फत्तेपूर सिक्री पूर्ण माहिती Fatehpur Sikri Information in Marathi

fatehpur sikri information in marathi फत्तेपूर सिक्री पूर्ण माहिती, भारतामध्ये आपल्या अनेक ऐतिहासिक इमारती आणि नजरे पहायला मिळतात आणि तसेच मुघल कलाकृती असणारे नजरे किंवा ऐतिहासिक इमारती देखील भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील एक असणार मुघल कलाकृती असणारा ऐतिहासिक नजरा म्हणजे फत्तेपूर सिक्री आणि आज आपण या लेखामध्ये फत्तेपूर सिक्री या ऐतिहासिक ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

फतेहपुर सिक्री हे उत्तर भारतातीत उत्तर प्रदेश या राज्यातील आग्रा या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे आग्रा या शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर आहे. फत्तेपूर सिक्री हे एक असे ठिकाण आहे जे अकबराने गुजरात जिंकल्यानंतर आपली राजधानी बनवली होती आणि तो काळ १५६९ ते १५७० होता आणि म्हणून या ठिकाणाला विजयाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.

फत्तेपूर सिक्री या ठिकाणी अकबराने अनेक ऐतिहासिक इमारती बांधल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपली राजधानी बनवली आहे. अकबराचे विचार हे सहिष्णू धार्मिक असल्यामुळे आणि आणि त्याला साहित्य, स्थापत्य आणि ललित कलांच्यामध्ये स्वारस्या असल्यामुळे फत्तेपूर सिक्री या ठिकाणी असणाऱ्या इमारतींना त्यांच्या शैली आणि रचनेमध्ये इस्लामिक आणि हिंदू बांधकाम शैलीचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते.

fatehpur sikri information in marathi
fatehpur sikri information in marathi

फत्तेपूर सिक्री पूर्ण माहिती – Fatehpur Sikri Information in Marathi

ठिकाणाचे नावफत्तेपूर सिक्री
पत्ताउत्तर भारतातीत उत्तर प्रदेश या राज्यातील आग्रा या जिल्ह्यामध्ये आहे.
जवळचे शहरआग्रा (४० किलो मीटर अंतरावर)
कोणी बनवलेअकबर
काळ१५६९ ते १५७०
बांधकाम आणि स्थापत्य शैलीइस्लामिक आणि हिंदू
पाहण्यासारखी ठिकाणेदिवाण खाना इ खास, दिवाण इ आम, जोधाबाईचा वाडा, बुलंद दरवाजा, ट्रेझरी इ.

फत्तेपूर सिक्री शहराविषयी महत्वाची माहिती – information about fatehpur sikri fort in marathi

फत्तेपूर सिक्री हे उत्तर भारतातीत उत्तर प्रदेश या राज्यातील आग्रा या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे आग्रा या शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर आहे आणि हे एक शहर आहे जे अकबराने वसवले आहे आणि या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती बांधलेल्या आहेत आणि ह्या इमारती लाल वाळूच्या दगडांनी बांधलेल्या आहेत.

फत्तेपूर सिक्री हे शहर ११ किलो मीटर लांबीच्या तटबंदीच्या भिंतीने वेढले आहे ज्या तटबंदीला अनेक प्रवेशद्वारे आहेत. नंतर अकबराने लाहोर या शहरामध्ये आपली राजधानी हलवली त्यामुळे फतेहपुर सिक्री या शहराकडे दुर्लक्ष झाले. जरी आज हे शहर भग्नाअवस्थेत असले तरी आग्रा या ठिकाणी गेल्यानंतर हे शहर देखील पाहण्यासारखे आहे.

