महाराष्ट्र इतिहास मराठी History Of Maharashtra in Marathi

History Of Maharashtra in Marathi – Maharashtracha Itihas महाराष्ट्र इतिहास मराठी महाराष्ट्र हे भारतातील एक ऐतिहासिक राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या आहेत. भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्र स्थित आहे. महाराष्ट्र मध्ये जवळपास अकरा कोटी लोक राहत आहेत. महाराष्ट्र राज्याची मातृभाषा जरी मराठी असली तरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बारा कोसावर वेगवेगळी भाषा ऐकायला मिळते‌ महाराष्ट्रामध्ये साठ बोली भाषा आहेत. भारतामध्ये सर्वात मोठे तिसरे राज्य महाराष्ट्र आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसरे मोठे राज्य आहे. भारत आता विकसनशील होत चालला आहे आणि भारतातील विकसनशील राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राने अनेक महान व्यक्तिमत्त्व घडवले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा असे महान संत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले म्हणूनच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवला आहे. मोगल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच जन्माला आले. येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू तयार झाले.

history of maharashtra in marathi
history-of-maharashtra-in-marathi

महाराष्ट्र इतिहास मराठी – History Of Maharashtra in Marathi

महाराष्ट्राचा इतिहास – Maharashtracha Itihas

महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. ऋग्वेदामध्ये राष्ट्र, अशोकाच्या काळात राष्ट्रिक व पुढे महा राष्ट्र अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला वेगवेगळे नाव देण्यात आले. महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील शब्दावरून महाराष्ट्राला नाव देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय असे सांगण्यात येते. महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सारखा आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, उद्दीन खीलजी, मोहम्मद बिन तुगलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादींनी महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे भाग व्यापले होते. महाराष्ट्रातील विविध स्थळ, नदी, पर्वत.. रामायण व महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देतात.

महाराष्ट्राची भाषा व संस्कृतीचा विकास सातवाहन व राजा शालीवाहन, देवगिरीचे यादव यांच्या कालखंडामध्ये झाला. सातवाहन यांनी इसवी सन पूर्व २३० ते २२५ या कालावधीत महाराष्ट्रावरती सत्ता गाजवली. याच कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. सातवाहनांची राजभाषा महाराष्ट्री प्राकृत भाषा होती. शालिवाहन यांनी सुरू केलेला शालिवाहन शक पंचांग आजही सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकांमध्ये इस्लामी सत्ता होती.

तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग जिंकले होते नंतर विजापूरच्या सुलतानांनी महाराष्ट्रावर सुमारे १५० वर्षे राज्य केलं. सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं आणि मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथून पुढे महाराजांच्या राज्याची अधिकृत सुरुवात झाली.

वडिलांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची सुत्रे पुढे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या हातात आली‌. त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील मराठा साम्राज्याचा विस्तार झाला‌‌. परंतु मोगल बादशहा औरंगजेब यांनी त्यांना पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्यची घडी मोडकळीला आली परंतु पुढील दशकांमध्ये मराठा साम्राज्यावर्ती पेशव्यांनी राज्य केले. पेशवे हे मराठा साम्राज्याचे प्रतिनिधी होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांच्या कारकीर्दीमध्ये मराठा साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पोहोचल्या.

१७६१ शाली पानिपतची तिसरी लढाई घडली ज्यामध्ये मराठी साम्राज्याचा मोठा पराभव झाला. पुढे इंग्रज भारतात आल्यानंतर मराठे व ब्रिटिशांच्या मध्ये युद्ध झाले. १८१८ च्या भिमा कोरेगाव लढाईनंतर पेशवे व मराठा साम्राज्याचा अंत झाला. इंग्रजांनी पुढे भारता वरती दोन शतके सत्ता गाजवली. ब्रिटिशांनी नागरी सोयी-सुविधा आणल्या परंतु त्यासोबत ते जनतेचे हाल करू लागले. पुढे लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला कालांतराने मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनले.

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रांत व राज्यांची पुनर्रचना घडवून आणली परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला होता. सरकारच्या या निर्णयामागे महाराष्ट्रातील जनतेचा विरोध होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं गेलं यामध्ये १०५ व्यक्तीने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकारला महाराष्ट्रामध्ये मुंबई सामील करायची नव्हती. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट इत्यादी मुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ घडली.

Maharashtra History in Marathi

आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. परंतु बेळगाव व गुजरात येथील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्र मध्ये समाविष्ट केला गेला नाही आणि आजही बेळगावसह ६६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दख्खनचा पठारी प्रदेश, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वत रांगा, या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा कृष्णा यांसारख्या उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्यभागस कोकण म्हटलं जातं. जो महाराष्ट्रातील निसर्गरम्य विभाग आहे. आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण देखील. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे जिथे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या राहते जिला भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी देखील म्हटले जाते. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते शिक्षण व संशोधन संस्थां येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असून पर्यटकांचे मुख्य आकर्षण व अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे येथे आढळतात. नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर मानलं जातं जिथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो जो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुर स्थान अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे‌.

सोलापूर हे महाराष्ट्रातील दक्षिण भागात वसलेले असून ते कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबतच अमरावती, सातारा, नांदेड इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख शहरे मानली जातात. ३६ जिल्हे समावून घेणारा महाराष्ट्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राला ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, आर्थिक वारसा लाभलेला आहे सोबतच महाराष्ट्रात रस्ते, चांगले लोहमार्ग, स्वस्त उपाहारगृहे धर्मशाळा आहेत.

महाराष्ट्रात असणारे ऐतिहासिक किल्ले इतिहासाची साक्ष देतात ते पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रीय किंवा मराठी माणूस असं संबोधलं जातं. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त हिंदू धर्मीय लोक आढळून येतात. परंतु त्यासोबतच बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख व पारशी धर्मीय लोक देखील आहेत. महाराष्ट्र हे एक ऐतिहासिक राज्य आहे.

महाराष्ट्र मध्ये असणारी अनेक मंदिरे कित्येक शतके जुनी आहेत. औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्र मध्ये गोंधळ, लावणी, भारुड, अभंग, पोवाडा इत्यादी लोकसंगीताचे प्रकार लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक बारा कोसावरती भाषा बदलत जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील भागानुसार बदलते.

महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक वेश नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर सदरा किंवा पायजमा असा आहे. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमीगणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकप्रिय सण आहे जो आज देशभर सर्वत्र साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या history of maharashtra in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र इतिहास मराठी माहिती maharashtra marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharashtracha itihas या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtra history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये history of maharashtra in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!