सूर्याची माहिती Sun Information in Marathi

Sun Information in Marathi सूर्याची माहिती सूर्याला पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा महणून ओळखले जाते तसेच सूर्य आपल्या जीवनासाठी अवश्यक असणारा प्रकाश आणि उष्णता पुरवते आणि त्यामुळेच पृथ्वीवरील जीवन बहरते. सौर मंडळातील दुसऱ्या ताऱ्यांशी तुलना केली तर सूर्य हा सर्वात मोठा तारा आहे ज्याचे वस्तुमान ९९.८ % इतके आहे आणि पुथ्वीपेक्षा १०९ पट मोठा आहे. या सूर्याचा व्यास १३,९०,००० आहे आणि हा हायड्रोजन आणि हिलीयम पासून बनलेला आहे. सूर्य हा सौर मंडळातील महत्वाचा भाग असून सौर मंडळाचा केंद्र बिंदू आहे आणि सर्व तारे आणि पृथ्वी सुद्धा त्याच्याभोवती फिरते.(surya chi mahiti)

sun-information-in-marath
sun information in marathi

सूर्याची माहिती – Sun Information in Marathi

सूर्याची निर्मिती कशी झाली – How was the sun formed ?

सूर्याची निर्मिती बहुतेक ४.५ अरब वर्षा अगोदर झाली. बरेच शास्त्रज्ञ असे मानतात कि सौर मंडळाची निर्मिती महाकाय अश्या फिरणाऱ्या मॉलुक्युल गॅसचा ढग ज्याला आपण नेभ्यूला (nebula) असे म्हणतो. तो गुरुत्वाकर्षनामुळे ढासळला आणि मग ते वेगाने फिरू लागले त्यानंतर ते डिस्क सारख्या चपट्या आकाराचे झाले आणि ते फिरत असतान काही भाग मध्य भागी सूर्याची निर्मिती करण्यासाठी ओढून घेतला गेला.

सूर्याची रचना The structure of the sun 

सूर्याच्या आतील थर

 1. कोर
 2. रेडिएटिव्ह
 3. कन्व्हेक्टिव्ह
 4. फोटोसफेयर
 5. क्रोमोस्फीयर
 6. संक्रमण क्षेत्र

सूर्याचा आतील भाग कित्येक थरांमध्ये विभागले गेले आहे. सूर्याचा सर्वात आतील भाग म्हणजे कोर त्यानंतर येतो रेडिएटिव्ह झोन आणि कन्व्हेक्टिव्ह आणि सूर्याच्या वरील सौर वातावरणामध्ये फोटोसफेयर, क्रोमोस्फीयर, एक संक्रमण क्षेत्र आणि कोरोना असते. कोर भाग हा सूर्याच्या मध्यभागी असतो आणि ते पृष्ठ भागाच्या चतुर्थांश भागापर्यंत पसरलेले असते कोर हे सूर्याच्या परीमानापेक्षा २ टक्के आहे.

त्यानंतर येतो तो रेडिएटिव्ह झोन जो सूर्याच्या पृष्ठ भागाकडे ७० टक्के व्यापलेला असतो. रेडिएटिव्ह या भागात कोरमधून प्रकाश पसरला आहे. संवहन क्षेत्राने हा सूर्याच्या पृष्ठ भागापर्यंत पसरलेला आहे आणि सूर्याच्या परिमाणात ६६ टक्के भाग तयार करते पण वस्तुमानाच्या २ टक्के भाग जास्त असतो. वायीचा छत असलेल्या या संवहन पेशी या भागावर अधिराज्य गाजवतात.

फोटोसफेयर हा सूर्याच्या वातावरणाचा सर्वात निचला स्तर आहे आणि तो स्तर आपण पाहत असलेल्या प्रकाशाचे उत्सर्जन करतो आणि हा थर ५०० किलोमीटर लांब आणि जाड असतो आणि यातील तापमान ६१२५ सेल्सियस ते ४१२५ सेल्सियस पर्यंत असते. पुढचा थर येतो तो क्रोमोस्फेयर ज्याचे तापमान १९७२५ सेल्सियस इतके असते.

चिकट संरचनाला स्पिक्युलस म्हणून ओळखले जाते जे १००० किलोमीटर लांब आणि  १०००० किलोमीटर उंच असते. त्यानंतर येते ते संक्रमण क्षेत्र जे काही मैल जड आहे आणि वरील गरम थर हा कोरोन आहे जो अल्ट्राव्हायोलेट किरणांप्रमाणे शेड करतो आणि याचे तापमान पाच लाख ते ६ दशलक्ष सेल्सियस पर्यंत असते आणि जेव्हा सौर ज्वाला उद्भवते तेव्हा कोट्यावधी डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचू शकते.

सूर्यग्रहण मराठी माहिती

 

सौर मंडळा – solar system 

आता आपण सौर मंडळाबद्दल थोडक्यात माहिती घेवूया सौर मंडळ म्हणजे सूर्य आणि गुरुत्वाकर्षानामुळे सूर्याभोवती फिरणारे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्युन हे ग्रह . बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत आणि या ग्रहांना लघुग्रहांचा पट्टा असेही म्हटले आहे हे ४ ग्रह सूर्याच्या खूप जवळ आहेत. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्युन हे बहिर्ग्रह आहेत. सूर्य आणि या ग्रहाबद्दल थोडक्यात माहिती.

