fibroid information in marathi – fibroid meaning in marathi फायब्रॉइड विषयी माहिती, फायब्रॉइड्स हे गर्भाशयाशी संबधित आहे आणि आज आपण या लेखामध्ये फायब्रॉइड्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फायब्रॉइड्स हे सामान्य आहेत आणि हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स हे ट्युमर प्रकारचे आहेत जे स्त्रियांच्या गर्भाशयात वाढतात आणि हे कर्करोगजन्य नसतात आणि हे ५ पैकी एका महिलेला त्यांच्या बाळंतपणाच्या वर्षामध्ये असू शकतात. फायब्रॉइड्स हे कमी वय असणाऱ्या स्त्रीयांच्यामध्ये वाढत नाहीत तर हे जास्त वय असणाऱ्या म्हणजेच ५० पेक्षा अधिक वय असणाऱ्या स्त्रियांच्यामध्ये वाढू शकतो.
फायब्रॉइड्स हे गर्भाशयामधे वाढण्याचे मुख्य काय कारण आहेत ते अजून समजले नाही तरी देखील हे शरीरातील हार्मोन्स आणि जीन्स या मुळे होतात असे म्हटले जाते. कोणत्याही स्त्रीच्या गर्भाशयामध्ये तयार होणारे फायब्रॉइड्स हे इतके लहान असतात कि ते आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत तर ते पाहण्यासाठी सुक्ष्म दर्शकाची आवश्यकता असते.
फायब्रॉइड विषयी माहिती – Fibroid Information in Marathi
फायब्रॉइड्स म्हणजे काय – fibroid meaning in marathi
गर्भाशयाचे फायब्रॉइड्स हे गर्भाशयाचे सामान्य कर्करोग नसलेले एक ट्युमर आहेत. हे गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीमध्ये वाढतात आणि हे ३५ ते ४० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांच्यामध्ये वाढतात.
गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स वाढण्याची लक्षणे – symptoms
जर एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जास्त प्रमाणात फायब्रॉइड्स वाढत असल्यास त्याची काही लक्षणे दिसून येतात आणि ती लक्षणे कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- जर एखाद्या संबधित स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात किंवा खूप रक्तस्त्राव होतो किंवा कधी कधी रक्ताच्या गुठळ्या होतात अश्या स्त्रीयांच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्सचे प्रमाण वाढलेले असते.
- अश्या केसेसमध्ये महिलांच्यामध्ये पोटाच्या खालच्या भागामध्ये हलकासा किंवा पूर्णपणे दाब जाणवतो त्यावेळी फायब्रॉइड्स वाढल्याची शक्यता असते.
- जर अधिकवेळा लघवी होत असल तर हे देखील गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स वाढण्याचे लक्षण आहे.
- मासिक पाळीच्यादरम्यान रक्तस्त्राव होतो आणि मासिक पाळी हि सामान्य कालावधीपेक्षा अधिक काळ राहत असेल तर हे देखील फायब्रॉइड्स वाढल्याचे लक्षण आहे.
- हे पेल्विक क्रॅम्पिंग किंवा मासिक पाळी सह वेदना.
फायब्रॉइड्स वाढण्याची किंवा विकसित होण्याची कारणे – reasons
- आशियाई महिलांच्यामध्ये लक्षनात्मक गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे प्रमाण कामी असते.
- हे लठ्ठपणा गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सशी संबधित आहेत आणि लठ्ठ महिलांना फायब्रॉइड्स होण्याचा धोका सरासरी वजनाच्या स्त्रियांच्यापेक्षा २ ते ३ पट जास्त असते.
- लाल मांस, गोमांस आणि हॅम या प्रकारचे अन्न जास्त प्रमाणात ज्या स्त्रियांच्या आहारामध्ये असते अश्या स्त्रीयांच्यामध्ये देखील फायब्रॉइड्सचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढते.
- कुटुंबातील एखाद्या स्त्री सदस्याला फायब्रॉइड्स असल्यास धोका वाढतो.
- हे शरीरातील हार्मोन्स आणि जीन्स या मुळे देखील होते.
फायब्रॉइड्स हा कर्करोगामध्ये आढळतो ?
फायब्रॉइड्स हे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये वाढत असतात आणि अनेकांना अशी भीती असते कि फायब्रॉइड्सच्या वाढीमुळे त्याचे कर्करोगामध्ये रुपांतर होते काय परंतु तसे काही नसते, गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्सच्या वाढीमुळे कोणत्याही प्रकारचा धोका वाढत नाही आणि १००० पैकी १ स्त्रीमध्ये कर्करोगजन्य फायब्रॉइड्स आढळतो.
फायब्रॉइड्स वाढीचे निदान कसे केले जाते ?
कोणतीही आरोग्य समस्या तपासण्यासाठी कोणती ना कोणती उपचार प्रक्रिया वापरली जाते आणि तसेच फायब्रॉइड्स प्रमाण किंवा फायब्रॉइड्स वाढ तपासण्यासाठी देखील काही उपचार प्रणाली वारली जाते आणि त्यामध्ये कोणकोणती उपचार प्रणाली समाविष्ट आहे ते खाली आपण पाहूया.
- चुंबकीय अनुनाद इमेजिंग (एमआरआय) : चित्र तयार करण्यासाठी चुंबक आणि रेडीओ लहरींचा वापर केला जातो.
- कॅट स्कॅन: अधिक संपूर्ण चित्रांसाठी वेगवेगळ्या कोनातून शरीराची अनेक एक्स रे चित्रे घेते.
- अल्ट्रासाऊंड: एखाद्या स्त्रीमध्ये फायब्रॉइड्स आहेत कि नाही याचे निदान करण्यासाठी आणि त्या विषयी चित्र तयार करण्यासाठी ध्वनी लहरी वापरल्या जातात. अल्ट्रासाऊंड तपासणी ओटीपोटावर ठेवली जाऊ शकते किंवा अल्ट्रासाऊंडदरम्यान योनीच्या आत ठेवली जाऊ शकते.
- क्ष किरण: फायब्रॉइड्सचे निदान करण्यासाठी क्ष किरणांचा देखील वापर केला जातो आणि यामध्ये चित्र तयार करण्यासाठी रेडीएशनचा एक प्रकार वापरला जातो.
डॉक्टरांना भेट केंव्हा घ्यावी
- जर तुमच्या ओटीपोटातील वेदना दूर होत नसतील तर तुम्हाला लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- जर तुम्हाला मुत्रविसर्जन करताना त्रास होत असेल तर अश्यावेळी देखील लगेच डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते.
- मासिक पाळीच्या दरम्यान जर स्पॉटिंग आणि रक्तस्त्राव होत असेल त्यावेळी त्या संबधित महिलेने लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- तुम्हाला जर सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर अश्यावेळी तुमच्या लाल पेशी कमी झालेल्या असतात आणि त्यावेळी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते.
फायब्रॉइड्स विषयी काही विशेष तथ्ये – facts
- कमीत कमी २५ टक्के स्त्रियांच्यामध्ये फायब्रॉइड्स असतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्या उद्भवते.
- फायब्रॉइड्स हे खूपच लहान म्हणजेच छोट्या बियांच्या आकाराचे असतात किंवा मग ते द्राक्ष्यांच्या आकाराचे असते म्हणजेच हे संखेत आणि आकारात भिन्न असतात.
- फायब्रॉइड्स ला गर्भाशयाचे मायोमास किंवा लियोमायोमास म्हणून ओळखले जाते.
- फायब्रॉइड्सच्या वाढीमुळे कोणतीही धोकादायक लक्षणे दिसत नाहीत.
- हे ३० ते ५० वर्ष वयोगटातील स्त्रियांच्यामध्ये जास्त वाढते.
- इंट्राम्युरल फायब्रॉइड्स, सबम्यूकोसल फायब्रॉइड्स आणि सबसेरोसाल फायब्रॉइड्स हे फायब्रॉइड्सचे वेगवेगळे तीन प्रकार आहेत.
- बऱ्याच स्त्रियांना गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्सची वाढ आहे हे माहिती नसते कारण त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या fibroid information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फायब्रॉइड विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fibroid meaning in marathi या uterine fibroid meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about fibroid in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये fibroid uterus meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट