घरकुल योजनेची माहिती Gharkul Yojana Information in Marathi

gharkul yojana information in marathi घरकुल योजनेची माहिती आज आपण या लेखामध्ये घरकुल योजना या विषयावर माहिती पाहणारा आहोत. आपल्याला माहित आहे कि आपल्या देशाचे सरकार हे सतत आपल्या देशाचा आणि देशातील राहणाऱ्या लोकांनाच विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर ते लोकांचे राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना तयार करतात आणि त्या राबवतात. अशाच प्रकारे सरकार गरीब लोकांच्यासाठी वेगवेगळ्या घरकुल योजना राबवते आणि या योजनेमध्ये जे लोक ग्रामीण भागामध्ये चांगल्या आणि सुव्यवस्थित घरात राहत नाहीत किंवा ज्यांना घरे नाहीत अश्या लोकांना घरे दिली जातात.

तसेच अनेक लोक शहरामध्ये झोपडपट्टी किंवा फुटपाथवर राहतात आणि अशा लोकांना या योजनांच्या मार्फत चांगल्या सुविधा असलेली घरे पुरवतात. गरीब आणि झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना घरे पुरवण्यासाठी अशा अनेक योजना चालू केल्या आहेत जसे कि प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि संजय गांधी आवास योजना. चला तर आपण आता ह्या योजना कशा काम करतात आणि या योजनेअंतर्गत गरजू लोकांना घरे कशी पुरवली जातात ते आता आपण खाली पाहूया.

gharkul yojana information in marathi
gharkul yojana information in marathi

प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती – Gharkul Yojana Information in Marathi

रमाई आवास योजना – gharkul yojana information in marathi pdf

सरकार जनतेला चांगले राहणीमान देण्यासाठी सतत प्रयत्न करत असते आणि त्यामधील लोकांच्या कल्याणासाठी आणि निवारा देण्यासाठी रमाई आवास योजना हि महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्यासाठी सुरु केली आहे ज्या जाती ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये देखील राहतात. अनुसूचित जातीतील लोकांची आर्थिक परिस्थिती हि तशी चांगली नसते तर ती खूप बिकट असते त्यामुळे त्यांना चांगल्या प्रतीची आणि सोयी सुविधा असणारी घरे बंधने परवडत नाही त्यावेळी महाराष्ट्र अश्या लोकांना चांगल्या प्रतीची घरे पुरवते.

रमाई घरकुल योजनेच्या मार्फत पात्र व्यक्तींना १३२००० घरांच्यासाठी अनुदान दिले जाते आणि डोंगराळ भागातील क्षेत्रांना १४२००० रुपये अनुदान दिले जाते. रमाई घरकुल किंवा आवास योजना ह्या योजनेचे मुल्यांकन आणि या योजनेविषयी सर्व काम पाहण्यासाठी एक समितीची नेमणूक केली आहे आणि हि समिती योजनेतील अडचणी, निधी आणि योजनेतील तृटी या प्रकारचे काम पाहते म्हणजेच हि समती योजना राबवते. रमाई घरकुल योजना किंवा रमाई आवास योजना हि २०१६ मध्ये सुरु केली आहे.

रमाई घरकुल / आवास योजना काय आहे ?

रमाई आवास योजना हि महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्यासाठी सुरु केली आहे ज्या जाती ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये देखील राहतात.

रमाई घरकुल / आवास  योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?

रमाई घरकुल योजना हि महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे आणि हि योजना २०१६ मध्ये सुरु केली आहे.

प्रधान मंत्री आवास योजना 

प्रधान मंत्री आवास योजनेचे ( PMAY ) लक्ष हे सर्वांच्यासाठी घरे पुरवणे आणि हे भारत सरकारने घराच्या मालकी वाढवण्याच्या उद्देशाने केले आहे. आपल्या देशातील घरे नसलेल्या लोकांची किंवा जे लोक चांगल्या घरामध्ये राहत नाहीत अश्या लोकांची अडचण लक्षण घेवून आपले सध्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरु केली आणि त्या योजनेचे नाव म्हणजे प्रधान मंत्री आवास योजना ( PMAY ).

