fire brigade information in marathi – agnishamak dal अग्निशमन दल माहिती मराठी, कोणत्याही घराला किंवा दुकानाला किंवा कोणत्याही ठिकाणाला कोणत्याही कारणाने जर आग लागली असेल तर सर्वात पहिला मदतीसाठी बोलावलं जाणारा दल म्हणजे अग्निशमन दल ज्याला आपण इंग्रजीमध्ये fire brigade (फायर ब्रिगेड) या नावाने ओळखतो. आगीपासून वाचवणारा दल म्हणून या दलाला ओळखले जाते आणि हा आपल्याला संकटाच्या काळामध्ये मदत करणार आपला मित्रच आहे असे मला वाटते. अग्निशमन दलाला अग्निशमन सेवा किंवा अग्निशमन प्राधिकरण या नावांनी देखील ओळखले जाते.
अग्निशमन दल हा प्रत्येक देशातील ४ क्रमांकाची एक महत्वाची सुरक्षा सेवा आहे. अग्निशमन दल हे फक्त युद्धाच्या वेळीच मदत करत नाहीत तर शांततेच्या वेळी जर कोणतीही अगीविषयक आपत्ती आली असेल तर हा दल मदत करतो. अग्निशमन दल हा त्यांच्या क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आग लागली असेल तर आग विझवण्याचे काम करते आणि आज आपण या लेखामध्ये अश्या या आगीपासून वाचवणाऱ्या आणि आगीपासून मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या दलाविषयी माहिती घेणार आहोत.
अग्निशमन दल माहिती मराठी – Fire Brigade Information in Marathi
अग्निशमन दलाची माहिती – fire brigade in marathi
अग्निशमन हा एक प्रशिक्षित लोकांचा दल असतो जो अपत्कालिक परिस्थितीमध्ये आग विझवण्यासाठी आणि आगीपासून होणारे नुकसान थांबवण्यासाठी मदत करत असतात. अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अगनिशामक असे म्हणतात आणि ते अग्निशमन केंद्रावर २४ तास उपलब्ध असतात.
आणि ज्यावेळी त्यांना त्यांच्या क्षेत्रातील कोणत्याही आपत्कालीन ठिकाणाहून कॉल आल्यानंतर ते त्या ठिकाणी लगेच मदतीसाठी जातात आणि त्या ठिकाणावरी आग विझवण्याचा आणि आगीपासून मालमत्तेचे होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. अग्निशमन दल हे एक सार्वजनिक दल किंवा संस्था आहे आणि हि दल राष्ट्र, राज्य, जिल्हा आणि नगरपालिकेमध्ये कार्यरत असते.
अग्निशमन दलाविषयी अनेकजण असे म्हणतात कि सर्वात जुनी ज्ञात असलेली अग्निशमन सेवा हि प्राचीन रोममध्ये मार्कस एग्नेशियस रुफस याने केली होती आणि त्यावेळी त्याने त्याच्या गुलामांना या सेवेसाठी कार्यरत केले होते आणि त्या काळामध्ये बादल्यांच्या साकळ्या करून आगीवर मात करत होते. आपल्या भारत देशामध्ये ३०००. हजार हून कमी अग्निशमन दल आहेत तर भारतामध्ये ८००० पेक्षा जास्त अग्निशमन केंद्रे असली पाहिजेत असे सरकारचे म्हणणे आहे.
अग्निशमन दलाचा सुरुवातीचा इतिहास – history
अग्निशमन दलाची सेवा हि सर्वात जुनी सेवा आहे आणि अग्निशमन सेवा हि प्राचीन रोममध्ये मार्कस एग्नेशियस रुफस याने केली होती आणि त्यावेळी त्याने त्याच्या गुलामांना या सेवेसाठी कार्यरत केले होते आणि त्या काळामध्ये बादल्यांच्या साकळ्या करून आगीवर मात करत होते.
मग आधुनिक काळामध्ये आधुनिक अग्निशमन हे १८ व्या शतकापासून सुरु झाले आणि आधुनिक अग्निशमन दलाची सुरुवात हि फ्रान्स या देशामध्ये झाली. भारतामध्ये दिल्ली मुन्सिपल कमिटीच्या नियंत्रणा खाली स्वतंत्रपणे काम करत असलेल्या २ अग्निशमन केंद्रांच्या एकत्रीकरणानंतर १९४२ मध्ये दिल्ली या शहरामध्ये अग्निशमन सेवा अस्तित्वात आली.
अग्निशमन दलातील अग्निशामकाची कार्ये – roles and responsibilities
- अग्निशामाकाचे मुख्य कार्य म्हणजे अपत्कालिक परीस्थितीमध्ये ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणावरील आग विझवणे आणि संपत्तीचे संरक्षण करणे.
- अग्निशामक फायर ट्रक चालवतात तसेच इतर अप्त्कालिक उपकरणे चालवणे.
- जर एखाद्या इमारतीमध्ये आग लागली असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचवणे.
- अप्त्कालिक ठिकाणावरील आग अग्निशामक यंत्रे, पाण्याचे पंप, पाण्याचे टँकर आणि पाण्याचे लांब नळ्या वापरून आग विझवणे.
- आपत्कालीन घटनांचे लेखी अहवाल तयार करण्याचे महत्वाचे काम अग्निशामकाचे काम असते.
- अग्निशमन उपकरणांची देखभाल करणे तसेच उपकरणे स्वच्छ ठेवणे.
अग्निशमन उपकरणे म्हणजे काय ?
अग्निशमन उपकरणे म्हणेजे हि उपकरणे आग विझवण्यासाठी किंवा वापर करणाऱ्या व्यक्तीचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेली किंवा शोधात आलेली उपकरणे म्हणजे अग्निशमन उपकरणे. या उपकरणांचा वापर हा एखाद्या ठिकाणवर जर आग लागली असेल ती विझवण्यासाठी तसेच मालमत्तेचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आणि व्यक्तीची देखील आगीपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
अग्निशमन उपकरणे : आगीपासून कोणत्याही मालमत्तेचे संरक्षण आणि बचाव करण्यासाठी कोणकोणत्या उपकरणांचा वापर करतात ते खाली पाहूया.
- आग विझवण्याची साधने : आग विझवण्यासाठी पाणी, कोरडी रासायनिक पावडर, कार्बन, फोम, डाय ऑक्साईड या प्रकारचे पदार्थ वापरणे.
- स्थापित अग्निशमन यंत्रणा : यामध्ये मुख्य पाणी पुरवठा यंत्रक, स्प्रिंकलर, हायड्रंट, इलेक्ट्रिक कट ऑफ सिस्टीम, पोर्टेबल जनरेटर आणि पोर्टेबल पंप.
- फायर फायटरचे गिअर : आग प्रतिरोधक बाह्य सूट, लोकरीचे मोजे, हेल्मेट, संपर्क यंत्रणा, श्वासोच्छवासाची उपकरणे.
- फायर डिटेक्शण आणि अलार्म सिस्टीम : स्पार्क डिटेक्टर, स्थानिक केंद्रीकृत स्वयंचलित, मॅन्युअल फायर अलार्म सिस्टम.
- दळणवळणाची साधने : वॉकी-टॉकी, लँडलाईन टेलिफोन, सेल आणि मोबईल फोन, व्हॉईस पाईप आणि रेडीओ.
- इतर उपकरणे : पाण्याची बादली, हातोडा, फायर एक्स, कटर, हुक, अपत्कालिक जीवन रक्षक उपकरणे.
अग्निशमन दलाविषयी महत्वाची माहिती – information about fire brigade in marathi
अग्निशमन दलाची भूमिका काय आहे ?
ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणावर जाऊन तेथील आग विझवणे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे. तसेच रहदारीच्या रस्त्यावर अपघात झाल्यास लोकांना वाचवणे आणि त्यांचे संरक्षण करणे.
भारतामध्ये किती अग्निशमन दल आहेत ?
आपल्या भारत देशामध्ये ३०००. हजार हून कमी अग्निशमन दल आहेत तर भारतामध्ये ८००० पेक्षा जास्त अग्निशमन केंद्रे असली पाहिजेत असे सरकारचे म्हणणे आहे.
अग्निशमन दलाची सेवा केंव्हा सुरु असते ?
अग्निशमन दलाची सेवा हि २४ तास सुरु असते आणि आपण संकटाच्यावेळी किंवा आपत्कालीन परिस्थिती मध्ये त्यांच्याकडे मदत मागितली तर ते लगेच आग विझवण्यासाठी आणि आणि संरक्षण करण्यासाठी धाऊन येतात.
अग्निशमन सेवा भारतामध्ये केंव्हा व कोठे अस्तित्वात आली ?
आगी पासून लोकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाची स्थापना सर्वप्रथम १९४२ मध्ये दिल्ली या शहरामध्ये झाली.
अग्निशमन दलाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला ?
अग्निशमन सेवा हि प्राचीन रोममध्ये मार्कस एग्नेशियस रुफस याने केली होती.
आम्ही दिलेल्या fire brigade information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अग्निशमन दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fire brigade information in marathi wikipedia या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about fire brigade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये fire brigade meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट