आकर्षक गोवा बीच माहिती Goa Beaches Information in Marathi

Goa Beaches Information in Marathi गोवा बीच विषयी माहिती गोवा म्हंटलं डोळ्यासमोर येतो तो गोव्यामध्ये असणारा समुद्र आणि आणि समुद्राकाठी असणारे बिच. आज या लेखामध्ये आपण गोवा बिच या विषयावर माहिती घेणार अहोत. गोवा हे मुंबई (बॉम्बे) च्या दक्षिणेस सुमारे २५० मैल (४०० किमी) अंतरावर आहे त्याचबरोबर हे शहर भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे आणि हे उत्तरेस महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जवळ आहे. या शहराला पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे त्यामुळे गोवा या शहराला विलक्षण सुंदर वालुकामय समुद्रकिनारे लाभले आहेत.
गोवा या शहराला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी असून गोवा प्रत्येक पर्यटकांच्या प्रवासासाठी महत्वाचे ठिकाण आहे आणि येथील सूर्य, वाळू आणि समुद्र – समुद्रकिनारे हे प्रमुख आकर्षण आहेत आणि ज्यांना विश्रांतीची गरज आहे त्यांच्यासाठी गोवा एक परिपूर्ण स्वर्ग आहे. चला तर मग आता आपण गोव्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुंदर, आकर्षक, विलक्षण आणि मनमोहक बीचेसची सफर करूयात.
goa beaches information in marathi
goa beaches information in marathi

गोवा बीच माहिती मराठी – Goa Beaches Information in Marathi

शहराचे नावगोवा
आकर्षनसमुद्र किनारपट्टी आणि बीचेस
किनारपट्टी१३१ किलो मीटर
ओळखस्वातंत्र्य राज्य म्हणून गोव्याची ओळख आहे.
गोव्यातील लोकप्रिय बीचअंजुना बीच, बागा बीच, मोरजीम बीच आणि मोबोर बीच

गोव्यामधील विविध बीच 

beaches of goa गोवा हे एक असे शहर आहे ज्या शहराला असे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे कि हे सौंदर्य पाहून मन अगदी भारावून जाते. आपल्या सर्वांना माहीतच आहे कि गोवा ह्या शहराला १३१ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत असतात.

अश्याच पर्यटकांच्यासाठी खासकरून जे beach lover आहेत त्यांच्या साठी काही आकर्षक आणि मनमोहक गोव्यातील बीच खाली दिले आहेत.

कॅंडोलिम बीच

कॅंडोलिमचे बीच हे एक विश्रांतीचे ठिकाण आहे आणि हे गोव्यातील साहसी खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी लाभलेला एक उत्तम समुद्र किनारा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी तरुण मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्यावर येतात. आपण कॅंडोलिममध्ये असल्यास, वेकबोर्डिंगचा प्रयत्न जरूर करा कारण हा एक मजेदार पाण्यातील खेळला जाणारा खेळ आहे.

मोरजीम बीच

गोवा या राज्याची राजधानी असणाऱ्या पणजी या शहरापासून उतरेकडे असणारा हा मोरजीम बिचा हे खूप सुंदर आणि प्रसिध्द बीच पैकी एक आहे. मोरजीम या बीचला शांत आणि गोव्यातील कमी गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ शकते. खरं तर, काईट सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी हा मोरजीम समुद्रकिनारा चांगले ठिकाण आहे.

या ठिकाणी आपण विंडसर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि पॅराग्लायडिंग या सारख्या साहसी खेळांचा देखील आनंद घेवू शकतो. 

अंजुना बीच

क्लासिक गोआन वाइब अनुभवण्यासाठी अंजुना बीच सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दिवसा, हा भव्य समुद्रकिनारा त्याच्या चमकत्या पांढऱ्या वाळूने भरलेला आहे आणि संध्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर, तेथे मोहक नाईट लाईफचा आनंद घेवू शकतो. अंजुना बीच हे रात्री गोव्याला भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक बनते.

दर बुधवारी येथे होणारा पिसू बाजार गर्दी करणारा असतो. या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला चापोरा किल्ला तसेच इ. स १९२० मध्ये बांधलेली अल्बुकर्क हवेली पाहायला मिळेल जी अष्टकोनी बुरुजांनी आणि आकर्षक मंगलोर टाइलच्या छप्परांनी बांधलेले आहे.

कळंगुट बीच – calangut beach in goa information in marathi

कॅंडोलिम ते बागा पर्यंत पसरलेल्या ह्या कळंगुट बीचला गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची राणी म्हणून प्रतिष्ठा प्राप्त आहे. हा निसर्गरम्य पांढरा वाळू असणारा समुद्रकिनारा गोव्यातील साहसी जल क्रीडा सत्रात सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठी स्वर्ग आहे, ज्यात स्पीड बोट राइड्स, बनाना राईड्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे.

