ऑलिंपिक खेळाची माहिती Olympic Information in Marathi

Olympic Information in Marathi ऑलिंपिक स्पर्धा माहिती खेळ म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर येते ती स्पर्धा आणि वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धेमधूनच समजते कि कोणता खेळाडू एका विशिष्ठ खेळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या भारतामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातूनच वेगवेगळ्या उत्कृष्ट खेळाडूंची ओळख देशाला होते तसेच जगभरामध्ये देखील असे किती तरी खेळाडू असतात आणि आणि त्यांची सर्वोत्कृष्टता साऱ्या जगाला कळण्यासाठी आणि त्यांची ओळख साऱ्या जगामध्ये होण्यासाठी विविध खेळांचे आयोजन जागतिक पातळीवरती केले जाते आणि त्यालाच ‘ऑलंम्पिक स्पर्धा’ म्हणतात.
olympic information in marathi
olympic information in marathi
अनुक्रमणिका hide
1 ऑलिंपिक खेळाची माहिती – Olympic Information in Marathi

ऑलिंपिक खेळाची माहिती – Olympic Information in Marathi

घटकमाहिती
तारखा23 जुलै 2021 – 8 ऑगस्ट 2021
स्थानटोकियो
स्टेडियमऑलिम्पिक स्टेडियम (टोकियो 2020)

इतिहास

इतिहासकारांच्या मते असे समजले जाते कि ऑलंम्पिक खेळाची सुरुवात बहुतेक ३००० वर्षापूर्वी झाली होती आणि त्यानंतर १८९६ मध्ये ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक स्पर्धा सुरु झाल्या. जेव्हा या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

पूर्वीच्या काळी ग्रीसमध्ये ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी १० ते ११ महिने अगोदर नियमित तयारी करावी लागायची आणि ३० वर्ष पूर्ण झालेलेच खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेवू शकता होते. पूर्वी हि स्पर्धा होण्याच्या अगोदर खेळामधील पंच, खेळाडू, घोडे आणि इतर खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची मिरवणूक खादली जायची.

ऑलंम्पिक स्पर्धा म्हणजे काय आणि त्याविषयी माहिती

ऑलंम्पिक स्पर्धा म्हणजे ?

जगभरामध्ये असे कित्येक खेळाडू आहेत जे कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये पारंगत असतात आणि या खेळाडूंची सर्वोत्कृष्टता संपूर्ण जगाला समजावी म्हणून जागतिक पातळीवर जी खेळाची स्पर्धा आयोजित केली जाते त्याला ऑलंम्पिक स्पर्धा म्हणतात.

ऑलंम्पिक स्पर्धा कोठे व केव्हा सुरु झाल्या ?

प्राचीन ऑलंम्पिकची सुरुवात ७७६ ई.स.पूर्व मध्ये झाली पण ३९४ ई.स. पूर्व मध्ये रोममधील राजा थीओ डोटस यांनी या स्पर्धा बंद केल्या होत्या त्यांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक स्पर्धेची सुरुवात ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये १८९६ मध्ये झाली जेव्हा या स्पर्धेची सुरुवात ग्रीसमध्ये झाली त्यावेळी पहिल्यांदा ग्रीस, फ्रांस, इंग्लंड, भारत, जर्मनीसोबत आणखी १४ देश या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

ऑलंम्पिक स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केल्या जातात ?

ऑलंम्पिक स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि या स्पर्धा आयोजित करण्याची सर्व जबाबदारी ऑलंम्पिक समिती कडे असते.

ऑलंम्पिक चिन्हे किवा ध्वज खेळाडूंना काय संदेश देतो ? – olympic symbol information in marathi

ऑलंम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर वेगवेगळ्या रंगाची पाच वर्तुळे आहेत आणि त्यामधील प्रत्येक वर्तुळाचा काहीतरी अर्थ आहे. ऑलंम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर अनुक्रमे निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवी वर्तुळे आहेत आणि हि वर्तुळे जगातील पाच खंड दर्शविते आणि आणि या ध्वजाची जी शुभ्रधवल पार्श्वभूमी आहे ते  विशाल अंतराळ दर्शविते.

