gdca information in marathi – gdca course information in marathi जीडीसीए कोर्सची माहिती, आपल्या देशामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत जे त्यांच्या परिस्थिमुळे १० वी आणि १२ वी परायान्ताचे शिक्षण घेवू शकतात आणि १० वी आणि १२ पर्यंतचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या कामासाठी चांगल्या संस्थेमध्ये किंवा कंपनी मध्ये नोकरी मिळता नाही. असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांना कमी खर्चामध्ये चांगले शिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायची असते आणि अश्या विद्यार्थ्यांच्यासाठी १० वी किंवा १२ वी नंतर अनेक चांगले कोर्स आहेत.
जे त्या विद्यार्थ्यांच्या खर्चामध्ये बसणारे देखील आहेत आणि त्यामधील एक कोर्स म्हणजे जीडीसीए (GDCA) आणि आज आपण या लेखामध्ये जीडीसीए कोर्स विषयी पाहणार आहोत. जीडीसीए म्हणजे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (government diploma in cooperation and accountancy) आणि हा कोर्स दहावी किंवा बारावी नंतर केला जाऊ शकतो.
जीडीसीए हा एक वर्षाचा कोर्स आहे आणि या कोर्समध्ये शिस्त अपील नियम, नोंदणीचे अधिकार, बॉम्बे नागरी सेवा नियम, संयुक्त नोंदणी, विभागीय लेखा या विषयांच्यावर प्रशिक्षण दिले जाते आणि मग या कोर्समधील विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाते जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते.
जीडीसीए परीक्षा देण्यासाठी सरकाने काही शैक्षणिक आणि वयाविषयी काही पात्रता निकष ठरवले आहेत ते आपण खाली पाहणार आहोतच. चला तर आता आपण जीडीसीए हा कोर्स काय आहे आणि त्याची उपयोग कसा होता या सर्व गोष्टींच्या विषयी सविस्तर माहिती खाली घेवूया.
जीडीसीए कोर्सची माहिती – GDCA Information in Marathi
कोर्सचे नाव | जीडीसीए (GDCA) |
जीडीसीए पूर्ण स्वरूप – gdca full form in marath | गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (government diploma in cooperation and accountancy) |
कोर्सचा प्रकार | सरकारी कोर्स |
कोर्सचा कालावधी | १ वर्ष |
जीडीसीए म्हणजे काय – gdca course information in marathi
जीडीसीए हा एक कोर्स आहे जो १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करता येतो आणि हा एक १ वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये शिस्त अपील नियम, नोंदणीचे अधिकार, बॉम्बे नागरी सेवा नियम, संयुक्त नोंदणी, विभागीय लेखा प्रशिक्षण दिले जाते.
जीडीसीए परीक्षेचे स्वरूप – gdca exam information in marathi
जीडीसीए हा एक वर्षाचा कोर्स विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते आणि हि परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते आणि हि परीक्षा दोन टप्प्यामध्ये घेतली जाते ते काय आहेत ते आपण खाली सविस्तर पाहूया.
पहिला टप्पा :
परीक्षेचा पहिला टप्पा हा प्राथमिक टप्पा असतो ज्या टप्प्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि हा टप्पा एकूण २०० गुणांचा असतो.
दुसरा टप्पा :
दुसरा टप्पा देखील २०० गुणांचा असतो आणि या टप्प्यामध्ये वर्णनात्मक म्हणजेच प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यावी लागतात आणि यामध्ये इंग्रजी आणि तांत्रिक विभागाचे प्रश्न असतात.
जीडीसीए मध्ये असणारा अभ्यास क्रम – gdca exam syllabus in marathi
जीडीसीए हा कोर्स १ वर्षाचा असतो आणि त्यामध्ये २ पेपर घेतले जातात आणि हे दोन पेपर कोणकोणते ते आपण खाली पाहूया.
पेपर पहिला :
- बॅंकिंग : सहकारी ऑडीट आणि सहकारी व्यवस्थापन कायदा आणि इतर कायदे सहकाराचा सिध्दांत आणि इतिहास.
- भारतातील सहकारी चळवळीची वाढ आणि सहकारी चळवळीचा विकास.
- सहकारी पतपुरवठा समिती, मेहता समिती आणि कृषी पत पुनरावलोकन समिती याचा अभ्यास.
- अखिल भारतीय ग्रामीण पात सर्वेक्षण समिती अभ्यास.
- राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ.
- राज्य सहकारी संघ.
- सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गरजा आणि पायाभूत सुविधा.
पेपर दुसरा :
- बुककीपिंग तत्वे ( bookkeeping principles ).
- पावती आणि पेमेंट खाते ( receipt and payment account ).
- नफा आणि तोटा खाते ( profit and loss account ).
- अंतिम खाती ( Final account ).
- ट्रेडिंग खाते ( trading account ).
- लेखा तत्वे ( Accounting principles ).
- त्रुटी सुधारणे ( rectification of errors ).
- उत्पन्न आणि खर्च खाते (income and expenditure account ).
जीडीसीएसाठी अर्ज कसा करावा – how to register
- ज्या लोकांना या कोर्ससाठी अर्ज करायचा आहे त्यांनी जीडीसीए च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि मग तुमच्या समोर एक पेज उघडेल.
- आता जीडीसीए अर्ज या बटनावर क्लिक करा म्हणजे तुमच्या समोर जीडीसीए चा अर्ज उघडेल.
- आता अर्जामध्ये असणारा सर्व तपशील भरा तसेच जर काही कागदपत्रांच्या फाइल अपलोड कराव्या लागत असतील तर त्या फाइल अपलोड करा जसे कि तुमचे फोटोची फाइल आणि किंवा सही.
- आता सर्व तपशील परत तपासा आणि मग सबमिट बटनावर क्लिक करा.
जीडीसीए कोर्ससाठी पात्रता निकष – eiligibility criateria
जीडीसीए हि परीक्षा देण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने किंवा इच्छुक उमेदवाराने काही शैक्षणिक तसेच वयाची पात्रता निकष पार पडावे लागतात. या कोर्सच्या आयोगाने विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा इच्छुक उमेदवारांच्यासाठी काही पात्रता निकष ठरवले आहेत ते काय आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.
- संबधित विद्यार्थ्याने किंवा इच्छुक उमेदवाराने जर १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण कमीत कमी ५० टक्के गुण मिळवून पूर्ण केलेलं असावे.
- तसेच त्याचबरोबर जर एकाद्या विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी कॉम (B.COM) ५० टक्के किंवा त्यापेक्षा आधीक गुण मिळवून पूर्ण केले असेल तर हा विद्यार्थी देखील हा कोर्स करण्यास पात्र ठरतो.
- हा कोर्स करण्यासाठी १८ ते ३१ या वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्र सहकारी कर्मचारी देखील या कोर्ससाठी आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
जीडीसीए कोर्सचे फायदे – benefits
- जर एखाद्या विद्यार्थ्याने जीडीसीए हि परीक्षा दिल्यानंतर यामुळे उमेदवाराला लेखीपरीक्षण क्षेत्रात चांगली सहकारी स्थिती मिळते.
- परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लेखा आणि लेखापरीक्षण कार्यासाठी परवाना देखील दिला जावू शकतो.
- जीडीसीए हि परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला चांगल्या संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते.
आम्ही दिलेल्या gdca information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जीडीसीए कोर्सची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gdca course information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि gdca exam information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gdca exam syllabus in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट