गलांडा फुल शेती माहिती Galanda Flower Information in Marathi

galanda flower information in marathi गलांडा फुल शेती माहिती, आपण वेगवेगळ्या रंगाची, आकाराची आणि जातीची फुले देवाच्या पूजेसाठी, मंदिरामध्ये आणि सजावटीसाठी वापरले जाते आणि तसेच गलांडा देखील एक प्रकारचे फुल आहे जे पूजेसाठी तसेच सजावटीसाठी वापरले जाते आणि आज आपण या लेखामध्ये गलांडा फुलाविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. गलांडा हे एक प्रकारचे फुल आहे आणि हे फुल सामान्य आहे म्हणजेच हे जवळ जवळ सर्वांच्या परिचयाचे आहे कारण हे अनेक वेळा देव पूजेसाठी आणि सजावटीसाठी वापरले जाते.

गलांड फुल हे मध्यम आकाराचे संपूर्ण पिवळ्या रंगाचे किंवा पिवळा आणि पाकळ्यांना साधारण लाल रंग असते आणि आणि या फुलाला जास्त प्रमाणात पाकळ्या असतात त्यामुळे हे फुल आकर्षक आणि सुंदर असते आणि म्हणून या फुलांचा वापर देवघरातील किंवा मंदिरातील पूजेसाठी वापरले जाते, त्याचबरोबर हे फुल मंगल कार्यामध्ये सजावटीसाठी वापरले जाते, तसेच सध्या फुलांची रांगोळी बनवणे हि एक क्रेझ आली आहे.

आणि फुलांची रांगोळी बनवण्यासाठी देखील या फुलांचा वापर होतो त्याचबरोबर केसांच्यामध्ये माळण्यासाठी देखील हि फुले वापरली जातात. गलांडा या फुलांचा वापर हा अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जातो त्यामुळे या फुलांची लागवड किंवा पिक हे भारताच्या अनेक भागांच्यामध्ये घेतले जाते आणि मुख्यता महाराष्ट्र राज्यातील अनेक भागामध्ये या फुलांचे पिक घेतले जाते.

galanda flower information in marathi
galanda flower information in marathi

गलांडा फुल शेती माहिती – Galanda Flower Information in Marathi

नावगलांडा किंवा गॅलर्डीया
कुटुंबअस्टेरेसि (asteraceae)
रंगपिवळा, वाईन लाल, पीच किंवा नारंगी
आकारमध्यम (३ इंच)
हवामानउष्ण आणि दमट

गलांडा फुलाविषयी महत्वाची माहिती

गलांडा हे फुल एक मध्यम आकाराचे फुल आहे जे अस्टेरेसि ( asteraceae ) कुटुंबातील एक फुल असून या फुलाला गॅलर्डीया ( Gaillardia ) या नावाने देखील ओळखले जाते. सुंदर आणि आकर्षक फुल पूर्णपणे पिवळ्या किंवा लाल आणि पिवळ्या रंगाचे असते आणि हे उष्ण आणि दमट हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाढते.

या फुलांची झाडे हि ३६ इंच उंच वाढतात आणि फुलांच्या झाडांचा रंग हा हिरव्या रंगाचे असतात आणि फुलांच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर ह्या फुलांचा आकार हा ३ इंच म्हणजेच ७ सेंटी मीटर इतका असतो.

या फुलांचा रंग पिवळा, वाईन लाल, पीच किंवा नारंगी असतो आणि या फुलांची रचना हि एकल, दुहेरी किंवा अर्ध दुहेरी असू शकते. गलांडा या फुलांची जाती हि बारामहिने पिकणारी जाती आहे आणि हि फुले पूर्ण सूर्यप्रकाशात वाढतात आणि या फुलांच्या चांगल्या वाढीसाठी चिकणमाती किंवा वाळूमतीची जमीन आवश्यक असते.

गलांडा फुलाचे मूळ स्थान – origion

सध्या गलांडा किंवा गॅलर्डीया हे फुल भारतामध्ये अनेक ठिकाणी पिकवले जात असले तरी या फुलाचे मूळ हे उत्तर अमेरिकेतील आहे आणि या ठिकाणी हे विपुल प्रमाणात आहेत आणि या फुलाला अमेरिकेमध्ये ब्लँकेट फ्लॉवर म्हणून ओळखले जाते. तसेच या प्रकारची फुले हि नॉर्थ कॅरोलीना ते फ्लोरिडा पर्यंत पूर्णपणे नैसर्गिक आहेत. या फुलाची मोठ्या प्रमाणात लागवड हि उत्तर अमेरिका आणि मेक्सिको या देशामध्ये केली जाते .

गलांडा फुलांची काळजी – care

जरी गलांडा फुलांची लागवड केली तर त्याचे चांगले पिक घेण्यासाठी त्याची नियमित काळजी घेणे आवश्यक असते आणि त्यामुळे झाडे चांगली राहण्यासाठी काही नियमित गोष्टी कराव्या लागतात त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहूया.

  • गलांड फुलांच्या झाडांना दर दोन आठवड्यांनी किमान एकदा तरी पाणी देण्याची गरज असते त्यामुळे दोन आठवड्यांनी नियमित पाने द्यावे.
  • तसेच या फुलांची चांगली वाढ होण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला तर ते अगदी योग्य ठरेल.
  • गलांडा हे फुल चांगल्या सूर्यप्रकाशात वाढते त्यामुळे हि फुले चांगल्या सूर्यप्रकाशात वाढवणे कधीही चांगले.

गलांडा फुलाचे वेगवेगळे उपयोग – uses

गलांडा फुलाचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • गलांडा हि फुले दिसायला खूप आकर्षक असतात त्यामुळे ह्या प्रकारची प्रजाती हि शोभेच्या गुणधर्मासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
  • हि फुले मोठ मोठ्या कार्यक्रमांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यासाठी देखील वापरली जातात.
  • गलांडा हे फुला घरातील आणि मंदिरातील देवाच्या पूजेसाठी किंवा मोठ्या मूर्त्यांच्यासाठी हार बनवण्यासाठी वापरले जातात.
  • या फुलाच्या बागेमध्ये हमिंगबर्ड्स आणि फुलपाखरे देखील आकर्षित होतात.
  • सध्या फुलांची रांगोळी काढण्याची मठी क्रेझ आली आहे आणि या फुलांच्या रांगोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या रंगाची फुले वापरली जातात आणि त्यामध्ये गलांडा हा फुल प्रकार देखील वापरला जातो.
  • जलद वाढीचा दर असलेली हि फुले विस्कळीत क्षेत्र, बागा, कचरा मैदान, बेबंद शेत, किनारी जंगले या सारख्या वसाहतीसाठी योग्य आहेत.
  • भारतीय स्त्रिया केसांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुले मळतात जसे कि मोगरा, गुलाब आणि इतर अशी अनेक प्रकारची फुले तसेच गलांडा देखील अनेक स्त्रिया केसांच्यामध्ये माळतात तसेच त्याची वेणी किंवा गजरा बनवून ते केसंच्यामध्ये घालतात.
  • या फुलांचा सुंगंध हा मधाची आठवण करून देतो त्यामुळे तो मधमाश्या आणि इतर अनेक कीटकांना आकर्षित करतो जे त्याचे परागकण करतात.
  • अमेरिकन लो अँटीस्पास्मोडीक, सेडेटिव्ह, इमेटीक, आणि शुध्दीकरणासाठी औषध म्हणून गलांडा फुलाचा वापर केला जातो.

आम्ही दिलेल्या galanda flower information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गलांडा फुल शेती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या galanda flower farming in marathi या Galanda flower information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about galanda flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!