बागा बीच – goa baga beach information in marathi

गोव्यातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे बागा बीच असून हा मोरजीम बीचच्या थोडा पुढे आहे. या बीचवर शांत वातावरण आहे तासेल आपल्याला या बीच वरून आपल्याला सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येतो.

जसे कि समोर पाण्याने भरलेला समुद्र त्यामधील निळसर लाटा आणि संध्याकाळच्या वेळी काही सूर्याची मनमोहक दृश्ये. आपण बागा बीच वर स्पीड बोट आणि वॉटर स्की या सारख्या पाण्यातील मजेदार खेळांचा आनंद घेवू शकता.

कोल्वा बीच – colva beach goa information in marathi

गोव्यातील प्रसिद्ध बीच पैकी एक म्हणजे कोल्वा बीच आणि हि किनारपट्टी साहसी खेळांच्यासाठी खूप लोकप्रिय आहे कारण या किनाऱ्यावर पांढऱ्या रंगाची मऊ वाळू आहे त्यामुळे त्यावर खेळायला खूप चं वाटते. या ठिकाणी जेट स्कीइंग आणि पॅरासेलिंग या सारखे खेळ खेळू शकता. या ठिकाणी २.५ किलो मीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या समुद्र किनाऱ्यावर नोव्हेंबर पासून फेब्रुवारी महिन्यापार्यात खूप गर्दी असते आणि कोल्वा हे बीच पर्यटकांचे गोव्यातील एक मुख्य आकर्षण आहे.

वॅगेटर बीच

वॅगेटर हा बीच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे कारण या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पांढरी वाळू, उंच खडक आणि समुद्र किणाऱ्यावर खजुराची आणि नारळाची झाडे आहेत. वॅगेटर हे बीच गोवा या राज्याची राजधानी असणाऱ्या पणजी या शहरापासून २१ ते २२ किलो मीटर अंतरावर आहे.

पालोलेम बीच

गोव्यामध्ये तुहाला जर राहायचे असेल तर पालोलेम बीच या ठिकाणी तुमची राहायची सोय चांगल्या प्रकारे होऊ शकेल कारण या ठिकाण कोको झोपड्या बनवल्या आहेत जेथे प्रवाशी आपली रात्र घालवू शकतात.

मोबोर बीच

साहसी खेळांच्यासाठी ओळखले जाणारा गोव्यातील एक महत्वाचा बीच म्हणजे मोबोर बीच. ज्या लोकांना साहसी खेळ आवडतात त्यांच्यासाठी हा बीच एक परिपूर्ण बीच आहे. मोबोर या बीचवर आपण वॉटर स्की, स्पीड बोर्ड, बनाना राईड्स, पॅरासेलिंग, वॉटर राइड्स आणि वॉटर सर्फिग या सारखे अनेक खेळ या बीचवर खेळले जातात.

गोव्याला कसे जायचे ?

हवाई, रेल्वे आणि रस्ता वाहतुक या सर्व माध्यमांद्वारे गोवा हे राज्य भारताशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे आपण गोव्याला हवाई मार्गे, रेल्वे मार्गे किंवा रस्ता मार्गे जावू शकतो.

हवाई मार्गाने

पणजीपासून २ km किमी दूर दाबोलीम येथील गोवा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे भारतातील सर्व प्रमुख शहरांसह आणि कतार, दुबई, शारजाह, कुवेत, ब्रिटन, जर्मनी आणि रशिया सारख्या इतर देशांशी जोडलेले आहे. आपण या विमानतळावर येऊन तेथून टॅक्सी भाड्याने घेवून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य पाहू शकतो.

रस्त्याने

मुंबई आणि जवळच्या गोवा शहरातून नियमित डीलक्स बस सेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपण गोव्याला आपल्या स्वताच्या करणे देखील भेट देवू शकतो कारण स्वताची करा असेल तर ते खूप फायद्याचे ठरेल कारण आपल्याला गोव्यातील बरीचसी पर्यटन स्थळे पाहायला मिळतील.

रेल्वेने

गोवा रेल्वे स्टेशन ( वास्को द गामा ) प्रमुख शहर उत्तर किनारपट्टी आणि दक्षिण किनारपट्टीला जोडते. आपण कोणत्याही मुख्य शहरातून गोवा रेल्वे स्टेशनची रेल्वे पकडून गोव्याला येवू शकतो.

आम्ही दिलेल्या goa beaches information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोवा बीच विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या goa beach information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of goa beaches in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये goa in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!