निळा वर्तुळ – युरोप खंड

काळा वर्तुळ – आफ्रिका खंड

लाल वर्तुळ – अमेरिका खंड

पिवळा वर्तुळ – आशिया खंड

हिरवा वर्तुळ – ओशिनिया खंड

ऑलंम्पिक खेळाचे ब्रीदवाक्य – सीटीयस, ऑल्टियस, फॉर्टीयस

ऑलंम्पिक ब्रीदवाक्याचाअर्थ :

सीटीयस – गतिमान

ऑल्टियस – उच्चता

फॉर्टीयस – तेजस्विता

ब्रीदवाक्यातून मिळणारा संदेश :

सीटीयस – सीटीयस म्हणजे गतिमान होय हे शब्द असा संदेश देतो कि खेळ खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने स्वताला जास्तीत जास्त गतिमान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ऑल्टियस – ऑल्टियस म्हणजे उच्चता होय या शब्दामार्फत असा संदेश दिला आहे कि अधिक अधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्नांची चिकाटी केली पाहिजे किवा जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत.

फॉर्टीयस – फॉर्टीयस याचा अर्थ तेजस्विता असा होतो आणि या शब्दामध्ये बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त कष्ट किवा श्रम घेतले पाहिजे.

ऑलंम्पिक खेळाची नावे आणि माहिती – 10 international games name

१८९६ मध्ये पहिल्या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये ९ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या त्यामध्ये आणि दुसरे खेळ जोडले तसेच काढले देखील गेले आणि १८९६ मधील उन्हाळी ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये अथलेटिक्स, सायकलिंग, जिमनॅस्टिक्स, फेन्सिंग आणि स्विमिंग या ५ क्रीडा स्पर्धा झाल्या. ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये दरवर्षी वेगवेगळे खेळ जोडले जातात त्याबरोबर त्यामध्ये समाविष्ट असणारे खेळ काढून देखील टाकले जातात. ऑलंम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या काही खेळाची नवे खाली दिली आहेत.

अणु.क्रखेळ
उन्हाळी ऑलंम्पिक खेळ
१.बॅडमिंटन ( badminton )
२.धनुर्विद्या ( archery )
३.सॉफ्टबॉल ( softball )
४.बेसबॉल ( baseball )
५.बास्केटबॉल ( basketball )
६. व्हॉलीबॉल ( volleyball )
७.बॉक्सिंग ( boxing )
८.क्लाम्बिंग ( climbing )
९.सायकलिंग ( cycling – road, track, mountain )
१०.फेन्सिंग ( fensing )
११.गोल्फ ( golf )
१२.हॉकी ( hockey )
१३.जीमनॅस्टीक ( gymnyastics )
१४.कराटे ( karate )
१५.जुडो ( judo )
१६.हॅन्डबॉल ( handball )
१७.नेमबाजी ( shooting )
१८.फुटबॉल/ सॉसर ( football/ soccer )
१९.स्विमिंग ( swimming )
२०.टेबल टेनिस ( table tennis )
२१.टेनिस ( tennis )
२२.कुस्ती ( wrestling )
२३.वेटलिफ्टिंग ( weightlifting )
२४.अॅथलेटीक्स ( athletics )
अलीकडे जोडलेले खेळ ( २०२० मध्ये )
२५.ब्रेकडान्सिंग ( breakdancing )
२६.स्केटबोर्डिंग ( skateboarding )
२७.सर्फिंग  (surfing )
२८.नेटबॉल ( netball )
२९.क्रिकेट ( cricket )
३०.पोलो ( polo )
३१.रॅकेट्स ( racquest )
३२.मोटर बोटिंग ( motor boating )
३३.लॅक्रोस ( lacrosse )

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लागतात आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष दोघेही खेळू शकतात आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील समाविष्ठ आहे.

बॅडमिंटन या खेळामध्ये जर हा खेळ एकेरी खेळ असेल तर या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि जर हा खेळ दुहेरी खेळ असेल तर या खेळामध्ये ४ खेळाडू असतात.

हा खेळ खेळताना २ रॅकेटची गरज असते रॅकेट हे अंडाकृती असते आणि ते धातूपासून बनवलेले असते आणि त्याला खाली धरण्यासाठी एक मुठ असते आणि रॅकेटच्या मधी जे छोटे छोटे चौकोण असतात ते फायबरचे असतात आणि रॅकेटचा वापर शटलकॉकला मारण्यासाठी केला जातो. शटलकॉक बॅडमिंटनचे फुल किवा बर्डी या नावाने देखील ओळखले जाते.

