तलवारबाजी खेळाची माहिती Fencing Game Information in Marathi

Fencing Game Information in Marathi तलवारबाजी खेळाची माहिती प्राचीन काळापासून अनेक प्रकारचे खेळ आपल्या मनोरंजनासाठी तसेच युद्धामध्ये वापरले जायचे त्यामधील एक खेळ म्हणजे तलवारबाजी. तलवारबाजी या खेळला खूप पूर्वीच्या काळापासून अनन्य साधारण महत्व आहे कारण तलवारबाजीचा उपयोग हा युध्द लढण्यासाठी आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केला जात होता. जस जसा काळ बदलत गेला तस तसे या खेळाचे स्वरूप देखील बदलत गेले आणि आज तलवारबाजी खेळ म्हणून खूप प्रसिध्द आहे. तलवारबाजी हा खेळ सध्या ऑलम्पिक मध्ये देखील खेळला जातो.

तलवारबाजी हा खेळ इ.स १८९६ मध्ये  आधुनिक खेळ म्हणून खेळण्यास सुरुवात झाली आणि हा खेळ ऑलिम्पिक खेळांमध्ये कायमस्वरूपी खेळल्या गेलेल्या पाच खेळांपैकी एक आहे. या खेळाचे मूळ जरी युरोपमधून आले असले तरी चीन आणि युनायटेड स्टेट्स या देशातील खेळाडूंनी या खेळामध्ये अलीकडे यश मिळवले आहे. या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये संघ इव्हेंट अस्तित्वात असला तरीही तलवारबाजीची फक्त एक विरुद्ध एक लढत केली जाते.

Fencing Game Information in Marathi
Fencing Game Information in Marathi

तलवारबाजी खेळाची माहिती – Fencing Game Information in Marathi

प्रकारखेळ
नावतलवारबाजी (fencing)
सुरुवातइ.स १८९६ पासून उन्हाळी ऑलिंपिक मध्ये समाविष्ट झाले
प्रथम कोठे खेळयुरोप
खेळाडूतलवारबाजी एका विरुध्द एक अशी खेळली जाते.

तलवारबाजी खेळाचा उद्देश 

खेळाचा उद्देश आपल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रहार करण्यासाठी आपल्या शस्त्राचा वापर करणे आणि स्वतावर वार होण्यापासून टाळणे हा आहे.

तलवारबाजी या खेळाचा इतिहास 

history of fencing game तलवारबाजी या खेळला खूप पूर्वीच्या काळापासून अनन्य साधारण महत्व आहे कारण तलवारबाजीचा उपयोग हा युध्द लढण्यासठी आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी केला जात होता. मध्ययुगीन काळामध्ये म्हणजेच ५ व्या शतकापासून ते १५ व्या शतकापर्यंत तलवार हे शस्त्र युद्धामध्ये वापरले जात होते. या शस्त्राचा उपयोग हा युद्धामध्ये चिलखत फोडण्यासाठी केला जात होता.

तसेच तलवारीचा वापर हा समोरच्या व्यक्तीचा वार रोखण्यासाठी केला जात होता त्यामुळे तलवार हे शस्त्र एक बचावात्मक तसेच आक्षेपार्ह शस्त्र बनले. एपी हा एक तलवारीचा प्रकार १८ व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये शोधून काढला. तलवारबाजी हा खेळ भारत देशामध्ये इ.स १९७० नंतर जवळजवळ सुरू झाला आणि फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना इ.स १९७४ मध्ये झाली.

खेळामध्ये वापरली जाणारी उपकरणे 

या खेळामध्ये वापरले जाणारे महत्वाचे उपकरण म्हणजे तलवार आणि या खेळामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या तलवारींचा वापर केला जातो आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारबाजी खेळामध्ये वापरल्या जातात. एपी ही सर्वात जड तलवार आहे, फॉइल हे एक हलके थ्रस्टिंग शस्त्र आहे आणि सेबर हे कापून काढणारे आणि जोर देणारे शस्त्र आहे.

त्याचबरोबर या खेळामध्ये तलवारीने गंभीर वार आणि प्रतिवार केला जातो ज्यामुळे खेळाडूंना गंभीर दुखापत होऊ शकते आणि हे रोखण्यासाठी हा खेळ खेळताना फेंसर्सना एक संरक्षणात्मक पोशाख घालायला दिलेला असतो.

