle remove tips in marathi

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय – Eye Dark Circle Remove Tips in Marathi

डार्क सर्कल्स म्हणजे काय – what is mean by dark circle 

डार्क सर्कल्स (eye dark circle) म्हणजे आपल्या डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे निर्माण झालेली असतात आणि ती आपल्या त्वचेपेक्षा काळी दिसतात.

डोळ्याभोवती काळी वर्तुळे कश्यामुळे होतात – causes of dark circle 

सध्या अनेक लोकांना डोळ्याभोवती काळी वर्तुळे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि हि समस्या अनेक कारणांच्या मुळे उद्भवू शकते. चला तर आता आपण डोळ्याभोवती काळी वर्तुळे कश्यामुळे होतात ती कारणे पाहूया.

 • डोळ्यांच्याभोवती काळी वर्तुळे होण्याचे कारण म्हणजे काही लोक हे सतत लॅपटॉप वरती काम करत असतात आणि स्क्रीन कडे बघून अशा व्यक्तींच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे होऊ शकतात.
 • काही लोकांना डोळ्याभोवती काळ्या वर्तुळांची समस्या हि अनुवंशिकतेने देखील येऊ शकते.
 • काही लोकांना डार्क सर्कल्स ( eye dark circle ) हे जास्त काळजीमुळे देखील येऊ शकतात.
 • वाढत्या वयामुळे आपल्याला अनेक समस्या येतात आणि वाढत्या वयामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे देखील होऊ शकतात.
 • जास्त थकवा आणि तणाव असेल तर डोळ्याला डार्क सर्कल्स ( eye dark circle ) येऊ शकतात.
 • प्रदूषणामुळे देखील आपल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होऊ शकतात.

डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी टिप्स – tips for eye dark circles 

डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण झाल्यामुळे काही स्त्रिया आणि पुरुष देखील खूप त्रस्त असतात आणि ते डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काही उपाय शोधात असतात अश्या लोकांच्यासाठी आपण आता खाली काही टिप्स पाहणार आहोत.

 • काकडी हि अनेक औषधी गुणधर्माने भरलेली आहे आणि हि आपण अनेक आरोग्य फायद्यासाठी सेवन करू शकतो तसेच हे अनेक समस्यांच्यावर वापर करू शकतो जसे कि काकडी हि डार्क सर्कल्स वर खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुमच्या डोळ्याभोवती काळे डाग असतील तर तुम्ही काकडीचे दोन गोल काप काढून घ्या आणि मग ते तुमच्या दोन्ही डोळ्यावर ठेवा आणि १० ते १५ मिनिटे करा आणि हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करा आणि रोज देखील न चुकता करा. यामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.
 • कच्चे दुध देखील अनेक त्वचेच्या समस्येवर उपयुक्त ठरते आणि हे डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. तुम्ही कच्चे दुध तुमच्या डोळ्यांच्या खाली लावा आणि मग ते १० मिनिटे तसेच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या आणि लगेच कोरडे करा. असे रोज केल्याने आपल्या डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे कमी होती.
 • टोमॅटो देखील अनेक समस्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे आणि हा डोळ्याभोवती काळे वर्तुळे निर्माण झाली असतील तर ती कमी करण्यासाठी देखील खूप उपयोगी ठरू शकते. टोमॅटोचे दोन गोल काप करा आणि तुमच्या दोन्ही डोळ्यांच्यावर ते ठेवा आणि तुम्ही १० ते १५ मिनिटे विश्रांती घ्या असे केल्याने तुमच्या डोळ्याभोवती असणारी काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.
 • कच्चा बटाट देखील आपल्या डोळ्यांच्यासाठी खूप उपयुक्त असू शकतो. आपण काकडी किंवा टोमॅटोचे जसे दोन गोल काप करतो तसे काप करा आणि मग ते तुमच्या डोळ्यांच्यावर ठेवा आणि १० ते १५ मिनिटे विश्रांती घ्या. बटाट्या मुळे तुमच्या डोळ्याभोवती असणारी काळी वर्तुळे झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
 • जर तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण झाली असतील तर ती कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्याच्या खाली खोबऱ्याचे तेल अकिंवा बदामाचे तेल लावा आणि ते तसेच १५ ते २० मिनिटे ठेवा आणि मग पाण्याने ते धुवून घ्या. यामुळे तुमचे डोळ्याचे भोवतीचे सार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.
 • हळदीचा वापर हा खूप पूर्वीपासून अनेक औषधी गुणधर्मासाठी वापरली जाते कारण त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि बॅक्टेरीयाशी लढण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे जर आपण हळद डार्क सर्कल्स वर उपाय म्हणून वापरली तर ती फायद्याची ठरू शकते. तुमच्या डोळ्याभोवती जर काळी वर्तुळे तयार झाली असतील तर तुम्ही जर हळदीमध्ये थोडे दुध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि मग ती पेस्ट तुमच्या डोळ्यांच्या खाली लावा आणि ते तसेच १० ते १५ मिनिटे धुवा आणि मग हळुवार पणे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
 • कापसाच्या बोळ्याने तुम्ही तुमच्या डोळ्यांच्याखाली गुलाबपाणी लावले तर तुमचे डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • कोरफड मध्ये देखील असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या डोळ्याचे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होऊ शकते. बाजारामध्ये कोरफडचे गेल विकत मिळते ते गेल आपण डोळ्याच्या खाली जेथे वर्तुळ निर्माण झालेत त्या ठिकाणी लावले तर यामुळे आपल्या डोळ्याभोवती निर्माण झालेला काळपट पणा कमी होण्यास मदत होऊ शकतो.
 • सोडा हा त्वचेचा काळपट पणा कमी करण्यासाठी ओळखला जातो आणि हा डोळ्याभोवती असणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील मदत करू शकतो. कोमट पाण्यामध्ये थोडा सोडा घाला आणि त्या पाण्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून ते डोळ्याभोवती जिथे त्वचा काळी झाली आहे तेथे लावा. असे केल्याने आपल्या डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या eye dark circle remove tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!