सूर्य : सूर्य हा सौर मंडळाचा केंद्रबिंदू असून त्याचा व्यास सुमारे १३,९०,००० इतका आहे . सूर्याचे गाभ्याचे तापमान १,६०,००० डिग्री सेल्सियस आहे तर पृष्ठभागाचे तापमान ६००० डिग्री सेल्सियस आहे. सूर्याचे वस्तुमान इतके मोठे आहे कि त्यामध्ये १३ लाख ग्रह बसू शकतात

बुध : बुध हा ग्रह सौर मंडळातील सर्वात लहान ग्रह असून त्याचा व्यास ४८७८ इतके आहे जो पृथ्वीवरून सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. या ग्रहाचा स्वताभोवती फिरण्याचा काळ (परिवलन काळ) ५९ दिवस असतो आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ ( परिभ्रमण काळ ) ८८ दिवस असतो.

शुक्र : शुक्र या ग्रहाचा व्यास १२१०४ किलोमीटर इतका आहे आणि हा सौर मंडळातील तेजस्वी ग्रह आहे. या ग्रहाचा परिवलन काळ २४३ दिवस आहे आणि परीभ्रमण काळ २२५ दिवस आहे.

पृथ्वी : पृथ्वीचा व्यास १२७५६ म्हणजेच शुक्रपेक्षा किंचित जास्ती आहे आणि पृथ्वी हा जीवसृष्ठी असणारा एकमेव ग्रह आहे. परिवलन काळ १ दिवस लागतो आणि परिभ्रमन काळ ३६५ दिवस आहे.

मंगळ : मंगळ या ग्रहाचा व्यास ६७९५ किलो मीटर आहे आणि या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर २२,७९,३६,६४० किलो मीटर आहे. या ग्रहाचा परिवलन काळ २४ तास ३७ मिनिटे आहे आणि परिभ्रमण काळ ६८७ दिवस आहे.

गुरु : या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर ७७,८४,१२,०१० किलो मीटर इतके आहे आणि हा ग्रह पृथ्वीच्या ३ पट आकाराने मोठा आहे. या ग्रहाचा परिवलन काळ ९ तास ५० मिनिटे आहे आणि परिभ्रमण काळ १२ वर्ष आहे.

शनी : शनी या ग्रहाचा व्यास १,२०,५३७ किलो मीटर आहे आणि खडकापासून तयार झालेला ग्रह ज्याचा परिवलन काळ १० तास ४० मिनिटे आहे आणि परिभ्रमन काळ २९ वर्ष आहे.

युरेनस : युरेनस या ग्रहाचा व्यास ५१,११९ किलो मीटर इतका आहे आणि याचा परिवल काळ १७ तास २४ मिनिटे आहे आणि परिभ्रमन काळ ८४ वर्ष आहे.

नेपच्युन : नेपच्युन हा सौर मंडळातील शेवटचा ग्रह ज्याचा व्यास ४९,५२८ किलो मीटर इतका आहे. हा ग्रह थंड असतो कारण तो सूर्यापासून खूप लांब आहे. या ग्रहाचा परिवलन काळ १६ तास ११ मिनिटे आहे आणि परिभ्रमण काळ १६४ वर्ष.

सुर्याबद्दल हे तुम्हाला माहित आहे का

 • भारत देशामध्ये सर्वात आधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशातल्या डोंग व्हॅलीमध्ये होतो.
 • सूर्याचे किरण सात रंगानी बनलेले आहे ते सात रान म्हणजे केशरी, लाल, जांभळा, निळा, आकाशी, हिरवा आणि पिवळा.
 • सूर्य उगवताच सूर्यापासून येणारी किरणे पृथ्वीपर्यंत पोहचण्यासाठी ८ मिनिटे ४० सेकंद इतका वेळ लागतो.
 • जर अंतराळातून सूर्य पहिला तर तो पांढऱ्या रंगाचा दिसतो.
 • सूर्य उगवताना आणि मावळताना सूर्याचा रंग नारंगी असतो.

सूर्यप्रकाशाचे परिवर्तन पृथ्वीवरील वातावरणातील

सुर्याबद्दलची काही महत्वाची तथ्ये – facts of sun 

 • सूर्य प्रती सेकंदात २२० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करू शकतो
 • सूर्याकडे एक चुंबकीय क्षेत्र आहे.
 • सूर्य पृथ्वीच्या उलट दिशेने फिरतो.
 • सूर्याच्या कोरद्वारे निर्मीत ऊर्जा अणु संलयन आहे.
 • सूर्याच्या पृष्ठ भागाचे क्षेत्रफळ पृथ्वीच्या ११९९० पट आहे.
 • प्रत्येक वर्षी सूर्यापासून पृथ्वीचे अंतर बदलते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि सूर्य हा ग्रह कसा आहे त्याचे काम काय आहे? तसेच सुर्याबद्दल महत्वाची तथ्ये काय आहेत? sun information in Marathi/ information about sun in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच sun in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सूर्याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!