या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील घरांची कमतरता दूर करून लोकांना राहण्यासाठी चांगली घरे पुरवणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट होते. PMAY-G या योजने अंतर्गत सरकारने ग्रामीण भागातील जी मातीपासून बनलेली किंवा पाल्यापासून बनलेली घरे जी राहण्यासाठी योग्य नाहीत आणि अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना या योजनेमार्फत लाभ मिळवून दिला आणि त्यांना सिमेंट, वीट आणि लोखंड या पासून बनवलेली मजबूत घरे राहण्यासाठी पुरवण्याचे काम सरकारने या योजने मार्फत केले.

तसेच शहरी भागामध्ये देखील जे लोक चांगल्या घरात राहत नाहीत किंवा जे झोपडपट्टी भागात राहतात अश्या लोकांच्यासाठी देखील घरे पुरवण्याचे काम या योजने अंतर्गत करण्यात आले. ग्रामीण भागामध्ये या योजनेमार्फत घरे बांधण्यासाठी ११४ दिवसचा कालावधी असतो आणि या योजनेमार्फत सरकारने ग्रामीण भागामध्ये २०१९ पर्यंत १ कोटीच्या वरती घरे बांधण्याचा विक्रमी विजय मिळवला आणि या योजनेमध्ये घरे बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार पर्यंत निधी दिला जातो

प्रधान मंत्री आवास योजना कोणी आणि केंव्हा सुरु केली ?

आपल्या देहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पडणाऱ्या घरांच्या कमतरता लक्षात घेवून त्यांनी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना घरे पुरवण्यासाठी प्रधान मंत्री आवास योजना १ जून २०१५ रोजी सुरु केली होती.

प्रधान मंत्री आवास योजना म्हणजे काय ?

प्रधान मंत्री आवास ( PMAY ) योजने मार्फत ज्या लोकांना घरे नाहीत किंवा ज्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत अश्या लोकांना या योजनेमार्फत सरकार कडून घरे पुरवली जातात.

राजीव गांधी आवास योजना 

राजीव गांधी आवास योजनेचा मुख्य हेतू हा शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी साठी घरे पुरवणे. झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती आणि त्यांची समस्या लक्ष्यात घेवून भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी चांगल्या प्रतीची आणि मजबूत बांधलेली घरे पुरवण्यासाठी सरकारने राजीव गांधी आवास योजना ( RGAY ). राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी सरकार २०० हून अधिक शहरामध्ये करणार होते म्हणजेच केंद्र सरकार हि योजना २०० हून अधिक शहरामध्ये राबविणार आहे.

हि योजना अशा शहरामध्ये राबवली जाणार आहे ज्या ठिकाणी ५ लाखहून अधिक लोकसंख्या आहे. राजीव गांधी आवास योजना ( RGAY ) हि २ जून २०११ मध्ये सुरु झालेली योजना आहे. या योजनेचा लाभ हा अश्या शहरातील लोकांना मिळतो ज्या ठिकाणी जिल्हा मुख्यालये, ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक आणि ज्या ठिकाणी जास्त वस्ती आहे. जे लोक मोठ्या शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहतात असे लोक पात्र आहेत आणि अनुसूचित जाती आणि जमाती ( SC / ST ), समाजातील इतर असुरक्षित घटकांचे प्राबल्य असलेली शहरे आणि अल्पसंख्याक लोकसंख्या असणारी शहरे हि या योजनेचा लाभ घेवू शकतात.

राजीव गांधी आवास योजना (RGAY) म्हणजे काय ?

राजीव गांधी आवास योजना ( RGAY ) हि एक सरकारने शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे मिळवीत आणि आपल्या भारतातील शहरे हि झोपडपट्टी मुक्त व्हावीत म्हणून राजीव गांधी आवास योजना सुरु केली आहे.

राजीव गांधी आवास योजना कोणी केंव्हा व सुरु केली ?

राजीव गांधी आवास योजना ( RGAY ) हि भारताच्या केंद्र सरकारने शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना चांगली घरे मिळवीत म्हणून २ जून २०७७ या दिवशी चालू केलेली योजना आहे.

आम्ही दिलेल्या gharkul yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर घरकुल योजनेची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gharkul yojana information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gharkul yojana maharashtra information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!