नुर्विद्या किवा तिरंदाजी म्हणजे धनुष्याच्या सहाय्याने बाण नेम धरून प्रक्षेपण करण्याची कला किवा गुण. तिरंदाजी करणाऱ्या व्यक्तीला धनुर्धर किवा तिरंदाज म्हणतात. तिरंदाजी हा खेळ बहुतेक ९००१ वर्षापासून खेळला जाणारा एक जुना ख्र्ल आहे. भारत, पारसी, न्यूबियन, ग्रीक, पार्थी, चीनी आणि जपानी लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनुर्धर होते.

जगभरामध्ये आज अनेक प्रकारचे धनुर्विद्या खेळ खेळले जातात. मुख्यता या खेळाचे चार प्रकार आहेत आणि ते म्हणजे लक्ष्य, फील्ड, क्लाउट आणि फ्लाइट आहेत. वेगवेगळ्या संस्कृतीत बाण धरण्याची किवा मारण्याची पध्दत वेगवेगळी असते. काही जन बाण डाव्या किवा उजव्या बाजूला सोडतात हे हाताची पकड कशी आहे त्यावर अवलंबून असते.

सॉफ्टबॉल हा एक बॅट-बॉल खेळ आहे ज्यामध्ये १० खेळाडूंच्या दोन संघात खेळला जातो आणि खेळ बेसबॉल खेळाशी जरी साम्य असला तरी त्यामध्ये काही महत्वाचे फरक आहेत. सॉफ्टबॉल मोठ्या मैदानावर २ संघांदरम्यान खेळला जातो, एकाच वेळी मैदानात एका संघाचे ९ किंवा १० खेळाडू असतात आणि इनफिल्डवर ४ तळ आहेत ते म्हणजे पहिला बेस, दुसरा बेस, तिसरा बेस आणि होम प्लेट. या चौकाच्या मध्यभागी एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळात “रबर” आहे जो एक छोटा सपाट आयताकृती क्षेत्र आहे.

खेळाचा हेतू म्हणजे दुसर्‍या संघापेक्षा जास्त एकापाठोपाठ एक धाव घेऊन जास्त गुण मिळवणे. सॉफ्टबॉल मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे स्लो पीच आणि फास्ट पीच. स्लो-पिच सॉफ्टबॉल सर्वात जास्त खेळला जातो आणि या प्रकारच्या सॉफ्टबॉलमध्ये खेळपट्टीवर जाताना बॉलला हवेमध्ये कमान करणे आवश्यक असते. फास्ट-पिच सॉफ्टबॉलमध्ये बॉल वेगवान फेकला जातो आणि एकावेळी मैदानात प्रत्येक संघाचे नऊ खेळाडू असतात.

या खेळामध्ये हि क्रिकेट सारखे बॅट आणि बॉल असते पण बेसबॉल चे बॅट हे क्रिकेट बॅटपेक्षा वेगळे असते हे बॅट दिसायला रॉडसारखे असते. आणि हा खेळ सुध्दा दोन विरोधी संघांमध्ये खेळला जातो आणि प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात.

या खेळामध्ये जो संघ बॅटिंग करत असतो त्यांचे पहिले उद्दीष्ट प्रथम खेळाडू सुरक्षितपणे पहिल्या बेसमध्ये जावून न आउट होता धावा बनवणे आणि विरोधी टीमचे लक्ष हे असते कि बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना आउट करणे आणि धावा काढू न देणे. या खेळामध्ये बॅट आणि बॉल वापरले जाते. बॅट हे लाकडी, अल्युमिनियम किवा मेटलचे असते आणि बॉल पांढरा किवा लाल रंगाचा असतो.

  • बास्केटबॉल – basketball 

बास्केटबॉल हा खेळ सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये २ संघ असतात आणि प्रत्येक संघामध्ये ५ खेळाडू असतात. या खेळामध्ये चेंडू जाळीच्या बास्केटमध्ये टाकायचा असतो म्हणून या खेळला बास्केटबॉल खेळ म्हणतात. या खेळाचे मैदान आयताकृती असते आणि त्याला बास्केट करत म्हणतात आणि ते २ भागामध्ये विभागलेले असते.

