जेनेरिक औषधांची माहिती Generic Medicine Information in Marathi

Generic Medicine Information in Marathi – Jenerik Medical Information in Marathi जेनेरिक औषधांची माहिती आज या लेखामध्ये आपण जेनेरिक मेडीसीन याबद्दल माहित घेणार आहोत. जेनेरिक मेडिसीन एक असा पर्याय आहे जो डॉक्टरांनी लिहून दिलेल्या महाग आणि केमिकल युक्त फार्मास्युटिकल औषधांचा एक चांगला पर्याय आहे. जेनेरिक औषध हे महागड्या औषधांसाठी निवडलेला एक पर्याय आहे. जो एका विशिष्ट समितीने बनवली आहेत. डोस फोर्म, सामर्थ्य, गुणवत्ता आणि कार्यप्रदर्शन या सारखी वैशीष्ठ्ये या प्रकारच्या औषधा मध्ये असतात. जेनेरिक औषधे हि फार्मास्युटिकल औषधा प्रमाणेच कार्य करतात आणि फार्मास्युटिकल औषधा प्रमाणेच लाभ देखील देतात.

generic medicine information in marathi
generic medicine information in marathi

जेनेरिक औषधांची माहिती – Generic Medicine Information in Marathi

जेनेरिक औषधे म्हणजे काय  – Generic Medicine Meaning in Marathi

जेनेरिक औषध हे महागड्या औषधांसाठी निवडलेला एक पर्याय आहे जो एका विशिष्ट समितीने बनवली आहेत. डोस फोर्म, सामर्थ्य, गुणवत्ता आणि कार्यप्रदर्शन या सारखी वैशीष्ठ्ये या प्रकारच्या औषधा मध्ये असतात.

जेनेरिक औषधांचे फायदे – benefits of generic medicine in marathi 

 • जेनेरिक औषधे त्यांच्या ब्रँड नावाच्या किंवा फार्मास्युटिकल औषध पर्यायांप्रमाणेच प्रभावी असू शकतात म्हणजेच या औषधांचा प्रभाव देखील फार्मास्युटिकल औषधा सारखाच असतो.
 • जेनेरिक औषधांची किमत हि ब्रँड औषधांच्यापेक्षा ८५ टक्के कमी असते. त्यामुळे जेनेरिक औषधे ब्रँड औषधांना पर्याय म्हणून वापरली तर त्यामुळे एकाद्या व्यक्तीचा जास्त होणारा खर्च कमी होतो कारण जेनेरिक औषधे स्वस्त असतात.
 • बर्‍याच लोकप्रिय ब्रँड नावाच्या औषधांना पर्याय शोधण्यासाठी रुग्णांना फारशी चौकशी करण्याची गरज नाही कारण १२००० पेक्षा जास्त जेनेरिक औषधे ग्राहकांसाठी उपलब्ध असतात.
 • काही लोकप्रिय जेनेरिक औषधे जी लोक मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे ती म्हणजे फेक्सोफेनाडाइन, कौमाडिन, वॉरफेरिन, ऍलर्जीचे औषध आणि ऍलेग्रा इ.
 • प्रिस्क्रिप्शन औषधे घेणे आवश्यक असलेल्या बर्‍याच लोकांच्यासाठी जेनेरिक औषधांचा पर्याय खूप चांगला आहे कारण जेनेरिक मध्ये प्रिस्क्रिप्शन औषधे मिळू शकतात आणि त्यामुळे एकाद्या व्यक्तिला औषधे देखील मिळतात आणि पैसे देखील वाचतात.
 • कमी किंमती मध्ये या प्रकारचे औषधांचे प्रभाव चांगले होतात.
 • जेनेरिक औषधे यूएस हेल्थ केअर सिस्टीममध्ये खर्च कमी ठेवण्यास मदत करतात.

जेनेरिक औषधांचे तोटे 

 • काही लोकांना जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा निकृष्ट वाटतात. .
 • ती औषधे सह सूत्रित नसल्यास, काही उच्च गोळ्यांचे ओझे पेलण्यास प्रतिबंध करू शकतात
 • जेनेरिक पुरवठादार बदलतात तेव्हा त्यांचा गोळीचा आकार किंवा रंग वेगळा असू शकतो.

जेनेरिक औषधांची नावे मराठी 

मधुमेहासाठी एक जेनेरिक औषध वापरले जाते ते म्हणजे मेटफॉर्मिन ज्याचे ब्रँड नाव ग्लुकोफेज असे आहे. जेनेरिक मधील उच्च रक्त दाबासाठी वापरलेले औषध म्हणजे मेटोप्रोलॉल आहे ज्या औषधाचे ब्रँड नाव लोप्रेसर असे आहे.

कोणकोणत्या कंपनीची जेनेरिक औषधे असतात ?

टेवा, नोव्हार्टिस, सँडोज, अम्नील, मायलॅन आणि एंडो इंटरनॅशनल यासह अनेक मोठ्या कंपन्या पारंपारिकपणे जेनेरिक औषधांच्या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवतात.

जेनेरिक औषधे कुठून येतात ?

युनायटेड स्टेट्समध्ये वापरल्या जाणार्‍या प्रिस्क्रिप्शन ड्रग्जपैकी ९० टक्के जेनेरिक औषधे आहेत आणि त्यापैकी बहुतेक परदेशात उत्पादित केले जातात जसे कि भारत आणि चीन.

जेनेरिक स्वस्त का आहे ?

जेनेरिक औषधे स्वस्त असतात कारण उत्पादन खर्चामध्ये औषधांचा विकास आणि विपणनाचा खर्च समाविष्ट नसतो. सामान्यता नवीन औषधांच्या खर्चामध्ये संशोधन, पेटन्सी, विकास, विपणन आणि जाहिरातीचा खर्च समाविष्ट असतो.

जेनेरिक औषध भारतात सुरक्षित आहे का ?

जेनेरिक औषध भारतात सुरक्षित आहे का या चिंतेमुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण होते की भारतात बनवलेली औषधे घेतल्याने अनपेक्षित परिणाम होऊ शकतात पण सुदैवाने, वस्तुस्थिती अशी आहे की भारतात उत्पादित केलेली जेनेरिक औषधे युनायटेड स्टेट्समध्ये बनवलेल्या औषधांइतकीच सुरक्षित आणि प्रभावी आहेत.

जेनेरिक औषधांच्या विषयी काही तथ्ये – facts about generic medicine 

 • जेनेरिक औषधांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होते आणि या प्रकारची औषधे हि अमेरिकेमध्ये विकली जातात.
 • अमेरीकेमध्ये ९० टक्के जेनेरिक औषधे वापरली जातात.
 • जेनेरिक औषधे हि फार्मास्युटिकल औषधा प्रमाणेच कार्य करतात आणि फार्मास्युटिकल औषधा प्रमाणेच लाभ देखील देतात.
 • जेनेरिक औषधे ब्रँड नावाच्या औषधांप्रमाणेच प्रभावी असतात.
 • टेवा, नोव्हार्टिस, सँडोज, अम्नील, मायलॅन आणि एंडो इंटरनॅशनल या काही जेनेरिक औषधांच्या कंपन्या आहेत.
 • जेनेरिक औषधांमध्ये ब्रँड नावाच्या औषधाप्रमाणेच सक्रिय घटक असल्याने, सक्रिय घटकाचे चांगले परिणाम आणि दुष्परिणाम सारखेच असतील.
 • जेनेरिक औषध ब्रँड नावाच्या औषधांप्रमाणेच कठोर मानकांनुसार तयार केले जाते.
 • जेनेरिक औषधे ही महाग आणि केमिकल युक्त फार्मास्युटिकल औषधांचा एक चांगला पर्याय आहे.
 • जेनेरिक औषधे कॅनेडियन रुग्णालयामध्ये सामान्यता त्यांचा पहिला पर्याय म्हणून निवडतात.
 • तेवा कॅनडा जेनेरिक आणि ब्रँड-नावाची दोन्ही औषधे बनवते.
 • जेनेरिक औषधांची किमत हि ब्रँड औषधांच्यापेक्षा ८५ टक्के कमी असते.
 • जेनेरिक औषधे ब्रँड-नावाच्या औषधांसाठी स्पर्धा निर्माण करतात कारण आरोग्यदायी स्पर्धा जी औषधोपचाराची सुलभता सुधारते, पैशाची बचत करते आणि नवकल्पना उत्तेजित करते.
 • बाजारामध्ये १२००० पेक्षा जास्त जेनेरिक औषधे ग्राहकांसाठी उपलब्ध असतात.

आम्ही दिलेल्या generic medicine information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जेनेरिक औषधांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या generic medicine information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of generic medicine in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये generic aushadhi chi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!