फॉलीनेक्स्ट गोळीविषयी माहिती Folinext Tablet Information in Marathi

folinext tablet information in marathi फॉलीनेक्स्ट गोळीविषयी माहिती, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात ज्यामध्ये अनेक पोषक घटक आणि तत्व समावलेले असतात आणि फॉलीनेक्स्ट (folinext) देखील त्या प्रकारातील एक गोळी आहे आणि आज आपण या लेखामध्ये फॉलीनेक्स्ट या गोळीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. फॉलीनेक्स्टच्या गोळ्या ह्या मल्टीविटामीन्सशी संबधित गोळ्या आहेत आणि प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंतीमध्ये किंवा दीर्घकालीन आजारांच्यामुळे शरीरामध्ये चांगल्या पोषणाची कमतरता भासते.

आणि या कमतरतेवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. फॉलीनेक्स्ट या गोळीमध्ये फॉलिक अॅसिड आणि मेथाइलकोबालामीन याचा समावेश असतो त्यामुळे एका व्यक्तीमध्ये शरीरामध्ये असणाऱ्या फॉलिक अॅसिडची कमतरता भरून काढण्यास मदत करते.

तसेच लाल रक्तपेशींचा अभाव, न्युरॉलॉजीकल रोग, फेफरे आणि व्हिटामिन बी १२ याची कमतरता या वर उपचार म्हणून या गोळीचा वापर होऊ शकतो परंतु हि गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली पाहिजे. चला तर खाली आपण फॉलीनेक्स्ट या गोळीविषयी सविस्तर माहिती घेवूया.

folinext tablet information in marathi
folinext tablet information in marathi

फॉलीनेक्स्ट गोळीविषयी माहिती – Folinext Tablet Information in Marathi

फॉलीनेक्स्ट गोळी कसे काम करते ?

फॉलीनेक्स्ट हि गोळी फॉलिक अॅसिड आणि मेथाइलकोबालामीन या दोन घटकांनी बनलेले आहे आणि हे दोन घटक शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करतात ते कसे करतात ते खाली आपण पाहूया.

फॉलिक अॅसिड

फॉलिक अॅसिड हे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करते म्हणजेच हे नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये काम करते त्याचबरोबर हे कर्करोग मध्ये कारणीभूत असणाऱ्या डीएनए (DNA) मधील बदल टाळण्यासाठी देखील याची मदत होऊ शकते तसेच शरीरामध्ये फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यानंतर देखील याचा वापर होतो.

मेथाइलकोबालामीन

फॉलिक अॅसिड आणि मेथाइलकोबालामीन हे मायलीनचे आरोग्य राखण्यास मदत करते त्याचबरोबर हे फॉस्फोलिपिड्स आणि प्रथिने बनलेली असते जे तांत्रिक तंतूभोवती पांढरे झाकण बनवतात.

फॉलीनेक्स्ट गोळ्यांचा फायदा किंवा उपचार – folinext tablet uses in marathi

फॉलीनेक्स्ट या गोळीमध्ये फॉलिक अॅसिड आणि मेथाइलकोबालामीन या गोष्टी समाविष्ट आहेत आणि हि गोळी अनेक आरोग्य समस्या वर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरते. खाली आपण हि गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली तर कोणकोणते फायदे होतात ते खाली आपण पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींचा अभाव असेल तर त्या वाढवण्यासाठी या गोळीची मदत होऊ शकते पण हि गोळी घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
  • फॉलीनेक्स्ट या गोळीचा वापर हा गरोदरपणामध्ये देखील होतो म्हणजेच गरोदर पणाच्या काळामध्ये शरीरामधील फोलेटची पातळी वाढवण्यास मदत होते.
  • बधीरपणा आणि मुंग्या येणे यावर देखील हि गोळी उपयोगी ठरू शकते.
  • न्यूरल ट्यूब दोषांचा धोका टाळण्यासाठी गर्भधारणा पूरक फॉलीनेक्स्ट हि गोळी असते.
  • एकाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये व्हिटामिन बी १२ ची कमतरता असेल तर ते वाढवण्यासाठी या गोळीची मदत होऊ शकते परंतु हि गोळी कोणत्याही कारणासाठी घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