व्हॉलीबॉल हा खेळ २ संघामध्ये खेळला जातो आणि प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात. या खेळाचे मैदान आयताकृती असते आणि याचा आकार १७ ते १८ सेंटी मीटर लांब आणि ८ ते ९ सेंटी मीटर असते आणि मैदानाच्या मध्यभागी एक नेत असते या खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात. या खेळामध्ये वापरला जाणारा चेंडू मोठा आणि मऊ असतो आणि मैदानावर ६ खेळाडू खेळण्यासाठी असतात आणि राहिलेले खेळाडू राखिव असतात.

बॉक्सिंग हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुध्द खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम ची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात.

बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे तसेच २०१२ पासून महिलांचा देखील ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग खेळामध्ये २ खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळतात आणि मुठीचा वापर करून एकमेका विरुध्द लढाई करतात. हा खेळ २ ते ३ मिनिटाच्या अंतराच्या मालिकांमध्ये खेळला जातो. हा खेळ पूर्णपणे रेफारीद्वारे हाताळला जातो.

  • क्लाम्बिंग – climbing 

क्लाम्बिंग हि एक बंदिस्त जागेमध्ये खेळला जाणारा खेळ आहे ज्या खेळामध्ये कृत्रिम भिंतीवर चढण्याची स्पर्धा असते. या खेळामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत आणि ते म्हणजे वेग, आघाडी आणि दगड फेक. क्लाम्बिंग या खेळाचा २०१३ मध्ये ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.

सायकलचा मनोरंजक वापर युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये व्यापक प्रमाणात आहे. १९ व्या शतकामध्ये सायकलची निर्मिती झाली आणि रॉयल मेलया या ब्रिटीश माणसाने १८८० मध्ये पहिल्यांदा चालवली. आजच्या काळात सायकलिंगच्या खेळात व्यावसायिक आणि हौशी शर्यतींचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे.

या खेळाच्या शर्यती शक्यतो अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये आयोजित केले जातात. सायकल शर्यत उन्हाळी ऑलंम्पिक खेळामध्ये १८९६ मध्ये समाविष्ठ करण्यात आला आणि महिलांचा सायकल शर्यतीचा ऑलंम्पिक खेळ १९८४ पासून सुरु झाला.

  • फेन्सिंग – fensing 

ताल्बाजी हि पूर्वीच्या काळामध्ये युध्दामध्ये केली जायची पण आता तलवारबाजीचा समावेश उन्हाळी ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये केली आहे आणि हा खेळ १८९६ मध्ये ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये खेळला गेला.

गोल्फ हा असा खेळ आहे जो वैयक्तिकरित्या किवा गटामध्ये खेळला जातो. या खेळामध्ये एक धातूची काठी ( ज्याला क्लब म्हणतात) घेवून चेंडूवर निशाना ठेवून तो चेंडू एका छिद्रात  गोल्फ खेळाच्या मैदानाचा दुसऱ्या खेळाच्या मैदानासारखा विशिष्ठ असा आकार ठरलेला नसतो आणि या खेळाच्या मैदानाला ‘कोर्स’ असे म्हणतात.

गोल्फ कोर्सवर हिरवेगार गवत असते आणि त्यावर अनेक छिद्र असतात या छिद्रांची संख्या कमीत कमी ९ आणि जास्तीत जास्त १८ छिद्रे असतात. जर हा खेळ वैयक्तिक असेल तर १ विरुध्द १ असतो आणि जर गटामध्ये असेल तर एका गटामध्ये १ ते ४ खेळाडू असतात.

हॉकी हा खेळ सांघिक खेळ आहे आणि तो २ संघामध्ये खेळला जातो. हॉकी हा एक लोकप्रिय आणि मनोरंजक खेळ असून हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जातो. एकूण ११ खेळाडू असतात त्यामधील ५ खेळाडू राखीव असतात.

हॉकी खेळाचे मैदान आयताकृती असते आणि मैदानाची लांबी ९० मीटर आणि रुंदी ६० मीटर असते. हॉकी हा एक खेळ आहे ज्यामध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात ज्यामध्ये हॉकी स्टिकचा वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या गोलमध्ये चेंडूचा घसरण करण्याचा प्रयत्न करतात.  ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा सुवर्ण पदक आणि सलग अनेक सामने जिंकले आहेत.

  • जीमनॅस्टीक – gymnyastics 

पूर्वीच्या काळामध्ये जीमनॅस्टीक खेळण्यासाठी भरपूर बळ आणि ताकदीची गरज लागत होती पण आताच्या काळामध्ये या खेळासाठी अनेक यांत्रिकी सामग्री उपलब्ध असल्यामुळे शारीरिक ताकदीची इतकी गरज लागत नाही. जीमनॅस्टीक या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला गेला आहे.

  • कराटे – karate 

करते या खेळाची ओळख १९ व्या शतकामध्ये ओकीनावा येथे झाली परंतु असे म्हणतात कि १९२० मध्ये हा प्रकार जपानमध्ये उदयास आला. या खेळाच्या विविध स्पर्धा असतात आणि त्या खेळाडूच्या वजनावर विभागलेल्या असतात. हा खेळ देखील ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

जुडो हा एक खेळ आहे जो पूर्वीच्या काळी संरक्षणासाठी खेळला जायचा. जुडो हा खेळ देखील कराटे सारखाच असतो. या खेळामध्ये कोणतेही शस्त्र किवा अस्त्र वापरले जात नाही तर या खेळामध्ये आपल्या हाताचा वापर करून खेळला जातो. जुडो हा खेळ देखील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट केला गेला आहे.

हँडबॉल हा एक जलद गतीचा सांघिक खेळ आहे ज्यामध्ये पळणे, उडी मारणे आणि फेकणे याचा समावेश आहे. हा खेळ २ संघामध्ये खेळला जातो आणि हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतात. या दोन संघांमध्ये प्रत्येकी ७ खेळाडू असतात आणि त्यामध्ये १ गोलरक्षक आणि राहिलेले ६ बाहेरील खेळाडू असतात. या खेळाचे मुख्य २ प्रकार आहेत आणि ते म्हणजे मैदानी खेळ (outdoor game) आणि बंदिस्त जागेतील खेळ (indoor game).

हँडबॉल गेम ६० मिनिटाचा असतो आणि १५ मिनिटांचा ब्रेक असतो आणि प्रत्येक ३० मिनिटांच्या दोन कालावधीत विभागले गेले आहे. या खेळाचे मुख्य उद्दीष्ट प्रतिस्पर्ध्याच्या गोलमध्ये चेंडू फेकणे हे असते. हँडबॉल खेळाचे मैदान आयताकृती असते आणि या मैदानाच व्यास ४० बाय २० मीटर असून मैदानाला कोर्ट म्हंटले जाते.

नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किवा शूट करण्याची स्पर्धा. प्राचीन काळी नेमबाजी दगड किवा धनुष्य आणि बाण वापरून नेमबाजी करत होते. बंदूकांचा वापर करून नेमबाजी ची सुरुवात सामान्यता आधुनिक काळात बंदुकांच्या विकासासह १५ व्या आणि १६ व्या शतकात युरोपमध्ये त्याची झाली. नेमबाजी या खेळाला ऑलिम्पिक खेळामध्येहि खूप महत्वाचे स्थान आहे आणि नेमबाजीचे ऑलिम्पिक अथेन्स १८९६ पासून सुरु झाले.

त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स मेक्सिको १९६८ पासून स्त्रिया देखील नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागल्या. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजी कार्यक्रम म्हणजे पिस्तूल, रायफल आणि शॉटगन या तीन शाखांच्या एकूण १५ कार्यक्रमांचा समावेश असतो. ऑलिम्पियन सहा पुरुष स्पर्धा, सहा महिला स्पर्धा आणि तीन मिश्र संघात भाग घेतात. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजीच्या कार्यक्रमांची माहिती खाली तक्त्यामध्ये मंडळी आहे.

फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो.

फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात. हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये १५ मिनिटाचा ब्रेक असतो.

  • स्विमिंग – swimming 

स्विमिंग हि एक पाण्यामध्ये हालचाल करून पाण्यावरती तरंगण्याची कला आहे. पूर्वीच्या काळात हा एक व्यायामाचा प्रकार होता पण आता त्याचे स्प्वारूप बदलले आहे आता या कडे खेळ म्हणून पहिले जाते. हा खेळ अनेक स्पर्धेमध्ये समाविष्ट केला आहे आणि हा खेळ ऑलिम्पिक मध्ये देखील समाविष्ट केला आहे.

. हा खेळ २ किवा ४ खेळाडूंमध्ये खेळला जातो  आणि हा खेळ खेळण्यासाठी रॅकेट आणि चेंडू लागतो तसेच हा खेळ इनडोअर खेळला जातो कारण ह्या खेळाला मैदान लागत नाही तर एक विशिष्ठ प्रकारच्या टेबलची गरज असते बहुतेक त्या टेबलाला टेनिस कोर्ट म्हटले जाते ते समान दोन भागामध्ये मधी जाळी लावून विभागलेले असते.

  • वेटलिफ्टिंग – weightlifting 

वेटलिफ्टिंग म्हणजे एक लांबलचक लोखंडी कांबी असते आणि तिच्या दोन्ही बाजूला दोन वजनदार वर्तुळाकार चकत्या असतात आणि ते आपल्या दोन्ही हातांनी डोक्याच्या वरती उचलण्याची कला म्हणजे वेटलिफ्टिंग. वेटलिफ्टिंग हा खेळ देखील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळवला जातो.

  • ब्रेकडान्सिंग – breakdancing 

ब्रेकडान्सिंग या खेळाला ब्रेकिंग किवा बी बोईंग या नावानेदेखील ओळखले जाते. हा खेळ म्हणजे नृत्य करण्याचा एक उत्साही प्रकार ज्यामध्ये बॅक स्पीन, स्टायलीज्ड फुटवर्क, हेड स्पीन सारख्या  अथलीट चालींचा समावेश असतो.

  • स्केटबोर्डिंग – skateboarding 

स्केटबोर्डिंग हा एक मनोरंजनाचा आणि खेळाचा प्रकार आहे. ज्यामध्ये चाक लावलेल्या छोट्याश्या फळीवर संतुलन राखले जाते. १९५९ मध्ये प्रथम व्यावसायिक स्केटबोर्डिंग खेळले जावू लागले.

  • नेटबॉल – netball 

नेटबॉल हा खेळ सांघिक खेळ असून हा थोडासा बास्केट बॉल खेळासारखाच असतो. या खेळाची सुरुवात इंग्लंड मध्ये १९ व्या शतकापासून झाली.

कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच महाराज्यांच्या काळा पासून खेळला जाणारा खेळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुस्ती या खेळाला मल्ल युध्द या नावाने संबोधले जायचे तसेच कुस्ती हा खेळ कुश्ती या पार्शी शब्दापासून आला आहे.

हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूला पैलवान म्हंटले जाते आणि कुस्ती हा खेळ खेळण्यासाठी पैलवाणाची शरीरयष्टी चपळ आणि बुध्दी तेज असावी लागते आणि या खेळाचे मैदान चौरस किवा वर्तुळाकार असू शकते आणि या मैदानाला आखाडा म्हंटले जाते. या खेळामध्ये २ प्रतिस्पर्धी असतात आणि ते एकमेकांविरोधी खेळतात.

अ‍ॅथलेटिक्स हा स्पोर्टिंग इव्हेंटचा ( ऑलम्पिक) एक गट आहे ज्यामध्ये स्पर्धात्मक धावणे, गोळा फेकणे, थाळी फेक, उडी मारणे, आणि चालणे या सारखे एका व्यक्तीने खेळले जाणारे खेळ समाविष्ट असतात. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ट्रॅक आणि फील्ड, रस्ता धावणे, क्रॉस कंट्री रनिंग आणि रेस वॉकिंग.

पोलो खेळ म्हणजे घोड्यावरून जो काठीने चेंडू मारून खेळला जातो आणि हा खेळ चार खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान घोड्यावर बसून गवताच्या मैदानावर खेळला जातो. यामध्ये खेळ खेळण्यासाठी एक लाकडी बॉल आणि तो बॉल मारण्यासाठी एक लवचिक हँडल्स असलेले स्टिक किवा मालेट वापरले जातो.

पोलो हा खेळ गवताच्या मैदानावर खेळला जातो आणि पोलो या खेळाचे मैदान ३०० यार्ड लांबीचे आणि २०० यार्ड रूंद असते. पोलो हा जगातील सर्वात जुना ज्ञात संघ खेळ आहे आणि या खेळाची संकल्पना आणि त्यातील रूपे पूर्वपूर्व ६ व्या शतकापासून ते पहिल्या शतकापर्यंतची आहेत आणि या खेळाचा शोध इराणमध्ये लागला. पोलो हा खेळ ऑलम्पिक स्पर्धेमध्ये देखील समाविष्ट आहे.

ऑलम्पिक स्पर्धेदिली मध्ये दिली जाणारी पदक – medals 

ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मुख्यता तीन पदक जातात आणि ती म्हणजे सुवर्ण पदक, रोप्य पदक आणि कास्य पदक.

  1. सुवर्ण पदक : सुवर्ण पदक हे ऑलम्पिक स्पर्धेमधील एक सर्वोच्च पदक आहे तसेच हे पदक नोबेल पारितोषिक विजेत्यास दिले जाते.
  2. रोप्य पदक : ऑलम्पिक स्पर्धेमधील एखादा खेळाडू कोणत्याही खेळामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला असेल तर त्याला रोप्य पदक दिले जाते.
  3. कास्य पदक : ऑलम्पिक स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूला दिले जाणारे पदक म्हणजे कास्य पदक.

२०२० मधील ऑलम्पिक पदे मिळवणारे देश – 2020 olympic information in marathi

रँकदेशगोल्डसिल्वर ब्राँझटोटल
1युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका394133113
2चीन38321888
3जपान27141758
4ग्रेट ब्रिटन22212265
5आरओसी20282365
6ऑस्ट्रेलिया1772246
7नेदरलँड10121436
48भारत1247

२०२० मधील भारतीय ऑलम्पिक विजेते खेळाडूंची नावे

खेळाडूखेळगोल्डसिल्वर ब्राँझ
एन. चोप्राअॅथलेटिक्स

पुरुषांची भालाफेक

100
पीव्ही सिंधू

 

बॅडमिंटन

महिला एकेरी

001
एल. बोर्गोहेन

 

बॉक्सिंग

महिलांचे वेल्टरवेट

001
डी. सिंह, एम. सिंह आणि बरेच काहीहॉकी

पुरुषांची स्पर्धा

001
सी. मीराबाई

 

वजन उचल

महिला 49 किलो

010
के. रवी

 

कुस्ती

पुरुषांची फ्रीस्टाइल 57 किलो

010
बी. पुनिया

 

कुस्ती

पुरुषांची फ्रीस्टाइल 65 किलो

001

२०२० मध्ये सर्वात जास्त पदके मिळणाऱ्या खेळाडूंची यादी

धावपटूगोल्डसिल्वरब्राँझटोटल
सी. ड्रेसेल5005
ई. मॅकेऑन4037
के. मॅककेउन3014
एस.एएन3003
E. थॉम्पसन-हेरा3003

२०१६ मधील भारतीय ऑलम्पिक विजेते खेळाडूंची नावे – olympic players information in marathi

खेळाडूचे नावखेळाचा प्रकारपदक आणि पात्रता
साक्षी मलिककुस्ती ( ५८ किलो गट )कास्य पदक
पी. व्ही. सिंधूबॅडमिंटनरोप्य पदक
दीपा करमाकरजीमनॅस्टीकजीमनॅस्टीक अप्पराटस अंतिम फेरी साठी पात्र ठरली
ललिता बाबरलांब अंतर धावपट्टूअंतिम शर्यतीसाठी पात्र ठरली
अभिनव ब्रिंद्राएयर रायफल शुटींगचौथ्या स्थानावर

 २०१६ मधील ऑलम्पिक पदे मिळवणारे देश – 2016 olympic information in marathi

देशसुवर्ण पदकरोप्य पदककास्य पदकएकूण पदक
अमेरिका४६३७३८१२१
चीन२६१८२६७०
ब्रिटन२७२३१७६७
रशिया१९१८१९५६
जर्मनी१७१०१५४२
फ्रांस१०१८१४४२
जपान१२२१४१
ऑस्ट्रोलिया१११०२९
इटली१२२८
सावूथ कोरिया२१
भारत

आम्ही दिलेल्या olympic information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर ऑलिंपिक या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about olympic in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि olympic information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

3 thoughts on “ऑलिंपिक खेळाची माहिती Olympic Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!