खेळाचे मैदान – ground 

तलवारबाजी खेळण्यासाठी एक मैदान असते ज्याला पिस्ट असे म्हणतात. हे पिस्ट ४६ फूट लांब आणि सुमारे ६  फूट रुंद असते. या मैदानाच्या रुंदीच्या दोन्ही बाजूला सहा फूट ऑन गार्ड रेषा असलेली एक मध्य रेषा आहे आणि येथूनच खेळाडू प्रत्येक फेरीची सुरुवात करतात.

तलवारबाजी या खेळाचे नियम – rules of fencing game 

  • ज्यावेळी खेळाडू तलवार बाजीची सुरुवात करत असतात त्यावेळी त्यांनी चढाओढीच्या सुरूवातीस आणि शेवटी एकमेकांना आणि रेफ्रीला सलाम करणे आवश्यक असते. जर एकाद्या खेळाडूने चुकून किंवा मुद्दाम असे केले नाही, तर त्याला एक गुण गमवावा लागतो किंवा त्याला खेळातून निलंबित केले जाते आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी म्हणून घेओषित केले जाते.
  • या खेळामध्ये एपी ही सर्वात जड तलवार आहे, फॉइल हे एक हलके थ्रस्टिंग शस्त्र आहे आणि सेबर हे कापून काढणारे आणि जोर देणारे शस्त्र हि शस्त्रे वापरली जातात या व्यतिरिक्त खेळाडू दुसरे कोणतेही शस्त्र वापरू शकत नाही.
  • जर खेळाडूने फॉइल हे शस्त्र वापरले असेल तर फॉइलमध्ये, लक्ष्य क्षेत्राबाहेरील स्ट्राइक पुन्हा पुन्हा सुरू होण्यापूर्वी स्पर्धा थांबवतात.
  • या खेळामध्ये खेळाडूंना एकमेकांवर वार करायचा असतो आणि त्या खेळाडूंनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने केल्या प्रहारापासून आपला स्वताचा बचाव करावा.
  • या खेळामध्ये दोनच खेळाडू एकमेका विरुध्द खेळू शकतात.
  • जर एकाद्या खेळाडूने धक्काबुक्की करणे किंवा प्रहार करण्यासाठी जर आपल्या हात, पाय किंवा इतर शस्त्राचा वापर केल्यास त्या खेळाडूला पेनल्टी बसू शकते आणि त्यामुळे त्याचे गुण कापले जावू शकतात.
  • या खेळामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडून विजेता म्हणून घोषित केला जातो.
  • तलवारबाजीच्या तीन प्रकारांमध्ये स्कोअरिंग वेगळ्या पद्धतीने केले जाते.
  • फॉइल वापरताना फक्त धड, मान, मांडीचा सांधा आणि पाठीच्या काउंटवर आघात होतो आणि केवळ शस्त्राच्या टोकाचा वापर करून गुण मिळवता येतात.
  • जर एखाद्या प्रतिस्पर्ध्याने प्रथम आपण हल्ला सुरु केला तर त्या खेळाडूला गुण मिळेल.

खेळ जिंकण्यासाठी आवश्यक असणारे गुण

ऑलिम्पिक खेळांचे सामने तीन-तीन मिनिटांच्या फेऱ्यांमध्ये लढवले जातात, विजेता एकतर पहिला ते १५ गुण किंवा तीन फेऱ्यांनंतर सर्वाधिक हिट्स मिळवणारा असतो.

तलवारबाजी या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – facts about fencing game 

  • तलवारबाजी हा खेळ इ.स १८९६ मध्ये आधुनिक खेळ म्हणून खेळण्यास सुरुवात झाली आणि हा खेळ ऑलिम्पिक खेळांमध्ये कायमस्वरूपी खेळल्या गेलेल्या पाच खेळांपैकी एक आहे.
  • तलवारबाजी खेळण्यासाठी एक मैदान असते ज्याला पिस्ट असे म्हणतात आणि हे पिस्ट ४६ फूट लांब आणि सुमारे ६ फूट रुंद असते.
  • तलवारबाजी हा वजन वर्ग नसलेला एकमेव लढाऊ खेळ म्हणून ओळखला जातो.
  • तलवारबाजी हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ असल्यामुळे या खेळाला प्राचीन खेळ म्हणून ओळखला जातो.
  • यामध्ये एपी, थ्रस्टिंग आणि सेबर ह्या तीन प्रकारच्या तलवारी वापरल्या जातात.

आम्ही दिलेल्या fencing game information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तलवारबाजी खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fencing information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of fencing game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये fencing game information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!