फॉलीनेक्स्ट गोळीचे दुष्परिणाम – side effects

जरी फॉलीनेक्स्ट हि गोळी जरी अनेक उपचारांच्यासाठी वापरली जात असली तरी या गोळीचे जास्त प्रमाणात डोस झाले तर त्याचे काही दुष्परिणाम देखील होतात ते काय काय आहेत ते खाली आपण पाहूया.

  • या गोळीच्या जास्त डोसमुळे त्या संबधित व्यक्तीला भूक लागत नाही.
  • तसेच त्या संबधित व्यक्तीच्या पोटामध्ये दुखू शकते म्हणजे त्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
  • अतिसार होणे.
  • मळमळ आणि उलटीचा त्रास होणे.
  • पायामध्ये गोळा येणे या सारखे अनेक दुष्परिणाम दिसतात.
  • तसेच जास्त डोस घेतलेल्या व्यक्तीला लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते त्याचबरोबर झोपेची पद्धत देखील बदलते.
  • त्यामुळे छातीमध्ये घट्टपणा येतो त्याचबरोबर छातीमध्ये धडधडणे सुरु होते.
  • ओटीपोटीचा विस्तार वाढतो.
  • त्याचबरोबर सतत मानसिक उदासीनता जाणवते.

फॉलीनेक्स्ट गोळीचा डोस कसा घेतला जातो ?

फॉलीनेक्स्ट या गोष्टीचा डोस हा अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यासाठी केला जातो आणि हा डोस ज्या समस्येसाठी डॉक्टरांच्या कडून लिहून दिला जातो त्या नुसार डोस निश्चित केला जातो. फॉलीनेक्स्ट या गोळीचा सामान्य डोस हा दिवसातून दोन वेळा घेतला जातो.

परंतु काही वेळा या गोळीचा डोस हा रोग प्रकार, वजन, आरोग्य समस्या आणि वय या सारख्या अनेक गोष्टींच्यावर आधारित घेतला जातो. या गोळीचे डोस हे सकाळी काही ना खाण्याच्या पूर्वी घ्या म्हणजे त्याचा परिणाम हा चांगला होऊ शकतो.

फॉलीनेक्स्ट या गोळीविषयी काही महत्वाची माहिती – information about folinext tablet in marathi

  • फॉलीनेक्स्ट हि गोळी कोणत्याही मेडिकल मध्ये मिळू शकते आणि ३० गोळ्यांच्या स्ट्रिप्सची किंमत हि ९८ ते १०० इतकी असते.
  • फॉलीनेक्स्ट हि गोळी काही सामान्य समस्यांच्यासाठी घेतली जाते आणि हि गोळी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेतात परंतु हि गोळी जरी सामान्य समस्येसाठी देखील हि गोळी घेताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन घेतली पाहिजे.
  • फॉलीनेक्स्ट हि गोळी घरामध्ये लहान मुलांच्या पासून सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे जेणे करून ती त्यांना सापडणार नाही.
  • फॉलीनेक्स्ट हि कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवावी त्यामुळे ती चांगली राहण्यास मदत होते.
  • गर्भवती होण्याअगोदर गर्भवती स्त्रीमध्ये फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढवण्यासाठी या गोळीचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे बाळाचे मणक्याचे आणि मेंदूचे गंभीर जन्मजात विकृती टाळण्यासाठी मदत करू शकते.
  • या गोळी मध्ये फॉलिक अॅसिड ५ मिली ग्रॅम इतके असते आणि मेथाइलकोबालामीन हे प्रमाण ७५० एमसीजी इतके असते.

आम्ही दिलेल्या folinext tablet information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फॉलीनेक्स्ट गोळीविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या folinext tablet uses in marathi या folinext gold tablet in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about folinext tablet in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये folinext tablet use in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!