फत्तेपूर सिक्री मधील काही पाहण्यासारखी ठिकाणे – what to see

  • सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी त्या ठिकाणी असणारे बुरुज आणि घुमट हे तांब्याच्या लाल आकाश्याच्या विरुध्द सावल्या आणि छायाचित्र तयार करतात.
  • दिवाण खाना इ खास : दिवाण खाना इ खास हि इमारत दोन माजली इमारत आहे ज्याला हॉल ऑफ प्रायव्हेट ऑडीयंस म्हणून ओळखले जाते आणि या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला फक्त एकच व्हॉल्टेड चेंबर दिसते आणि यांच्या मध्यभागी एक आधार देणारा विपुल कोरीव स्तंभ आहे. आणि या इमारतीमध्ये अकबराच्या सिंहासनाने राजधानीवरील गोलाकार जागा व्यापली होती आणि चार कोपरे हे मंत्र्यांना दिले होते.
  • दिवाण इ आम : शाही राजवाड्याचा प्रवास हा दिवाण इ आम किंवा हॉल ऑफ पब्लिक ऑडीयंसने सुरु होतो. दिवाण इ आम या हॉलचा वापर हा सार्वजनिक प्रार्थना करण्यासाठी केला जात होता. यामध्ये आयताकृती अंगणाच्या तीन बाजूंनी आहेत आणि पश्चिमेला सम्राटांचे सिंहासन असलेला मंडप आहे.
  • दौलत खाना इ खास : दौलत खाना इ खास मध्ये डावीकडे सम्राटांचे खाजगी कक्ष आहे आणि तळमजल्यावर दोन मुख्य खोल्या आहेत ज्यामध्ये एका खोलीमध्ये वाचनालय आहे तर एक खोली हि विश्रांतीची खोली आहे.
  • ट्रेझरी : दिवान इ खासाच्या डावीकडे ट्रेझरी किंवा आंख मिचौली आहे ज्याचा वापर हा एकेकाळी खेळ खेळण्यासाठी केला जात होता.
  • जोधाबाईचा वाडा : अकबराची राजपूत पत्नी जोधाबाई हिच्या नावावर हा वाडा बांधला आहे आणि हि इमारत राजवाड्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची इमारत आहे. या राजवाड्याला पूर्वेला उंच भिंती आणि ९ मीटर संरक्षित गेटद्वारे गोपनीयता आणि सुरक्षिततेची हमी देण्यात आली होती.
  • बुलंद दरवाजा : या गेटला बाहेरून १३ मीटरच्या पायऱ्यांच्यावरून पोहचता येते ज्यामुळे या स्मारकाची भव्यता वाढते. अकबराच्या दक्खनच्या विजयाच्या स्मरणार्थ १६०२ मध्ये हा दरवाजा उभारलेला आहे.
  • हवा महल आणि नगीना मशीद : जोधाबाई वाड्याच्या उजवीकडे हवा महल आहे आणि हा बागेकडे तोंड करून आहे आणि राजवाड्याला जोडलेला आहे.
  • जामी मशीद : भारतातील सर्वात मोठ्या माशिदिपैकी एक जमि मशीद हे १५७१ मध्ये बांधले गेले. आतमध्ये एक विस्तीर्ण मंडळाचे अंगण आहे तसेच उजवीकडे कोपऱ्यात जम्मत खाना हॉल आणि पुढे राजेशाही महिलांची कबर आहे.

फत्तेपूर सिक्री या ठिकाणाला कसे जायचे – how to reach

  • रस्त्याने : जर तुम्हाला या शहराला बसने जायचे असल्यास तुम्हाला सर्वप्रथम आग्रा या मुख्य शहरामध्ये जावे लागेल आणि अग्र्यामध्ये इदगाह हे बसस्थानक मुख्य बसस्थानक आहे आणि तेथून दिल्ली, फत्तेपूर सिक्री, मधुर आणि जयपूर या ठिकाणी जाणाऱ्या बस मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही बस पकडून फत्तेपूरला जाऊ शकता.
  • विमानाने : फतेहपुर सिक्री पासून सर्वात जवळचे विमानतळ हे आग्रा या ठिकाणी आहे आणि हे शहराच्या केंद्रापासून ७ किलो मीटर अंतरावर आहे आणि हे इदगाह बसस्थानकापासून ३ किलो मीटर अंतरावर आहे. विमानाने तुम्ही कोणत्याही मुख्य शहरातून आग्र्याला येऊ शकता आणि तेथून मग तुम्ही बस पकडून किंवा टॅक्सी घेऊन फतेहपुर सिक्री या ठिकाणी जावू शकता.
  • रेल्वे : या ठिकाणापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे आग्रा या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही आग्रा या शहरामध्ये रेल्वेने येऊन तेथून तुम्ही बस पकडून किंवा टॅक्सी घेऊन फतेहपुर सिक्री पर्यंत जावू शकता.

प्रवेश शुल्क – entrance fee

  • काही ठिकाणी ऐतिहासिक स्मारके आणि इमारती पाहण्यासाठी प्रवेश शुल्क घेतले जात नाहीत परंतु काही ठिकाणी घेतले जातात आणि फत्तेपूर सिक्री मधील ऐतिहासिक इमारती पाहण्यासाठी तिकीट घेतली जातात. जर फतेहपुर सिक्री पाहण्यासाठी कोणताही भारतीय नागरिक गेल्यास त्या प्रती व्यक्तीसाठी ५० रुपये तिकीट आहे आणि परदेशी लोकांच्यासाठी ६१० रुपये प्रती व्यक्ती असे तिकीट आहे.
  • पूर्ण दिवसासाठी भारतीय लोकांच्यासाठी ७५० रुपये तिकीट आहे आणि परदेशी लोकांच्यासाठी ३६०० रुपये तिकीट आहे.
  • जर अर्धा दिवस तुम्हाला फतेहपुर सिक्री मधील ऐतिहासिक स्मारके आणि इमारती पहायच्या असतील तर भारतीय लोकांच्यासाठी ५५० रुपये तिकीट आहे आणि परदेशी लोकांच्यासाठी १५०० रुपये इतके तिकीट किंवा प्रवेश शुल्क आहे.
  • मुलांच्यासाठी अर्धा दिवसाच्या टूर साठी भारतीय मुलांना देखील ५५० रुपये तिकीट आहे आणि परदेशी मुलांना देखील ५५० रुपये तिकीट आहे.

आम्ही दिलेल्या fatehpur sikri information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फत्तेपूर सिक्री पूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fatehpur sikri fort information in marathi या fatehpur sikri fort history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about fatehpur sikri fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये fatehpur sikri uttar pradesh information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!